Submitted by नात्या on 2 August, 2012 - 21:43
योसेमिटी एका दिवसात फिरायचे असेल तर काय काय बघावे? तसेच योसेमिटीच्या बाहेर रहाण्यासाठी एखादे बरे हॉटेल माहीत आहे का कोणाला?
अजुनही प्रश्ण आहेत पण ते नंतर. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका दिवसात फिरुन होइल पण खुप
एका दिवसात फिरुन होइल पण खुप हेक्टीक होतं जर Drive करणार असाल..़कारण आम्ही LA हुन गेलो तर ४ तास लागले होते ... कॅम्प केलेत तर मस्त !! ़खुप मस्त जागा आहेत तिथे..
नात्या, योसेमिटीला सकाळी जाउन
नात्या, योसेमिटीला सकाळी जाउन संध्याकाळी बे एरियात परत येणे शक्य आहे पण खूप धावपळ होते. Mariposa/Oakhurst यापैकी कोठे हॉटेल मिळाले तर बघ. आम्ही राहिलो होतो त्याचे नाव आठवले तर टाकतो, पण त्याला ७-८ वर्षे झाली.
योसेमिटी व्हिलेज मधे सुद्धा कधीकधी चांगले डील मिळेल. ते मिळाले तर सर्वात चांगले.
अगदी एका दिवसात करायचेच असेल
अगदी एका दिवसात करायचेच असेल तर शक्यतो सप्टेंबरच्या आधी जा - पहाटे बे एरियातून निघून योसेमिटी व्हिलेज मधे जा. तेथे बरेच फॉल्स, ट्रेल्स आणि इतर बघण्यासारख्या गोष्टी आहेत. तेथे एक लूप रोड आहे त्यावरून फिरा. मग मॅरिपोसा ग्रूव्ह म्हणून एक जागा आहे, किती वेळ लागतो लक्षात नाही, पण एक तासापेक्षा जास्त नसेल. तेथे सेक्वोया ची भलीमोठी झाडे आहेत. जाताना एक बोगदा लागतो तेथे लगेच व्हिस्टा पॉईंट ला योसेमिटीचा तो प्रसिद्ध फोटो काढता येतो (एल कॅपिटान, ब्रायडल व्हेल फॉल्स आणि हाफ डोम). नंतर वेळ असेल तर ग्लेशियर पॉईंटला जाता येइल, पण माझ्या अंदाजाने ग्लेशियर पॉईंट किंवा मॅरिपोसा ग्रूव्ह यापैकी एकच जमेल. ग्लेशियर पॉईंट चा रस्ता फक्त समरमधेच चालू असतो. तेथून व्हिलेज पर्यंत परत यायलाही बहुधा एक तास लागतो, रस्ताही बराच अरूंद आहे. फक्त तेथून हाफ डोम, व्हिलेज वगैरे खूप छान दिसतात.
बरोबर लहान मुले असतील तर माझे रेकमेण्डेशन - व्हिलेज आणि मॅरिपोसा ग्रूव्ह - कदाचित आधी मॅरिपोसा ग्रूव्हला गेलेले बरे पडेल. कारण परत यायचा एक रस्ता व्हिलेजमधूनच जातो. दुसरा दिवस हातात असेल तर ग्लेशियर पॉईंट.
चनस/फारेंड धन्यवाद. एका दिवशी
चनस/फारेंड धन्यवाद. एका दिवशी रात्री पोहोचुन दुसर्या दिवशी योसेमिटी बघुन लेक टाहो किंवा बे एरिया इथे पोहोचण्याचा प्लॅन आहे.
