'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
हो, आधी झोके, मग बिस्कीटे,
हो, आधी झोके, मग बिस्कीटे, नंतर आईसक्रीम असे ते इंसेन्टिव चढत्या क्रमात आहेत.
ते छोटं पोरगं पण कसलं बेरकी
ते छोटं पोरगं पण कसलं बेरकी .... जोरात झोका दे की जेवला नाही का?
अजून जोरात ..अजून जोरात, घरनं
अजून जोरात ..अजून जोरात, घरनं खाऊन पिऊन नाय आला का?
फारएण्ड, व्हिव्ह रिचर्ड्स ऑन
फारएण्ड, व्हिव्ह रिचर्ड्स ऑन डाएट ... बेस्ट
ते गावातून पळून जात असतात,
ते गावातून पळून जात असतात, तेव्हा रस्त्यावर ते पोरगं गोट्या खेळत असतं, ते पटकन उठून त्यांच्याकडे वळून बघतं... तेव्हा क्षणभर वाटतं की आता ते जाऊन चुगली करणार.
ललिता प्रीती, मला हसू आलं तो
ललिता प्रीती, मला हसू आलं
तो मुलगा इतक्या obliviously वळून बघतो मला वाटलं त्याला म्हणावं लेका! कळतंय का? You have been quite instrumental in bringing about this mayhem!!
निरागस धुर्तपणा म्हणतात
निरागस धुर्तपणा म्हणतात त्याला. काम तर करणार पण मोबदल्याशिवाय नाही पण निरुपद्रवी असतात अशी मुलं
ते पोरगं शेवटी 'तुला घ्यायचीय
त्याची धावपळ पाहता क्रिम बिस्कीटं आणि बाकी मोबदला रास्त आहे
http://thewire.in/2016/05/30/
http://thewire.in/2016/05/30/ambedkars-idea-of-india-and-the-marathi-blo...
हे एक चांगले आर्टीकल आहे.
यात परत बरेचदा ब्राह्मनिकल
यात परत बरेचदा ब्राह्मनिकल आयड्या चा अतीरेक आहे.परिक्षणाचा दुसरा भाग जो महिला सबलीकरणाबद्दल आहे तो बराच पटला.
'ब्राहमण लोक ब्राहमण लोकांसाठीच फिल्मा लिहीत होते' पेक्षाही 'जास्त करुन लिहीणारा एक शहरी लेखकवर्ग होता ज्याल ग्रामीण वातावरणावर कथा नीट लिहीता येत नाहीत' असं काहीसं खरं ठरेल.चांगल्या फिल्मा बघताना ब्राह्मनिकल वातावरणातल्याच आहेत का हे कधी तपासून पाहिलं नाही आणि हे वातावरण का काय प्रकार असतो तेही अजून झेपलेलं नाही.आजच्या जगात (नजरेला दिसणारे)वर्ग जातीवरुन नसून शहरी आणी ग्रामीण राहणीवरुन आणि जीवनमानावरुन पडतात.
जाऊदे चित्रपट खूप आवडला यावर मी थांबते.चित्रपट पाहणार्यांच्या आणि बनवणार्यांच्या जाती पाहून वावा किंवा शीशी करायचे हे ठरवायचे असते हे आजच कळतंय.
मी_अनु, प्रत्येकजण त्याला हवी
मी_अनु,
प्रत्येकजण त्याला हवी तशी आपली पोळी भाजून घेतो हे सत्य आहेच.
लेखात "आंबेडकरांची भारताबद्दलची कल्पना" ही गोष्ट मला स्वतःला फार पटली म्हणून शेअर केला आहे.
पिक्चर फक्त मुंबई पुणे किंवा
पिक्चर फक्त मुंबई पुणे किंवा शहरी जनतेला कन्सीडर करुन आणि फक्त त्यांच्या आयुष्यावर बनू नयेत हा भाग पटला.(याच न्यायाने ८०% हिंदी चित्रपट पण मल्होत्रा सिंग सक्सेना यांच्या भव्य बंगल्यांवर आणि समस्यांवर आणी त्यात परदेशातल्या बंगल्यांमध्ये राहून काढलेल्या उत्तरांवर बनू नयेत असंही वाटतं.) या चित्रपटांमध्ये मराठी पात्रं पंजाबी राहणीची असणार किंवा नोकर असणार, साऊथ इंडियन स्तिरिओटाईप गीक किंवा नायिकेने नाकारलेली सँपल्स असणार.
हिंदी सिनेमांबद्दलचे मत
हिंदी सिनेमांबद्दलचे मत पटले.
त्यातही हल्ली बदल होतोय हे ही आश्वासक आहे.
मी पुणे हैद्राबाद पूर्वी
मी पुणे हैद्राबाद पूर्वी ट्रेन ने अनेक वर्शे केले आहे. पण जेउर स्टेशन नुसते बघितले. तिथे माणसे असतील नागराज असेल व तेथील लोकांबद्दल काहीच विचार कधी केला नव्हता. तो ह्या सिनेमा मुळे केला. आमच्या कामाच्या मावशीं च्या मुलीने पण १४ व्या वर्शी पळून जाउन लग्न केले होते जवळच राहणा र्या मेकॅनिक मुलाशी. मग त्याने मारहाण केल्यावर परत आली. तिला चेंज म्हणून मी सहा महिने मुंबईला आणले होते बरोबर. आता ती लग्न करून सुखाने नांदते आहे. पण तिच्यात तो आर्ची वाला अॅग्रेसिव नेस आला आहे. आणि तिचा सध्याचा नवरा पण तिच्या मानाने माइल्ड आहे. तिची आठवण झाली सिनेमा बघताना.
