अ‍ॅस्परेगस ची भाजी

Submitted by sneha1 on 15 May, 2016 - 22:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अ‍ॅस्परेगस , फोडणीचे साहित्य , दाण्याचा कूट , तिखट मीठ आणि मसाले आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. कोवळा अ‍ॅस्परेगस घ्या.. त्याचे लहान तुकडे करा , शेंगांच्या भाजीसाठी करतो तसे पण थोडे अजून लहान. अ‍ॅस्परेगस चा जाड देठाचा भाग काढून टाका.
२. तेलाची फोडणी करा. हिंग , मोहरी, हळद टाका आणि अ‍ॅस्परेगस टाका.. थोडे परतून घ्या आणि झाकण ठेवा. मी नेहमी कढई पेक्षा लहान झाकण घेते, म्हणजे भाजी खमंग होते आणो लवकर शिजते..मध्यम आचेवर शिजवा. कोवळी असेल तर पटकन शिजते.
३. दाण्याचा कूट, चवीप्रमाणे तिखट ,मीठ आणि साखर टाका..आवडीप्रमाणे मसाले टाका..मी टाकत नाही.
४. गरम भाजी पोळीबरोबर खा..
५. आता फोटो मागू नका. करीन तेव्हा टाकीन. त्याच्या आधी तुम्ही केली तर तुम्ही टाका.

वाढणी/प्रमाण: 
आवडीप्रमाणे
अधिक टिपा: 

अ‍ॅस्परेगस कोवळा घ्या शक्यतो.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग. अमेरिकेत काही काळ अशा ठिकाणी होतो की जिथे इंडियन स्टोर नवह्ते. तेव्हा वाटेल ते प्रयोग केले .
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रयोग स्ने. यात एखाद कांदा उभा चिरून टाक कधीतरी. भाजी वाढते!!
कांदा नाही टाकला आणि कोवळ्या शेंगा असल्या तर स्नॅक म्हणूनही छान लाग्ते ही भाजी.

अस्पॅरागसची टोके काढून टाकतात. एक शेंग हातात घेऊन मोडायची. जो टोकाचा भाग तूटतो तो टाकून देतात. It tell you where to break Happy

याचे सूपही मस्त होते.

अस्पॅरागसची टोके काढून टाकतात.>> नाही असे काहीच नाही उलट टोकचं खायचे असते आणि देठाखालचा जरड भाग काढून टाकायचा असतो. अ‍ॅस्परागसच्या शेंगा नसतात तुरे असते. शेंगा म्हणणे चुकीचे होईल. मी अ‍ॅस्परागसची भाजी कधी केली नाही फक्त पोळ्या झाल्यात की तेलावर अरतपरत करतो आणि मीरपुड आणि मिठ घालतो. एक दोन वाफेतच ही तुरे होतात फार वेळ लागत नाही आणि गरम गरम खाल्ल्या तर जास्त छान लागतात. मस्त गोड चव असते ह्या तुर्‍यांना.

फोटो हवाच होता Happy

अ‍ॅस्पेरॅगस गोज बेस्ट विथ गार्लिक, बटरवर गार्लिक परतुन त्याच्यात कान्ड्या परतायच्या आणि फोर्क टेन्डर शिजवायच्या फार शिजल्या तर चिवट लागतात.आधी करुन ठेवल्या तर मेगळट होतात.तेव्हा करुन लगेच खायच्या.
सुप पण छानच होते .

अजुन एक प्रकार खाल्ला होता. जरा जास्त तेलात , फोडणीत हिरवी मिरची व हरभरा डाळ पण घालणे व शेवटी ओले खोबरे पेरणे. फार छान लागते.

मी पण सूप करते, आणि कधी साधा पुलाव. कधी बार्लीचा रिसोटो..

बी , पुढच्यावेळी नक्की फोटो काढीन.

दिनेशदा, मला पण ह्यात मसाले आवडत नाहीत , तिखट मीठ पुरेसे वाटते.

सुनिधी, डाळ खोबर्‍याची आयडिया मस्त आहे..करून बघीन Happy

एक प्रश्न...अ‍ॅस्पेरॅगस म्हणजे शतावरी का?

असेल तर मग आणखी काय उपयोग आहेत अ‍ॅस्पेरॅगस चे?