AIB ची किड फोफावणार होतीच. काही आश्चर्य नाही वाटले त्यात. पण खेद मात्र झाला.
हा माझा २०१५ चा धागा - AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी - http://www.maayboli.com/node/52596
आता तो धागा लॉक आहे, पण मी तेव्हाच याचा निषेध केला होता. तेव्हाच सावध केले होते. वॅलेंटाईन डे ला गरीब बिचार्या प्रेमिकांना फटकवणार्या संस्कृतीरक्षकांनाही तेव्हाच आवाहन केले होते. तेव्हा हे जे काही थेरं चालू होती ती एका खाजगी जागेत आणि आपापसात चालली होती असा युक्तीवाद होत होता. चला आतापुरता तो मान्यही करूया. पण आज मात्र तो युक्तीवादही केविलवाणा ठरावा असा प्रकार घडलाय. आता महाराष्ट्रभूषण सचिन आणि लतादिदींचा अपमान घडलाय. अपमान हा शब्दही कमी भासावा अश्या गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्यांच्यावर विनोद केले गेलेत. आता हे नक्कीच त्यांची परवानगी घेऊन केले गेले नसावेत. तर मग हे असे कोणालाही काहीही करण्याचा काय हक्क बनतो. हक्कही एका बाजूला राहीला, मुळात ज्या विनोदाच्या नावाखाली हे केले गेलेय तो हा अस्सा असतो. एखादा मानसिक आजारीच अश्यातून आनंद उचलो शकतो. कमाल वाटते या लोकांची की सेलेब्रेटी निवडताना देखील यांना हि आदर्श व्यक्तीमत्वेच मिळावीत. लतादिदिंना मी व्यक्तीशा ओळखत नाही, कधी स्टेजवर गाताना पाहिले असेल तेवढेच. पण सचिन मात्र सचिन आहे. त्याला गॉड ऑफ क्रिकेट खेळापेक्षाही जास्त त्याच्या वर्तनामुळे बोलतात. अश्या आयडॉलनाच नेमके या प्रकारासाठी निवडणे यातून चीप मेंटेलिटी आणि सवंग प्रसिद्धीचा हव्यास हेच दिसून येते.
असो, खाली बातमीची लिंक शेअर करतो,
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/film-indu...
विडिओ शेअर करायला मन धजावत नाहीये.
पण शोधून नक्की बघा.
कारण मागे धाग्याबरोबरच एक पोलही काढलेला - AIB पोल - http://www.maayboli.com/node/52621
त्याचा निकाल असा होता -
१) हो - असे चांगले कार्यक्रम व्हावेत. - २७ मत (१५ टक्के)
२) नाही - असे वाईट कार्यक्रम होऊ नयेत - ९२ मते (४९ टक्के)
३) तटस्थ - बघायचे ते बघतील - ६८ मते (३६ टक्के)
तर मला वाटते अपवाद वगळता उर्वरीत ५१ टक्के लोकांची मतेही आता नक्कीच बदलतील..
निषेध !
(No subject)
ऋन्मेष व्हिडिओ शेअर करा.
ऋन्मेष व्हिडिओ शेअर करा. म्हणजे नक्कि काय झाले ते कळेल.
पगारे, तुम्ही जर यू ट्यूबवर
पगारे, तुम्ही जर यू ट्यूबवर एआयबी, सचिन, लतादिदी वगैरे की वर्ड टाकलेत की चटकन सापडेल.
मला खरेच ही लिंक कोणाला स्वताहून द्यायची ईच्छा होत नाहीये .. पण निषेध करायचा आहेच
लतादिदिंना मी व्यक्तीशा ओळखत
लतादिदिंना मी व्यक्तीशा ओळखत नाही,
सुप्पर ☺
लतादिदी ओळखतात तर मग झालं..
लतादिदी ओळखतात तर मग झालं.. कुणीतरी कुणाला तरी ओळखलं की आपल्याकडे चालतं.
व्हिडिओ बघितला.
व्हिडिओ बघितला.
स्वप्नील जोशीला पर्सनली
स्वप्नील जोशीला पर्सनली ओळखतोस कि कसं ?
बाकी चला हवा येऊ द्या मधे तो जितक्या वेळा आलाय तितक्या वेळा निर्माता दिग्दर्शकापेक्षा तोच जास्त बोललाय. याला विचारूनच सिनेमे काढत असतील असं वाटतं ते सगळं पाहून..
