आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाताना केसाला काळा रबरबँड लावत होते. हो, रबरबँडच. इथे अमेरिकेत बहुतेक त्याला हेअरबँड म्हणतात. पण माझ्या लहानपणी आम्ही याला रबरबँडच म्हणत असू. वॉकला जाताना केस बांधून गेलेलंच बरं पडतं. केसांचा गुंता होत नाही आणि घामाने केस चेहर्यावर चिकटतही नाहीत. इथे या शहरात चालण्यापेक्षाही धावण्याचं मोठं प्रस्थ! सकाळी कितीतरी मुलं, मुली, काका, काकू, आजी आजोबा सुद्धा इथल्या नदीकिनारी असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरून धावताना दिसतात. मला मॉर्निंगवॉकची सवय पण इथे येऊनच लागली. माझा नवरा पळायला जातो पण मी त्याला म्हणाले मला आधी नित्यनेमाने चालणं जमलं तरी पुष्कळ आहे. शिवाय इथे चालणारे अगदीच नसतात असंही नाही. आपल्याच नादात गाणी ऐकत जाणारे, कुत्र्याला फिरवणारे किंवा मैत्रिणीशी/मित्राशी गुजगोष्टी करत चालणारे खूप असतात. मला मात्र एकटीलाच फिरायला आवडतं. तेवढाच स्वतःला दिलेला वेळ!
तर आज केस बांधताना लक्षात आलं की लहानपणी हे असे रेशीम गुंडाळलेले रबरबँड आम्ही हमखास टाळत असू. त्याने केस लूज बांधले जातात आणि थोड्यावेळाने हे बँड्स कधी सुटून पडून जातात कळतही नाही. इथे नाइलाज म्हणून ते वापरतेय खरी. पण भारतात असताना किती काय काय प्रकार मिळायचे केसांना लावायला. मन एकदम शाळा कॉलेजच्या दिवसांतच गेलं.
शाळेत असतानाचे सोबती होते साधे छोटे छोटे रबरबँड्स. वेण्या घालून झाल्या की त्यांच्या शेंड्यांना रिबीनीच्या आतून लावायला. अजून काही शाळेत चालतच नसे. पण तेव्हा बाहेर जाताना लावायला मात्र अगदी फॅशनेबल रंगीबेरंगी रबरबँड्स होते. कित्येकदा त्याला मणी, प्लॅस्टीकची फुलं, लोलक, पिसं असं काय काय लावलेलं असायचं. असले रबरबँड्स लावून बाहेर जायला मी अगदी खुश असायचे. त्यात पुन्हा ते खराब झाले की त्याला लावलेला हा सगळा खजिना हस्तगत करता यायचा. प्रत्येक ड्रेसला मॅचिंग रबरबँड्स ची जोडी आणण्यासाठी मी आईकडे हट्ट करायचे.
पुढे कॉलेजमधे गेल्यावर तर काय केसांना लावायच्या वस्तूंचे कित्तीतरी पर्याय हाती आले. सर्वात आधी आवडली ती बनाना क्लिप. काहीकाही मुलींचे केस त्यात खूप सुंदर बसायचे आणि दिसायचे. पण आमचे केस इतके सुळसुळीत की त्या क्लिपा केसांना लावल्या की काही मिनीटांतच घसरून खाली यायच्या. मग बटरफ्लाय क्लिप नावाचं मोठ्ठं प्रकरण सापडलं. त्यात मात्र केस मस्त बसायचे. आणि त्या क्लिपा तरी किती सुंदर. अगदी नावाप्रमाणे. आत्तासारख्या या क्लिपा छोटुकल्या मात्र अजिबात नसत. मग टेलिफिनच्या वायरप्रमाणे दिसणारं काहीतरी होतं जे ब्रेसलेट म्हणून पण वापरता यायचं. केसांना लावायला रंगीबेरंगी बीड्स मिळायचे.
