मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

दक्षे, भारी लिहिलयस, माझा कितवा ववि असेल ते मोजायला लागेल आता. पण मला पहिला ववि नक्कीच आठवतो आहे. युकेज ला होता तो आणि मी बाहरेनहुन सुट्ट्यांसाठी आलेली अस्तानाच वविला येणार होते. पण मुंबईहुन वविला येणार का पुण्याहुन हे ठरवता येइना, कारण पुण्यात माझी राहण्याची सोय नव्हती आणि मुंबईहुन मला जमू शकेल अस वाटत नव्हत. तेंव्हा मयुरेश आणि रुमानी एवढ्या सहज," ई मग आमच्याकडे रहा की, त्यात काय एवढं?" म्हटल होतं तेंव्हापासून मला पुण्यात कायमच हक्काच घर मिळालं आहे. आजही अगदी सहजच मला कंटाळा आला म्हणून आले एवढ्या कारणावरुनसुद्धा मी या घरात हक्कानी जाते आहे.
तेंव्हा मग मी पुण्याहुन येउन मुंबईला जाणार होते, जाताना मुंबई पब्लिक सोबत गेले, मुंबईच पब्लिक तेंव्हा लोकल नी येत असे वविला Uhoh माझ्या दोन बॅगा दोन पोरं हे सगळ सांभाळत मला वाशीला घरापर्यंत पोचत केलं गेलं मला. (मनी,इंद्रा आनंदमैत्री आणि कोण कोण होतात रे? :अओ:) आता तेंव्हा या सगळ्या प्रवासात कोण कोण होतं ते आठवत सुद्धा नाहिये मला. वविला आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या घरी सुखरुप पोचेतो ही जबाबदारी संयोजक मंडळातल्या प्रत्येकाला वाटत असते.

दक्षुतै.. मस्त लिहलयसं .. Happy
रच्याकने माझे गेल्या वविचे पैसे तु भरले होतेस ..मी ते अजुनही तुला दिले नाहीय(बहुतेक?) हे आता माझ्या लक्षात आलयं .. कित्ती टक्के व्याज लावतेस Proud Uhoh

जवळचा जिवलग मित्र माझा नवरा आणि जिवलग मैत्रीण माझी बहीण. पिकनीकचे सोबती माझे दोन्ही घरचे, भाचेकंपनी, कझिन्स वैगेरे. एकत्र निघालो तर वरात होइल स्मित >>>> +१११

आमची अशी वरात अधुन मधुन वेळ साधून निघतेच त्यामुळे खुप काही मिस करते असं वाटतच नाही कधी Happy

ग्रुपिझम चा फटका वविला बसत असावा,ग्रुपिझम मध्ये वाईट काहीच नाही म्हणा,पण पैसा खर्च करुन यायचं व एका कोपर्यात बसून रहायला लागणे या विचाराणे अनेकजण ववि टाळत असावेत.

श्यामली, मोदी रिसॉर्ट २००६ चा ववि होता तो ..>>> बरोबर. मोदीचा होता तो.

,पण पैसा खर्च करुन यायचं व एका कोपर्यात बसून रहायला लागणे या विचाराणे अनेकजण ववि टाळत असावेत...>>> शंका बरोबर आहे. पण खरच तसं होतं का हे वविला एकदा यऊन कन्फर्म करायला हरकत नाही. नाही का? Happy

दक्षिणा, छान लिहिलं आहेस.
मला ते सुरूवातीचे ववि (सिंहगड २००३ आणि मुळशी २००४) अजून आठवतात.
२००९ चा ववि हा माझा शेवटचा ववि. त्यानंतर वविला जाणे वेळेअभावी जमलेले नाही. पण वेळ काढून जावे असेही वाटलेले नाही.
२००९ च्या वविमधे कुठलाही वाईट अनुभव वगैरे होता असे काही कारण नाही पण सुरूवातीचे ववि आणि २००९ चा ववि यात काही महत्वाचे फरक होते.
१. माणसांची संख्या
२. सांस्कॄतिक कार्यक्रम व खेळ.

सुरूवातीच्या वविंमधे बहुतेक सर्वांशी बोलता आले होते. गप्प झाल्या होत्या. ते मला फार आवडले होते. २००९ च्या वविमधे ८०-९० किंवा अधिकच लोक होते बहुतेक. बसमधे जाताना खूप धमाल आली. तिथे पोचल्यावर भिजणे कार्यक्रम वगैरेही मस्त पण दुपारच्या जेवणानंतरचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा वेळ हा मला कंटाळवाणा झाला. (कुठल्यातरी स्पर्धेत बक्षिसही मिळाले मी होते त्या ग्रुपला पण तरी.) सां स ने आखलेले कार्यक्रम कल्पक होते यात वाद नाही पण आलेल्या सर्व लोकांशी ओळख व्हायला, बोलायला काहीच वेळ मिळाला नाही.

