'हे काय कुठे निघालीस नटून थटून ?'
'वड पुजायला. आज वटसावित्री आहे ना. सासुबाई सकाळपासुन मागे लागल्यात. '
'आता आईला काय झाल? तिच आणि तुझ तर अजिबात जमत नाही.'
'तेच म्हणतेय मी. आत सात जन्म आपण नवरा बायको असणार आणि तुम्हालाही जन्मोजन्मी हीच आई हवी. मग काय सात जन्म हीच सासु असणार. म्हणुनच मला वटसावित्रीची पुजा करण्यात जराही रस नाही'
'खर सांगतेस. तू मला मोकळ करायला तयार आहेस. यमच पावला'
'मलासुध्दा'
'आता ऐक. मला त्या पलिकडल्या बिल्डिगमधली सई आवडते. ती वटसावित्रीची पूजा करतेय माझ्यासाठी.'
'हो का तुमच्या आईलाही तसलीच नटमोगरी सुन पाहिजे.'
'तू तिला नाव ठेवु नकोस. आता नटते थोडफार. सगळ्या काही जन्मत: दिपिका नसतात. तसही तासभरच लागतो तिला'
'हो पण माझे दहा मिनिटसुध्दा तुम्हाला दहा तासासारखे वाटतात ना'
'तरीही शुर्पणखाच दिसतेस.'
'हे तुमच्या मातोश्रींचे शब्द'
'प्रत्येक गोष्टीत माझ्या आईला आणु नकोस'
'का नाही? त्या आहेत म्हणुन तर तुम्ही आहात'
'आता खुप झाल. मला धटस्फोट हवाय.'
' खरच। अरे व्वा। वडच पावला. आताच पम्याला फोन करते'
'पम्या?'
'माझा काॅलेजमधला मित्र. मेरा पहला प्यार. आता मी निघले.'
'आं अग थांब.'
'बाय'
(No subject)
नक्की काय चालू आहे..
नक्की काय चालू आहे..
अय्यो ही वटसावित्री न वाटता
अय्यो ही वटसावित्री न वाटता फट फट सावित्री वाटतेय.:अओ:
वट वट सावित्री!!!
वट वट सावित्री!!!
पम्याच्या बायकोचं काय?
पम्याच्या बायकोचं काय?