वेडं वय अन काय.
जेव्हा मुले आपल्या मनासारखे वागत नाहीत तेव्हाच त्यांना आपली व आपल्या आधाराची सर्वात जास्त गरज असते. मी आहे तुला गरज वाटली तर असा विश्वास त्यांना द्यायला हवा पालकांचा इगो बाजूला ठेवून. ही मानसिकता नाही व्हायरल होत.
लोक पिक्चरला पिक्चर म्हणुन का
लोक पिक्चरला पिक्चर म्हणुन का पहात नाहीत, उगाच "दिल्पे" घेत आहेत आणी असल जीवनात आणु पहात आहेत.
पिक्चर आहे पिक्चर सारखा पहा नी विसरा, इतकं दळलय इतकं दळलय की आर्ची आणी परश्याकडचे वर्हाडी दोन वेळा जेवुन जातील. परत दुसर्या दिवशी सकाळी नाश्त्याला पण पुरेल.
दुसर्यांनी काय केले पाहिजे
दुसर्यांनी काय केले पाहिजे हे सांगण्यात एकदम वाकबगार असणे ही आपल्या लोकांची खासियत आहे
>> इतकं दळलय इतकं दळलय की
>> इतकं दळलय इतकं दळलय की आर्ची आणी परश्याकडचे वर्हाडी दोन वेळा जेवुन जातील. परत दुसर्या दिवशी सकाळी नाश्त्याला पण पुरेल. <<
किती दळलय ते पहाण्यासाठी आणि
किती दळलय ते पहाण्यासाठी आणि इग्नोर करण्यासाठी तरी इकडच्या पोस्टी वाचल्या जात आहेत
जनु बांडे,
जनु बांडे,

.......आणि इतिहासात
.......आणि इतिहासात पहिल्यांदाच रसप यांच्या धाग्याने पंचशतकी मजल मारली
अमा, ते याड लागलं गाण्यात
अमा, ते याड लागलं गाण्यात परश्या आंघोळ का करतो ते मला कळलंच नव्हते.
मस्त निरीक्षण!
सामी | 2 June, 2016 -
सामी | 2 June, 2016 - 16:12
किती दळलय ते पहाण्यासाठी आणि इग्नोर करण्यासाठी तरी इकडच्या पोस्टी वाचल्या जात आहेत स्मित
>>
गझलच्या सुवर्णकाळात आम्ही ह्याचकरिता प्रात:स्मरणीय प्रोफेसरांच्या पोष्टी वाचत असू..!!
टग्या | 2 June, 2016 - 16:17
टग्या | 2 June, 2016 - 16:17 नवीन
.......आणि इतिहासात पहिल्यांदाच रसप यांच्या धाग्याने पंचशतकी मजल मारली
>>
फिलिंग 'याड लागलं' !!
पिक्चर आहे पिक्चर सारखा पहा
पिक्चर आहे पिक्चर सारखा पहा नी विसरा, इतकं दळलय इतकं दळलय की आर्ची आणी परश्याकडचे वर्हाडी दोन वेळा जेवुन जातील. परत दुसर्या दिवशी सकाळी नाश्त्याला पण पुरेल.
चक्कीच्या आवाजाने तुम्हाला झोपमोड झाल्यासारखे वाटतेय का??

लंगड्याचा सपनीने स्वप्नभंग
लंगड्याचा सपनीने स्वप्नभंग केल्यावर आणि तो त्यामधुन सावरुन तिथुन जाताना त्याला एक लंगडा समोरुन येताना दिसतो, तो मुद्दाम हाक मारुन त्याला थांबवतो आणि रामराम घालतो.. जणू त्याला स्वतःच्या जगातला कोणी भेटतो..
चक्कीच्या आवाजाने तुम्हाला
चक्कीच्या आवाजाने तुम्हाला झोपमोड झाल्यासारखे वाटतेय का??>>>
चक्कीच्या आवाजाने तुम्हाला
चक्कीच्या आवाजाने तुम्हाला झोपमोड झाल्यासारखे वाटतेय का??>>> खो खो
(No subject)
अमा चे गाण्यांबद्दलचे
अमा चे गाण्यांबद्दलचे प्रतीसाद वाचून गाणी नव्याने नीट ऐकतेय.छान वाटतंय.सैराट ची गाणी पण ए आर रेहमान सारखी आहेत, ऐकून ऐकून आवडायला लागतात.झिंगाट पेक्षा सैराट आणि याड लागलं जास्त आवडली.ढोलकी(बहुतेक) सारखं दंगा वालं वाद्य वाजवून पण सैराट सारखं रोमँटिक गाणं बनवणार्या अजय अतुल ला परत एकदा नमस्कार!!
(मी अग्नीपथ मधलं शाह का रुतबा पण खूपदा ऐकते.)
Guyzzz, did anyone saw
Guyzzz, did anyone saw Casting couch with Amey & Nipun with Sairat team?
Pages