'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
दोघांचे भांडण फोन वरून होते.
दोघांचे भांडण फोन वरून होते. नंतर संशय वाढत जातो. ते सगळ झाल्यावर आर्ची पुन्हा आल्यावर दोघांमधे नाते बळकट होते. दोघांचा एकमेकांवर विश्वास वाढतो. इतका की दोघांमधे एकच फोन आहे. बाळ्याचा फोन पण त्याच्या साठी आर्चीच्या मोबाइल वर येतो.
दोघांमधला वाढलेला विश्वास हा निव्वळ मोबाइल द्वारे दाखवला आहे
मला तर ती मजा वाटलेली , तो
मला तर ती मजा वाटलेली , तो सर्व पास्वर्ड्स ट्राय करतो आणि खरं तर पासवर्ड परश्याच असतो.
मुलं पण ना विचित्र असतात....
मी मैत्रीणीला तेच म्हणत होते की बघ हां पासवर्ड परश्या असेल.
...
बेस्ट सिन म्हणून आर्ची घर
बेस्ट सिन म्हणून
आर्ची घर बघायला आली असताना आपल्या आई बरोबर बोलतानाचा आहे. तीचा चेहरा बदलत डोळ्यात चटकन येणारे पाणी "तात्या घेतील का?" असे विचारताना गळा दाटून येणे हे बघून एकदम अस्वस्थ होते. सहज अभिनय वाटतो.
लिंक द्या >> फेसबुक वर आहे.
लिंक द्या >> फेसबुक वर आहे. शोधून घ्या. टैमलैन पाताळात गेली असेल आतापर्यंत
गचु.
गचु.
http://khabar.ndtv.com/news/b
http://khabar.ndtv.com/news/blogs/blog-by-ravish-kumar-after-watching-ma...
रविशकुमार ची सैराट बघून प्रतिक्रिया!
आज सैराट झाले जी ... पण परत
आज सैराट झाले जी ... पण परत परत पाहिले.. तेही सुरेख आहे, जरी याड लागलंय इतके नसले तरी.
दोघांनाही काहीही बाह्य कारण नसताना आतल्या आत स्वतःवर खुश होऊन नाचताना दाखवलेत ते बघुन गंमत वाटते.
या गाण्यातुन त्यांची आंखमिचौली बराच काळ चालल्याचे दाखवलेय, पावसाळा, होळी सगळेच आलेय त्यात. एवढ्या वेळात प्रिंसदादा काय करत होता देव जाणे. तोही तिच्याच कॉलेजात होता असे वाटते. शिक्षकाच्या श्रीमुखात मारण्याच्या प्रसंगात तो फोनवर एफवायच्या वर्गात बसलोय असे सांगतो. म्हणजे त्याचा वर्ग तो नसावा. तरीही तो तिथे का बसला ते कळले नाही. या दोघांची कुणकुण त्याला लागलीय असे काही सुचवलेलेही नाही. प्रिन्स आणि त्याच्या वडलांचा सत्तेचा माज दाखवण्यव्यतिरिक्त अजुन काही त्या प्रसंगाचे प्रयोजन आहे असे वाटत नाही.
.
.
>> अजुन काही त्या प्रसंगाचे
>> अजुन काही त्या प्रसंगाचे प्रयोजन आहे असे वाटत नाही.
कॅरॅक्टर बिल्डींग?
बाकी गाण्यात दाखवलेल्या प्रसंगांची क्रोनॉलॉजी एव्हढी अॅनालाइझ करण्याची गरज आहे का कळत नाही पण प्रश्न विचारलाच आहे तर गाण्यात दाखवलेला पाऊस वळवाचा किंवा बिन मौसम ही असू शकतो की. हल्ली तर कुठेही कधीही पाऊस पडतो ना?
सगळी गाणी तुफान सुंदर आहेत ऐकायला आणि बघायलाही. मी ऑलमोस्ट रोज एकदा तरी ऐकतेय.
इकडे बारीक सारीक डिटेल्स् वर जी चर्चा होत आहे आहे ती वाचायला आवडत आहे
शेवटच्या १५मिनिटात खूप काही
शेवटच्या १५मिनिटात खूप काही सांगितलं आहे. ही मंडळी भेटायला येतात तेव्हा आर्ची रांगोळी काढत असते जी अर्धवट राहते. रांगोळी चं प्रतिक सुंदर आहे. आत येऊन चहा टाकताना ती एक चमचा साखर पटकन तोंडात टाकते (तिला गरज आहे त्याची)!
