"Thank You. तू खूप समजूतदार आहेस हे माहित होत मला. लग्नाला बोलाव"...
गुड बाय.
त्याचे ते वाक्य पूर्ण होईपर्यंत मनु तिथून निघाली होती.
धावतच ती गाडीकडे आली आणि गाडी चालू केली. जोर जोरात रडत होती. सगळ आयुष्यच उध्वस्त झाल्यासारखे वाटत होते. सुसाट गाडी चालवत होती. तिला आता स्वतःचाच खूप राग येत होता. इतकी वर्ष जर तो आपल्याला भेटत नाही, बोलत नाही तरी आपण वेड्यासारखे त्याची वाट बघत का बसलो? आधीच का नाही सगळ clear करून घेतलं? तिला आत्ता ह्या क्षणी जगावस वाटत नव्हत, काय करू, कुठे जाऊ?
मनुसाठी आता सगळंच संपल होत. ह्यापुढे आपल्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही हे तिने ठरवले आणि एका नव्या उमेदीने नवीन आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाली. हृदयाचा तो कप्पा तिने कायमचा बंद केला कधीही न उघडण्यासाठी...
-----------------------------XXXX-------------------XXXX-------------------------------XXXX-----------------------
"आई, बाबा कदी येणाSS ऎ? आपण पाद्क मध्ये जाणाSS ओतो ना आज? कदी जायचं?“ ऋताने मनुला विचारले.
"अगं, येइलच इतक्यात. तो आला की आपण लगेच जाऊ हा. चल तुझा खाऊ संपव पटकन"...
ऋता, मनुची ३ वर्षांची मुलगी. आज तिच्या बाबाने पार्क मध्ये जाऊ असं प्रोमीस केल होत... सकाळपासून तिने किती तरी वेळा दोघांना आठवण करून दिली होती. तो काही कामासाठी बाहेर गेला होता. १ तासात परत येतो असं सांगितलं होत पण ३ तास होऊन गेले तरी तो आला नव्हता म्हणून मनुलाही काळजी वाटत होती. ती कधीपासून त्याचा number try करत होती तो लागत नव्हता. तिने त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केले पण तो कुणाकडेही नव्हता. असं कधी वागला नव्हता तो, उशीर होणार असेल किंवा फोन silent वर टाकणार असेल तर तो आधी तिला फोन किंवा msg करून सांगायचा. त्यामुळे मनु अजूनच घाबरली होती. ती आईला फोन करणार इतक्यात तिला एक call आला आणि मनु धाडकन जमिनीवर पडली. ती शुद्धीत आली तेव्हा हॉस्पिटल मध्ये होती... आई आणि बहिण तिच्याजवळ होत्या. डोळे उघडल्यावर तिने पहिला प्रश्न केला
“ओंकार कसा आहे आता?"
ओंकारला अपघात झाला होता. त्याला फारशी दुखापत झाली नव्हती पण समोरच्या गाडीला भयंकर अपघात झाला होता. त्यामधली व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
"ओंकार बरा आहे. त्याला जास्त काही झाल नाही. पण समोरच्या गाडीतील driver आणि दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत”. मनूच्या आईने सांगितले. ओंकार बरा आहे कळल्यावर मनूच्या जीवात जीव आला. “चूक समोरच्या गाडीची होती. Driver चा ताबा सुटला आणि गाडी झाडाला जाऊन धडकली मध्ये ओंकारची bike आल्यामुळे त्यालाही थोडा धक्का बसला”.
मनु धावत ओंकारच्या खोलीकडे पळाली. ओंकार फक्त तिचा नवराच नाही तर तिचा जीवाभावाचा सखा झाला होता ह्या ५ वर्षात. त्याला काही झाले असते तर मनु जगूच शकली नसती. तो तिच्या जगण्याचा आधार होता.
मनु त्याच्याकडे गेली तेव्हा तो झोपला होता. "आत्ताच झोपेच injection दिलं आहे. तुम्ही त्यांच्या पत्नी का? हि काही औषध आहेत ती मागवून घ्या" nurse ने मनुला सांगितले. मनु ओंकारकडे बघत होती.
तिला तो ५ वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला.