एक पॉमपॉम नावाचं काहीतरी कापडी मिळायचं. यात तर इतकी व्हरायटी होती आणि इतके रंग की काही विचारूच नका. ते एक स्टाइल स्टेटमेंटच होऊन बसलं होतं. माझ्याकडे बांधणीच्या कापडाची, सिल्कची थोडी महागातली अशी, काही काळी-पांढरी वगैरे अशी खूप पॉमपॉम्स असत तेव्हा. आता बहुतेक ही मिळत नाहीत. मधेच कधीतरी 'अशिकी' सिनेमा आला होता तेव्हा रंगीबेरंगी नेटच्या रिबीनींची फॅशन आली होती. तश्या पण एक-दोन अर्थातच होत्या माझ्याकडे.
बाकी कुठे छान नटून बाहेर जायचं असेल तर मात्र केस मोकळेच सोडायचे मी. तो एक सोपस्कारच असायचा. शॅम्पू करून, छान ड्रायरने केस जमतील तेवढे नीट सेट करून बाहेर पडेपर्यंत भरपूर वेळ जायचा. पण स्वतःचेच ते सिल्की, चमकदार केस पाहून मनाला अश्या काही गुदगुल्या व्हायच्या म्हणता! आता केस कापण्याच्या बाबतीत टंगळमंगळ करणारी मी तेव्हा मात्र अगदी नियमित केस ट्रिम करत असे.
एका साध्या छोट्या रबरबँडने भूतकाळाची केवढीतरी मोठी सफर काही क्षणांत घडवून आणली. नवर्याची हाक आली 'अगं, जाणारेस ना वॉक ला?' आणि मी एकदम भानावर आले. तेव्हा स्वतःला अपटूडेट फॅशनेबल ठेवत होते तसंच पुन्हा एकदा करून पहावं असा मी मनोमन निश्चय केला आणि नव्या उमेदीने वॉकसाठी बाहेर पडले.
लेख वाचून तुळशीबाग आठवली!
लेख वाचून तुळशीबाग आठवली! एकदा माझ्या भाचीने मॉलमध्ये हेअरबँड घेण्याचा हट्ट केल्यावर ताईने ह्यापेक्षा तुबामध्ये छान आणि स्वस्त मिळतील असं म्हटल्यावर तिथल्या विक्रेत्या मुलीने चक्क तुझी आई बरोबर सांगते आहे तिचं ऐक अशी माझ्या भाचीची समजूत काढली होती
तुळशीबागच आली आहे माबोवर
तुळशीबागच आली आहे माबोवर ओढणी, रबरबँड, आता चपला, टिकल्या येऊ द्या
मस्त लेख . शाळेत असताना माझे
मस्त लेख .
शाळेत असताना माझे केस कायमच छोटे होते . त्यामुळे हेअरबँड होताच . त्यातही शाळेचा नियमाप्रमाणे काळा रंगाचाच हेअरबँड कँपलसरी .
तेव्हा शाहरुख काजोलचा कुछ कुछ होता है रिलीज झाला होता. तेव्हा त्या सिनेमात काजोलने जसा हेअरबँड वापरलाय तसा वापरायची फॅशन आलेली. पण तो बँड फार घट्ट बसायचा डोक्याला .
नंतर मध्ये चमचमीत रंगाचे बँड बाजारात आलेले. मुंबईच्या लोकलमध्ये सर्रास मिळतात अजूनही . ते वापरून एकदम गर्ली, फ़ंकी लूक येतो .
अजूनही केस मध्यम लांबीचे असल्याने मी हेअरबँड वापरते .
वा वा! सेक्स अॅण्ड द सिटी
वा वा!
सेक्स अॅण्ड द सिटी च्या एका एपिसोड मध्ये स्क्रन्ची वापरणारी बाई न्यू यॉर्क ची असूच शकत नाही असा एक टॉपिक होता , तो आठवला.
अगदी छोट्या छोट्या फुटकळ
अगदी छोट्या छोट्या फुटकळ गोष्टींनी नॉस्टॅल्जिक होत त्यावर लगेच लिहिणं हे वय वाढत चालल्याचं लक्षण म्हणावं का?
भूतकाळाची सफर ... अरे यार
भूतकाळाची सफर ... अरे यार निदान टायटल मध्ये वॉर्निंग तर द्यायची...
रबरबँड 'ओढणी' ला मॅचींग आहे
रबरबँड 'ओढणी' ला मॅचींग आहे का?
तसं असेल तर पुढचा धागा नक्की 'पुरुषांना अगोदर "घेऊ" दे' असणार तुमचा.