ही अनपेक्षित भेट आणि तिचा शेवट पाहिल्यावर वाटतं की ह्या सगळ्या भेटी आईने पाठवल्याच नसाव्यात. किंबहुना आईला (कदाचित तात्यांना देखिल) अंधारात ठेवून प्रिंसदादाने हा कारभार केला असावा.
तेच वाटले. सत्तेचा माज
तेच वाटले. सत्तेचा माज दाखवलाय, घरी गेल्यावर बाबा कौतुक करतात पोराचे.
पाऊस तसाही असेल पण मुद्दा हा होता कि साधारण 5 6 महिने तरी प्रकरण चालू होते, मित्रमैत्रिणीत माहीत होते, तरी विरोधी पार्टीला पत्ता नाही. गावात सहसा असे होत नाही.
रांगोळी चं प्रतिक सुंदर आहे.
रांगोळी चं प्रतिक सुंदर आहे. <<< ओह, हे लक्षात आले नव्हते.
ती आधी फोनवर बोलत होती तेव्हा
ती आधी फोनवर बोलत होती तेव्हा दुसऱ्या बाजूने फक्त आई नसावी, बाबांनाही कळले असणार आणि तेही ऐकत असणार. बहुतेक आईला खोटे सांगून हीचा पत्ता मिळवला असावा. प्रिंसदादा एकटा डब्यात डिंकाचे लाडू घालून आणणार नाही. खूप वाईट वाटते जेव्हा ती मुलाचे कपडे हातात घेऊन कुरवाळते आणि त्या मागचा आईचा स्पर्श अनुभवते. आई नक्कीच सामील नसणार, तिची फसगत केली गेली. भेटी आईनेच पाठवल्या असतील पण हे लोक असे करतील याची कल्पना तिला नसणार.
कालपासुन वाचतेय सर्व
कालपासुन वाचतेय सर्व डीटेलींग इथे, मजा आली आणी शेवटी पहीला भाग परत एकदा पाहीला
रहावलच नाही पाहील्याशिवाय
सरळ आहे, आईला 'आम्ही भेटून
सरळ आहे, आईला 'आम्ही भेटून येतो,आता वैर धरुन काय करायचंय' वगैरे सांगून अंधारात ठेवलंय आणि बाप्+प्रिन्स आणि बाकी माणसं यांचा प्लॉट.
तसंही आईला पूर्ण कथेत फारशी पॉवर आहे असं दिसलं नाही.
ते दोघं हैद्राबादमधे
ते दोघं हैद्राबादमधे पोचल्यापोचल्या एका गाडीवर काहीतरी खातात, तो प्लॅस्टिकच्या मगातून पाणी पितो, पण तिला ते नको वाटतं, म्हणून तो तिच्यासाठी पाण्याची बाटली घेतो... दोघांच्या घरचं वातावरण, आर्थिक परिस्थिती, सवयी यातला फरक या छोट्याश्या प्रसंगातून परफेक्ट दाखवलाय. शिवाय त्यांच्या संसारात पुढे काय अडचणी वाढून ठेवल्या आहेत याची प्रेक्षकांनाही कल्पना येते.
ती गाडी त्यांना नंतर मदत करणार्या बाईचीच असते. हे माझ्या आधी लक्षात आलं नव्हतं. कारण पहिल्या दृश्यात गाडीवर त्या बाईचा मुलगाच काम करताना दाखवला होता. (बाईही दाखवली असेल तर आठवत नाही.) त्यामुळे रात्री गुंड मागे लागतात तेव्हा अचानक ही बाई कुठून आली असा प्रश्न पडला. पण परत त्या बाईचा मुलगा दिसल्यावर लिंक लागली. त्या बाईने किंवा मुलाने या दोघांना आपांपसांत मराठीत बोलताना ऐकलं असावं, परप्रांतात किंचित मराठी कानावर पडली तरी लगेच लक्ष जातंच (स्वानुभव)... त्यामुळे ती त्यांना आपणहून मदत करते - हे आवडलं. (असा संदर्भ प्रेक्षक म्हणून मी जोडला हे खरंच, पण प्रेक्षकांना कथानकात सामिल करून घेतल्याचं हे एक चांगलं उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक गोष्ट एक्स्प्लिसिटलीच दाखवायला हवी असं नसतं.)