एकदा एका महिलेले पोलिसात
एकदा एका महिलेले पोलिसात तक्रार केली की तिच्या समोरच्या इमारतीतील माणूस घरात विवस्त्र हिंडतो म्हणून तिला ऑकवर्ड वाटते. तपासासाठी पोलिस घरी आले.
पोलिस : अहो मेडम तुमच्या घरातून तर त्याच्या घराची खिडकी दिसतही नाही.
महिला : या स्टूल वर चढून पहा.
पोलीस : ठीक आहे पण फारच अंधूक दिसते. इमारत दूर आहे.
महिला : ही दुर्बीण घ्या व त्यातून बघा.
एक न्यूज साईटची क्लिप पाहिली.
एक न्यूज साईटची क्लिप पाहिली. त्यात पहिली ३-४ मिनीटे नकली सचिन व लता यांचे संभाषण होते. व्हिडीओ तेवढाच आहे का माहिती नाही.
एकदम भंकस क्लिप आहे. एआयबी ने पूर्वी ब्रिलियण्ट विनोदी व्हिडीओज काढलेले आहेत. उदाहरण म्हणून भारतातील विमानाच्या प्रवाशांबद्दलचा हा पाहा. पण या (सचिन्/लता वाल्या) व्हिडीओत काहीच कल्पकता नाही. नुसताच व्हल्गर आहे.
तर मला वाटते अपवाद वगळता उर्वरीत ५१ टक्के लोकांची मतेही आता नक्कीच बदलतील.. >> > ?? ऋन्मेष, तू ही जजमेण्टल? :). मी सचिनचा व लताचा मोठा फॅन आहे असे मी समजतो. हा व्हिडिओ भंकस आहे. काहीच विनोद नाही यात. पण त्यापलीकडे "आवरा" म्हणजे काय? ज्यांना आवडत नाही त्यांनी त्यावर सोशल नेटवर्क मधे, मीडिया मधे टीका करावी, किंवा दुर्लक्ष करावे. उगाच लायकीपेक्षा महत्त्व देउ नये.
न्यूज चॅनेल वाल्यांनाही उद्योग नाही. एक भंकस व्हिडीओ. त्याबद्दल सिनेक्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती, त्यावर अर्ध्या तासाचा प्रोग्रॅम. त्यात तेच मॉर्फ केलेले चेहरे बडबडताना म्यूट मधे
फा, अवांतर आहे, पण तू म्हटलेच
फा, अवांतर आहे, पण तू म्हटलेच आहेस म्हणून - 9GAG च्या व्हिडीओजची कॉपी आहे तो व्हिडीओ देखील. खूप काही नवीन नाही.
बाकी, अत्यंत भंकस आणि अनफनी व्हिडीओ. मलाही एआयबीवाल्यांची बर्यापैकी किळसच येते. फा, मला असे वाटत नाही की ऋन्मेष ऑफिशीयली बंदी घालण्याविषयी काही म्हणतोय. तोही उलट सोशल मीडीयाद्वारे लोकांचे मन बदलायचा प्रयत्न करतो आहे असे वाटते. तो म्हणेलच त्याला काय म्हणायचे ते.
ओके समजले भा
ओके समजले भा
या लोकांना लायकीपेक्षा जास्त
या लोकांना लायकीपेक्षा जास्त प्रसिद्धी देऊन फेमस आणि इम्पॉर्टन्ट करायचे हाही त्यांच्या पीआरचा भाग असेल.
बाकी ज्यांच्याविषयी वल्गर किळसवाणे बोलण्यासारखे काहीही नसेल त्यांच्याबद्दल ते बोलून वर हा अमेरिकेतला खूप फेमस कॉमेडीप्रकार आहे म्हणणे आणि समर्थन करणे मला विकृत वाटते. कॉमेडी बहुतेकवेळा मनोरंजनासाठी केली जाते. असल्या विकृत गोष्टींमधून मनोरंजन करवून घेणारे लोक कसल्या मानसिकतेचे असतील?
You tube वर आताच एका बातमीत
You tube वर आताच एका बातमीत विडिओचा एक भाग पाहिला. त्यात सचिन लताला म्हणतो have you seen your face in mirror? Its look like its been soked in water for 8 days. you know ....... also died, you should also die...
असल्या संवादाना कॉमेडी म्हणतात?
असले संवाद असलेले विडिओ काढणे आणि त्याने मनोरंजन करून घेणे. जिथे असल्या प्रकारांना लोकमान्यता आहे तिथेही असलेच संवाद असलेले विडिओ असतात का आणि लोक ते आवडीने पाहतात का?
