फेब्रुवारीमधे बागकामाचा धागा ? झोन ६ मधून ? आज सकाळी इथे ३-४ इंच बर्फ होतं रस्त्यावर! पण रेडिओवर फ्लावर शो च्या बातम्या सांगत होते. फ्लावर शो बघून आल्यावर कॅटलॉग न्याहाळणे, बिया मागवणे, सीड स्टार्टिंग ची तयारी करणे - एवढे करे पर्यंत माझ्या झोन मधे बहुतेक सीड स्टार्टिंगची घटिका समीप आलेली असते.
तर फ्लावर शो च्या बातम्या यायला लागल्या की मला भाजीपाला उगवण्याचे वेध लागतात म्हणून हा धागा .
काही उपयुक्त दुवे
http://www.gardeningknowhow.com/ornamental/flowers/fgen/full-sun-plants.htm दिवसभर प्रखर उन मिळत असेल अशा जागांसाठी फुलझाडे
http://monarchbutterflygarden.net/milkweed-plant-seed-resources/ मोनार्क फुलपाखरे / सुरवंट यांच्या आवडीचे मिल्कवीड - राज्यनिहाय स्थानिक जाती .
स्टेम कटिंग घेऊन नवीन रोपे करण्याची पद्धत https://www.youtube.com/watch?v=hb23IGiL5T8
काल फायनली काही रोपं मोठ्या
काल फायनली काही रोपं मोठ्या कुंड्यांमध्ये हलवली, माती बदलली, काटछाट केली. हे काम मागच्या उन्हाळ्यापासून पेन्डिंग होतं. आता हलवलेल्या रोपांनी माना-बिना टाकू नयेत म्हणजे झालं.
तगरीच्या रोपासोबत एक पिन्क जॅस्मिनचं रोप कॉम्प्लिमेन्टरी (फुकट या शब्दाला किती ग्लोरियस वाटत असेल) मिळालं होतं ते वेळेत कुंडीत न हलवल्यानं जळालं. बिचार्याला या जन्मी माती लाभू द्यावी म्हणून बागेत एका कोपर्यात खोचून ठेवलं होतं. काल बघितलं तर कोंब फुटलेले दिसले. एकदमच भारी.
पहिल्यांदा लावलेले लायलॅक चे
पहिल्यांदा लावलेले लायलॅक चे कटिंग चतुष्पाद ( बार्क्याने ) उचकटून , चावून, माती कार्पेट वर पसरुन राडा केला होता. आता परत लावलेले कटिंग्ज एका टेबलवर ठेवलेत . काल पाहिले तर जरा बारीक कोंब दिसत होते. थोरली म्हणे काड्या उप्टून बघ खालून मुळं फुटली आहेत का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी दर वर्षी मे मधे
मी दर वर्षी मे मधे अॅन्युअल्स लावते कुंड्यांमधे. हवे तसे सजावटीसाठी वापरता येतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावेळी रोपे आणली तेव्हा असलेल्याच नेहमीच्या कुंड्यामधे नवी माती, खत वगैरे भरावे आणि नवी रोपे लावावीत असे म्हणत कुंड्या एकत्र गोळा केल्या. तर त्यातल्या २ कुंड्यांत आधीच लहान लहान रोपे आलेली दिसली.या कुंड्यांमधे गेल्या वर्षी पेटुनिया लावले होते. ते अॅन्युअल असल्याने काही जिवंत असतील असे वाटले नाही तरी पण या कुंड्या तशाच ठेवल्या मग, फक्त नविन पॉटिंग मिक्स अॅड केले जरा.
आता पहाते तर मस्त पेटुनिया फुलला की दोन्ही कुंड्यात!! यावेर्षी विंटर फार नव्हता, पण तरी दोन तीन मोठे स्नो फॉल झाले की, आणि थंडी काही आठवडे तरी होतीच, तशात पण पेटुनिया टिकला म्हणून फारच आनंद झालाय
पेटुनिया पेरिनियल आहे.
पेटुनिया पेरिनियल आहे.
पेन स्टेट युनिव्हर्सिटी
पेन स्टेट युनिव्हर्सिटी एक्स्टेंशन तर्फे चालणारा पॉंड मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला. त्या निमित्ताने आमच्या अंगणातल्या पॉंडचे पाणी टेस्ट करुन झाले . आयर्न थोडे जास्त आहे आणि हार्डनेस पण जास्त आहे असे निदान आले. मायनिंग बेल्ट मधे असल्याने ते अपेक्षितच होते. इतर सर्व काही रेंज मधे आहे , हार्मफुल केमिकल्स, बॅक्टेरिया वगैरे काही नाही .