ग्लेशिअर पॉइंटला छोटी (कॉम्पॅक्ट) गाडी घेऊन जाता येईल असा रस्ता आहे का (ऑगस्ट एन्ड)? मॅरिपोसा ग्रोव बद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. मस्त जागा दिसते (मला वाटले होते तितकी मोठी झाडे फक्त रेडवुड फॉरेस्ट मध्ये आहेत). आता योसेमिटी व्हिलेज, फॉल्स, मॅरिपोसा ग्रोव नक्की. फॉल्स आत्ता कोरडे दिसत आहेत म्हणजे ऑगस्ट एंडला तिथे पाणी असण्याची शक्यता कमीच दिसते.
योसेमिटीतील टेंट्स असलेल्या हॉटेलमध्ये बरे डील दिसले. ($१२० पर नाईट). तिथे कोणी राहीले आहे का?
नात्या, हाउसकीपिंग टेन्ट आणि
नात्या, हाउसकीपिंग टेन्ट आणि करी व्हिलेज मधले टेन्ट दोन्हीकडे राहिलोय आम्ही. मस्त वाटला तिथला स्टे. एक मात्र आहे, तिथे फक्त एक केबिन अन आत बेड, दिवे इतकेच असते, या व्यतिरिक्त टिव्ही वगैरे अशा सोयी नसतात. पब्लिक रेस्ट रूम / शॉवर असतात. स्वच्छता वगैरेचे प्रॉब्लेम नसतात , पण अर्थात काही लोकांना टिपिकल "लक्झरी वेकेशन" ची सवय असेल तर ते आवडणार नाही पण आम्हाला कँपिंग ची आणि त्या आउटडोअर लाइफ स्टाइल (!)ची सवय / आवड असल्यामुळे आम्हाला आवडलं तिथे.
नात्या, आम्ही मरिपोसा ला
नात्या, आम्ही मरिपोसा ला योसेमिटी लॉजमध्ये राहिलो होतो .. तिथून पार्कमध्ये जायला साधारण ४५ मिनीटे ते एक तास लागतो .. पण इथे गावात सर्व सुविधा आहेत त्यामुळे सोयीचं ठरू शकतं .. तसंच युसेमिटीतून ताहो ला जाण्यासाठीचा हिस्टॉरीक ४९ हायवे इथूनच जातो ..
इकडून पार्कमध्ये जायच्या रस्त्यावर एक सीडर लॉज आणि अजून एक योसेमिटी व्ह्यू लॉज आहेत तीही बरी वाटतात (रहाण्याचा अनुभव नाही) पण पार्कमध्ये जायचे अंतर मरिपोसा पेक्षा बरेच कमी होते ..
ग्लेशियर पॉइंट मी नक्कीच रेकमेंड करेन .. तिकडून अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो संपूर्ण व्हॅली चा .. अर्थात आता उन्हाळा संपत आला आणि ह्यावर्षी तसाही बर्फ कमी होता त्यामुळे फॉल्स् ला पाणी जरा कमीच असेल .. पण तरी इकडे जाणं मस्ट असंच म्हणेन मी .. आणि एकच दिवस असेल तर टूरिस्टी असले तरी पटेल स्पॉट्स बघावेत असं म्हणेन मी .. ते युसेमिटी तले आयकॉनिक पॉइंट्स आहेत आणि अगदी नक्की बघावेत असेच आहेत ..
पार्कच्या आतलं लॉज अॅट फॉल्स् इथे आम्ही दोनदा राहिलोय .. गुडलक चांगलं असेल तर इथे बुकींग मिळतंय का बघ .. साधारण १७५ पर नाईट ला मिळू शकेल .. हेही आम्हाला खुप आवडतं ..
सगळ्यांचे मनापासुन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
तंबू मध्ये हिटरची सोय नाही असे लिहीले आहे. ऑगस्ट एंडला कितपत थंडी असते? ३ वर्षाच्या मुलाला सोसेल इतकी असते का हीटर नसल्यास? आम्ही बहुदा हॉटेलच शोधु एखादे. सिडर्/योसेमिटी लॉज बघतो कसे आहे ते. ग्लेशियर पॉईंट नक्की करु आता. बस जाते का ते बघायला हवे. नाहीतर कार जाईल असे वाटते. बघतो.
