मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

बस फुल्ल होइल नाहीतर.>>>>

माझे ठरले ऐनवेळी तर जाग़ा मिळेल ना?

कारण आता काहीच ठाऊक नाही...

मागे एक ववीचा डान्स व्हिडीयो बघितला तेव्हा कुणीतरी मेल आयडीने लावणि केली ... भारी होती ती! एक्दम उत्स्फुर्त !

मानिनी, हे जुने जाणते लोक्स बेसिकली एकमेकांची टिंगल करतात Proud नवख्यांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. सो जोपर्यंत तुम्ही नविन आहात तोपर्यंत एंजॉय.. Proud
निसंकोचपणे वविला जावा लोकहो. भयंकर मज्जा असते. अभासी जगातले मायबोलीकर आणि प्रत्यक्षातले मायबोलीकर फार वेगळे आहेत.

रच्याकने ववि आला तरी निंबुडा कशी नाही उगवली अजुन इथे? ठिकेय न ती? कोणाकडे तिची काही खबरबात?

मागच्या वर्षी च्या वृत्तांताच्या धाग्यावर 'मी पुढच्यावर्षी येईन' असं कबुल केल्याचं मला आठवतंय. त्याला ओढत घेऊन जावा.

मी या वर्षी नाहीये ते ठिकेय पुढच्या वर्षी जिथे कुठे असेन तिथुन वविला येणार Sad मला लैच दु:ख होतंय यावर्षी जमत नाहीये त्याचं Sad भ्याआआआआआआआआआआआआआ!

मी बरीच वर्षे मायबोलीवर आहे. मी कधीही वविला गेलो नाही. (मी प्लॅन करुन वेळ काढु शकतो, हे ठिकाण बर्‍यापैकी जवळ आहे आणि काही प्रॉब्लेम नाही पण तरीही मी जात नाही कारण मला नवीन लोकांमधे कंफर्टेबल वाटत नाही) पण हा माझा वैयक्तीक इशु आहे वविचा नाही किंवा मायबोलीचा नाही.

केवळ फोटो पाहुन एखादी गोष्ट अव्यवस्थित असेल नीट नसेल म्हणुन हँग अप येणे ही वैयक्तीक गोष्ट आहे, त्यावरुन जे जातात किंवा जे तुम्हाला यायला सांगतात त्यांनाच शहाणपणा शिकवु नये. जे जातात ज्यांच्या ओळखी आहेत ते जातील आणि एंजॉय करतीलच काय गरज आहे त्यांना तुम्हाला विचारायची? मला तरी वाटते जे लोक जातात , एंजॉय करतात त्यांना आपल्याप्रमाणे इतरांनाही हा आनंद मिळावा असे वाटते म्हणुन ते विचारतात, त्यांना "तुम्ही आम्हाला कशाला सांगता" या टोन मधे आपण का जात नाही हे स्वतःचा शहाणपणा दाखवण्यासाठी का लिहावे?

तुम्हाला माझ्यासारखा हँग अप नसेल तर वविला जरुर जा. समजा वाईट अनुभव आला तर परत नाही जायचे. पण न जाताच पुर्वग्रह बनवुन न जाण्याने तुम्ही मजा मिस कराल. (या वर्षी सुदैवाने पाउस चांगला झाला/होत आहे. जर वविपर्यंत राहिला तर तिथे आणखी छान वातावरण असेल)

>>> (या वर्षी सुदैवाने पाउस चांगला झाला/होत आहे. जर वविपर्यंत राहिला तर तिथे आणखी छान वातावरण असेल) <<<<
बरोबर....
अन आजवरचे ववि हे कोकणपट्टीत घाट उतरुन खालच्या अंगाला होते.
अर्थात पाऊसपाणी भरपुर असले तरी "थंडी" तितकीशी नसते...
या वेळेसचा ववि घाटावर आहे, इकडे भणाणते वारे, व थंडी असणार आहे. तेव्हा येणार्‍यांनी थंडीपासुन संरक्षणासाठी पुरेशी तजवीज करुन ठेवावी, कंटाळा करु नये, (खास करुन लहान मुलांसाठी).
लक्षात घ्या की कर्जत/खोपोलीच्या दमट हवेतील पावसाळ्यातील ववि, अन पवनानजिक घाटमाथ्यावर मावळातील मोकळ्या भणाणत्या हवेतील पावसाळ्यातील ववि यात फरक असणार आहे. कानाला बांधायला रुमाल /मफलर/स्वेटर वगैरे जरुर बरोबर ठेवा... चिखलापाण्यात खेळताना काही वाटणार नाही, पण खेळून झाल्यावर बाहेर आल्यावर हुडहुडी भरु शकते याची मानसिक तयारी ठेवा. ज्यांना थंडीचे वावडे नाही, त्यांचा प्रश्न नाही, पण जे थंडी सहन करण्यास कमी पडत असतील, तर त्यांनी काळजी घ्यावी. Happy
तसेच, गरज पडल्यास रिसॉर्ट वाल्यांना सांगुन शेकोटी करता आली तर अधिक उत्तम. Happy (असे मला वाटते).

