देव आणि शैतान

Submitted by Suyog Shilwant on 20 June, 2016 - 04:02

एकदा दोन मुलं शेजारच्या बागेतुन एक गोणीभर संत्री चोरतात.

त्याचे वाटप करायला एखाद्या निर्जन स्थानाच्या शोधात दोघे एका कब्रस्ताना जवळ येतात.

गेट वर चढून ओलांडून जाण्याच्या गडबडित गोणितून दोन संत्री खाली पडतात, पण त्या कड़े दुर्लक्ष करून दोघे आत जातात.

दरम्यान तिथून एक बेवड़ा टुन होऊन जात असतो, त्याच्या कानावर शब्द पडतात ... "एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ..."

तो धावत चर्च मध्ये जातो व धापा टाकत टाकत फादऱला सांगतो, "फादर, लवकर चला कब्रिस्तानात, ईश्वर आणि शैतान शवांचे वाटप करीत आहेत ..."

दोघेही धावत धावत गेट पाशी येवून थबकतात, तोच त्यांच्या कानावर शब्द ऐकू येवू लागतात, "एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा" आणि अचानक थोड्या शांततेनतर त्यांच्या कानावर पुन्हा शब्द पडतात "... आणि बाहेर गेट वर जे दोन आहेत त्यांचे काय करायचे?

बेवड़ा आणि फादर दोन्हीही *सैरा वैरा सैराट* ना राव ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users