फेब्रुवारीमधे बागकामाचा धागा ? झोन ६ मधून ? आज सकाळी इथे ३-४ इंच बर्फ होतं रस्त्यावर! पण रेडिओवर फ्लावर शो च्या बातम्या सांगत होते. फ्लावर शो बघून आल्यावर कॅटलॉग न्याहाळणे, बिया मागवणे, सीड स्टार्टिंग ची तयारी करणे - एवढे करे पर्यंत माझ्या झोन मधे बहुतेक सीड स्टार्टिंगची घटिका समीप आलेली असते.
तर फ्लावर शो च्या बातम्या यायला लागल्या की मला भाजीपाला उगवण्याचे वेध लागतात म्हणून हा धागा .
काही उपयुक्त दुवे
http://www.gardeningknowhow.com/ornamental/flowers/fgen/full-sun-plants.htm दिवसभर प्रखर उन मिळत असेल अशा जागांसाठी फुलझाडे
http://monarchbutterflygarden.net/milkweed-plant-seed-resources/ मोनार्क फुलपाखरे / सुरवंट यांच्या आवडीचे मिल्कवीड - राज्यनिहाय स्थानिक जाती .
स्टेम कटिंग घेऊन नवीन रोपे करण्याची पद्धत https://www.youtube.com/watch?v=hb23IGiL5T8
कॉस्कोतून कंदांची पिशवी आणली
कॉस्कोतून कंदांची पिशवी आणली का? माझ्याकडे पिशवी आली आहे पण मुहूर्त नाही लावायला. >>>> नाही ह्यावेळी लोक नर्सरीतून दोनच कंद आणले होते.
मी गेल्यावर्षी हेच प्रश्न विचारले होते, तो धागा खणायचा कंटाळा आला. ट्युलिप्स बरोबर डॅफोचे कंदही तसेच ठेऊ ना कुंडीत ? ते पण येतात का पुढच्यावर्षी ?
शोनू, अबोली आत आणून परत बाहेर नेली का? आमच्या घरच्या सदस्यांनी अबोली आणि जास्वंद आत आणू दिली नाही गेल्यावर्षी.. त्यामुळे गेली दोन्ही झाडं..
आता यंदा परत लाऊ.
हो, डॅफोडिल्स परत उगवतात.
हो, डॅफोडिल्स परत उगवतात.
मी अबोली , जास्वंद, मोगरा , कढी पत्ता, रोझमेरी, बे लीव्ह्स , लेमन ग्रास , थाइम हे सर्व आत बाहेर करते.
तरी मागच्या वर्षी लेमन ग्रास व थाईम हे देवाघरी गेले. चांगलं ७० च्या वर तापमान असलेल्या दिवशी जुन्या घरातून नव्या घरात आणले होते पण तरिही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
लेमन ग्रास हवं का तुला?
लेमन ग्रास हवं का तुला?
पुढच्या आठवड्यात हर्ब शो मधे
पुढच्या आठवड्यात हर्ब शो मधे नाही मिळाले लेमन ग्रास तर कळवते तुला.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अबोलीचे एकच रोप आहे सध्या. बर्याच बिया मी कुठल्या तरी एका रिकाम्या कुंडीत माती भरुन त्यात पेरल्या होत्या. सामान हलवताना सगळ्या ' रिकाम्या' ( वाटणार्या) कुंड्यांमधली माती ( अबोलीच्या बिया, निशिगंधाचे अन कॅला लिलीचे कंद इत्यादी ) अंगणाच्या कोपर्यात डंप करुन खरोखरच्या रिकाम्या कुंड्या आणल्यात नव्या घरी
वेका , अगं ती रोझमेरी नाही.
वेका , अगं ती रोझमेरी नाही. स्पॅनिश लव्हेंडर आहे. आमच्याकडच्या एक्स्ट्रीम हॉट वेदर मध्ये अतिशय वेगाने पसरते . माझ्याकडे रोझमेरी आणि स्पॅनिश लव्हेंडर आणि गवती चहा खुप पसरलेलं. किचकट झाल्याने साप येवू लागले त्यात. सगळ काढून टाकल आम्ही गेल्यावर्षी. गवती चहा आणि रोझमेरी आता पॉट मध्येच लावणार लावली तर. भरपुर गुलबकावली लावली गेल्या वर्षी. सशाने अज्जिब्बात तोंड लावल नाही. आणि बिया पडून परत यावर्षी रोप आली आहेत.
