१२ महिन्यांनी आज म्यागी नामक प्रकार पुन्हा करायला (आणि खायला) घेतला. म्हणून म्हटलं दोन मिनिटातच का खेळ खल्लास करा. घेऊया की चांगली १२ मिनिटे.
स्थळ - किचनकट्टा, दक्षिण-मध्य मुंबई
काळ - मध्यरात्रीचा
आचारी - मी स्वत:
मदतनीस - शेजारच्या पिंट्या
मदतीचे स्वरूप - भांडी धुवून देणे.
साहित्य - पॉर्न
जोक होता हं
साहित्य - कॉर्न , कोंबडीचे अंडे, वाटाण्याची भाजी, मटकीची डाळ (बहुतेक हं, मला डाळी स्वत:हून ओळखता येत नाहीत), म्यागी आणि म्यागीचे मसाले, म्यागीचाच टमाटर सॉस, एव्हरेस्टचे नको नको ते मसाले, कांदा आणि कोणचे तर लिंबाचे लोणचे.
अप्रकाशित साहित्य (म्हणजे जे ऊपलब्ध नव्हते, नाहीतर वापरायला आवडले असते) - फरसाण आणि घरगुती लाल ठेचा.
डायलॉग - जिथे लोकांचे पदार्थ बनवून संपतात तिथे माझे सुरू होतात..
तर वरच्या डायलॉगला अनुसरून डाळ आणि उसळ घरात तयार होती. मात्र त्यात कोलसवायला भात नव्हता. ताजा करून द्यायला आई नव्हती. सोबतीला शेजारच्या पिंट्यालाही काहीतरी खाऊ घालायचे होते. त्यांच्याच घरात पडलेली, एक्स्पायरी डेट संपत आलेली आणि त्यानेच हुडकून आणलेली, एक वेज म्यागीचे, एक चिकन म्यागीचे, तर एक येप्पी म्यागीचे पाकीट हाताशी होते. त्यांचीच मारामारी करून काहीतरी बनवायचे ठरवले.
आमचा फ्रिज कधीही उघडा, त्याचा एक कप्पा जणू खुराडाच असल्यासारखी आठ-दहा अंडी सहज हाताला गावतात. भाताचा प्रकार असता तर मोजून चार वापरली असती पण म्यागीच्या मूळ चवीवर कुठेही अत्याचार करायचे नसल्याने एकच उचलले. तसेही शाकाहारी लोकांचा पत्ता कट करायला एकच पुरेसे होते.
एका टोपात मीठ मसाला कांदा लसून कसलेही संस्कार न करता एवढासा तो अंड्याचा जीव फेटून तळून घेतला. याला आपण प्लेन भुर्जी म्हणू शकतो. त्यात वाटाण्याची भाजी आणि हॉट कॉर्न टाकले. कॉर्न मोजून सातच होते. काजू बदाम सारखे नेमक्या सात घासांना लागू नयेत म्हणून चमच्याने चेचून टाकले.
एकंदरीत पहिल्या टप्प्यानंतरचे चित्र असे दिसायला लागले.
त्यावर कांदा आणि म्यागीचा सॉस सोडल्यावर ते असे झाले.
आता म्यागीच्या नूडल्स बनवायची माझी पद्धत, पुढीलप्रमाणे -
एका मोठ्या टोपात पाणी ऊकळवून त्यात सर्व नूडल्स न मोडता टाका, त्या स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी गाळून फेकून द्या.
मग नवीन टोपात त्या धुतल्या नूडल्स घेऊन त्यात खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडेसे पाणी सोडून त्याला पटकन एक उकळी द्या.
अधनामधना एकेक नूडल चिमटीत पकडून, उचलून पटकन तोंडात टाकत खाऊन बघा. कचकच कमी होत नरम पडायला सुरुवात होताच गॅस काढून टाका.
आता अडमतडम मसाले टाकायची वेळ झाली समजा.
आयत्या वेळी काय टाकावे आणि काय नाय अशी धांदल उडायला नको आणि त्या दिरंगाईत नूडल्स नरम पडायला नकोत म्हणून सारे मसाले असे किचनकट्ट्यावर मांडून घ्या.
मसाल्यांचा गालिचा जेव्हा नूडल्सवर असा पसरतो बस्स तेव्हाच, तोंडाला पाणी सुटायला सुरुवात होते
गॅस चालू न करताच वाफाळलेल्या नूडल्ससोबत ते मसाले छानपैकी ढवळून घ्या. मसाले जितके कमी जाळाल तितके चांगले.
हळूहळू म्यागी आपला रंग पकडायला सुरुवात करते आणि तोंडातल्या पाण्याची पातळी वाढत जाते.
आता शेजारच्या चुलीवरील अंड्याच्या टोपात डाळीचे पाणी टाका. फक्त पाणीच टाका. डाळीचे अतिरीक्त कण टाकाल तर रोजच्यासारखा घरचा डाळभात खाल्यासारखे वाटेल.