मी प्लॅन करुन वेळ काढु शकतो, हे ठिकाण बर्‍यापैकी जवळ आहे आणि काही प्रॉब्लेम नाही पण तरीही मी जात नाही कारण मला नवीन लोकांमधे कंफर्टेबल वाटत नाही>>>>>>>> मेरी मनकी बात बोल दी.शिवाय सर्व तरुणाईत ऑड (ओल्ड) वुमन आऊट!

राखी - अहो काही गैरसमज नाही, मी सहजच टाकले ते की हे एक कारण असु शकते जेव्हा आपण नविन लोकांत जातो.

रीया - मी जवळ्पास गेले ६-७ महीन मायबोलीवरचे लिखाण वाचतेय, व वि व्रुतांत वाचुन अन तुम्हा सर्वांच्या अनुभवांवरुन यावेसे वाटतेय खरे पण सोबत नाहीये. फ्रेंडस आणी परिवारासोवत गेला आठवडा मस्त पावसाळी सहलच काढली होती त्यामुळे आता कोणीही कंपनी द्यायला तयार नाहीयेत.

शिवाय मीही थोडीसी मितभाषीच आहे, नाही मिसळता येत अनोळखी लोकांमध्ये

देवकी, नो ओल्ड. ऑल यंग! Lol ववित दंगा करणारे काही सुजन केस पांढरे झालेले असतात, असू शकतात आणि शांतपणे किंवा टकामका सगळीकडे बघत वविचा आनंद आपल्या स्टाईलने घेणारे सुजन अगदी कोवळे युवक-युवती असू शकतात. वयावर काहीच नाही अवलंबून आणि आनंद लुटण्याची प्रत्येकाची आपली स्वत:ची अशी वेगळी स्टाईल असतेच! Happy

अहो mansmi18 , लेखात वर " किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत? " ही ओळ लिहीलीये ना?
म्हणूनच लोकं लिहीत असतील त्यांची न जाण्याची कारणे.

आणि परागच्या पोस्ट ला माझे पुर्ण अनुमोदन. त्याने फोटो पाहिलेयत फक्त, मी तर त्या ववी ला उपस्थित होते. तिथे जे काही चालले होते ते पाहून परत ववी ला जायची माझी काही हिंमत आणि इच्छा नाही.
तुम्ही अनोळखी स्त्री पुरुषांच्या ग्रूप मध्ये आहात आणि पाण्यात जात आहात, तर जरा व्यवस्थित कपडे (अप्रोप्रिएट ड्रेसिंग) घालून जा. नसते अत्याचार कशाला दुसर्‍यांच्या डोळ्यांवर?

मी एका वविला उपस्थित होतो आणि तो खूप एंजॉयही केला, त्याच्या पुढच्या वर्षीच्या वविच्या संयोजनातही काही काळ होतो पण त्यावर्षी अचानक घरगुती अडचणी आल्या आणि ते सगळे मधेच सोडावे लागले. त्यानंतर आजपर्यंत शक्य असूनही जाण्याची इच्छाच झाली नाही.
तसेही मला या धाग्याचा उद्देश अजूनही समजलेला नाही. ज्यांना जावेसे वाटते ते जातात बाकीचे नाही. मायबोलीच्या इतर कोणत्या उपक्रमाबद्द्ल असा धागा निघाल्याचे मला तरी आठवत नाही. इतके कॅनव्हासिंग कशाला?
मायबोली आयुष्याचा अविभाज्य भाग वगैरे माझ्याही आहे, इथे जे मिळाले ते भरपूर आणि भन्नाट आहे. पण शेवटी तो एक 'भाग'च आहे आणि त्याला मी किती आयुष्य व्यापू देणार हा फारच वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे वविला येणे-न येणे हा त्याच निर्णयाचा भाग असू शकतो हे लक्षात घेतले जावे. अशाच कारणाने लोक मायबोलीच्या गणेशोत्सवात, दिवाळी अंकात किंवा इतर कोणत्या उपक्रमात भाग घ्यायचा की नाही ते ठरवत असावेत हे अगदी शक्य आहे. माझ्या आयुष्यात मायबोलीचे जे स्थान आहे तेच तुमच्याही आयुष्यात असले पाहिजे असे कसे असेल?
आता हे देखील लिहावे की नाही असाच विचार इतके दिवस करीत होतो कारण इथे थोडाही वेगळा सूर लगेच 'ववि-विरोध' मानला जाईल असे दिसते. एखाद्या मजेच्या-लाईट-टाईमपास उपक्रमाबद्दलचा इतका पराकोटीचा 'पझेसिव्हनेस' मला तरी अचंबित करणारा वाटतो.
आता एवढे सगळे लिहूनही मूड लागलाच तर या वविलाही मी येऊच शकतो!

