कॅलिफोर्निया पर्यटन

Submitted by नात्या on 2 August, 2012 - 21:43

योसेमिटी एका दिवसात फिरायचे असेल तर काय काय बघावे? तसेच योसेमिटीच्या बाहेर रहाण्यासाठी एखादे बरे हॉटेल माहीत आहे का कोणाला?

अजुनही प्रश्ण आहेत पण ते नंतर. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेंडा, थँक्यू थँक्यू. थंडीची माहीती हवीच होती. Happy
हो बघतेय २-३ दिवस मारिपोसा आणि आसपासचे डील्स. गृपॉन वर पण चेक करते. Happy

अस्चिग व इतर, जुलै मधे पुर्ण ४ ते साडेचार दिवस रेडवुड पार्कमधे घालवायचा विचार आहे. कमी पडेल का की जास्त? crescent city मधे राहु.

भरपूर वेळ आहे की.

क्रेसेन्ट सिटी मध्ये रहाणार तर ओरेगॉन मधली काही ठिकाणं (उदा. क्रेटर लेक वगैरे) बघणार का?

ते पाहिलय. त्यामुळे यावेळे यादीत नाही. दुसरे काही सुचवशील. नेटवर वाचले की तिथे ४-६ दिवस रहावे, खुप चांगले hiking trails आहेत. त्यामुळे आरामात करायचे आहे. तिथुन जवळ समुद्राचे सुंदर दर्शन देणारी जागा असेल तर सांग. समुद्रात जायचे नाहीये, नुसतीच भव्यता पहायला मिळाली तरी चालेल.

मला जागा अशा सांगता येणार नाहीत. पण क्रेसेन्ट सिटीचं लोकेशन तसंच तिकडून तो रेडवूड हायवे आहे पार्क मध्ये जायला तो सुंदर आहे. आम्ही एका लाँग वीकेण्डला रमत गमत क्रेटर लेक आणि रेडवूड नॅशनल फॉरेस्ट ला जाऊन आलो त्यामुळे निवांत फिरणं झालं नाही. पण एका दिवसांत सुद्धा जे दिसलं रेडवूड फॉरेस्ट मधलं ते सगळं सुंदर आहे Happy

बरं सशल. शोधते. क्रेटर लेक पुन्हा पहावेसे वाटतय. उन्हात पाहिले की स्वर्गातले तळे पहातोय असे वाटते.

जाऊन आलो बरं का मागचा पुर्ण आठवडा.
इतके चालणे झाले की आज व उद्या फक्त आ रा म करणार घरी.
क्रेटर लेकपण पाहिले पुन्हा.
रेडवुड सुं द र!! ३०० फुट उंच वृक्ष अबब!
गेल्या ६-७ दिवसात खुप ठिकाणे पाहिली, तीही आरामात. घाई न करता.
गर्दी कमी होती म्हणुन अजुन शांतता होती म्हणुन अजुनच मस्त वाटले. निसर्ग शांततेतच पहायला हवा. अ‍ॅरिझोनात झाडे नाहीत आणि तिकडे लाखो झाडे... त्यामुळे आमचे काय झाले असेल हे समजु शकता. Happy

lassen नाही जाता आले.

मस्तच सुनिधी.

आम्हिही दहा दिवसांपुर्वी सिअ‍ॅटल वरून बे एरियात परत येत होतो विमानाने तर इतकं सगळं स्वच्छ सुंदर दिसत होतं.

स्टार्टींग फ्रॉम माउंट रेनियर, त्यानंतर तीन की चार अजून पीक्स् (सगळ्यांची नावं मला माहित नाहीत), माउंट हूड, मग क्रेटर लेक. हे सर्व (मधले तीन-चार नो-नेम ही) अगदी उंच पर्वत असावेत. पूर्णपणे बर्फाच्छादीत किंवा मग शिखरं तरी पूर्णपणे बर्फाच्छादीत, माउंट शास्ता, लेक शास्ता त्यावरचं धरण हे सर्व अगदी क्लीअर. ते पर्वत तर अगदी एका रांगेत असल्यासारखे दिसत होते मध्ये एका वेळी. ४-५ शिखरं आणि सगळी पांढरी, वास्ट एक्प्सान्स असलेली. खिडकी एकच होती आणि लेकाने काबीज केलेली होती तरी जेव्हढं बघता आलं ते सर्व सुंदर. मोठ्या सुटीची सुरेख सांगता झाल्यासारखं वाटलं. Happy

अरे वा. विमानातुन अप्रतिम दिसत असेल ते सर्व. फोटो काढलेस का? असल्यास दाखव.
आमचा प्रवास उलटा असल्याने आम्हाला क्रेटर लेक नाही दिसले. मात्र इथले वाळवंटी प्रदेशातले गूढ, जरासे भितीदायक दिसणारे पर्वत मस्त दिसत होते. फोटो काढले पण नीट नाही आले. असे ऐकलेय की या सरकारने नेवाडा वगैरे वाळवंटात सैन्याची कायकाय ठिकाणे केली आहेत जी कोणालाच माहिती नाहीत व त्यांचे तिथे कायकाय प्रयोग चालत असतात. तसे काही दिसते का पहायचा प्रयत्नही केला. पण नाही दिसले Happy

आस्चिग, म्हणजे खरे एलिअन दिसले आहेत की काय? तसाही हा प्रदेश एकुण एकटाएकटाच आहे. नुसती उजाड मैलोनमैल पसरलेली माळराने.

Pages