त्या मिश्रणाला पटकन एक छानशी उकळी देत त्यात दुसर्या टोपातील नूडल्स सोडा.
जास्त ढवळाढवळ न करता फटकन एक चमचा फिरवून गॅस काढून टाका. वेळ लावाल तर एव्हाना धोक्याची पातळी ओलांडलेले तुमच्या तोंडाला सुटलेले पाणी त्यात पडायला सुरुवात होईल आणि आयुष्यभर ढवळतच राहाल.
म्यागी तयार झाली आहे.
पण ताटात घेतल्याशिवाय मजा नाही.
नूडल्स कमीतकमी तुटतील याची काळजी घेतली असेलच. त्यामुळे खायला काटा द फोर्कच वापराल.
(तसेही चमच्याने म्यागी खाणे म्हणजे हाताने वडासांबार खाण्यासारखे झाले)
गर्रमा गरमच खायाची असल्याने त्यावर गार्निशिंग करत त्याचे फोटो टिपायच्या भानगडीत पडलो नाही. वरच्या चित्रातील ताट किचनकट्ट्यावरून बेडरूममपर्यंत जाईस्तोवर, त्यावर एक लिंबू लोणच्याची फोड येऊन बसली होती.
विशेष टीप -- काय नाय. खायला या
- ऋन्मेष
कधी करून खाणार नाही हा
कधी करून खाणार नाही हा प्रकार!
पण लिहायची स्टाईल द शैली भारी आहे.
मॅगी बनवताना वापरलेला शाही
मॅगी बनवताना वापरलेला शाही बिर्याणी मसाला पाहून टडोपा मोमेंट वाटलं. त्यानंतरच लिंबू लोणच्याच ऍडिशन पाहून उठा ले रे भगवान ही अवस्था. !!
काय त्या मॅगीची ( माबो आयडी नव्हे ) हालत ...
असो , लिहिण्याची स्टाइल चांगली आहे. फक्त पाककृती जरा नीट टाकत जा..
अरारारारारारा.... काय ही
अरारारारारारा.... काय ही म्यागीची दैना
चिन्ग चे हक्का नूडल्स आणून हा प्रकार कर बघू.
पण लिहिलयस मात्र झोकात !
म्यागीची खरी कदर पुरुषच करू
म्यागीची खरी कदर पुरुषच करू शकतो.. एखाद्या पुरुषी प्रतिसादाची वाट बघतो
बाकी आधी नाव ठेवणारे नंतर वॉव करत खातात असे मी या रेसिपीबद्दल बरेचदा अनुभवले आहे. ईथे चव अपलोड करता येत नाही हे माझे दुर्दैव्य ..
अरारारा! बिर्यानि मसाल्यात तर
अरारारा! बिर्यानि मसाल्यात तर वेलची दालचिनी वगैरे असते, तो , छोले, पाभा मसाला, अंडी, लोणचं.... कल्पनेनेच ढवळून आलं!!
(No subject)
अरेरेरे...मॅगीची बिर्याणी
अरेरेरे...मॅगीची बिर्याणी कशाला केलीस ऋन्मेऽऽष?
मी मॅगीत मसाला सोडून काहीऽऽही घालत नाही...
बाकी, लिहिण्याची स्टाईल खरच मस्त!
दोन मिनटाच्या मॅगिला एवढा
दोन मिनटाच्या मॅगिला एवढा कुटाना कशाला ?
बाकी लिहिलय भारी..
बिर्यानि मसाल्यात तर वेलची
बिर्यानि मसाल्यात तर वेलची दालचिनी वगैरे असते,
>>>>>>>
हो. मलाही हे परवाच समजले
पण एवढ्या मसाल्यात त्यांचे अत्यल्प प्रमाण पाहता त्यांनी हलकासा फ्लेवर द्यायचेच काम केले.
तरी पुढच्यावेळी त्यांचा वापर फक्त दाखवायचे मसाले म्हणून करेन.
ऋन्मेऽऽष, कधी बोलावतोस
ऋन्मेऽऽष,
कधी बोलावतोस खायला....
मला असे अतरंगी प्रकार खायला लय आवडतात्...पुढील वेळी मुंबईत आलो की येतो तुझ्याकडे...
या कधीही फक्त एडवान्समध्ये
या कधीही
फक्त एडवान्समध्ये कळवा
कारण मुंबईत आपला काही एक ठिकाणा नसतो
मी एक थुकपा नावाचा पदार्थ
मी एक थुकपा नावाचा पदार्थ खाल्ला होता.....कोणाला माहित आहे का?
भारि लिहिलय ऋन्मेऽऽष
भारि लिहिलय ऋन्मेऽऽष
ना.फ. इथे बघा.
ना.फ. इथे बघा.
