आला पावसाळा.... कारपेट सांभाळा ;-)

Submitted by विनार्च on 23 June, 2016 - 11:02

हाय, Happy पावसा सोबत आम्हीही एन्ट्री मारत आहोत ....लक्ष असू द्या

पहिल्या पावसाने ही जादू केली

IMG_20160611_190000.jpg

माध्यम : अ‍ॅक्रलीक कलर विथ नाइफ (अ‍ॅक्रलीक कलरला ब्रश लावणार नाही , ही शप्पथ घेतलीय बहूदा Proud )

हे सोफ्ट पेस्टल मधलं काम.... आमचं ड्रिम हाऊस Happy

IMG_20160508_202659.jpg

दिदीच बड्डे गिफ्ट....

2016-05-05 15.41.38_1462443126975.jpg

एकदम परफेक्ट आहे ना ? आमची दिदी थोडीशी खडूस बनून, आमच्या आसपास भटकणार्‍या लोकांवर बारीक लक्ष ठेवून असते नी आम्ही खोड्या काढण्यात बिझी Wink

तुम्हाला क्ल्ब पेंगवीन गेम माहिती आहे का? त्यातल्या डि जे केड्न्सने वेड लावलयं ... दिवस रात्र आम्ही तिची गाणी गात असतो ( आईच्या मते वात आणतो Sad )
ती ही केड्न्स
20160524_120751.jpg20160526_131532.jpg

लगे हातो अजून थोड मातीकाम करुन घेतल

20160526_131229.jpg20160526_131157.jpg

हा ड्रॅक्यूला.... ह्याच डिटेलींग जर तुम्ही ओळखल , तर हा तुमचा Happy

20160502_181337.jpg

हा पेपरवेट बाबासाठी Happy
20160526_131000.jpg

हे , "कर कर , त्या कारपेटची माती कर " ,हा मंत्र पठण करणार्‍या माझ्या प्रेमळ आईसाठी Wink
( धाग्याच्या नावाचा प्रश्न सुटला ना ? Proud
20160526_131739.jpg

ह्या उन्हाळी सुट्टीत आम्ही कुठे गायब होतो ? हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ... नेहरु सायन्स सेंटरचे बरेच वर्कशॉप आम्ही अटेन्ड केले त्यामुळे इकडचे उद्योग थोडे कमी Wink
हे एरोमॉडलींग वर्कशॉप मधल काम
20160603_204025.jpg20160603_204049.jpg20160603_204109.jpg20160603_204134.jpg

जेवढ शिकवल तेवढच केलं , तर आमचं नाव बदलतील ना Proud

20160603_203848.jpg20160603_203901.jpg

ह्या सोबत आम्ही छोटे छोटे हार्ट्सही बनवले होते ,ते सगळे वर्कशॉपला येणार्‍या दादालोकांनी घेतलेआणि अजूनपण बनवायला सांगितले पण मी इतके छान प्राणी बनवले ते त्यांना नको झाले ... खडूस दादाज्स

कसे वाटले आमचे उद्योग ? नक्की सांगा हा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर हस्तकला.

सिंह आणि ड्रॅक्युल्याच्या मधला मुखवटा विशेष आवडला. प्रपोर्शन्स सुंदर आहेत. अन बोल्ड रेंडरिंग. फिनिशिंगसाठी -खासकरून दातांच्या रेघांवर- ६ नंबरचा ब्रश साध्या पाण्यात घालून वरून फिरवला तर अजून मस्त दिसेल. पेपरवेटवर ते काम ऑलरेडी केल्यासारखं दिसतंय. (लाल माती टेराकोटा सारखी दिसते आहे. ओव्हनमधे भाजता येईल का? )

हे करणार्‍या मुलाचे वय समजेल का?

कौतुकाला बाकी शब्द नाहीत ...
लिहिलेय खुसखुशीत हे लिखाणाचे कौतुक तेवढे करतो..

धन्यवाद __/\__ Happy

पेपरवेटवर ते काम ऑलरेडी केल्यासारखं दिसतंय. (लाल माती टेराकोटा सारखी दिसते आहे. ओव्हनमधे भाजता येईल का? ) >>>>> पेपरवेट करताना तिने मातीचा गोळा चपटा करुन मग एक्स्ट्रा माती खरवडून आकार निर्माण केला आहे. हो ती टेराकोटाच आहे.. भाजता येइल पण भट्टी जवळ नसल्याने भाजून घेतल्या नाही आहेत ... थोडी अजून तयार झाली की एकत्र भाजायला द्यायचा विचार आहे
सुचनेसाठी मनापासून आभार Happy

हे करणार्‍या मुलाचे वय समजेल का? >>> ऋन्मेऽऽष , माझी लेक १२ वर्षाची आहे. लिखाणाच्या कौतुका बद्द्ल धन्यवाद Happy

ओह बारा वर्षे.. ग्रेट .. माझ्या पाहण्यात ओळखीच्यात असा कोणीही बारा काय सोळा वर्षाचा नाही ज्याला हे जमावे .. कमाल आहे लेक तुमची Happy

खूपच गोड अनन्याचं काम.
ड्रॅक्युला च्या डोक्यावर स्पायडर आहे. ड्रॅक्युलाने उजव्य हातात टॉर्च धरलाय का?
डाव्या हातात रक्त प्यायला पकडलेलं लहान मूल आहे का ?
(घाबरलेली) अनु

खुप सुंदर. मास्क खुप आवडला.
कारपेटचा संदर्भातलं काय आहे? पेंडन्ट आहे का? मग कारपेटचा काय संबंध आलाय त्यात?

बापरे, पहिलेच चित्र बघितले आणि बघतच बसले. काय अमेझिंग काढलेय.. बाकीचेही मस्तच आहेत.. अनन्याला मोठ्ठे चॉकलेट.. Happy

मस्तच ते पेंडंट टाईप आहे ते फार आवडल.

दुसर्‍या चित्रात मशरूम्स फुलझाडाहून मोठ्या? पण गोड आहेत. मारिओ मधल्यासारख्या. आणि तो दूर डोंगरांवर बर्फ. लै भारी.

Pages