यावर्षी अंबाडी,बिन्स,वांगी,कार्ली,दुधी,लाल पालेभाजी,तुळस(बीया सीड्स ऑफ इंडीया वरून मागवलेल्या),मायाळू (दिनेशनी त्यांच्या रेसीपीत लिहिलेल देठ लावला तर वाढतो. म्हणुन खोचून ठेवलेला देठ. छान वाढतोय.), दोडका, मोस्टली सगळे इटालिअयन हर्ब्ज लावले. सशाच्या तडाख्यातून काय काय वाचेल ते बघेन.
सशल, लँटानाला पाणि जास्त घालू नको.
सीमा, त्याचा नेम टॅग अजून आहे
सीमा, त्याचा नेम टॅग अजून आहे रोझमेरी म्हणून. होम डिपोवाल्यांनी चुना लावला का? पण हे झाड कोवळं असताना रोझमेरी वापरली आहे आणि वास तरी तसाच आला.
रोझमेरी ला ही अशी लॅवेंडर
रोझमेरी ला ही अशी लॅवेंडर कलरची फुलं येतात ना? मी इकडे बघितली आहेत.
वेका हे पहा स्पॅनिश
वेका हे पहा स्पॅनिश लव्हेंडर.
![lavstoechasblooming1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u182/lavstoechasblooming1.jpg)
आणि हे रोझमेरीचे फुल
![images_3.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u182/images_3.jpg)
म्हणजे आता रोझमेरी आणावी
म्हणजे आता रोझमेरी आणावी लागणार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सीमा, खरंच की. वेका कडची
सीमा, खरंच की. वेका कडची स्पॅनिश लॅव्हेंडर वाटत आहेत.
पण मी अशी फुलं बघितली आहेत रोझमेरी ची (की तीही स्पॅनिश लॅव्हेंडर च होती?)
सशल तु दिलेली रोझमेरीच गं. ही
सशल तु दिलेली रोझमेरीच गं. ही अशीच वेड्यासारखी वाढते रोझमेरी. मी दुसरा फोटो दिलाय त्याला एक्झाटली मॅच होतीये बघ.
सीमा, हा फोटो नेटवरचा आहे.
सीमा, हा फोटो नेटवरचा आहे. आणि मी बहुतेक दोन्हीं बघितली आहेत असं वाटतंय पण ती स्पॅनिश लॅव्हेंडर्स फार जास्त दिसतात बहुतेक म्हणून माझाच गोंधळ होतोय.
माझ्या कडे पिंक जास्मिन ला
माझ्या कडे पिंक जास्मिन ला जोरदार फुलं येतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जमल तर फोटो टाकते नंतर.
वीकेंडला झिनिया, सदाफुली,
वीकेंडला झिनिया, सदाफुली, साल्विया, पॉपी आणि झेंडूची मिळून दोन अडीचशे रोपं लावली अंगणात. एकूण एक मसल सोअर आहेत आता
पुढच्या वर्षी मुकाट्याने पेरेनियल्स लावणार .
जुन्या घरातून रोझ ऑफ शॅरॉनची २०- २५ बारकी रोपे आणून ती लावलीत . सेज, मिंट , पार्स्ली , थाईम, रोझमेरी , लॅव्हेंडर वगैरे हर्ब्स आणून ठेवले होते १५ दिवसांपूर्वी, ते पण लावलेत .
नव्या घरात भरपूर जांभळे डच आयरिसेस उगवले आहेत. शिवाय डे लिली फुलायच्या बेतात आहेत .
मदत करा! मदत करा! एक
मदत करा! मदत करा!
एक पेस्ट्/बग आहे ज्याने हनी सकल कुरतडून बर्याच फांद्या मारून टाकल्या. आणि आज सकाळी बघितलं आता दुसरीकडे छान मंद सुवासाचा पिवळा गुलाब आहे ज्याला घरी आणून रुजल्यानंतर आताच बर्याच कळ्या आल्या आहेत आणि पहिल्या दोन उमलण्याच्या बेतात आहेत तिकडे नजर वळवली आहे त्या किड्याने ( बग/पेस्ट ने). लोव्ज् मधून एक स्प्रे आणून मारला होता पण हा किडा त्याला दाद देत नाही बहुतेक![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फोटो काढून होम डिपो,
फोटो काढून होम डिपो, लोव्जमध्ये विचारलंस तर?
