मायबोली वर्षाविहार आणि मी
माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्यापैकी असते.
वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.
पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?
मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.
एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.
मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....
तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.
दक्षीने मला या धाग्यावरुन
दक्षीने मला या धाग्यावरुन चालता होण्यास सांगीतले आहे म्हनुन मी काहीही बोलणार नाही :हाताची घडी घालुन बसलेला भावला:
विनय भिडे, पोस्ट आवडली.
विनय भिडे, पोस्ट आवडली. भाषेचा सूर जुळला तर अवघड गोष्टी सोप्या होतात.
वैभ्या, तू हद्दपारच बरा
वैभ्या, तू हद्दपारच बरा आहेस..
वैभ्या, तू हद्दपारच बरा
वैभ्या, तू हद्दपारच बरा आहेस..
दोनदा हद्दपार केला मला
दोनदा हद्दपार केला मला
हद्द झाली आता
हद्द झाली आता
limbutimbu, पोस्ट मनाला
limbutimbu,
पोस्ट मनाला भिडली.....
बापरे इथे फारच दंगा झालेला
बापरे इथे फारच दंगा झालेला दिसतोय .
हा माझा सलग पाचवा ववि . यातील ३दा माझी बायको माझ्याबरोबर आली होती आणि तिनेही प्र्त्येक ववि धमाल एंजॉय केलाय (नवीन लोकाना भेटण्याचा/मिसळण्याची भीती अशी स्पर्धा ठेवेली तर पहिल्या ३ मधे येऊ शकेल ती)
एवढ्च काय माझ्या १ वर्षे वयाच्या लेकीनेही गेला ववि प्रचंड एंजॉय केला होता . सगळ्यानी तिची फार काळजी घेतली होती . ( शी विल बी बॅक धिस यिअर अल्सो )
ववि सोडून मी इतर गट्ग ला न कधी गेलोय ना कधी कुणाच्या फारसा वैयक्तिक संपर्कात आहे पण तरीही सगळे दर वेळी अगदी रोज भेटत असल्यासारखे वागतात
त्यामुळे नवे कुणी जर येणार असाल तर नक्की या .
प्रत्येकाचे अनुभव , प्रत्येकाच्या अपे़क्षा वेगळ्या . इतरानी काय लिहिले / अनुभवले यापेक्षा स्वतः एकदा येऊन काय ते पहा
केड्या ओवी येणार का यावेळी पण
केड्या ओवी येणार का यावेळी पण , वाह! वाह!
येस्स . पाणी आणि भरपूर लोक ,
येस्स . पाणी आणि भरपूर लोक , दोन्ही आमच्या फेवरिट गोष्टी आहेत
ओवी गेल्या वविची रॉकस्टार
ओवी गेल्या वविची रॉकस्टार होती! इतकं छोटं पिल्लू पण काय एंजॉय केलाय ववि तिने! बसमधल्या दंग्यापासून ते डुंबाडुंबीपर्यंत सबकुछ! आणि मग तण्णावून झोप. सो स्वीट!
विनय भिडे, छान पोस्ट.
विनय भिडे, छान पोस्ट.
लिंबू, खुप छान पोस्ट...
लिंबू, खुप छान पोस्ट... मायबोली करांना भेटणे नेहमीच आनंददायी असते... कुणाशी नव्याने ओळख झाली, कि दिनेश. का ? मग काही सेकंदाचा पॉज असतो ( तेवढ्यात सगळे प्रतिसाद डोळ्यासमोरुन जात असावेत ) आणि मग गप्पा सुरु होतात... तो जो पॉज असतो ना, तो मला प्रत्येक वेळी अनुभवताना खुप मजा वाटते.
पण मायबोलीकरांना भेटू नका असे
पण मायबोलीकरांना भेटू नका असे मी कुठे म्हणालोय? मी देखील भेटतो. मलाही आवडतेच !
लिंब्याने नेहमीसारखेच दुसरेच दळण लावून विषय घासून पुसून दुसरीकडे नेला. मी काय म्हणतोय, काय पोचले अन काय मांडले हे सगळे वेगळेच !