@नाना फडणीस साहेब, होय थुकपा
@नाना फडणीस साहेब,
होय थुकपा म्हणजे तिबेटीयन नूडल सूप (क्लिअर प्रकारातले) अतिशय मस्त लसूण फ्लेवर असतो त्याला , सिक्कीम अन इतर पूर्वोत्तर राज्ये इकडे त्याची खूप variation मिळतात, तसेच हिमाचल प्रदेश अन उत्तराखंडात सुद्धा सापडते हे सूप, खाश्या नेपाळ मध्ये तर आपल्याकडे वडापावच्या गाड्या असतात तसे स्टॉल लागतात थुकपा चे
कालच मास्टरशेफ ची जाहिरात
कालच मास्टरशेफ ची जाहिरात बघितली.
कु. ऋ. मध्ये पोटेन्शियल आहे.
त्या पेक्षा वे़ज पुलावच
त्या पेक्षा वे़ज पुलावच बनवायचाना... छान झाला असता
अरे भात करणं सोपं पडलं असतं
अरे भात करणं सोपं पडलं असतं रे.
माझा एक मित्र अशी मॅगी बनवायचा. एका टोपात पाणी उकळत ठेवायचं त्याला उकळी आली की त्यात दोन अंडी फोडुन घालाय्ची (यक्क) मग मॅगी न्युडल्स आणि मसाला. सगळं कहलवायचंं- हलवायचं (ब्याआआआआ) मॅगी चिकन क्युब, हाताशी असतील ते मसाले घालायचे आणि आटवायचं. मग ओरपायचं. हे ऐकुनच माझी मॅगी खाण्याची इच्छा मरुन गेली.
म्यागीत साजूक तूप पण मस्त
म्यागीत साजूक तूप पण मस्त लागते
कॉर्न , कोंबडीचे अंडे,
कॉर्न , कोंबडीचे अंडे, वाटाण्याची भाजी, मटकीची डाळ (बहुतेक हं, मला डाळी स्वत:हून ओळखता येत नाहीत), म्यागी आणि म्यागीचे मसाले, म्यागीचाच टमाटर सॉस, एव्हरेस्टचे नको नको ते मसाले, कांदा आणि कोणचे तर लिंबाचे लोणचे. >>
बापरे....हे वाचुन पुढचं काही वाचायची ईच्छा नाही झाली....आणि शेजारच्या पिंट्या ची दया पण आली ....
भावा एकच नम्बर.... असले
भावा एकच नम्बर....
असले नवनवीन प्रयोग करण्यातच खरी मजा आहे... रेग्युलर आयट्म तर नेहमीच खातो आपण...
आज सन्ध्याकाळी नक्की बनवतो हा प्रकार....
ऋन्मेष, जितकं छान लिहिलं
ऋन्मेष, जितकं छान लिहिलं आहेस, तेवढीच घाण केली आहेस त्या मॅगीची.
पुढचे ३-४ दिवस मॅगीच खाऊ शकणार नाही, इतकी अशक्य वाईट रेसिपी होती. बिचारा पिंट्या
फुकट प्रेमाचा सल्ला - ही अशी मॅगी गर्लफ्रेंडला कधीही खायला घालु नकोस. ब्रेकअप व्हायचा.
गफ्रेनेच रेसिपी दिली असेल तर?
गफ्रेनेच रेसिपी दिली असेल तर?
गफ्रेनेच रेसिपी दिली असेल तर?
गफ्रेनेच रेसिपी दिली असेल तर? डोळा मारा >>>>
तर मग प्रेमाचा सल्ला बाजुला ठेवुन, कुजकट सल्ला द्यावा लागेल कि 'ऋन्मेषने पुनर्विचार करावा
'
ही जरा जास्तच अॅडिशन्स
ही जरा जास्तच अॅडिशन्स केलेली मॅगी आहे, पण व्हेज मॅगी मिळते लेह मधे ती मस्त मिळते..त्यात एवढा पसारा नसतो पण टेस्ट मस्त असते.. मॅगीत कसुरी मेथी, मिरचीचे तुकडे आणि कच्चा कांदा घालायचा एकदम मस्त लागते..
मॅगीत कांदा भाज्या अंडी वगैरे
मॅगीत कांदा भाज्या अंडी वगैरे घालताना पाहिलंय लोकांना.
पण पावभाजी शाही बिर्याणी आणि छोले मसाला यांचा त्रिवेणी संगम हा फारच अत्याचार वाटतोय.
कोणीतरी खाऊन बघा आणि मला कळवा.(तुम लढो, हम पीछे काटे चमचे संभालते है..)
मस्तच आहे पाककृती.
मस्तच आहे पाककृती.
{तेवढे अंडे बाहेर काढशील}
{तेवढे अंडे बाहेर काढशील} please specify from.....
And please take this as a joke शब्दनिष्ठ विनोद and try not to get offended..
ते वाक्य वाचून अगदीच राहावलं नाही.
Bichara pintya.....
Bichara pintya.....
एवढीही वाईट नव्हती झाली
एवढीही वाईट नव्हती झाली हो.
पिंट्याच्या आईचा विश्वास आहे माझ्यावर..
Pages