AIB ची किड फोफावणार होतीच. काही आश्चर्य नाही वाटले त्यात. पण खेद मात्र झाला.
हा माझा २०१५ चा धागा - AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी - http://www.maayboli.com/node/52596
आता तो धागा लॉक आहे, पण मी तेव्हाच याचा निषेध केला होता. तेव्हाच सावध केले होते. वॅलेंटाईन डे ला गरीब बिचार्या प्रेमिकांना फटकवणार्या संस्कृतीरक्षकांनाही तेव्हाच आवाहन केले होते. तेव्हा हे जे काही थेरं चालू होती ती एका खाजगी जागेत आणि आपापसात चालली होती असा युक्तीवाद होत होता. चला आतापुरता तो मान्यही करूया. पण आज मात्र तो युक्तीवादही केविलवाणा ठरावा असा प्रकार घडलाय. आता महाराष्ट्रभूषण सचिन आणि लतादिदींचा अपमान घडलाय. अपमान हा शब्दही कमी भासावा अश्या गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्यांच्यावर विनोद केले गेलेत. आता हे नक्कीच त्यांची परवानगी घेऊन केले गेले नसावेत. तर मग हे असे कोणालाही काहीही करण्याचा काय हक्क बनतो. हक्कही एका बाजूला राहीला, मुळात ज्या विनोदाच्या नावाखाली हे केले गेलेय तो हा अस्सा असतो. एखादा मानसिक आजारीच अश्यातून आनंद उचलो शकतो. कमाल वाटते या लोकांची की सेलेब्रेटी निवडताना देखील यांना हि आदर्श व्यक्तीमत्वेच मिळावीत. लतादिदिंना मी व्यक्तीशा ओळखत नाही, कधी स्टेजवर गाताना पाहिले असेल तेवढेच. पण सचिन मात्र सचिन आहे. त्याला गॉड ऑफ क्रिकेट खेळापेक्षाही जास्त त्याच्या वर्तनामुळे बोलतात. अश्या आयडॉलनाच नेमके या प्रकारासाठी निवडणे यातून चीप मेंटेलिटी आणि सवंग प्रसिद्धीचा हव्यास हेच दिसून येते.
असो, खाली बातमीची लिंक शेअर करतो,
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/film-indu...
विडिओ शेअर करायला मन धजावत नाहीये.
पण शोधून नक्की बघा.
कारण मागे धाग्याबरोबरच एक पोलही काढलेला - AIB पोल - http://www.maayboli.com/node/52621
त्याचा निकाल असा होता -
१) हो - असे चांगले कार्यक्रम व्हावेत. - २७ मत (१५ टक्के)
२) नाही - असे वाईट कार्यक्रम होऊ नयेत - ९२ मते (४९ टक्के)
३) तटस्थ - बघायचे ते बघतील - ६८ मते (३६ टक्के)
तर मला वाटते अपवाद वगळता उर्वरीत ५१ टक्के लोकांची मतेही आता नक्कीच बदलतील..
निषेध !
सर्वानी कालच्या टाइम्स मधला
सर्वानी कालच्या टाइम्स मधला अग्रलेख वाचावा सर्वामाझा सल्ला आहे. जर सचिन व लताबाईनी त्याबद्धल अजुन काही केले म्हणजे तन्मय भटवर खटला केलेला नाही तर तुम्हाला या उचापती का?
>>भटवर खटला केलेला नाही तर
>>भटवर खटला केलेला नाही तर तुम्हाला या उचापती का?>> अहो दिगोचि, असं म्हणू नका. उचापती नसतील तर दर दोन दिवसाला एक असा बीबी काढायचा नेम मोडीत निघेल त्याचं काय?
जर सचिन व लताबाईनी त्याबद्धल
जर सचिन व लताबाईनी त्याबद्धल अजुन काही केले म्हणजे तन्मय भटवर खटला केलेला नाही तर तुम्हाला या उचापती का?
>>>>> >>>
तुमचा हा निकष बलात्काराचेही समर्थन करेन जिथे तक्रार होत नाही.
तक्रार नाही झाली तर का नाही होत हे जाणून घ्या.
गर्दिश मे हो तारे, ना घबराना
गर्दिश मे हो तारे, ना घबराना प्यारे,
गर तू हिंमत ना हारे थे होंगे वाहरे वाह रे
लता आणि सचिन त्यांच्या
लता आणि सचिन त्यांच्या अपमानाचं बघून घेतील. इतरांनी त्रास का करून घ्यावा?
>>>
ओके!