>> बस जाते का ते बघायला
>> बस जाते का ते बघायला हवे
बसचं माहित नाही पण कॉम्पॅक्ट कार नक्कीच जाऊ शकेल ..
>> ऑगस्ट एंडला कितपत थंडी असते?
पहाटे चांगलीच थंडी असेल ..
सिडर ग्रोव लॉजमध्ये रहाणार
सिडर ग्रोव लॉजमध्ये रहाणार आहोत आम्ही योसेमिटीत. त्यातल्या त्यात जवळ चांगला ऑप्शन वाटला.
सॅन फ्रॅन्सिस्को फिरण्यासाठी सगळ्यात चांगला ऑप्शन कुठला? कोणी हॉप ऑन हॉप ऑफ टुर घेतली आहे का? एका कंपनीची $३१ माणशी आणी २० स्टॉप्सची आहे. ती चांगली वाटत आहे. गोल्डन गेट ब्रिज, क्रुकेड स्ट्रीट, ट्राम राईड, फिशरमन वार्फ, चायना टाऊन या गोष्टी बघायची इच्छा आहे. बाकी काही न चुकवण्यासारखे असेल तर नक्की सांगा. म्युयर वुडबद्दल ऐकलंय पण मरिपोसा ग्रोवला गेलो तर परत तिकडे जाणार नाही. गाडी पार्क करण्यासाठी चांगली जागा कुठली? का शहराबाहेर गाडी पार्क करुन रेल्वेने गेलेले बरे? तुम्हाला काही अनुभव असतील तर प्लिज शेअर करा. अल्काट्राझला जाऊन यायला किती वेळ लागतो? कोणाचा अनुभव? धन्यवाद!
हॉप ऑन हॉप ऑफ चा अनुभव नाही
हॉप ऑन हॉप ऑफ चा अनुभव नाही ..
सिटीत $१५ पर डे असे बरेच पार्कींग लॉट आहेत .. आम्ही सहसा पिअर ३९ जवळचा एखादा असा लॉट शोधून तिकडे पार्क करतो .. पिअर ३९, फिशरमन व्हॉर्फ तिकडून चालत फार लांब नाही .. अजूनही चालायाची इच्छा असेल, वेळ असेल तर फिशरमन व्हॉर्फ वरून चालत क्रुकेड् स्ट्रीट ला जाता येईल (बराच स्टीप चढ आहे) किंवा मग जगप्रसिद्ध सॅन फ्रान्सिस्को ची केबल कार घेऊन जाता येईल फिशरमन व्हॉर्फ पासून .. किंवा मग क्रूकेड स्ट्रीट वरूनच ड्राइव्ह करता येईल .. घिराडेली स्क्वेअरही तिथून (फिशरमन व्हॉर्फपासून) जवळ आहे खूप .. गोल्डन गेटलाही स्वतःचं पार्कींग आहे (बहुतेक $५ पेर डे) .. तिकडे पार्क करून चालत ब्रिजवरून जायचं असल्यास ..
तसंच पिअर ३९ वरून चायना टाऊनला जायला म्युनी पकडता येईल ..
कॉइट टॉवर मध्ये इंटरेस्ट असल्यास जाता येईल ..
पहिल्यांदाच सिटीत जाणार असल्यास पटेल स्पॉट्स बघावेत हे मत परत एकदा ..
- सॅन फ्रॅन्सिस्को टुर्स (हॉप
- सॅन फ्रॅन्सिस्को टुर्स (हॉप ऑन हॉप ऑफ ) टुरचा मला अनुभव नाही पण माझ्या बर्याच नातेवाईकांनी आणि मित्रांनी घेतली आहे. त्यांना त्या टुर्स आवडल्या. गाडीने गेल्यास आपण सगळ्याच गोष्टी बघु शकत नाहीत (उदा. समुद्र किनार्यावर असलेली जुनी व्हिक्टोरीअन स्टाईलची घरे). ह्या सगळ्या गोष्टी टुर मधे होउन जातात.