त्या बाईच्या ओळखीने ती बॉटलिंग प्लांटमधे नोकरीला लागते. तिथे पहिल्या दिवशी तिथली एक मुलगी तिला काम समजावून सांगत असते, सरकत्या पट्ट्यावर एक-एक बाटली कशी लटकवायची हे दाखवत असते, तर लटकवलेली बाटली हळूहळू पुढे सरकते तेव्हा आर्चीला मजा वाटते. परिस्थितीचे चटके बसायला सुरूवात झालेली असली, तरी कोवळं वय आणि अवखळपणा संपलेला नसतो. ते सारं रिंकू राजगुरूने एका क्षणात चेहर्यावर अप्रतिमरित्या दाखवलं आहे.
तसंच, सुरूवातीला खोपटात चहा पण करता येत नाही म्हणणारी आर्ची शेवटी घरच्यांना चहा टाकते म्हणते तेव्हा सर्व अडथळे पार करून त्यांचा संसार आता मार्गी लागतो आहे, इतक्यात .... - हा विचार सिनेमा संपल्यावरही डोक्यातून जात नाही.
ह्म्म.. तो आत येतो तेव्हा
ह्म्म.. तो आत येतो तेव्हा आता सगळे नीट होणार म्हणत ती त्याला बिलगते. खरेतर त्यांचे सगळे नीटच चाललेले असते पण घरचे समोर दिसल्यावर तिला उणिव जाणवते, तेही सोबत असले तर जास्त चांगले असे वाटते. आईच्या भेटवस्तु पाहुन घरचेही तिच्या संसारात त्यात सामिल होताहेत हा विश्वास वाटतो.
हे सगळे वास्तव ज्या अभागी जिवांच्या वाट्याला आलेय, काय वाटले असेल शेवटच्या विश्वासघाताच्या क्षणी...

पण मुळात त्यांचा पत्ता
पण मुळात त्यांचा पत्ता घरच्यांना कळला कसा? हा भाग मी मिस केला असावा बहुतेक.
आणि १ वर्षाने का कळला? लगेच का नाही?
पण मुळात त्यांचा पत्ता
पण मुळात त्यांचा पत्ता घरच्यांना कळला कसा? हा भाग मी मिस केला असावा बहुतेक.
आणि १ वर्षाने का कळला? लगेच का नाही?
ते दाखवले नाही. म्हणुन तर मी वर लिहिलेय की ती जेव्हा आईशी फोनवर बोलत असते तेव्हा प्रिन्स ला कळत असणार आई संपर्कात आहे ते. आणि तिच्याशी खोटे बोलुन पत्ता मिळवला असणार. म्हणुन तर आईने अगदी डिंकाच्या लाडवांपासुन सगळे पाठवले तिला. मारण्याच्या कटात घरचे सगळे असते तर इतके नाटक करायची गरज नव्हती.
बेक्कार आहे.एकंदर मुलींचा
बेक्कार आहे.एकंदर मुलींचा घरच्यांवर खूप विश्वास असतो.
अग्निरेखा आर्चि वर लिहायचे
अग्निरेखा आर्चि वर लिहायचे आहे तूर्तास रुमाल. लै कामं आहेत. आज याड लागल हपिसात येताना ऐकलं संपायच्या वेळेस सिग्नल ला उभी आणि डोळे भरून पाणी. लै डेंजर . निग्रहाने पुढे आले. ह्यागाण्याचे कवी कोण आहेत बरे?
अहो तेच ते कवी, ज्यांनी
अहो तेच ते कवी, ज्यांनी संगित दिलेय..
आईशी बोलण्याच्या प्रसंगातही
आईशी बोलण्याच्या प्रसंगातही रिण्कुने छान काम केलेय. आधी आनंदात बोलत असते, मुलाला आजीशी बोलायला लावते. तात्यांचा राग अजुनही गेला नाही का विचारते आणि बोलता बोलता अचानक तात्या बोलतील का ग माझ्याशी म्हणत तिचे डोळे भरुन येतात.