म्हणजे त्यांना त्रास होऊ शकतो हे मान्य केलेत आपण असे समजू
>>>>>>>>>
सचिन नी अनेक वेळेला भरवशाच्या म्हशीला टोणगा ही म्ह्ण सार्थ करुन दाखवली तेंव्हा आमच्या मानसिक त्रासाचा विचार कोणी केला होता का?
किंवा लताबाई नी आपल्या वयाला शोभत नसताना वीशीतल्या मुलींना आवाज दिला तेंव्हा आम्ही काही बोललो का?
व्हिडिओ ची लिंक कोणी देईल का?
व्हिडिओ ची लिंक कोणी देईल का? त्या शिवाय चर्चा कळणार नाही.
तुमचा हा निकष बलात्काराचेही
तुमचा हा निकष बलात्काराचेही समर्थन करेन जिथे तक्रार होत नाही.>>>>>>
ऋनम्या पुढे वाचली गीता!
बॉलिवूडच्या संगीताचा सर्व
बॉलिवूडच्या संगीताचा सर्व जगभरात डंका असताना नावे ठेवणे बरे दिसत नाही.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Z8ABNy
"भरवशाच्या म्हशीला टोणगा"
"भरवशाच्या म्हशीला टोणगा" म्हणजे काय?
वैद्यबुवा हसू नका ओ,
वैद्यबुवा हसू नका ओ, सिरीअसली. एखादी पिडीत मुलगी न्याय तर काही मिळणार नाही उगाच आणखी अब्रूचे धिंडवडे नको, फरफट नको म्हणून तक्रार करत नाही. इथेही सेलिब्रेटी असाच विचार करून शांत राहतात. पण हा नाईलाजच झाला. ते दाखवत नाहीत याचा अर्थ त्यांना त्रास झाला नाही असे आहे का?
सकुरा,
तुम्हाला देतो लिंक नंतर त्या विडिओची आधी जरा चहा पिऊन घेतो.
तसेही त्या लिंकमध्ये बहुतांश लोकांना तितकेसे आक्षेपार्ह वाटत नसेल तर शेअर करायला हरकत नसावी..
यावरून आठवले, ते असे दोन
यावरून आठवले, ते असे
दोन मुद्दे
१) त्या विडिओमध्ये काही आक्षेपार्ह नाही.
२) मनसे सारख्या राजकीय पक्षां स्टॅण्डमुळे आणि या ऋन्मेषसारख्या लोकांनी काढलेल्या धाग्यामुळेच उलट त्या विडिओचा प्रसार होतोय.
अशी दोन्ही वाक्ये काही आयडींनी एकसाथच म्हटली आहेत.
जर विडिओत काही आक्षेपार्ह नसेलच तर होऊ दे की कितीही प्रसार.. कोणाचे काय जातेय
भौ, जरा भानावर ये. बळच
भौ, जरा भानावर ये. बळच पाल्हाळ कशाला लावतोस? तो मुद्दा आहे का? मुद्दा विडियो हा आहे. तो मुद्दा बुडाखाली घेऊन तू त्याला तुझ्या अचाट इमॅजिनेशन्च्या विमानाची मोटर लावून वाट्टेल तसा आसमंतात का म्हून उडत आहेस?
ये, जरा खाली ये.
तूच काय, आपल्या इथे असे फुटकळ मुद्द्यांवरुन जगबूडीच्या कल्पना रंगवणार्या सगळ्यांनीच जरा दुसरी कामं शोधली पाहिजेत. तुम्हालाच आवरलं पाहिजे खरं जनहिताकरता.
ऋन्मेष, ह्या सेलेब्रिटींची
ऋन्मेष, ह्या सेलेब्रिटींची मुलाखत घेऊन टाक ना इकडे. 'कैसा लगा आपको?' असा प्रश्न विचारायला विसरू नकोस. प्रत्येक सेलेब करता नवीन बीबीच पायजेल.
सकुरा, मागच्या पानावर विकुंचे जोक्स वाचा तर आधी.
१) त्या विडिओमध्ये काही
१) त्या विडिओमध्ये काही आक्षेपार्ह नाही. >>> असे कोणी इथे म्हंटलेले आहे? पुन्हा वाचायला पाहिजे. आता आक्षेपार्ह जरा लूज वाख्या आहे, पण बहुतांश लोकांना तो व्हिडीओ आवडलेला नाही. मलाही तो महाटुकार आहे असेच वाटते.
