झुबेदा .....
रेडलाईटमधली अर्धीकच्ची झुबेदा एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून उभी असते तेंव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि पोपडे उडालेल्या भिंतीचा लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट, मोडकळीला आलेली कवाडे अन त्यावर खिळे बाहेर आलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात अधाशी पुरुषी चेहरयांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरी पासून ते सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे तिथे घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात..
झुबेदाला आता सारं सवयीचे झालेय,
फाटक्या वासाच्या गादीत सकाळी दहाएक वाजेपर्यंत झोपून देखील तिच्या बरगड्या ठणकत असतात,
रक्ताळलेल्या गालावर उमटलेले दात तिच्या गावीही नसतात,
गुंता झालेल्या केसांचा बुरखंडा तोंडाशी आला तरी तिला जाग कसली ती येत नाही.
शेजारच्या फळकुटातल्या पुनाम्माचा यार सकाळीच कुत्र्यागत तुडवत असतो तेंव्हाच्या
किंकाळ्यानी जाग येते.
कानतुटक्या कपातून चॉकलेटी वाफाळतं पाणी ती शून्यात नजर लावून पिते.
सकाळीच टीव्हीवर लागलेला एखादा जुनाट सिनेमा टक लावून बघत बसते.
नाश्तावाला अज्जू उप्पीट आणून तिच्यापाशी ठेवतो अन तिच्या हाताला हळूच शिवून जातो
तिचा सकाळचा हा पहिला अन एकच अलगद स्पर्श असतो.
शबनमदिदीच्या त्या खोलीत लटकणारया ढीगभर देवांच्या हार लागलेल्या तस्बिरींकडे
शून्यवत बघत ती न्हाणीत जाते,
कवाड पूर्ण न लावताच उघडी होते,
झाकायचं काय आणि कशासाठी असा तिचा यावर रोकडा सवाल असतो !
अंगाला हाती लागेल ते गुंडाळून ती पुन्हा त्या फाटक्या गादीवर येऊन पडते,
रंग विटून गेलेल्या छताकडे बघता बघता तिच्या डोळ्यांचा बर्फ होतो,
“अरी ओ झुबी, बैरी हो गई क्या तेरा गिऱ्हाक आया है” ही हाक,
तिची जेंव्हा तंद्री लागते तेंव्हाच तिला 'हाक' येते अन ती यंत्रवत आरशापुढे उभी राहते, नटमोगरी होते.
दुपारचे अन्न खाण्याआधी कोणीतरी येऊन तिला कुस्करून जातो
अन ती तशीच ओशट अंगाने बसल्या जागी जेवते,
कांताबाईने बनवलेल्या कसल्यातरी टमाटयाच्या रश्शात बोट बुडवत बसते.
चुन्नी तिला दुपारी तिच्या मोकळ्या पाठीवरून मायेने हात फिरवत सांगत असते,
“साईडवाली मरीनाला तिचा नवरा पुन्हा इथंच सोडून गेला
अन पुलिस येऊन मायाला घेऊन पेशगी म्हणून घेऊन गेलेत !
देख झुबी मर्दका भरोसा ना कर, दुनियाका सबसे कमीना जानवर मर्द है ! ” चुन्नीचं लॉजिक सुरूच असतं ...
आस्ते कदम पडक्या तोंडाने संध्याकाळ मयताचं सामान घेऊन यावं
तशी झुबेदाच्या पुढ्यात येऊन व्याकुळ होऊन उमलत जाते,
पुन्हा एकदा तिची अंघोळ होते, आरसा होतो,
चरबटलेल्या केसांवर अधाशी मोगरा नागवेटोळे घालून बसतो !
भकासलेल्या गल्ल्यांमध्ये आता पिवळे लाईट धगाटून गेलेले असतात,
ओघळलेल्या डोळ्यांनी वखवखल्या नजरा इकडून तिकडे फिरू लागतात.
सिगारेटी पिऊन डांबरागत राट ओठ झालेलेही कोवळ्या पाकळ्या शोधत फिरत असतात
अवजड,वेडावाकडा, खडबडीत देह कपड्यात लपवून लुसलुशीत मऊ मांसल देह हुडकत असतात
लूत भरलेले लेंडाचे गाडगे तोंडात धरावे तसे आपलाच माव्याचा थुंका गिळत फिरत असतात !
धुरकटलेल्या खिन्न पिवळ्या उजेडात झुबेदा रोज अशीच दाराशी उभी असते,
चटावलेल्या जिभा आत येत राहतात बाहेर जात राहतात,
उंबऱ्यावरच्या लाकडावर हागीमुतीने भरलेल्या चपला घासत जात येत राहतात.