डीटेलिंग वाचायला
डीटेलिंग वाचायला आवडतय.
आर्चीच्या आईवडलांच्या , प्रिन्सच्या राहणीमानातही फरक जाणवतो इंटरवलच्या आधी अन नंतर. आर्चीचे वडील फार केविलवाणे वाटले स्टेजवर सोनम की सोनलताईच्या सत्कारावेळी.
काही काही सिन्स खूप वेळी रीपीट करुन पाहीले. गाणी तर अगणित वेळा ऐकली . याड लागलं अन सैराट झालं जी... तो रेल्वेचा डान्स सीन आमच्या कॉलेजआत आमच्या ग्रुपमधे जसाच्या तसा झालेला आहे अन एक येडं ते फुलं (रान फुलं, गुलाबाला कोण पैसे घालील) बी ठेवायचं कुठं कुठं ते पण आठवलं::फिदी:
आर्चीच्या आईवडलांच्या ,
आर्चीच्या आईवडलांच्या , प्रिन्सच्या राहणीमानातही फरक जाणवतो इंटरवलच्या आधी अन नंतर. आर्चीचे वडील फार केविलवाणे वाटले स्टेजवर सोनम की सोनलताईच्या सत्कारावेळी.
मी हेच तर पहिल्या प्रतिसादात लिहिलेलं. आपल्या समाजात लग्न ही खाजगी बाब समजली जात नाही. परशा आणि आर्चीच्या लग्नामुळे दोन्ही घरचे लोक भरडले जातात. परश्याच्या बहिणीचे लग्न जुळत नाही तर आर्चीच्या बाबाची सत्ता जाते, प्रिन्स सत्तेवर आला असता तेही अशक्य होऊन बसतं. मग ज्या घटनेमुळे आयुष्यात इतकी उलथापालथ झाली त्या घटनेला जबाबदार असलेल्याना सजा द्यायचा विचार लोक करणारच. ही सजा काय द्यावी हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा भाग आहे. परश्याचे आईबाबा दुर्बल असतात, ते गाव सोडुन जातात. जातपंचायतीपुढे लोटांगण घालतात. आरचीच्या घरच्यांकडे सत्ता गेली तरी पैशाचा माज असतोच. त्या बळावर ते तिला शोधतात आणि त्याना योग्य वाटेल असे शासन करतात. मुळात कोणी कोणाशी लग्न करावे यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबुन नसाव्यात. पण आपण इतके प्रगत अजुन झालो नाहीयोत.
बहिणीचे लग्न जुळत नाही << Oh,
बहिणीचे लग्न जुळत नाही
<<
Oh, did I miss this ? Kadhi aahe ha scene ?
Bahin barich lahanahi aaste na?
रच्याकने, परश्याची बहिण पण
रच्याकने, परश्याची बहिण पण क्युट आहे. पहिल्यापासुनच तिच्या लक्शात हे सगळे प्रकरण आलेले असते. आर्ची ट्रेक्टर घेऊन दारात येते तेव्हा ती परश्याला सांगते की अरे तुलाच बोलतेय ती..
दुस-या भागात एक सिन आहे ज्यात
दुस-या भागात एक सिन आहे ज्यात जात पंचायत बसलेली असते आणि परश्याचे बाबा उभे राहुन माफी मागतात सगळ्यांची. तेव्हा ते बोलतात की हिला ३ स्थळे आलेली पण नंतर नकार दिला गेला. तो प्रसंगही खुप वाईट आहे. त्यांची काहीही चुक नसताना इतकी मानहानी सहन करावी लागते केवळ एका लग्नामुळे.
तेव्हाची बोलीभाषा वेगळी दाखवलीय. आर्ची, परशा आणि इतर मुले बोलतात ती भाषा वेगळी आहे. तेव्हा परशाचे घरचेही त्याच भाषेत बोलताना दाखवलेय. पण जात पंचायतीतली भाषा थोडी वेगळी आहे.
जात पंचायतीतली भाषा थोडी
जात पंचायतीतली भाषा थोडी वेगळी आहे >>> त्या भाषेचं गुजराथी बोली भाषेशी साम्य आहे.
येस, मलाही तसेच वाटले.
येस, मलाही तसेच वाटले.
Pages