जे आधीच्या ओळखीचे होते ते सोडून जेमतेम ४-५ नवीन लोकांशी हाय-हॅलो, तुझे नाव काय-माझे नाव काय? इतपतच ओळख झाली.
आधीच्या ओळखीच्या लोकांशीही पोटभर गप्पा मारल्याचा, त्यांच्याबरोबर दंगा करण्याचा आनंद मिळाला नाही.
वविला पोचताना मुंबई बसमधे आणि नंतर परतीच्या वेळेला पुणे बसमधेच ज्या काय गप्पा झाल्या असतील तितक्याच.

हे मला नाही आवडलं.
याला पर्याय नाहीये हे मला समजतं. तसंच माझी नवीन ओळखी करून घेण्याची क्षमता संपली असेल हे ही मान्यच आहे. त्यामुळे संयोजक वा सां स यांच्यावर ही टीका नाही हे लक्षात घ्यावे.

ग्रुपिझम हा प्रकार वविमधे नक्की नसतो. अगदी माबोवर ग्रुप्स असले तरी. हे मी खात्रीशीर सांगू शकते. त्या धास्तीने न जाण्याचे करू नका.

मी ही अजुन वविला आलो नाहिये, काय करु विचार करतोय, मनात प्रचंड धाकधुक आहे, बस मधे बसायला जाग मिळेल की नाही की उभंच रहावं लागेल, मी खाण्याचे पदार्थ माबोवर पोष्ट करतो त्यामुळे मला खरखुरं जेवण / नाष्टा मिळेल की फोटोच देतील मला, दक्षी मला पाहताच मुस्काड तर फोडणार नाही?(पण ती ओळखेल कशी मला?) बागुलबुवा कसे दिसतात माहित नाही,

जाम टेंशन आलंय काय करु सांगा....
करु का बुकींग?

नी अतिशय प्रामाणिक प्रतिसाद. पहिल्या एक दोन वविंची संख्या खरोखरी कमी होती. आणि तू आलेला शेवटचा ववि हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला होता (माझ्यामते) २००९ (मला तर मेलीला वविचं ठिकाण आणि साल काही लक्षात रहात नाही :अओ:)
मोठ्या संख्येने लोक असतील तर जास्त गप्पा वगैरे मारता येत नाहित हे नक्की (खास करून नविन लोकांना अधिक ओळख करून घ्यायची असेल तर)
जुने लोक काय कुठे ही कुणाशीही बोलतातच Proud

वर बर्‍याच लोकांनी आपल्या पहिल्या वविच्या आठवणी आणि अनुभव लिहिले आहेत. सगळे पॉझिटिव्ह आहेत हे पाहून इतका आनंद झालाय, कि माझ्या धाग्याचं सार्थक झालं. हा धागा वाचून बुजलेले १-२ नवे सभासद आले तरी मी धन्यता मानेन.

पुन्हा एकदा कळकळिने सांगते, हा आनंदाचा सोहळा आहे चुकवू नका.
हा सोहळा वर्षातून एकदाच येतो Sad (त्याचे मला वाईट वाटते) कसर भरून काढायला अधुन मधुन गटग असतातच, पण ववि तो वविच...

मला एकदा तरी वविला यायची इच्छा आहे.

5 वर्षांपूर्वी गडकरीच्या कट्ट्यावर काही मायबोकरांची पहिल्यांदा भेट झाली होती. आपण या सगळ्यांना पहिल्यांदा भेटतोय असं अजिबात जावणलं नव्हतं. त्या गटगवरून वविला सगळेजण किती धमाल करत असतील याची कल्पना आली.

ज्यांना आय डी मागचा चेहरा (माणूस)) जाणून घ्यायचा आहे त्यांनी ववि किंवा गटगला नक्की जावे!

राखी, मेलबर्न / ऑस्ट्रेलियातून ववि स्पेशल बस निघाल्यास नक्की Wink

मला ही वविला यावेसे वाटते.. कुण्णाशी ओळख नसली तरी मजा येईल असे वाटते. पण इतक्या लांबून ३-४ दिवसांची सुटी खर्च करून येणे जमत नाही. Sad चालायचच.. Sad

मेलबर्न / ऑस्ट्रेलियातून ववि स्पेशल बस निघाल्यास नक्की>>>>>

वत्सला, तिकडेच ववि ठेवा ना.... मुंबई पुणेकराना विशेष निमंत्रण! द्या Happy

मला ही वविला यावेसे वाटते.. कुण्णाशी ओळख नसली तरी मजा येईल असे वाटते. >>>

पुण्याला येणार होता ना? ती सुटी ह्या वविच्या सुमारास घ्यायची आहे काय नाही काय?!

कृष्णा, नक्की या !

पुढचा ववि मेलबर्नला होऊन जाऊ द्या!

ऑन अ सिरियस नोट, एकदा एक इंटरनॅशनल ववि होऊन जाऊ द्या!

नेमकी आत्त्ता सातारा ट्रीप नाहीना... गणपतीत पुण्यात २ दिवस यायचा विचार आहे कृष्णाजी Happy (खर तर सिंहगड मुलीला दाखवायला गेले ४-५ वर्षापासून ठरवतेय.. पण जमेना गेलयं )

Pages