Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"अँडरसनची गैरहजेरी इंग्लंडला
"अँडरसनची गैरहजेरी इंग्लंडला चांगलीच जाणवली असावी." - सहमत >> +१
शिवाय हा पहिलाच सामना आहे. बहुतेक वेळा पहिला सामना टिपिकल इंग्लिश नसलेल्या पिचवर खेळवतात नि मग गाफिल झालेल्या समोरच्या संघाला धोबीपछाड घालतात
पाकने ३००+ करून आतां
पाकने ३००+ करून आतां इंग्लंडला फलंदाजीत बर्यापैकी रोखलंय. आमिरने कूकला सतत ऑफ-स्टंपबाहेर मारा करत हैराण केलं व आंत येणारा एक चेंडू [पण जो ऑफ-स्टंपच्या बाहेरच होता ] खेळायच्या मोहात पाडून बाद केलं. यासिरचा लेग-स्पीन इंग्लंड खेळून काढत असलं तरी तो त्रासदायक ठरतोच आहे .पाक डांवपेंच रचून आले आहेत हें निश्चित !
बहुतेक वेळा पहिला सामना
बहुतेक वेळा पहिला सामना टिपिकल इंग्लिश नसलेल्या पिचवर खेळवतात >>> असाम्या आजकाल सराव सामने कमी झाल्यामुळे का? पूर्वी नाहीतर ते ३ दिवसांचे, ४ दिवसांचे सामने होते ते पाटा पिचेस वर खेळवून कसोटीला एकदम हेडिंग्ले ला उभे करत
भारतीय उपखंडातील संघांना लेट-समर टूर (जुलै मधे सुरू होणारी) जास्त फायदेशीर असते अशी गावसकर ची थिअरी होती पूर्वी. थंडी व स्विंग कमी असतो म्हणून. आता किती लागू आहे माहीत नाही. माझ्या आठवणीत १९८६ व २००२ च्या टूर्स मधे तरी फायदा झाला होता भारताला.
फा, भारताच्या बिग ४ सिरीजच्या
फा, भारताच्या बिग ४ सिरीजच्या वेळी असे वाचलेले कि अँडि फ्लॉवर ने मांडलेला हा डावपेच होता. सराव सामने बर्यापैकी माईल्ड पिचवर नि पहिला सामना अटीपीकल पिचवर खेळायचा नि नंतर सिमिंग ट्रॅक देऊन कोथळा बाहेर काढायचा. बघूया इथेही तसेच होतेय का ? अँडरसन परत आला कि पण बराच फरक पडेल. कूक नि रूट ह्यांची मेंटल strength नि temperament उल्लेखनीय आहे (त्याच बरोबर पाकिस्तानचे बेभरवशाचे) त्यामूळे सिरीज संपेतो अंदाज बांधणे धाडसी ठरेल.
आमिर चे इंग्लंड मधले स्टॅट्स कसले हेवा वाटण्याजोगे आहेत. असिफचे बघायलाच नको.
<< नंतर सिमिंग ट्रॅक देऊन
<< नंतर सिमिंग ट्रॅक देऊन कोथळा बाहेर काढायचा >> पाकच्या बाबतीत हा डाव इंग्लंडवर उलटण्याची शक्यताच जास्त !
पाकच्या १२९-५ ! तरीही आत्तांच
पाकच्या १२९-५ ! तरीही आत्तांच आघाडी १९६ धांवांची आहे व चेंडू 'रिव्हर्स स्विंग' होणं सुरु झालंय . पाक गोलंदाज या संधीची वाटच पहात असावेत !अर्थात, धांवाचं लक्ष्य ३०० तरी असणं आवश्यक वाटतं. बघूं सामना कसा रंगतो तें .
मिसबाहची ही सेन्छ्युरी
मिसबाहची ही सेन्छ्युरी वयाच्या ४२ + मध्ये काढलेली आहे. ४२ + ला सेन्च्युरी काढणारा तो आतापर्यन्त तिसरा आहे म्हणाले.