गेल्या वर्षी माझ्या काही झाडांना बारीक बारीक किडे आले होते तेव्हा मी पाणी, डिश सोप आणि तेल एकत्र करून स्प्रे केलं होतं आणि त्याचा उपयोग वाटला तेव्हा.
डिश सोप का? त्याने झाडांनां
डिश सोप का? त्याने झाडांनां अपाय नाही ना होत? की सगळंच माइल्ड अमाउन्ट्स मध्ये घ्यायचं? थँक्स सायो.
फोटो काढून दाखवेन. मला सुचलं नव्हतं. सध्या फक्त राग आला आहे त्या किड्याचा.
सगळं सेम पोर्शनमध्ये मिक्स
सगळं सेम पोर्शनमध्ये मिक्स करून फवारलं होतं. नेटवर वाचून.
http://smsf-mastergardeners.u
http://smsf-mastergardeners.ucanr.edu/Advice_to_Grow_By/
ही Master Gardeners ऑफ San Mateo and San Francisco Counties. ची साइट आहे. यांना फोन करुन विचार . तुमच्या भागातल्या पेस्टस ची त्यांना बरोबर माहिती असणार अन ते उपाय सुचवू शकतील
थँक्स मेधा! ते ही करून बघते.
थँक्स मेधा! ते ही करून बघते.
ही जर्बेराची फुलं. ह्याचे
ही जर्बेराची फुलं. ह्याचे रंग मस्त डार्क आहेत.
ह्या आमच्या बागेतल्या काही भाज्या. एक काकडी खूपच मोठी झाली! बाकी दोन्ही लहान राहिल्या. खालुन सुकायला लागल्यावर तोडल्या. टमॅटो खूप आले आहेत आता.
मस्तय पराग.
मस्तय पराग.
भारी.
भारी.
हे आणलेल्या रोपांचे
हे आणलेल्या रोपांचे फोटो
आणि हे रोपं कुठे लावायची त्याचं स्पेस प्लानिंग करताना.
मेधा, ती फुलं नसलेली हिरवी
मेधा, ती फुलं नसलेली हिरवी रोपं ( २ ट्रे ) कसली आहेत?
कित्ती रोपं आणली आहेस! खूप उत्साही आहेस.
मेधा..पराग.. व्हॉट अ
मेधा..पराग.. व्हॉट अ ब्यूटी!!!! जरबेरा चे खूपच सुरेख कलर्स आहेत!!
मेधा किती रोपं आणलीयेस.. वॉव..
पहिल्या फोटोत डावीकडची फुले
पहिल्या फोटोत डावीकडची फुले नसलेली झिनिया आहेत, अन उजवीकडचे दोन ट्रे सदाफुली आहेत. हरणं त्यातल्या त्यात कमी खातात ही झाडं असं वाचून आणली आहेत.
स्वाती२, तुम्ही मागे
स्वाती२, तुम्ही मागे स्नो-ओईंग बद्दल लिहिलं होतत. ते कुठल्या कुठल्या झाडांचं करता येईल ? (भाज्या ?)
आम्ही मिरचीचं बी लावलं आहे. पण त्याचा वाढायचा स्पीट बघता सिझन अपुरा पड्णार असं वाटतय.
त्यामुळे पुढल्या वर्षी थंडीतच लावावी का असं वाटतय.
कधी करायचं साधारण स्नोसो ?
पराग, फुलं मस्त
पराग, फुलं मस्त आहेत!
स्नोसोइंग करणार असाल तर तुम्ही कुठल्या झोनमधे आहात त्यानुसार टोमॅटो, मिरच्या, वांगी कधी स्नोसो करायचे ते ठरेल. मी खाली टाईमटेबल देतेय
झोन ३ , झोन ४ - एप्रिल
झोन ५, झोन ६ - मार्च
झोन ७ -फेब
मेधा, केवढी रोपं आणल्येत!
मेधा, केवढी रोपं आणल्येत! सगळी फुलली की फोटो टाका.
Pages