फारएण्ड +१, एआयबीचे काही
फारएण्ड +१,
एआयबीचे काही विडिओ मस्त आहेत, पण मला हा विडिओ पूर्णपणे प्रसिद्धीसाठी केलेला खोडसाळपणा वाटतो. विडिओ मध्ये कोणत्याच अँगलने काहीच विनोदी वाटले नाही.
>>> AIB ची किड - पुन्हा एकदा
>>> AIB ची किड - पुन्हा एकदा - आवरा आता यांना <<<<
सहमत.
नुस्ते आवरा नाही, तर पुन्हा कोणी असले उपद्व्याप करु धजणार नाही अशी अद्दल घडवली पाहिजे.
तुमच्या "श्रद्धास्थानांवर" येन केन प्रकारेण हल्लाबोल करणे हेच यांचे ध्येय आहे.
याबाबत मी मनसेच्या भुमिकेच्या पाठीशी असेन. तशीच भुमिका अन्य जे कोणी घेतिल त्यांचेही स्वागतच.
खरंतर मनसे मुळे हा व्हिडीओ
खरंतर मनसे मुळे हा व्हिडीओ सामान्य लोकांना कळलाय.
लिंटीं.. तुम्हाला एक मेल केली
लिंटीं.. तुम्हाला एक मेल केली आहे. त्याची पोच विपुत द्याल का कृपया?
खुद्द सचिन आणि लताबाई यांचे
खुद्द सचिन आणि लताबाई यांचे काय मत आहे?
मी स्वतः त्या दोघांचा चाहता आहे. तरीही, ह्या विडियो प्रकरणी दुर्लक्ष करणे हेच योग्य असे माझे मत आहे.
भंकस आहे.
भंकस आहे.
विजयकुलकर्णी, आपली पोस्ट
विजयकुलकर्णी, आपली पोस्ट समजली नाही. उदाहरणातील लॉजिक गंडल्यासारखे वाटतेय. जरा एकदा सेल्फ चेक कराल का?
फारेण्ड, तू नेमका कश्याचा बाजूने आहेस समजले नाही. विनोद तर यात नाहीच आहे हे मान्य केलेस. पण यात काही गैर वा आक्षेपार्ह नाही वाटले का? म्हणजे याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून बघतोयस का? या विडिओंचा हेतू नेमका काय असावा असे तुला वाटते..
तसेच प्रश्न तुला किंवा मला हा विडिओ बघून काय वाटते एवढाच नाहीये. ज्यांच्यावर हे विनोद झाले आहेत त्या सचिन आणि लतादीदी यांनी काय करावे? त्यांना दुर्लक्ष करायचा सल्ला देणे सोपे आहे. किंबहुना हेच योग्य वाटल्यास ते वरवर तसे करतीलही. पण त्रास व्हायचा तो होणारच. त्यांनाच नाही तर त्यांच्या जवळच्यांनाही होणार. तो त्यांनी का सोसायचा? सेलिब्रेटी असल्याची किंमत आहे का ही?
सरकारच्या कारभारावर शंका उपस्थित करणे, एखाद्या नेत्याच्या भ्रष्ट आचरणावर टीका करणे हे व्यक्तीस्वातंत्र्यात येणे समजू शकतो.
पण एखाद्या सेलिब्रेटीमधील कुठल्याश्या अवगुणावर विनोद करायचा झाल्यास त्याला काही मर्यादा नको का? किंबहुना त्या अवगुणाचे भांडे फोडणे हा हेतू असेल तर उलट त्या विनोदाचा क्लास राखायची जबाबदारी वाढते. इथे तर हे यांचीच चीड यावी अश्या गलिच्छ पातळीला गेले आहेत. असला विनोद जर कोणाला आवडलाच तर तो सचिन आणि लतादीदी यांचा डायहार्ड हेटर असावा ज्याला भडासपूर्तीचा आनंद मिळेल.
एक कायद्याची शंका,
जर यांच्यावर सचिन, लतादिदी यांनी केस टाकली आणि अब्रूनुकसानीचा दावा केला तर कायदा काय बोलतो हे जाणून घ्यायला आवडेल. तसेच कोर्टाने भरमसाठ नुकसानभरपाई ठोठावलीच तर एआयबीचे दुकानच तर नाही ना बंद होणार ..
फारेण्ड, तू नेमका कश्याचा
फारेण्ड, तू नेमका कश्याचा बाजूने आहेस समजले नाही. >>> पण "नेमकी एक बाजू" प्रत्येक वादात असायला ह्वी असे कशाला? म्हणजे मी एकतर लिंबू सारखे "अद्दल'" वगैरे च्या बाजूने असायला हवे, किंवा तसे नसेल तर मला तो विनोद व ते शेरे आवडतात असे तरी असायला हवे का?