-----------------------------XXXX-------------------XXXX-------------------------------XXXX-----------------------
“मनु, कुठे आहेस तू? किती वेळ झाला call करतोय तुला? काय झालंय? बरी आहेस न? कुठे आहेस ते सांग मी येतोय घ्यायला. घरचे सगळे किती काळजीत आहेत." ओंकार फोनवर बोलत होता. मनु फक्त ऐकून घेत होती. तिला काय बोलावे हेच सुचत नव्हते. "मनु, अगं काय झालं? आवाज ऐकू येतोय ना माझा?"
"हो. ऐकतेय. बोल"
"अगं, आहेस कुठे तू? किती वेळा फोन केले. बरं ते जाऊ दे. कुठे आहेस ते सांग आधी. मी येतो घ्यायला".
मनूने ओंकारला पत्ता सांगितला.
घरी आल्यावर सगळ्यांनी मनुभोवती गराडा घातला. तिची आई तर अजूनही रडतच होती. मनु आता तिच्या धक्क्यातून बाहेर येत होती. आपण सगळ्यांनाच किती त्रास देतोय ह्या विचारानेच तिला खूप वाईट वाटले. ती मनसोक्त रडली. कुणीच तिला काहीच विचारलं नाही. पण त्या दिवशी मनुने मनातच शपथ घेतली की ती अनिकेतचा विचार कधीच करणार नाही. आता जगायचं ते फक्त आपल्या माणसांच्या सुखासाठी.
2 महिन्यांनी मनु आणि ओंकारच लग्न झालं. सगळेच खुश होते. मनुसुद्धा ओंकारसारखा नवरा मिळाल्यामुळे आपण किती खुश आणि नशीबवान आहोत हेच सगळ्यांना सांगत होती. पण तिच्या मनातून अनिकेतचा विचार काही केल्या जात नव्हता. शेवटी काळ हे सगळ्या दुःखावरच औषध असत असं म्हणतात ते खरंच आहे.
ओंकार खूप समंजस, कर्तृत्ववान तर होताच पण त्याच बरोबर तो मनु ची अतिशय काळजी घ्यायचा, तिच्या आवडी निवडी जोपासायचा, तिला काय हवं काय नको बघायचा, सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर शेअर करायचा, प्रत्येक निर्णयात तिचं मत विचारायचा.. अजून काय हवं असत एका मुलीला? प्रेम? प्रेम तर तो तिच्यावर जीवापाड करायचा...
इतकंच काय 'जो पर्यंत आपल्या नात्यामध्ये सहजता येत नाही तोपर्यंत शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत' हा मनूचा निर्णयही त्याने हसत हसत स्वीकारला होता. एवढं सगळं असताना एखाद्याविषयी आपल्या मनात प्रेम नाही तरी निदान आपुलकी तरी निर्माण होतेच. मनूचंही तेच झालं. हळू हळू ओंकारबरोबरच्या नवीन आठवणींमुळे अनिकेतच्या जुन्या आठवणी पुसट होऊ लागल्या.
लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. पण मनु आणि ओंकार खऱ्या अर्थाने एकमेकांचे पती पत्नी झाले नव्हते. आता त्यांच्या नात्यात सहजता आली होती. मनूच्या मनातही ओंकारविषयी नाजूक भावना निर्माण झाली होती. त्यातच ओंकारच्या आईने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांना 'आता लवकर माझे प्रमोशन करा' असं जेव्हा विचारलं तेव्हा मनु लाजली आणि खरंच आता ह्या गोष्टीचा विचार करायला हवा असे तिला वाटले. हा विचार तिने ओंकारला सांगितलं तेव्हा तो आनंदानं अगदी वेडा झाला.
कालांतराने दोघांना एक गोड मुलगी झाली आणि दोघांचे नाते अजूनच दृढ झाले. आता ते एकमेकांशिवाय राहायचा विचारही करू शकत नव्हते.
-----------------------------XXXX-------------------XXXX-------------------------------XXXX-----------------------
आज ओंकारच्या अपघाताची बातमी ऐकली आणि मनूच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सुखरूप आहे हे कळल्यावर कुठे तिच्या जीवात जीव आला होता.
नियतीच्या मनात काय चाललं आहे हे कधी कुणाला कळलंय का? ती कधी कुणाची कशी परीक्षा घेईल काहीच सांगता येत नाही. मनुची सुद्धा अशीच परीक्षा घ्यायची लहर नियतीला आली होती...
ओंकारला जाग आली तेव्हा मनु त्याच्या शेजारीच होती. त्याने डोळे उघडल्याचे पाहताच तिने रडायला सुरुवात केली.