-म्युर वुड्स ला जाणार नसाल तर सनीवेल वरुन कॅल ट्रेन घेउन सॅन फ्रॅन्सिस्को ला जाणे (किंवा फ्रीमाँट हुन BART ने). टुर्स ने सिटी दर्शन घ्या. उरलेला अर्धा दिवस सिटी पायी फिरुन अनुभवा. संध्याकाळी कॅल ट्रेन ने परत निघा. हिल्स डेल किंवा कोणत्यातरी स्टेशन वरुन मायबोली गटगला हजेरी लावा. सीटीतुन बार्टने एसफओ विमानतळावर येता येते. तिथुन आमच्या पैकी कोणीतरी घ्यायला येईलच.
टुर्स घेतल्याचा एक तोटा म्हणजे क्रुकेड स्ट्रीट वरुन गाडी चालवायचा अनुभव मिळणार नाही. क्रुकेड स्ट्रीटवरुन जायला टॅक्सीवाले $१० जास्तीचे घेतात.
- गाडी घेउन जाणार असाल तर पिअर ३९ ला पब्लिक पार्कींग मधे पार्क करा. गोल्डन गेट टुर्स घेणार असाल असे गृहीत धरतोय. अल्काट्रास मधे जायलाच हवे इतके चांगले आहे असे वाटत नाही. तुम्हाला स्वतःला त्यात इंटरेस्ट असला तरी बाकीच्यांना कंटाळा येईल. अल्काट्रासला जायला आणि यायला साधारण १ तास. तिथे फिरण्या साठी एखादा तास आणि तिकीट काढल्यापासुन अल्काट्रासची बोट येई पर्यंत वाट पहायला जो काय वेळ लागेल तो लागेल.
पिअर ३९ वर सी फुड चांगले मिळते. तिथे बर्याच रेस्टॉरंट मधे पार्कींग व्हॅलिडेशन आहे. पिअर ३९ वरुन coit tower ला जा. तिथे फ्री पार्कींगची सोय आहे पण टॉवरवर जायला ३-४ डॉ. तिकीट आहे त्यासाठी कॅशच लागते. तिथुन गोल्डन गेट वर जा. गोल्डन गेटवर अमेरीकन चार आण्याची नाणे जवळ ठेवा. दिवसभराचे पैसे द्यायचे नसतील तर हे क्वार्टर्स कामाला येतील. गोल्डन गेट ओलांडुन म्युअर वुड्स ला जाता येईल. रस्ता डोंगरातुन जात असल्याने वेळ लागतो. साधारण ३ ते ४ तास त्यासाठी राखीव ठेवा.
गोल्डन गेटवरुन येताना किंवा जाताना क्रुकेड स्ट्रीट ला जा. सॅन फ्रॅन्सिस्को मधे बरेच वन वे आहेत त्यामुळे दगा न देणारा वाटाड्या (नॅव्हिगेशन सिस्टीम) जवळ ठेवा.
गाडी असेल तर ट्राम राईड साठी तुम्हाला कुठे तरी पॅ.पा. करावे लागेल. अगदी इंच इंच जागेचा वापर करुन गाडी लावावी लागेल. त्या ट्राम राईड (विशेषतः युनियन स्केवर वरुन चायना टाउन, क्रुकेड स्ट्रीट मार्गे फिशरमन वार्फ ला जाणार्या ट्राम साठी) साठी बरीच लाईन असते. कदाचित वर्कींग डे मधे कमी असेल.
वि.सु. सीटी मधे जाताना जॅकेट जवळ ठेवा.
अजुन आठवेल तसे सांगतो.
