वाचकहो हे चित्रपटाचे परिक्षण नाही!!!
मला दोन सिनेमे बघायचेच होते.. आहेत. एक पेले आणि दुसरा दी मॅन हू न्यू ईन्फिनीटी. पैकी, दुसरा पाहून झाला आणि जिवापाड आवडला.
आपण शाळेत गणितामधे अनेक अनेक गोष्टी शिकतो. खास करुन तुम्ही जर विज्ञान शाखेतून अभियांत्रिकीमधे प्रवेश घेतला असेल तर अनेक अनेक प्रकारचे गणित, गणितज्ञ, सिद्धांत, प्रमेय तुम्हाला शिकायला मिळतात. श्रिनिवास रामाणुजन ह्या गणित तज्ञाचे नाव मी कधीतरी शाळेत असताना ऐकले पण पायथॉगोरसचे प्रमेय जसे पटकन आठवतात तसे इतर गणित तज्ञांच्या शोधांबद्दल लगेच आठवत नाही. रामाणुजनबद्दल मला तो भारतीय शास्त्रज्ञ होता आणि गणितामधे त्यानी काहीतरी शोध लावला ह्यापलिकडे जाऊन फार काहीसे माहिती नव्हते. कुठल्या तरी परिक्षेची तयारी करताना १७२९ ह्या जादुई संख्येबद्दल वाचले होते. १७२९ ह्या संख्येला - Hardy–Ramanujan number म्हणतात. it is the smallest number expressible as the sum of two cubes in two different ways:
1729 = (1)3 + (12)3 = (9)3 + (10)3) (इथे ३ क्युब आहे)
त्यानंतर रामानुजन स्केअरबद्दल वाचले होते. त्याचा तो चौकोन खूप मजेशीर वाटला होता. त्याबद्दल तुम्हाला इथे वाचता येईल - https://en.wikipedia.org/wiki/Magic_square
तर आता सिनेमाबद्दल. हा सिनेमा खूप खूप हेलावून टाकणार आहे. आपल्याकडे भारतात हिन्दी सिनेमे मुळे कथेशी प्रतारणा करतात. जीवनपट बनवताना आपल्या पदरचे तिखटमिठ काळामसाला घालतात पण रामाणुजनांवरचा हा सिनेमा मात्र अथपासून इतिपर्यंत मुळ कथेशी प्रामाणिक राहिला आहे. ह्या सिनेमात रामाणुजनची भुमिका करणारा देव पटेल ह्यानी चेहर्यावर जे भाव दाखवलेत.. जो अभिनय त्यानी साकारला मला वाट्त रामाणुजनच्या वेषात इतका अजून कुणि चांगला अभिनेता मिळाला नसतात. देव पटेल हा खूप गुणि, देखना, तरल प्रसंग उभे करणारा कलाकार वाटला.
रामाणुजनबद्दल काहीच माहिती नव्हते पण जसाजसा सिनेमा पुढे पुढे जातो तसतसे रामाणुजनबद्दल कळत जात की ह्या व्यक्तिच्या जीवनात किती कठोर प्रसंग आलेत. त्यांना गणितामधे संख्या घेऊन गणित तयार यायचे पण अमुक उत्तर कसे आले ह्याबद्दल जो सिध्दांत लागतो तो त्यांना कधीच नीट मांडता आला. त्याबद्दल त्याची कळकळ देव पटेल ह्यानी खूप छान व्यक्त केली आहे.
Devika Bhise ही अभिनेत्री ह्या सिनेमात रामाणुजनची पत्नी दाखवली. ती अगदी टिपिकल दक्षिणात्य वाटते इतका छान तिचा गेटअप जमला आहे. आपल्या पतीपासून अनेक वर्ष दुर राहून विरह सहन करणारी एक स्त्रि ही भुमिका तिने सुरेख रित्या साकारली आहे.
सिनेमात रामाणुजन ह्यांचे गाईड म्हणून काम करणारे - हार्डी - Jeremy Irons ह्यांनी पण आपली भुकिमा सुरेख वठवली आहे.
एकूण ह्या सिनेमा बघावा असा आहे. मी इथे पुर्ण माहिती देत नाही. पण हा सिनेमा बघायला कुणि विसरु नये म्हणून हा धागा काढला आहे. हा सिनेमा अवश्य अवश्य बघा च च च!!!!
नक्कीच बघायचा आहे. आणि छान
नक्कीच बघायचा आहे. आणि छान लिहिले आहे.
धन्यवाद दिनेशदा. तुमच्या
धन्यवाद दिनेशदा. तुमच्या मनाचा मोठेपणा तुम्ही ह्याला छान लिहिले असे म्हंटले. मी हे लिहितानाच मला पोस्टू की नको असे झाले होते पण विचार केला प्रतिक्रियातून खूप काही मिळेल. शिवाय लोकांना हा सिनेमा बघा असे आपण सुचवित आहोत तो संदेश पोचला म्हणजे उद्देश सफल झाला धाग्याचा.
मला पण हा सिनेमा बघायचा आहे.
मला पण हा सिनेमा बघायचा आहे. अमेरिकेत कधी release झाला?
रामानुजन यान्च्या जिवनपटावर
रामानुजन यान्च्या जिवनपटावर आधारित असलेल्या चित्रपटावर धागा सुरु केल्याबद्दल हर्ट तुमचे मनापासुन अभिनन्दन.
<<मी हे लिहितानाच मला पोस्टू की नको असे झाले होते पण विचार केला प्रतिक्रियातून खूप काही मिळेल.>
---- छान काम केलेत. तुमच्यामुळे किमान २५ लोक हा चित्रपट बघुन काही चान्गले करायचा प्रयत्न करतील... मी नक्की बघणार आहे.
नक्की पाहा. रामानुजमच्या
नक्की पाहा.
रामानुजमच्या जीवनावर दोन तासांची चित्रफीत आहे डीडी भारतीकडे.ती पाहिली आहे.त्यानिमित्ताने कुंभकोणम,चैन्नईतली त्यांची शाळाही दाखवली आहे.शेवटी उदोउदो करणारे ब्राम्हण लोक,गावकरी मृत्यनंतर महायात्रेला फिरकतच नाहीत करण समुद्र ओलांडण्याचं त्यांनी पाप केलं होतं.
दु्र्दैवाने या महान गणितीच्या नावावर कोणताही शोध नोंदला गेला नाही.
पाहायचा आहे.. उत्कंठा
पाहायचा आहे.. उत्कंठा वाढवणाऱ्या धाग्याबद्दल धन्यवाद !
धन्यवाद सर्वांचे. आणि
धन्यवाद सर्वांचे.
आणि ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे त्यांच्याकडून प्रतिसाद वाचायला आवडतील.
रसप, हो नक्की पहा आणि तुझ्याकडून मग नक्की परिक्षण हवे आहे
पहायचा राहिलाय, नक्कीच पाहणार
पहायचा राहिलाय, नक्कीच पाहणार