"काय हे मनु, साधा मार लागलाय मला तर एवढं रडतेस? काही बरं वाईट...." मनूने ओंकारच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली "मी जिवंत असेपर्यंत तुला काही होणार नाही ओंकार... आणि असलं काही बोलायचं नाही हा? नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी" मनु गुश्यातच म्हणाली. "बरं बाई, नाही बोलणार. तुझी शपथ" ओंकारने तिला लगेच आश्वासन दिले. "ते दोघे कसे आहेत? ओपरेशन झालं का सक्सेसफुल?"
"नाही रे, मला काहीच माहीत नाही, मी कधीची तुझ्यापाशीच बसून आहे" मनु म्हणाली. "खूप सिरीयस आहेत का?"
"मलाही काही कल्पना नाही ग, पण जाऊन बघायला हवं. तुला माझा तो मित्र माहितीय ह्रिषीकेश? ह्रिषीकेश देशपांडे? त्याचा मित्र आहे हा बहुतेक. खूप आधी एक दोनदा भेट झाली होती. पण नाव आठवत नाहीय आत्ता. तिथे गेल्यावरच कळेल नक्की तोच आहे का ते. चल".
मनु आणि ओंकार दोघेही डॉक्टरांकडे गेले.
"दोघेही आता out of danger आहेत. ओपरेशन successful झालंय. Mr.ओंकार तुमचं खरंच कौतुक करायला हवं, तुम्ही त्यांना वेळेत घेऊन आला नसता तर कदाचित आपल्याला यश आले नसते"
"कौतुक कसलं डॉक्टर? हे तर माझं कर्तव्यच होत. मला त्या व्यक्तीचे नाव आठवत नाहीय. कदाचित मी त्याला ओळखतो".
“अनिकेत प्रधान!!" डॉक्टर म्हणाले. "अनिकेत प्रधान नाव आहे त्यांचं".
क्रमश:
कृपया जुन्या भागांची लिंक
कृपया जुन्या भागांची लिंक द्या...
वा!! खूपच छान जमलीय अस्मि...
वा!! खूपच छान जमलीय अस्मि... पुढचा भाग टाक आता लवकर:-).. पुलेशु.
छान जमलीय .कृपया जुन्या
छान जमलीय .कृपया जुन्या भागांची लिंक द्या...+ १
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सगळ्यांना.
@स्वधा, क्रिश्नन्त - मला आधीच्या भागांची लिंक कशी द्यावी ह्याबद्दल माहिती मिळू शकेल का?
खूपच छान जमलीय पुढचा भाग
खूपच छान जमलीय पुढचा भाग लवकर लवकर टाक
छानच जमलिये.पुढचा भाग लवकर
छानच जमलिये.पुढचा भाग लवकर टाका
धन्यवाद तेजस्विनी आणि अदि ती
धन्यवाद तेजस्विनी आणि अदि ती
लवकर टाका पुढचा भाग.
लवकर टाका पुढचा भाग.
लवकर टाका पुढचा भाग.
लवकर टाका पुढचा भाग.
१५ जुलै नंतर पुढचा भाग पोस्ट
१५ जुलै नंतर पुढचा भाग पोस्ट नाही केला ?
आजून किती प्रतीक्षा करायची?????
अजुन पुढचा भाग आला नाही का?
अजुन पुढचा भाग आला नाही का?
खुप छान आहे. पण आढिच्या
खुप छान आहे. पण आढिच्या भागान्ची लीन्क द्याल का?
आधीचे भागः १)
आधीचे भागः
१) http://www.maayboli.com/node/58667
२) http://www.maayboli.com/node/58769
३) http://www.maayboli.com/node/58836
४) http://www.maayboli.com/node/58969
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
आजून किती प्रतीक्षा
आजून किती प्रतीक्षा करायची?????
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सगळ्यांना.
Sorry. Pudhil bhagasathi thodi pratiksha karavi lagel. Now a days i m busy with my newborn baby... Tyachyatun vel milala ki nakki taken pudhacha bhag...
asmi tai nivant taka jvha vel
asmi tai nivant taka jvha vel bhetel tvha ky gadbd nhiye.... aamhi vat bghtoy fkt visru nka pudhcha bhag takayla.... n ho aaple abhinandanpn br ka....
कथा खुपच छान
कथा खुपच छान वाटलि.पु.ले.शु................