मारिपोसाला गेलात तरी म्युअर
मारिपोसाला गेलात तरी म्युअर वुड्स ला जायला हरकत नाही.. तिथले ट्रेल्स मस्त आहेत.
द रॉक किंवा श्वशां़क खूप आवडत असेल तर अल्कट्राजला जा नक्की. नाहितर पिअर ३९ वरुन साधी क्रुज घेउ शकता ती गोगे आनि अलक्ट्रज दोन्हीच्या जवळ फिरवते. क्रुजवर अशक्य थंडी असते. ़जॅकेट नक्की न्या.
पे अॅड पार्क १५/२० डोलरला आहेत.
गिराडेली स्क्वेअरला जा.. आणि आधी गेला नसाल तर तिथे जवळ रेन फॉरेस्ट कॅफे आहे तिथे ही जा.
एकूणच गोल्डन गेट ब्रिज जवळ भर
एकूणच गोल्डन गेट ब्रिज जवळ भर उन्हाळ्यातही प्रचंड गार वारे असते. चांगले जॅकेट ठेवाच जवळ. ब्रिज कधीकधी पूर्ण धुक्यात बुडालेला दिसतो. थोडा वेळ थांबलात तर पुन्हा नीट दिसू शकतो. काही वेळेस दुसर्या बाजूला जाईपर्यंत सुद्धा क्लिअर होते. गाडीने गेलात तर पूल पार करून पुढे एक एक्झिट आहे, तेथून रस्त्याच्या खालून डावीकडच्या टेकडीवर घाटासारखा एक रस्ता जातो - त्या रस्त्यावरून ब्रिज व शहराचा इतर भाग खूप सुंदर दिसतो.
नात्या, वर्णन व फोटो असेल
नात्या, वर्णन व फोटो असेल म्हणून बाफ उघडून बघितला. तुमची टूर करून झाली की नक्की फोटो टाका. आणि लिहा पण. हॅव द फन्स.
परत एकदा, अनेक धन्यवाद!! वरची
परत एकदा, अनेक धन्यवाद!!
वरची सगळी माहिती डायजेस्ट करायचा प्रयत्न करतोय.. पहिल्यांदा गोल्डन गेट, मग क्रुकेड स्ट्रीट, मग पेंटेड लेडी या गोष्टी गाडीतून बघुन मग तुम्ही म्हणता तसं फिशरमन्स वार्फ, पिअर ३९ जवळ गाडी पार्क करुन बाकी ठिकाणे पायी, म्युनी वापरुन करावी असे वाटतंय (वेळात बसतील अशी). ($६०-७० हॉप ऑन हॉप ऑफ साठी + पार्कींगपेक्षा जिथे लागेल तिथे तात्पुरते पार्किंग करणे सोयीस्कर वाटतंय). विकडेला ट्रॅफिक कितपत असतो?
जॅकेट्स नक्की जवळ ठेवू. काल वेदर.कॉमवर बघुन अंदाज आला (योसेमिटी ९२ फॅ पण सॅन फ्रॅन्/सॅन सिमिअन ६०-६५ फॅ दाखवत होते दुपारचे तापमान)
मामी, ट्रीप झाल्यावर काही फोटो (चांगले आले तर नक्की टाकीन) आणी प्रवासवर्णन लिहुन बोअरही करीन..
नात्या, ह्या धाग्याबद्दल
नात्या, ह्या धाग्याबद्दल धन्यवाद. आमचा सगळा ग्रूप याच सुमारास योसेमिटी ला जायच्या विचारात आहे. तेव्हा या महितीचा खूपच उपयोग होईल.
विकडेला ट्रॅफिक कितपत असतो >>
विकडेला ट्रॅफिक कितपत असतो >> सिटी मधे जाण्यासाठी बर्यापैकी ट्रॅफीक लागेल. १०१ वर खुप गर्दी असेल त्यामानाने २८० वर तुलनेने कमी गर्दी असेल.