देवकीतै, मला म्हणायचंय सगळे वविकर्स मनाने कायमच तरुण असतात. एक्दा जाऊन तर बघा Happy

मानिनी, सोबतीला आहेत की हे एवढे माबोकर. पुरेसे आहेत Happy खरच जा यावर्षी Happy

माफ करा मंडळी, पण एकुण चर्चेतील काही मेचका नकारात्मक सूर पहाता अजुन एक सुचना द्यावीशी वाटते की यंदा चिखलात लोळता येणार आहे.... Wink
तर त्याचे फोटो कृपयाच कुणी प्रसिद्ध करु नयेत,
नैतर नखशिखांत चिखलात माखलेल्या लोकांचे फोटो पाहुन कुणा हलक्या ताकदीच्या हृदयाला, किळस वा भिती वा शहारा वा अजुन कै कै व्हायचे/वाटायचे , नको ते प्राणी अन दृष्ये आठवायची , तर कृपयाच..... चिखलातील बरबटलेले फोटु नका टाकू. .... Proud

Dakshina tai..

Thank you g. it was really nice experience. maza 1st vavi anubhav hota.. १६ जुलै २०११.

Thank you to Mr.Yo Rocks Happy Happy ..

Bapre aapal drawing aathavun mala hasuch aavarat nahi aahe .

but ekdatari anubhav ghyava saglyani..

मी तर त्या ववी ला उपस्थित होते. तिथे जे काही चालले होते ते पाहून परत ववी ला जायची माझी काही हिंमत आणि इच्छा नाही.
>> 'त्या' म्हणजे नक्की कोणत्या वविबद्दल ही चर्चा सुरू आहे? ठिकाण, साल? Uhoh
नक्की काय चालू होतं? ते ही सविस्तर लिहा मग, विषय निघालाच आहे तर.

>>> इतके कॅनव्हासिंग कशाला? <<<
आगावा, मायबोलीवर वर्शाचे ३६४ दिवस भेटतात लोक ते "नेट वरुन", अधेमधे गटग होतात, पण ती मर्यादित असतात. हाच एक नियमित अधिकृत कार्यक्रम असा आहे की ज्यात माबोकर एकमेकांना प्रत्यक्ष भेटतात. त्याची रचना/आयोजन माबोकरच करतात. अन त्यामुळेच वर्षाचे बाकी ३६४ दिवस व्हर्च्युअस्ल नेटविश्वात वावरणारे प्रत्यक्ष भेटतात, हा एक अत्यंत महत्वाचा योग - कार्यक्रम मानला जातो. अर्थात त्याची पुरेशी चर्चा होणारच.....
अन त्या चर्चेला "कॅनव्हासिंग" असे मी म्हणू शकत नाही. Happy
कारण याच न्यायाने, उद्या तुझा बुद्धिप्रामाण्यवाद "नवरानवरीचे लग्न ठरलय, तर उगा लोकांना आमंत्रण पत्रिका का वाटताय, नौरानौरींना करुदे की काय करायचं ते ! " असे विचारण्यापर्यंत पोहोचू शकतो हे मला ठाव आहे... Proud

अगं लिहीलय की खालच्याच ओळीत
"तुम्ही अनोळखी स्त्री पुरुषांच्या ग्रूप मध्ये आहात आणि पाण्यात जात आहात, तर जरा व्यवस्थित कपडे (अप्रोप्रिएट ड्रेसिंग) घालून जा."

लिंबू Rofl मस्त प्रतिसाद.

आगावा शेवटी ज्याचा त्याचा दृष्टिकोन, मला लोकांनी वविचा अनुभव घ्यावा असं वाटत होतं म्हणून मी आत्मियतेनं धागा काढला (तो पण माझ्या हक्काच्या रंगिबेरंगीवर) त्याला कॅन्व्हासिंग असं मी सुद्धा म्हणू शकत नाही. तुला म्हणायचं असेल तर म्हणू शकतोस. तुझी मर्जी.

पाण्यात जातानाचं अ‍ॅप्रोप्रिएट ड्रेसिंग म्हणजे नक्की काय? Uhoh
पुरुष तर नॉर्मली फुल ड्रेस नाहीच घालत. मग तुम्ही गेलाय बरोबर तो तुमचा मोठा ग्रुप असो वा रिसॉर्टवर आलेला इतर ग्रुप असो.
जाऊ दे पण इतका काथ्याकुट कशाला करतेय मी तरी. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आपण काय करू शकतो? अगदी साड्या नेसून पाण्यात उतरलं तरी बोलणारे बोलतीलच.