"पुरूषांना देवू दे" असा असणार
"पुरूषांना देवू दे" असा असणार गं.. नेहमी पुरूषांनी मारूती नायतर होंडाच का चालवायची Daewoo चे ट्रक ही चालवावे असा धागा काढेल.
तुझी आई बरोबर सांगते आहे तिचं
तुझी आई बरोबर सांगते आहे तिचं ऐक
कॉलेजला असताना मलाही लांब केस आणि कपाळबँडचा खूप शौक होता. राठ वाढलेले केस ज्यातून कंगवाही बिनपाण्याचे एकटादुकटा फिरण्याचे धाडस करू नये असे ते पुढून उचलून मोठ्ठाले कपाळ उघड्यावर पाडले की छान दिसायचे. त्यात दाढी वाढली की आणखी भारदस्तपणा यायचा. काहीजण अभिषेक बच्चन म्हणून हाक मारायचे, पण त्याने असे कधी केलेले मला माहीत नाही, मी तरी त्याला बघून काही कॉपी केले नव्हते.
हल्ली मात्र ऑफिसला असे काही करून जायची सोय नसल्याने हा शौक घरच्या घरीच भागवतो.
मात्र या लेखाने बरेच आठवणी जागवल्या त्याबद्दल धन्यवाद. रात्रीचे दोन वाजत आले नसते तर दहाबारा लिहून काढल्या असत्या
(No subject)
मी आधी रमडबँड वाचलं.
मी आधी रमडबँड वाचलं.
रबरबँड 'ओढणी' ला मॅचींग आहे
रबरबँड 'ओढणी' ला मॅचींग आहे का? >>> वाटतयं तर खरं , भारी जमलयं
पुरुषांना अगोदर "घेऊ" दे' >>> कित्ती त्रास देताय गरीब बिच्चार्या पुरुषांना .
रबरबॅड व रिबिनी. बहिणींना
रबरबॅड व रिबिनी. बहिणींना पिडायला मज्ज यायची.
बहिणींना पिडायला मज्ज यायची.
बहिणींना पिडायला मज्ज यायची. <<< हो. डिस्को रबरबँड म्हणूनही एक असायचे.
भांडणात रबरबँड तोडले की प्रतिपक्ष ते तोडलेले रबरबँड ताणून त्वचेवर चटके उमटवायचा.
बॅक इन द सेवंटीज एक दो बदन
बॅक इन द सेवंटीज एक दो बदन म्हणूनही प्रकार मिळायचा. एका रब्बरात दोन प्लास्टिकचे क्रिस्टली मोठे मणी असायचे. मध्ये केस घालून मग ते मणी एकात एक गुंतवायचे. मला कित्ती वर्श बदन म्हणजे शरीर हे माहीतच नव्हते त्यामुळे हिंदी गाण्यात बदन पे सितारे वगिअरे आले की हे दो बदनच आठवायचे. आम्ही कधीकधी स्मार्ट पणे त्याला दोबटण म्हणायचो.
तुमच्याकडे बॉबी लिहीलेली कंपास्पेटी होती का? आम्ही दहावीत असताना कोट्रेड( ते कोटेड आहे हे खूप दिवसांनी कळले. ) रबरं आली. नाहीतर साध्या रबरात केस गुंतून तुटत. ओढले पण जात. हाँग काँग लेन ला जायला पाहिजे परत एकदा.
रमड, यात तुमच्या नवर्याचे
रमड, यात तुमच्या नवर्याचे नाव (सगळ्या जगाला हे नाव तुमच्या धन्याचेच आहे हे माहित असेल असे गृहित धरून लिहलेले) आलेले नाही. त्याऐवजी दोनतीनदा 'नवरा' असे लिहिलेय.
सो मी काही मार्क्स कट करत्येय!
तो सिनेमा "आशिकी" नाही "मैने
तो सिनेमा "आशिकी" नाही "मैने प्यार किया" भाग्यश्री बैनी केली ती नेटवाली रिबीन फेमस.