मला व्हिडीओ आवडला नाही. काही शेरे आक्षेप घेण्यासारखे आहेत. पण जो बनवतो त्याचेही स्वातंत्र्य आहे - सचिन व लताला राग आला तर त्यांनी केस करावी. ती ग्राह्य वाटली तर न्यायालय काय ते करेल.
मला व्हिडीओ आवडला नाही. काही
मला व्हिडीओ आवडला नाही. काही शेरे आक्षेप घेण्यासारखे आहेत. पण जो बनवतो त्याचेही स्वातंत्र्य आहे - सचिन व लताला राग आला तर त्यांनी केस करावी. ती ग्राह्य वाटली तर न्यायालय काय ते करेल.
<<
फा + १
एआयबी चे इतर व्हिडीओ आवडतात पण हा अगदीच पुअर आहे, नॉट फनी !
पण भलत्याच लोकांनी केस करावं हे मात्रं फनी आहे :).
हा एआयबीचा व्हिडिओ नाही.
हा एआयबीचा व्हिडिओ नाही. तन्मय भटचा आहे.
केस करणं इत्यादी मूर्खपणा आहे कारण कोणत्याही दृष्टीनं ही अब्रूनुकसानी नाही.
मुळात हे प्रकरण राजकीय पक्षांनी उगाचच्या उगाच पेटवलं आहे. तावातावानं मंगेशकर आणि तेंडुलकर यांच्या 'सन्मानासाठी' लढणार्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनीही हा व्हिडिओ पाहिलेला नाही आणि त्यांना स्नॅपचॅट हे काय प्रकरण आहे, याची गंधवार्ता नाही, हे काल त्यांच्यापैकी एकाकडूनच समजलं.
राजकीय पक्ष स्वार्थासाठी असले स्टंट करतातच, पण आता इंटरनेटवर इतका वेळ घालवणार्यांनीही जरा भावना दुखावून घेण्याचं प्रमाण कमी करत जगभरात स्टॅण्ड-अप कॉमेडीच्या विश्वात काय सुरू आहे, आपण उगाच अशा व्हिडिओंवर 'बंदी घाला', कीड मुळापासून उपटा' अशा प्रतिक्रिया देऊन स्वघोषित संस्कृतीरक्षकांच्या सेन्सॉरशिपला पाठिंबा देत आहोत का, याचा विचार करावा.
हा एआयबीचा व्हिडिओ नाही.
हा एआयबीचा व्हिडिओ नाही. तन्मय भटचा आहे.
<<<<
ओह ओके , तरीच म्हंटलं एआयबी ने हे काय केलं एकदम !
तन्मय भट ने स्नॅपचॅट मधल्या 'फेस स्वॅप' फ्लिटर चा जोक म्हणून हे करायचा प्रयत्नं केलाय, अजिबात जमलं नाही !
वरच्या लिंकेतली क्लिप सुद्धा
वरच्या लिंकेतली क्लिप सुद्धा टुकार आहे. हि भट आणि कंपनी फेलन, स्टुअर्ट, कोबेऽर इ. ची काॅपी करायला जातात आणि तोंडघशी पडतात. त्याच्याकडे दुर्लक्श करणं हाच ऊत्तम उपाय...
चिनूक्स +१. पुअर टेस्ट मध्ये
चिनूक्स +१.
पुअर टेस्ट मध्ये केलेला म्हणता येइल पण बाकी फाफटपसारा आणि मुख्य म्हणजे अपमान केला ह्याचा पाल्हाळ आता किती दिवस चालेल काय माहिती.
कोणावरती विनोद केला तर तो पुअर टेस्ट मध्ये आहे त्याकरता त्याला नावं ठेवली तर ठीक आहे कारण मेबी इट जस्ट डिझर्व्ड दॅट. पण मधल्या मध्ये "लतादीदींचा अपमान केला!" "तेंडूलकरचा अपमान केला!!" हे काय असतं? ते पण माणसच आहेत. उद्या मिक्का आणि राखी सावंतचा फोटो मिक्स करुन लावला असता त्यानी तर केला असता का इतका बवाल कोणी? कदाचित नाही कारण तीच गोष्ट त्यांच्याबाबतीत केली तरी मिका आणि राखी सावंत "गुरुतुल्य" किंवा "देवतुल्य" वगैरे वाटत नसावेत लोकांना.