त्या रात्री खिशातल्या पाकीटातील देवांच्या तसबिरीनाही ते आपल्याबरोबर घेऊन आत येतात,
नागवे होतात अन त्यांच्यातला दैत्य उफाळत राहतो,
चिंधाडलेल्या काटकुळ्या अंगावर आपलं बरबटलेलं शरीर घुसळत राहतात ...
झुबेदाच्या कातळलेल्या कमनीय देहाच्या प्रत्येक परिच्छेदावर तर
गीता, कुराण अन बायबल अशा सर्व धर्मग्रंथाच्या शब्दांचे अगणित वळ उठलेले असतात.
विस्कटलेली रात्र फुटक्या चंद्राला भगभग्त्या बल्बमध्ये असंच रोज बंदिस्त करून जात असते,
तेंव्हाच काळ्याकभिन्न आभाळातल्या चांदण्याचं बेट
तिच्या लुगड्यात उजेड शोधायला येतं अन कोनाड्यात बसून कण्हत राहतं !
झुबेदाला देवांचीही शिसारी आहे पण तिला दानवांचा रागही नाही, तिचे लॉजिकच वेगळे आहे !
तिला कुणाचा राग येत नाही, लोभ नाही, प्रेम नाही. काही नाही.
तिच्या कानातलं शिसं आतां काहीही ऐकलं तरी तापत नाही,
तिच्या डोळ्याला पाणीही येत नाही
मुडद्याचे आयुष्य जगता जगता कधी कधी ती जुन्या बचपनच्या गोष्टी सांगते,
अब्बू कसा इथं सोडून गेला अन दाल्ला पैसे घेऊन कसे पळून गेला ते सारं सारं सांगत राहते,
इथली घरे म्हणजे जिवंत स्त्रियांची चिरे निखळलेली भडक रंगातली थडगीच !
यातल्याच एका थडग्यात राहणारी झुबेदा जास्तीची पिल्यावर जे सांगते
ते एखाद्या फिलॉंसॉंफरपेक्षा भारी वाटते,
तिच्या मेंदूतल्या मुंग्या माझ्या शब्दशाईत कधी उतरतात काही समजत नाही !
मात्र माझ्याही पुरुषत्वाची तेंव्हा मला लाज वाटत राहते .... !
- समीर गायकवाड .
हे वास्तव आहे, याची कल्पना
हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.
जळजळीत वास्तव
जळजळीत वास्तव
हे वास्तव आहे, याची कल्पना
हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.>>>>>>असहमत.
हे वास्तव आहे, याची कल्पना
हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.>>>>+१
सकुरा +१
सकुरा +१
सुन्न व्हायला झाल वाचून
सुन्न व्हायला झाल वाचून
हे वास्तव आहे, याची कल्पना
हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.>>>> प्रचंड असहमत. असे असते तर बलात्कार झालेच नसते लहान ग्या पोरीपासून म्हातारीपर्यंत ते होतात.
लेख / कथा अंगावर आली ,
बापरे..... हे वास्तव आहे,
बापरे..... हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.>>>>>>असहमत.+११११०००००००००००००००००००००००००००००००००००००००
हे वास्तव आहे, याची कल्पना
हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.>>>>>>>>>>>+१
वाईट वाटतं तिथल्या मुली-बायकांच .
हे वास्तव आहे, याची कल्पना
हे वास्तव आहे, याची कल्पना आहे पण त्याचबरोबर त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.≥>>>>>>>>
असली विधाने वाचली कि भयानक राग येतो. इथे कोणीही सुरक्षित नाहीय आणि याचे कारण नालायक आणि घाणेरडी पुरुषी मानसिकता आहे. एवढा मोठा, अंगावर काटा उभा करणारा लेख वाचल्यावर सुद्धा असले विधान केले गेले याचे आश्चर्य आणि राग आलाय. तिथे जाणार्या पुरुषांना जर तिथे गेले नसते तर थेट मृत्युनेच गाठले असते तर कदाचित...कदाचित मी हे वाक्य वाचू शकले असते पण तिथे कोणी पुरुष मजबुरी म्हणून जात नाहीय. त्या बायका आहेत म्हणून इतरत्र होणारे बलात्कार थांबले असते तर कदाचित मी हे वाक्य एक अंदाज म्हणून स्वीकारू शकले असते. पण दुर्दैव...
साधना +१
साधना +१
बेक्कार लिहीलं आहे!
बेक्कार लिहीलं आहे!
कैच्याकै दिनेश. वेश्यांकडे
कैच्याकै दिनेश.