नाही नाही आशिकीच माझ्याकडे
नाही नाही आशिकीच माझ्याकडे पण होती ती नेटवाली रिबीन. आम्ही तिला आशिकी रिबीनच म्हणायचो
थँक्यू सर्वांना - rmd
थँक्यू सर्वांना
- rmd
भाग्यश्री ने नेट रिबीन फक्त
भाग्यश्री ने नेट रिबीन फक्त आते जाते वा फेमस फाईट च्या वेळी घातली होती('एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते ' वगैरे वगैरे)
फेमस वाली जाळी रिबीन अनू अगरवाल चीच.त्यात पण एक स्वस्त वाली मिळायची ज्यावर तारे म्हणून प्लॅस्टिक चे पॅच, आणि एक महाग वाली ज्यावर लेसी एम्रॉयडरी चे तारे.
एक भयंकर हवाईयन दिसणारं प्लॅस्टिक चं फूल पण मिळायचं, त्याच्याखाली आडवी क्लिप असायची बहुतेक.
आणि लोकल मध्ये एक बाई यायची ते काळं मेटल चं सूर्यफूल घेऊन.त्याने ५ हेअर स्टाईल करुन डेमो दाखवायची इतक्या गर्दीत पण.जाम कमाल वाटायची.इतके चमत्कार घडवणारा तो प्रकार फक्त १५ ला होता.
मस्तं! खूप छान लिहीलय. उच्च
मस्तं! खूप छान लिहीलय. उच्च प्रतीचे विडंबन. टू गुड.
आमच्या एका काकांचा अगदी आजही
आमच्या एका काकांचा अगदी आजही "दो बदन" हे नाव ऐकताच रागाने तीळ पापड होतो. त्यांचे दुकान होते. दो बदन ची जबरदस्त क्रेझ पाहून त्यांनी बराच माल होलसेल मध्ये खरेदी केला. पण ती क्रेझ जशी आली तशीच गेली व त्यांचे नुकसान झाले. आशीकी रिबीन ने असाच घोळ घातला.
ओह्ह हे विडंबन होते .. भारी
ओह्ह हे विडंबन होते .. भारी हं
मग तुमच्या काकांनी उरलेल्या २
मग तुमच्या काकांनी उरलेल्या २ बदनचं काय केलं ?
हल्ली मात्र ऑफिसला असे काही
हल्ली मात्र ऑफिसला असे काही करून जायची सोय नसल्याने हा शौक घरच्या घरीच भागवतो. >> म्हणजे तू रात्री केस अन दाढी वाढवतो नि सकाळी सगळे साफ चटाचट करून ऑफीसला जातो. परत रात्री घरी परतला कि केस वाढवणे सुरू असे का ?
अरे मी ते कपाळावर
अरे
मी ते कपाळावर रबरब्यांण्ड बांधण्याबद्दल बोललो .. केस आणि दाढी माझे वाढलेलेच असतात.. सचिनचा जेवढा कसोटी एवरेज आहे तेवढ्या दिवसांनी दाढी करायचा माझा एवरेज आहे.. आणि केस कापण्याबाबत मी ब्रॅडम्यानशी स्पर्धा करतो ..
बाकी रबरब्यांण्ड हा काही फक्त स्त्रियांचा दागिना नाही. मलाही वापरायला आवडतो. काही नाही मिळाले तर मी छोटा कंगवा खोचून बसतो.. त्यानेही केस मस्त उभे राहतात.
अरे केस आहेत की पाण्याचा नल ?
अरे केस आहेत की पाण्याचा नल ? सोडला की बदाबदा केसं वाढायला ?
रू, रबरबँड म्हणजी केसांची
रू,
रबरबँड म्हणजी केसांची वेणी, बो बांधायला, नोटा बांधायला वगैरे वापरतात ते. हेअरबँड म्हणजे प्लास्टिक किंवा तारेच्या कमानी किंवा पूर्ण गोल कापडी पट्टा, केस डोळ्यावर येऊ नयेत म्हणून किंवा घाम चेहेर्यावर येऊ नये म्हणून डोक्यावर लावतात किंवा बांधतात ते. येतय का लक्षात, का गूगल करून फोटो शोधशील?
सोनू हो.. मग माझा हेअरब्यांड
सोनू हो.. मग माझा हेअरब्यांड
लिओनार्डो दा विंची असे
लिओनार्डो दा विंची असे भारदस्त नाव असतानाही त्याने मोनालिसा चित्राखाली सही नाय केली आणि ही शिंची पोस्टीखाली सही ठोकते...
Pages