ह्या संसकृतीदांडग्यांचं असं आहे की त्यांच्या दृष्टिनी महत्वाच्या माणसाबद्दल ब्र जरी काढला तरी हे लगेच हमरीतुमरीवर येणार अन काही लगेच केस वगैरे करणार. कामं नाहीत दुसरी, असल्या गोष्टींना बळच चिवडत बसण्याशिवाय.
"आता महाराष्ट्रभूषण सचिन आणि लतादिदींचा अपमान घडलाय. अपमान हा शब्दही कमी भासावा अश्या गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्यांच्यावर विनोद केले गेलेत. आता हे नक्कीच त्यांची परवानगी घेऊन केले गेले नसावेत. तर मग हे असे कोणालाही काहीही करण्याचा काय हक्क बनतो. हक्कही एका बाजूला राहीला, मुळात ज्या विनोदाच्या नावाखाली हे केले गेलेय तो हा अस्सा असतो. एखादा मानसिक आजारीच अश्यातून आनंद उचलो शकतो." >>>>>
पुअर टेस्ट मधले जोक खरं कोणावरच करु नयेत पण त्याच बरोबरीनी हे बावळटासारखं आंधळेपणानी काही लोकांना इतकं वर, आदर्श ठिकाणी नेऊन ठेवणं की जेणेकरुन त्यांचं नाव काढलं की लगेच यादवी माजते वगैरे बालिशपणा केव्हा बंद होणार आहे काय माहित.
टुकार क्लिप आहे. इतकंच.
टुकार क्लिप आहे. इतकंच. पूर्णविराम. (तरीपण आता पुढे) संस्कृती रक्षक आले की भीक नको वेळ येणारच. मरण्याचे जोक केले किंवा चेहेऱ्यावरून जोक केले की अब्रूनुस्कानी कशी होते माहित नाही. चीप आहेच ते. पण कीड, इ. म्हणणे तितकाच डेंजर आहे.
मरण्याच्या जोक वरून आठवलं, क्वीन एलिझाबेथ च्या (फॉर एव्हर) जिवंत राहण्यावरून तिला हेड ऑफ द स्टेट मानणारे लोक चिक्कार जोक करतात. हे कसलही समर्थन नाही, पण भारतीय संस्कृती/ परंपरेत असे जोक करत नाहीत म्हणून ते वियर्ड वाटतच. चालायचच.
फा, च्या पोस्टला पूर्ण अनुमोदन. काळे पांढरे शिक्के लावायचा अट्टाहास का?
मुळात हे प्रकरण राजकीय
मुळात हे प्रकरण राजकीय पक्षांनी उगाचच्या उगाच पेटवलं आहे. तावातावानं मंगेशकर आणि तेंडुलकर यांच्या 'सन्मानासाठी' लढणार्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनीही हा व्हिडिओ पाहिलेला नाही आणि त्यांना स्नॅपचॅट हे काय प्रकरण आहे, याची गंधवार्ता नाही, हे काल त्यांच्यापैकी एकाकडूनच समजलं.

<<
लो कल्लो बात
हे म्हणजे बाजीराव मस्तानीला विरोध करायला सिटीप्राइडला आलेल्या प्रोटेस्टं करणार्या लोकांना पत्रकारांनी गंमत म्हणून पेशव्यांच्या इतिहासाविषयी प्रश्नं विचारले पण त्यापैकी कोणालाच करेक्ट इतिहास माहित नाही आणि आंदोलनं करायला आले तसं झालं
अंध, अपंग, तृतीयपंथी, सनी
अंध, अपंग, तृतीयपंथी, सनी लियोनी यांच्याबद्दल काहीही बोललेलं चालतं. पण लता, सचिन यांच्याबद्दल विनोद करायचे नाहीत, असं का?
उद्या मिक्का आणि राखी सावंतचा
उद्या मिक्का आणि राखी सावंतचा फोटो मिक्स करुन लावला असता त्यानी तर केला असता का इतका बवाल कोणी? कदाचित नाही कारण तीच गोष्ट त्यांच्याबाबतीत केली तरी मिका आणि राखी सावंत "गुरुतुल्य" किंवा "देवतुल्य" वगैरे वाटत नसावेत लोकांना.
<<
एग्झॅक्ट्ली बुवा
उलट लोकांनी टाळ्या पिटल्या असत्या..
अंध, अपंग, तृतीयपंथी, सनी लियोनी यांच्याबद्दल काहीही बोललेलं चालतं. पण लता, सचिन यांच्याबद्दल विनोद करायचे नाहीत, असं का?
<<
+ १
Pages