अ.अ.अ - इण्टरेस्टिंग. तो एवढा
अ.अ.अ - इण्टरेस्टिंग. तो एवढा मोठा आहे माहीत नव्हते. बॉयकॉट आहे का बाकी दोघांत? बघतो स्टॅट्स
नाही बायकॉट नाही. पार अगदी
नाही बायकॉट नाही. पार अगदी पुराणपुरुष आहेत १९४० च्या दरम्यानचे... त्यावेळी एवढी स्पर्धा कुठे होती तरुण लोकांची? व्यावसायिक क्रिकेट नसल्याने हौशीच मामला होता. खेळा हवे तेवढे.
अ.अ.अ - इण्टरेस्टिंग. तो एवढा
अ.अ.अ - इण्टरेस्टिंग. तो एवढा मोठा आहे माहीत नव्हते.
>>>>
मलाही मागे दोनतीन वर्षांपूर्वी की कधीतरी त्याचे वय समजलेले तेव्हा आश्चर्य आणि कौतुकच वाटलेले. तसे त्या आधीही त्याच्या खेळाचे कौतुकच वाटायचे. त्यांचा द्रविड कम लक्ष्मण कम धोनी सारे तोच वाटतो मला. तरीही त्याच्या जीवावर का उठलेले असतात हे समजत नाही.
पुराणपुरुष >>> . बघतो.
पुराणपुरुष >>> :D. बघतो. इंग्लिश काउण्टी क्रिकेट मधे बराच काळ खेळत लोक.
तरीही त्याच्या जीवावर का उठलेले असतात हे समजत नाही. >>> बहुधा त्याने भारताविरूद्ध अनेकदा मॅच तोंडाशी आणून जिंकलेली नाही, म्हणून असेल.
मिस्बाहला तसा 'पुराणपुरुष'
मिस्बाहला तसा 'पुराणपुरुष' नाही म्हणता येणार. त्याचं कसोटी पदार्पणच वयाच्या २६व्या वर्षीं झालंय. राहुल द्रविड व मिस्बाह दोघेही १६ वर्षंच टेस्ट क्रिकेट खेळले आहेत; पण त्या १६ वर्षांत रहुल १६४ कसोटी सामने तर मिस्बाह फक्त ६२ कसोटी खेळला आहे. तरीही आपल्याला मिस्बाह हा वर्षानुवर्षं कसोटी खेळतोच आहे असं वाटतं, हें मात्र खरं.
.
तरीही आपल्याला मिस्बाह हा
तरीही आपल्याला मिस्बाह हा वर्षानुवर्षं कसोटी खेळतोच आहे असं वाटतं, हें मात्र खरं.
>>> हो ना, मागे कुठली तरी फायनल भारताविरुद्ध मागे लेगला चेंडू उडविल्यावर श्रीसंतने त्याचा झेल घेऊन त्याची आणि मॅच आणि टूर्नामेन्टचीही गठडी वळली होती त्यानन्तर त्याला हाकलले असेल असे समजून मी चाललो होतो. मधून मधून त्याचे नाव येई तेव्हाही वाटे अरे हा अजून आहेच का?प्रवा त्याला साक्षात शतक काढताना पाहिले आणि धक्काच बसला. पाक व आपला क्रिकेटमध्ये संबंध येत नसल्याने त्यांचे कोण खेळतेय आणि कोण रिटायर जालाय हेच कळत नाही...
<< चे कोण खेळतेय आणि कोण
<< चे कोण खेळतेय आणि कोण रिटायर जालाय हेच कळत नाही...>> त्यामुळें सचिनची पाकविरुद्ध पहिली कसोटी, त्याने अब्दुल कादीरला मारलेल्या सिक्सर्स, मियांदादने शेवटच्या चेंडूवर मारलेली सिक्सर, मंजूर इलाहीने भारताकडून खेंचून नेलेली मॅच इ.इ. अशा काळजाला भिडलेल्या घटनाच केवळ लक्षात रहातात !!
अजय, हो हा तो कॅच. २००७ च्या
अजय, हो हा तो कॅच. २००७ च्या २०-२० फायनल मधला
https://www.youtube.com/watch?v=2ErTG1STnhM
तसेच २०११ च्या ५० ओव्हर्स वर्ल्ड कप मधेही आपल्याविरूद्ध शेवटपर्यंत तो खेळत होता पण रन रेट च्या मागेच होता कायम. शेवटी कोलून आउट झाला. २००७ च्या २०-२० कप मधेही पहिल्या लीग गेम मधे तसेच काहीतरी झाले होते.