या विषयावर हे मा शे पो.

अय्या मी आत्ताच भारतात येऊन गेले
नहीतर दक्षिणा तुमची post वाचून मी तरी नक्कीच आले असते (एरवी आले नसते...पट्कन मिक्स होता येत नाही म्हणून)
UK मध्ये future मध्ये जर काही GTG असलं तर मी नक्की येइन

कसला भारी पाऊस पडतोय ना महाराष्ट्रात Happy Happy I am sure या ववि ला खूप मजा येइल
(आणि मी ती miss करणार)

तुम्ही अनोळखी स्त्री पुरुषांच्या ग्रूप मध्ये आहात आणि पाण्यात जात आहात, तर जरा व्यवस्थित कपडे (अप्रोप्रिएट ड्रेसिंग) घालून जा. नसते अत्याचार कशाला दुसर्‍यांच्या डोळ्यांवर?

डोळ्यांवर अत्याचार होत असतील हे थोड्याफार प्रमाणात खरे आहे, पण हे अत्याचार जनरली तुम्ही कुठल्याही रिसॉर्टाला गेलात तरी होतच असतात. भारतात पाण्यात उतरताना पुरूष मंडळी हाफ पँट (त्यातले काही जण तर जरा जास्तच हाफ मध्ये) आणि स्त्रीया जनरली लांब टीशर्ट आणि खाली लेगींग्स या अवतारात उतरतात. पंजाबी ड्रेसम्ध्ये उतरणा-या बायकाही मी पाहिल्यात. रिसॉर्टमध्ये फक्त माबोकरच नसतात तर इतर जनरल पब्लीक पण असते. त्यामुळे अगदीच शुचिता बाळगायची म्हटले तर ते अशक्य...

पाण्यात उतरताना आपल्या माबोकरांचा ग्रुप व्यवस्थित काळजी घेऊन उतरतो, पुरुष लोक शक्य तितक्या डिसेंट कपड्यात पाण्यात उतरतात, दुसरा ग्रुप मुद्दम काही हरकती/त्रास देत असेल तर काळजी घेतात. बाकी इतर पब्लिक काय घालुन पाण्यात उतरेल यावर आपले काही बंधन नाहीय.

तो लावणी वाला यो रॉक्स..

मस्त धागा.

मी चेन्नईला असल्याने याही वविला येणर नाहीये Sad पण ववि टोटल धमाल असतो हे मात्र खरं.

पियु, मी नवर्‍याला घेऊन गेले होते. त्याने पाण्यात उतरणार नाही (मला वाटतं थोडा ताप वगैरे आला होता त्याला) असं सांगितलं होतं. माबोकरांनी त्याचं सेफ डीपॉझिट बॉक्स केला. कॅमेराच्या पिशव्या, घड्याळं, पाकिटं सांभाळत बसला पण तरी बोअर मात्र झाला नाही.

दगडूला बसमध्ये कोळीडान्स पण करायला सांगा.

अरे बापरे, या चर्चेला लागलेले वळण पाहून आधीच लांबून नाक मुरडणार्यांची नाकं पार वाकडी होतील! Lol
कोणत्याही वाॅटर रिसाॅर्टला गेल्यावर तिथले नियम पाळून जर कुणी वावरत असेल तर तुम्हाला तक्रार करायला वाव नसतो. स्वातीने लिहीले तसे होते बरेचदा. पण त्यावर उपाय म्हणजे पूलसमोर न थांबणे. जे पाण्यात खेळत असतात ते अगदी रममाण झालेले असतात दंग्यात. काठावर उभं राहिलेल्यांना त्यातली मजा कशी कळणार? याच न्यायाने मी आजवर कधीही पूलजवळ जास्त फिरकले नाहीय आणि उतरलेही नाहीय. लेट अस ऑल एंजाॅय. स्वतःचा कंफर्ट झोन शोधते. त्या वेळेत दुसरीकडे किती मस्त गप्पा रंगलेल्या असतात, बागेतले झोके रिकामे असतात, कॅरमचा गेम क्वीनवर खोळंबलेला असतो.. रिसाॅर्टचा परिसर नयनरम्य असतो.. आपल्या डोळ्यांवर अत्याचार होऊ द्यायचे का नाही हा निर्णय पापणी मिटायच्या आत घेता येतो, नाही का? Happy

आणि हे कॅनव्हासिंग असलं तरी काय फरक पडतो? दिवाळी अंकाप्रमाणे यालाही कमी प्रतिसाद येत असेल तर कुठे चुकतंय हे शोधायला काही हरकत नसावी. उलट, इतर उपक्रमांसाठीही अशी चर्चा व्हायला हवी.

Pages