व्हिडिओ बघितल्या शिवाय
व्हिडिओ बघितल्या शिवाय काही-काही कळ्ळणार नाही विकुंचा जोक्स.पण ..:(
ऋ, आरामात दे चहा वैगरे पिऊन जेऊन खाऊन उद्या पर्यन्त दिली तरी चालेल
या सर्व दुर्दैवी वादावर हेच
या सर्व दुर्दैवी वादावर हेच सेन्सीबल मत वाटते...
https://www.youtube.com/watch?v=qH0Z9Ilnf88
१) त्या विडिओमध्ये काही
१) त्या विडिओमध्ये काही आक्षेपार्ह नाही. >>> असे कोणी इथे म्हंटलेले आहे?
>>>>>>>
म्हणजे आक्षेपार्ह आहे पण आक्षेप न घेता इग्नोर करा असे म्हणायचे आहे का?
>>व्हिडिओ बघितल्या शिवाय
>>व्हिडिओ बघितल्या शिवाय काही-काही कळ्ळणार नाही विकुंचा जोक्स.पण ..अरेरे>> विकुंच्या जोकचा नी व्हिडीओचा काहीच पपसं नाही. आधी जोक वाचा मग व्हिडीओ बघा म्हणजे कळेल जोक आधी का वाचायचा ते.
आक्षेप न घेता इग्नोर करा
आक्षेप न घेता इग्नोर करा >>>> ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख मे भर लो पानी ..
म्हणजे आक्षेपार्ह आहे पण
म्हणजे आक्षेपार्ह आहे पण आक्षेप न घेता इग्नोर करा असे म्हणायचे आहे का? >>> ऑल्मोस्ट. आक्षेपही जरूर घ्या. पण लिंबू म्हणतो तसे "अद्दल" वगैरे घडवायला किंवा त्यावर बंदी आणायला निघू नका, किंवा जे असे म्हणत आहेत त्यांना कम्युनिस्ट(विचारस्वातंत्र्यावरून, ते ही!!!) ठरवू नका. हे स्पेसिफिकली तुला नाही. इग्नोर करा. लायकीपेक्षा जास्त फुटेज देउ नका.
सुनील गजाकोश या मित्राने मी
सुनील गजाकोश या मित्राने मी मराठी या वाहीनीवर या विषयावर मांडलेली मतं. भाजप आणि मनसेची मतं देखील या व्हिडीओत (हवी असल्यास) पाहता येतील
https://youtu.be/oAyF_TCnhGg
ऋन्मेष, "बलात्काराच्या केस
ऋन्मेष, "बलात्काराच्या केस मधेही तक्रार केली जात नाही, तर तेव्हा तक्रार नाही म्हणून मग तिकडेही दुर्लक्ष करणार का!" असा अध्यार्हुत प्रश्न असलेला, गेन्ड्याच्या कातडीचा पांढरपेशा लोकांकरताचा युक्तिवाद तुमच्या उदाहरणाने दिला आहेत, त्याचेशी सहमत.
हे आजचेच नाही, रिडस्ल ऑफ रामायणा काय की हुसेनची चित्रे काय, तिथेही असेच निगरगट्ट युक्तिवाद होत होते, राम-सीऽता आलेत का तक्रारी करायला, मग तुम्हांलाच काय पडलीये, दुर्लक्ष करा... वगैरे....
पूर्वी एक वाक्प्रचार होता (आहे), की शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा....
तद्वतच, जोवर अशा घटना (खास करुन हिंदू धर्माबाबत्/ब्राह्मणांबाबत) इतरांबरोबर घडत असतील, तर दुर्लक्ष करा...... आमच्या घरात झाल्या नाहीयेत ना या घटना? आमच्या घरात नै ना जन्मला शिवाजी अजुन? मग काळजी कशाची..... शिवाजी जन्मुदे शेजारच्या घरात, अत्याचार होऊदेत शेजारच्या घरावर, मला काय त्याचे? दुर्लक्ष करा हो...... !
अहो मागच्याच महिन्यातल्या दोन तिन बातम्या होत्या अॅक्सिडेण्टच्या - हाणामार्यांच्या, येवढी गर्दी असुन कोणीही ढुन्कुनही बघत नव्हते, उलट जमल्यास व्हिडीओ चित्रण करीत होते मोबाइलमधुन....
तर अशा मुर्दाड लोकांकडुन कुठली हो अपेक्षा करताय की ही लोक किमान शाब्दिक निषेध तरी व्यक्ति करतील लता अन सचिन च्या केलेल्या बिभत्स अपमानाचा... !
असो.
नमस्कार लिंबू भौ, कसे आहात
नमस्कार लिंबू भौ, कसे आहात ?