ब्रीजवरुन जाणार असाल तर कुणाचा फास्ट ट्रॅक जवळ ठेवा. कारपुलसाठी फास्ट ट्रॅक लागतो नाहीतर सगळ्यांसोबत लाईन मधे थांबावे लागेल.
विकडे मधे पार्कींग मिळणे पण जरा अवघड असते. सकाळी लवकर आलात तर पार्कींग मिळेलही पण बर्याच ठिकाणी संध्याकाळी चार पर्यंत गाडी काढु देत नाहीत. बे ब्रीजच्या खाली /embarcadero & Bryant St junction वर (Reds Java House नावाच्या रेस्टॉरंट च्या बाजुला) एक मोठे पार्कींग लॉट आहे. तिथे मिळेल. तिथे डेली मॅक्स $१२ की $१८ आहे. पीअर ३९ च्या आसपास बरीच प्रायव्हेट पार्कींग लॉट्स आहेत किंवा पीअर ३९ च्या जवळ असलेले पब्लीक पार्कींग लॉट मधे डेली चार्ज ($२७) थोडा जास्त असेल पण पार्कींग मिळेलच.
इथे पार्कींग बद्दल बरीच माहिती आहे.
सीटी मधे गाडी चालवायला इतके कठीण नाही. रस्ते लहान आहेत आणि त्यात म्युनी बसेस आणि टॅक्सीवाले असतात पण पुणे रिक्षा किंवा न्यु यॉर्क टॅक्सीवाल्यांच्या तुलनेत एसफचे टॅक्सीवाले बरेच सभ्य आहेत त्यामुळे चालवायला इतके काही कठीण नाही. खुप सिग्नल्स आहेत आणि पायी चालणारे जागोजागी आहेत त्यामुळे ब्रेकवर लक्ष असु द्या.
तापमान ६०-६५ असले तरी थंड वार्या मुळे जास्त थंडी वाजते.
रमड, तुम्ही जाऊन आलात का?
रमड, तुम्ही जाऊन आलात का? तुमची ट्रीप कशी झाली?
नात्या तू जाऊन आलास का? फोटो
नात्या तू जाऊन आलास का? फोटो कुठे आहेत?
फोटो काय फार चांगले आले
फोटो काय फार चांगले आले नाहीत, साध्या पॉईंट अॅन्ड शूट कॅमेर्याने काढलेत, जे गेले नाहियेत त्यांना अंदाज यावा म्हणुन टाकतो..
योसेमिटीतले काही..
योसेमिटी व्हॅली (डाविकडे एल कापितान, उजवीकडे आटलेला ब्रायडल व्हेल फॉल्स):
ग्लेशियर पॉईंटवरुन दिसणारा हाफ डोमः
योसेमिटी व्हॅलीतून दिसणारे पर्वतः
मॅरिपोसा ग्रोव मधील जायंट सिकोया:
उन्मळुन पडलेला एक सिकोया:
छान आहेत की पाहिल्या त्या
छान आहेत की
पाहिल्या त्या बोगद्याच्या इथून काढला आहे का? आम्ही गेलो तेव्हा इतकी गर्दी होती की तिथे पार्कींगच मिळालं नाही !
नात्या मस्त आहेत
नात्या मस्त आहेत प्रकाशचित्रे.
योसेमिटीची अजुन काही प्रकाशचित्रे इथे पहायला मिळतील.
योसेमिटी ला यंदाच्या मेमोरियल
योसेमिटी ला यंदाच्या मेमोरियल डे ला जायचा प्लान आहे. करी विलेज मधे बुकिंग मिळत आहे, नॉन हिटेड टेंट. ज्ये ना व लहान मुलांना झेपणेबल थंडी असेल का ? की सरळ मारिपोसा किंवा आसपास हॉटेलमध्ये रहावे ? आतमध्ये बाकी काही बुकींग शिल्लक नाहीत.