मिस्बाह पाकिस्तान चा (टेस्ट
मिस्बाह पाकिस्तान चा (टेस्ट मधला) खुप भरवशाचा खेळाडू आहे. भारताविरुद्ध विचित्र पद्धतीनं आऊट व्हायची देदिप्यमान परंपरा त्यानं जोपासली असल्यामुळे आपल्याकडे त्याचं ईतकं कौतुक झालं नाही (रेफः टी-२० वर्ल्डकप २००७ च्या फायनल ला श्रीसंथ च्या हातात काढलेला कॅच. नंतर दिल्ली च्या टेस्ट मधे रन काढताना क्रीझ मधे पोहोचल्यावर पायावर येणारा चेंडू हूकवायला उडी मारून झालेला रन- आऊट, २०११ च्या वर्ल्डकप सेमी फायनल ला अकारण स्लो खेळून, मॅच हातातून गेल्यावर आक्रमक फटके मारून केलेलं अर्धशतक वगैरे).
पहिली टेस्ट मॅच पाकिस्तान जिंकेल असं दिसतय. अँडरसन लवकर परतावा ही ईंग्लंड च्या संघाची प्रार्थना असेल.
<<पहिली टेस्ट मॅच पाकिस्तान
<<पहिली टेस्ट मॅच पाकिस्तान जिंकेल असं दिसतय. >> इंग्लंड १९६-८ [लक्ष्य २८४] म्हणजे जवळ जवळ हरणं आलंच !! पण बेअरस्टो व वोकस यांची चिवट झुंज कौतुकास्पद. इंग्लीश फलंदाज फिरकीविरुद्ध 'फूटवर्क'चा उपयोग करायला कचरतात व त्यामुळे यासिर शाह त्याना या दौर्यात डोकेदुखीच ठरणार आहे ! त्या मानाने आमिरला ते बर्याच आत्मविश्वासाने खेळत होते.
बेअरस्टो गेला की आता! सुपडा
बेअरस्टो गेला की आता! सुपडा साफ होतो की काय!
<< सुपडा साफ होतो की काय! >>
<< सुपडा साफ होतो की काय! >> झालाच ! पाकचं अभिनंदन.
इंग्लंडमधे कसोटी सामन्याना बर्यापैकीं प्रेक्षकवर्ग मैदानावर हजेरी लावतो, हे लक्षणीय आहे !
त्यामुळे यासिर शाह त्याना या
त्यामुळे यासिर शाह त्याना या दौर्यात डोकेदुखीच ठरणार आहे .>> नाहि नाही, पुढच्या वेळेपासून स्विंगिंग ट्रॅक्स असणार हे उघड आहे.
हो हो मला माहित आहे कि आमिर डोकेदुखी ठरेल अशा ट्रॅकवर पण स्विंग होणार्या पिचेस वर तुम्ही इंग्लिश बॅट्समन वर भरवसा कराल कि पाकिस्तान ह्यात उत्तर दडलेले आहे.
विजयानंतर पाक चे ड्रिल पाहिले
विजयानंतर पाक चे ड्रिल पाहिले का? म्हणे पाक आर्मीकडून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या सेलेब्रेशन वर मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. जरा ओव्हरच वाटली, पण बर्याच दिवसांनी जिंकल्याने ठीक आहे
इथे क्लिप आहे
http://www.espncricinfo.com/england-v-pakistan-2016/content/story/103598...
पाक आर्मीकडून भारताकडून हरायचे ही प्रशिक्षण घेतले असेल तर चांगलेच आहे
पाक आर्मीकडून भारताकडून
पाक आर्मीकडून भारताकडून हरायचे ही प्रशिक्षण घेतले असेल तर चांगलेच आहे
>> जहबहरीही होता हा फा! 