वेश्यांकडे जाणारे, वेश्या नसत्या तर छेडछाड किंवा बलात्कार करत सुटले असते हे पटत नाही
वेश्यांकडे जाणारे, त्या उपलब्ध असल्यामुळे इतर बायकांकडे वखवखलेल्या नजरेने बघत नाहीत किंवा छेडछाड/बलात्कार करत नाहीत हेही पटत नाही
थोडक्यात काय तर समाजात वेश्या असण्याचा इतर बायकांच्या सुरक्षिततेशी काहीच संबंध नाही
>>थोडक्यात काय तर समाजात
>>थोडक्यात काय तर समाजात वेश्या असण्याचा इतर बायकांच्या सुरक्षिततेशी काहीच संबंध नाही
अगदी १००% नसला तरी खुप मोठ्या प्रमाणावर संबंध आहे. म्हणुन ते योग्य आहे असे नाही.
लई डेन्जर! साधना +१
लई डेन्जर!
साधना +१
काय वास्तव मांडल आहे!
काय वास्तव मांडल आहे! सुन्न... सुन्न..
लेख लिखाण म्हणून भारी जमलेय.
लेख लिखाण म्हणून भारी जमलेय. हे असलेच अंगावर येणारे असणार याची कल्पना आल्याने तयारीतच होतो. तरीही यायचे ते आलेच.
पेपरात वेश्या पुनर्वसनाबद्दल वाचणे होते कधीतरी. त्यात काय किती तथ्य आणि काय प्रमाणावर होते, खरेच त्या या दलदलीतून बाहेर पडू शकतात का यावरही एखाद्या स्वतंत्र लेखात काही लिहू शकाल का.. जमल्यास..
""त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत, हे ही खरेय.""
>>>>>>>
हे वाक्य दिनेशदांचे स्वताचे नाही, या आधीही हे ऐकले आहे. त्यांचा हे बोलण्याचा हेतू नक्कीच वेगळा असावा किंवा त्यांनी हे वेगळ्या अर्थाने घेतले असावे.
मात्र ज्याही कोणाचे हे मूळ वाक्य असेल, गंडलेले वाक्य आहे हे नक्की.
असहमत +७८६
वेश्याव्यवसाय हा देखील आपल्याकडे एक बलात्कारच असतो. कारण त्या स्वताच्या मर्जीने हे करत नसतात.
!!.......
!!.......
भीषण !
भीषण !
हे अजूनही कुठे आले आहे का
हे अजूनही कुठे आले आहे का ?
मला वाचल्यासारखे वाटत आहे यापुर्वी
कातील लिहिलंय!!
कातील लिहिलंय!!
संपूर्ण वाचल्यावर लक्षात आलं
संपूर्ण वाचल्यावर लक्षात आलं की हाताची मूठ नखं रुतेपर्यंत घट्टं धरून ठेवली होती.
वाचू नकोस वाचू नकोस असं म्हणत वाचत राहिले. भयंकर आहे. असणारच.
ह्या स्त्रीयांमुळे आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत.. हे विधान नाही पटत आहे. त्याही कुणाच्या आया बहिणी असतीलच ना...
हे अजूनही कुठे आले आहे का
हे अजूनही कुठे आले आहे का ?
मला वाचल्यासारखे वाटत आहे यापुर्वी >>> +१ आशू... मला पहिल्या लेखाच्या वेळेस पण असेच वाटले होते.. एकदम देजावू फिलिंग होतं..
......
......
विस्कटलेली रात्र फुटक्या
विस्कटलेली रात्र फुटक्या चंद्राला भगभग्त्या बल्बमध्ये असंच रोज बंदिस्त करून जात असते,
तेंव्हाच काळ्याकभिन्न आभाळातल्या चांदण्याचं बेट
तिच्या लुगड्यात उजेड शोधायला येतं अन कोनाड्यात बसून कण्हत राहतं ! >>>>>>सुन्न!! __/\__
चरबटलेल्या केसांवर!!!!!!! फार
चरबटलेल्या केसांवर!!!!!!!
फार छान लिहिली आहे कविता. एक नकोशी वास्तविकता प्रखर शब्दात तुम्हाला व्यक्त करता आली आहे.
................. सुन्न!!
.................
सुन्न!! __/\__
वाचू नकोस वाचू नकोस असं म्हणत
वाचू नकोस वाचू नकोस असं म्हणत वाचत राहिले. भयंकर आहे. असणारच.>>>> + १००
फार डेंजर आहे.फार विचित्र चिवित्र फिंलीग येतेय अस काही वाच्ल्यावर.
ब्लॉगवर वा चेपुवर वाचले
ब्लॉगवर वा चेपुवर वाचले असण्याची शक्यता आहे ...@हिम्सकूल .....अभिप्रायासाठी सर्वांचे आभार ,,
वाचुन मन सुन्न झाले.....!!
वाचुन मन सुन्न झाले.....!!
Pages