मेमोरियल डे ला जावे की त्याच्या पुढच्या/मागच्या विकेंडला जावे, गर्दी टाळायला ?
>> मेमोरियल डे ला जावे की
>> मेमोरियल डे ला जावे की त्याच्या पुढच्या/मागच्या विकेंडला जावे
पुढच्या वीकेण्डला शक्यतो गर्दी टाळायला तसंच ग्लेशियर पॉइंट कधी ओपन होईल ते बघून ..
हो ग्लेशियर पॉईंट मागच्या
हो ग्लेशियर पॉईंट मागच्या वर्षी एप्रिल मधेच ओपन झालाय. पण यावर्षीचं पहावं लागेल. पण बुकींग आत्ताच करुन ठेवायला लागेल ना.
आणि २ नाईट्स जावे की ३ नाईट्स ?
मागच्या वर्षी बर्फ खुपच कमी
मागच्या वर्षी बर्फ खुपच कमी होता .. ह्यावेळी बर्यापैकी आहे बहुतेक .. तेव्हा अगदी एप्रिल ला ओपन होईल की नाही माहित नाही ..
तुम्हाला इकडे तिकडे बागडण्यात, छोटे छोटे ट्रेक्स् करण्यात इंटरेस्ट असेल, मुलींनां खेळायला वेळ द्यायचा असेल तर तीन रात्री जा .. योसेमिटी फार फार सुंदर आहे .. काय करावं असा प्रश्न अजिबात पडणार नाही ..
धन्यवाद सशल. मलाही ३ रात्री
धन्यवाद सशल. मलाही ३ रात्री जायची इच्छा होती.
बाहेर राहीलं तरी ठीक असेल ना, कारण आतले जे थोडूसे बुकींग्स आता आहेत ते कायच्या काय महाग आहेत. नॉन हीटेड टेंट शेअर्ड रेस्टरुम्स मधे ज्ये नां ना झेपेल का नाही कळत नाहीये.
>> नॉन हीटेड टेंट ह्याबद्दल
>> नॉन हीटेड टेंट
ह्याबद्दल मात्र अनुभव नाही त्यामुळे सांगू शकत नाही ..
आम्ही आत पार्कमध्ये दोनदा राहिलोय, दोन्ही वेळेला लॉज अॅट द योसेमिटी फॉल्स् मध्येच ..
खरं सांगायचं आम्ही आत पार्कमध्ये टेन्ट मध्ये राहिलेलो नाहीये अजून .. ते करायचंय एकदा; खूप इच्छा आहे .. बघुया कधी मुहूर्त मिळतोय ते ..
ओके. लॉज अॅट द फॉल्स ला
ओके.
लॉज अॅट द फॉल्स ला बुकींग्स नाहीचेत शिल्लक, अधलामधला एखादा दिवस आहे सध्या.
मवा, योसेमिटीमधे कधीही रात्री
मवा, योसेमिटीमधे कधीही रात्री खूप थंडी वाजेल हे गृहीत धरूनच प्लॅन कर. भारतातून आलेल्या ज्येना वगैरेंना जास्तच, पण आपल्यालाही.
पार्कच्या आतील हॉटेल्स खूप लौकर बुक होतात, त्यामुळे बरेच लोक Mariposa, Oakhurst वगैरे सारख्या ठिकाणी राहतात. मॅरिपोसा वरून योसेमिटी व्हिलेज साधारण एक-सव्वा तासावर आहे. दोन रात्री राहिलात तर बहुधा बरेचसे बघून होईल. तशी काही प्रमुख ठिकाणे दोन दिवसांत (एक रात्र) सुद्धा होऊ शकतात, पण मग दोन्ही दिवशी बे एरिया व योसेमिटी हा प्रवासही त्यात येतो व साधारण ४ तास दोन्ही वेळा त्यात जातील.
एक दोन आठवड्यांपूर्वी groupon.com वर काहीतरी डील चालू होते. चेक कर तेही.
Pages