आर्थिक स्थिती, परदेशी प्रवास, वैचारिक मतभेद ? बरं बरं. असो. आता बोलणे नको. लिंबू महराजांचा विजय असो !
सगळीच गंमत !
बरं असू द्या आता.....पुढे
बरं असू द्या आता.....पुढे बोला!
विनय पोस्ट आवडली
>>> लिंब्याने नेहमीसारखेच
>>> लिंब्याने नेहमीसारखेच दुसरेच दळण लावून विषय घासून पुसून दुसरीकडे नेला. <<<<
अरे केदारभाऊ (सायकलवाला) , मला पर्यायच नव्हता दुसरा.... वेबमास्तरांनी दिलेली तंबी विसरुन कसे चालेल? म्हणून लिगली करेक्ट प्रतिसाद दिला....
लिंबुभौ , लै भारी. केदार, या
लिंबुभौ , लै भारी.
केदार, या रे, ओवी मोठी झाली असेल. आता येइल का सगळ्यांकडे? मागच्या वर्षी जाम धमाल केलेली तिने
मागच्या वर्षीची स्टार
मागच्या वर्षीची स्टार 'ओवी'
केड्या तुझं ऑब्जेक्शन असेल तर सांग, फोटो काढून टाकेन.
किती छान फोटो ओवी गोडुली
किती छान फोटो ओवी गोडुली
मॅडम, तुम्ही पण छान दिसताय
दक्षिणा , मस्त आहे फोटो .
दक्षिणा ,
मस्त आहे फोटो .
ऑब्जेक्शन कसल ? काहीपण .
मुग्धानंद , नक्की येईल . आजकाल तर आम्हाला नुसते प्रेक्षक हवे असतात
सह्ही फोटू!
सह्ही फोटू!
दक्षु आणी ओवी, मस्त गुटगुटीत
दक्षु आणी ओवी, मस्त गुटगुटीत फोटो आलेत. त्यातुन हसरे आणी गोड. ( दोघी पण )
मला फोटो आणी अल्बम पहाणे फार आवडते.
दोघांमधे मोठी कोण दक्षी की
दोघांमधे मोठी कोण दक्षी की ओवी?
दोघांमधे मोठी कोण दक्षी की
दोघांमधे मोठी कोण दक्षी की ओवी?
डोळे फुटलेत कारे ओवी दिसत नाहीय का तुला?
मायबोलीवर नवीन आहे. हे वर्षा
मायबोलीवर नवीन आहे. हे वर्षा विहार म्हणजे काय? ट्रीप आहे का
{{{ हे वर्षा विहार म्हणजे
{{{ हे वर्षा विहार म्हणजे काय? ट्रीप आहे का }}}
सावंत साहेब,
नैसर्गिकरीत्या भिजवणार्या पावसात रोज भिजण्यापासून छत्री रेनकोट वापरुन स्वतःला वाचवायचं आणि मग कृत्रिमरीत्या पाण्याचे डोह डबकी बनवून त्याला वॉटर पार्क असं नाव देणार्यांकडे तगडी रक्कम मोजून स्वतःला भिजवायचं याला इथे 'वर्षा विहार' म्हणतात.
मल्ल्या आणि वैभ्या आला
मल्ल्या आणि वैभ्या आला पावसाळा(ववि) आपापली मुस्काडं सांभाळा
तुम्ही दोघं पण पळायची प्रॅक्टिस करून ठेवा.
मल्ल्याचा तर बस मध्येच बुक्का करणार आहे मी.
वरील फोटोतील ओवी कोणती?
वरील फोटोतील ओवी कोणती?
कसला तुफान गोड फोटो आहे .ओवी
कसला तुफान गोड फोटो आहे .ओवी आणि दक्षु चा
वरील फोटोतील ओवी कोणती? >> ती
वरील फोटोतील ओवी कोणती?
>> ती मागे आहे ना पुसट निळ्या टिशर्टमधली... ती
Pages