काय लिहीलंय वर ?
>>> काय लिहीलंय वर ? फिदीफिदी
>>> काय लिहीलंय वर ? फिदीफिदी <<<<
घ्या, खास तुमच्या करता गुगलबाबाकडुन विन्ग्रजीत ट्रान्सलेट (भाषांतरीत हो...) करुन घेतलय, ते पुढे दिलय.... आता नक्कीच समजेल तुम्हाला मी वर काय लिहिलय ते... हो ना?
Rnmesa, "rape case is not complaining as well, if not as a complaint, and will ignore and tikadehi!" The adhyarhuta question, gendya the skin pandharapesa have given you an example lokankarataca argument, so it agrees. smile
What pictures of what Hussain, ridasla not ajaceca of Ramayana, there was not so brazen argument against the Ram-Sita come, regardless of what was then, ye ... etc ....
There was a phrase (a), be born in the neighborhood of Shivaji's house ....
Ideally, as long as such events (especially with what is happening with others Hindu dharmababat / brahmanambabata), but this event is not to ignore ...... not when our house? Moral Shivaji still not born in our house? And what worries ..... Shivaji janmude neighboring houses, torture houdeta neighboring house, what do I do about it? Ignore it ......!
Hey magacyaca month were two news aeksidenta of three - the hanamaryam, no one was looking at dhunkunahi There yevadhi crowd, but were depicted video mobailamadhuna explain ....
What if such a thing should be at least verbal protest will murdada lokankaduna of the people of that person laughing fanatically injuries Sachin, Lata un ...!
Anyway.
लिंबूजी तुम्ही टीव्हीवर केशव
लिंबूजी
तुम्ही टीव्हीवर केशव उपाध्ये या नावाने येता का हो ?
quite
quite balanced:
http://www.loksatta.com/manoranjan-news/tanmay-bhat-makes-shocking-video...
[ईथे असेही अनेक वेळा घडले आहे की ज्या आयडी एकेमेकांना ओळखत देखिल नाहीत, त्या निव्वळ वादावादी, शाब्दीक अपमान, ई. घडले की अॅडमिन कडे धाव घेतात. अशा वेळी लता दिदी वा सचिन सारख्यांना सल्ले देणे किंवा त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष करा असे सांगणे म्हणजे गंमतच आहे. :)]
सल्ला देणारी व्यक्ती तो
सल्ला देणारी व्यक्ती तो प्रत्यक्षात आचरणात आणते कि नाही हे पाहण्यापेक्षा तो सल्ला आपण आचरणात आणतो कि नाही हे पाहणे महत्वाचे आहे........... ...देश तुमच्यासाठी काय करतो हे पाहण्याऐवजी आपण देशासाठी काय करतो ते पाहणे योग्य होय................... परदेशात जाऊन तिकडची तुलना इथल्या देशी गोष्टींशी करणा-याने देशासाठी काय केले किंवा परदेशात सर्व ठाकठीक असण्यात त्याचे योगदान काय हे विचारण्यापेक्षा जे काही सांगितले आहे ते आपण केले तर देश सुधारेल हा विचार करणे गरजेचे आहे.... सिस्टीम बदलता येत नसेल तर आपणच सिस्टीमचा भाग व्हावे...... देश बदलता येत नसेल तर देश बदलावा............अर्धा ग्लास रिकामा आहे असे म्हणण्याऐवजी अर्धा ग्लास भरलेला आहे असे म्हणावे, रात्री खूप झाली आहे असे म्हणण्याऐवजी आता लवकरच सकाळ होईल असा विचार करावा.....हाहुस्श
लिंबू - पुन्हा एकदा - ती
लिंबू - पुन्हा एकदा - ती उदाहरणे पूर्ण चुकीची आहेत. माझ्या शेजारच्या घरात मटण शिजते, त्याच्या वासाकडे दुर्लक्ष करा म्हंटल्यावर "उद्या शेजार्याने अॅटम बॉम्ब बनवला तर त्याच्याकडेही दुर्लक्ष करायला सांगणार का" विचारल्यासारखे आहे. केवळ एकाच पोस्ट मधे लिहीली म्हणजे उदाहरणे आपोआप सारखीच होत नाहीत.
बाकी मुर्दाड, निगरगट्ट ई. नक्की कोणाला उद्देशून आहे?
लिंबू जींच्या पोस्ट्स मला
लिंबू जींच्या पोस्ट्स मला दिसत नाहीयेत. ब्लॉक केले काय ?
Pages