"पाक आर्मीकडून भारताकडून
"पाक आर्मीकडून भारताकडून हरायचे ही प्रशिक्षण घेतले असेल तर चांगलेच आहे" -
LOL फा. पाकिस्तान फारच हवेत
LOL फा. पाकिस्तान फारच हवेत आहे राव
भारत - वेस्ट ईंडिज टेस्ट मॅच
भारत - वेस्ट ईंडिज टेस्ट मॅच सुरू. मस्त टीम निवडलीये पहिल्या टेस्ट साठी - सगळे स्पेशलिस्ट प्लेयर्स. मजा येईल.
झाले पहिले सेशन.. टिपिकल
झाले पहिले सेशन.. टिपिकल स्कोअरलाईन.. सत्तरला एक वगैरे..
५ बॉलर घेतलेत .. कोहलीची आक्रमक सुरुवात.. रन मारायचे मी बघून घेईन, तुम्ही मला विकेट काढून द्या..
आणि पूर्वीची विंडीज ची
आणि पूर्वीची विंडीज ची स्टाईल. ऑल राउण्डर्स, बिट्स अॅण्ड पिसेस खेळाडू वगैरे प्रकार नाही. चार फास्ट बोलर्स विकेट काढत, व पाच टॉप चे बॅट्समन भरपूर रन्स काढत. एखादा स्पिनर बहुधा इतर बोलर्स च्या विश्रांती करता असे. रॉजर हार्पर, लॅरी गोम्स वगैरे :). त्यांच्या बोलर्स ना ब्रेक घ्यावा लागेल अशी वेळ गावसकर वगैरे सोडले तर इतरांनी क्वचितच आणली
आणि पूर्वीची विंडीज ची स्टाईल
आणि पूर्वीची विंडीज ची स्टाईल >> मह्त्वाचा फरक म्हणजे तिथे 'ते' चार मुख्य बॉलर्स असत इथे 'हे' दोघे मुख्य बॉलर्स असणार आहेत
आजच्या जमान्यात मार्शल, होल्डींग नि गार्नर लिमिटेड ओव्ह्रस मधेही तेव्हढेच प्रभावी ठरले असते का ? म्हणजे नियम सरळ सरल बॅट्समन्च्या बाजूचे आहेत, एकापाठोपाठ एक मॅचेस खेळून बॉलर्स overloaded आहेत. पिचेस स्लो झाली आहेत. बॅट्स वजनी झाल्या आहेत, अशक्य analysis मूळे बॅट्समन dominated झालेले आहेत. अशा वेळी काय झाले असते वाटते ?
फारएण्ड आणी ऋन्मेष, सहमत!
फारएण्ड आणी ऋन्मेष, सहमत! टेस्ट ला अशीच टीम पहायला आवडते. तो क्रिकेट चा क्लासिक आणी प्युअर फॉर्म आहे. तिथे बिट्स अॅण्ड पिसेस प्लेयर्स ना जागा नाही. ऑलराऊंडर्स सुद्धा पूर्ण ऑलराऊंडर्स असले पाहिजेत, जे बॅटींग आणी बॉलिंग ह्या दोनपैकी कुठल्याही एका स्किल वर सुद्धा भरीव योगदान देऊ शकतात (जॅक कॅलिस कॅटेगरी).
इंटरेस्टिंग पॉईण्ट, असामी.
इंटरेस्टिंग पॉईण्ट, असामी. आणि दोनच बोलर्स बद्दल सहमत.
मला वाटते होल्डिंग, मार्शल वगैरे आताही यशस्वी झाले असते - कसोटीत. कारण तेथे अजून खूप फरक पडलेला नाही. अॅनेलिसीस वगैरे आहे, पण बॅट्समन च्या बाबतीत बराचसा गेम त्या वेळेस बाजूच्या वातावरणाशी, आधीच्या अॅनेलिसीस शी पूर्ण isolate होउन सुरू असतो. बॉल टाकल्याच्या वेळच्या क्षणात तो जे काही अॅप्लाय करू शकेल त्यावरच सगळे असते. त्यामुळे अॅनेलिसीस चा फायदा बोलर्स, फील्डर्स ना जास्त मिळतो असे वाटते. बॅट्समेनना अजिबात नाही असे नाही, पण तुलनेने इफेक्टिव्हनेस कमी असेल त्या सगळ्या माहितीचा.
Pages