पुढच्या गटगला मंडळी पाँडमधे पोहू शकतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चाफ्याची तीन रोपं आहेत कुणाला
चाफ्याची तीन रोपं आहेत कुणाला हवी असल्यास सांगा. फांद्या फारच उंच झाल्या होत्या म्हणून छाटणी केली यंदा. सध्या अशाच इथे तिथे खोचल्या आहेत. कुणाला हव्या असल्यास कुंडीत हलवेन.
मला चालतील पण कशी आणणार?
मला चालतील पण कशी आणणार?
चाफा असा छाटलेल्या फांद्या
चाफा असा छाटलेल्या फांद्या रोवून लागतो का?
अमित, इकडे नाही आणता आला तर "चाफा बोलेना, चाफा चालेना" म्हणणार का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणता आला तरी म्हणू की !!!
आणता आला तरी म्हणू की !!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
व्हय पहिले १-२ दिवस जरा मऊ
व्हय पहिले १-२ दिवस जरा मऊ पडते फांदी पण लगेचच तग धरते. मी आणल्या त्या फांद्याच होत्या. आतापर्यंत ३-४ तरी रोपं बनवून दिली आहेत कुणाकुणाला.
अरे मग मलाही चालेल. सिंडरेला
अरे मग मलाही चालेल.
सिंडरेला तुझ्याकडे एव्हाना "झाड" लेव्हलला पोचलाय का चाफा?
http://mikesbackyardnursery.com/2013/08/how-to-ship-plants-by-mail-ups-o...
त्यातली एक मी ही आहे. सिंडीने
त्यातली एक मी ही आहे. सिंडीने चाफ्याची फांदी दिली होती. त्याला पानं वगैरे फुटली. थंडीत त्याला बेसमेंटमध्ये शिफ्ट केल्यावर पानं सुकून गळली. स्प्रिंगमध्ये आता पुन्हा आली आहेत बाहेर नेल्यावर.
माझ्याकडच्या गुलाबाच्या
माझ्याकडच्या गुलाबाच्या रोपांना बहुधा स्पायडर माइट्सची बाधा झाली आहे. कोळ्याच्या जाळ्यासारखी जाळी दिसताहेत फांद्यांच्या टोकांना आणि पानं पिवळट होत आहेत. काय औषध वापरता येईल? इन्सेक्ट किलिंग सोप उपयोगी पडेल का?
रमड, मी एवढ्यातल्या एवढ्यात
रमड, मी एवढ्यातल्या एवढ्यात स्प्रे बॉटलमध्ये समजा १ कप पाणी असेल तर पाव कप तेल (कुकींग ऑईल), पाव कप डिश सोप असं मिश्रण एकत्र करून ढवळून स्प्रे केलंय आणि फरक पडलेला पाहिलाय. ह्यात हार्मफुल केमिकल्स नसल्याने करून बघ.
मध्यंतरी मी कॉस्कोतून डेलियाचे बल्ब्ज आणून लावले होते ते काहीच्या काही वाढले होते. त्यांना आज वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करायचं काम केलं. आयकियात प्लांट्स आणि कुंड्या बाहेरपेक्षा स्वस्त मिळतात हे कळल्यामुळे घरात इनडोअर, आऊटडोअर झाडं भरपूर झाली आहेत.
ओके. थँक्स, सायो. हे करून
ओके. थँक्स, सायो. हे करून पाहाते आणि इथे फीडबॅक देते परत.
सिंडरेला, बे एरियात राहतेस
सिंडरेला, बे एरियात राहतेस कां? मी आले अस्ते एक फांदी घ्यायला.
बे एरितात मिळत असतील अशी माझी
बे एरितात मिळत असतील अशी माझी कल्पना होती. मी एक जणांना पाठवणार आहे त्यांच्याकडून घेउ शकता.
ते एक जण वाचत असतील तर- पाठवणार आहे बर्का. सध्या फारच लग्नं लागल्यामुळे चाफ्याचं बाळंतपण जरा बॅकबर्नरवर आहे.
सायो, कॉस्कोतल्या डेलियाला
सायो, कॉस्कोतल्या डेलियाला चांगली फुलं आली का?
आम्ही ह्यावेळी लोकल नर्सरीतून आणले डेलियाचे कंद. तर अगरी खुरटी आणि पांढरी फुलं आली. :|
गेल्यावर्षी होम डेपोतल्या कंदांना मस्त गेंदेदार फुलं आली होती.
फॉल प्लँटींगसाठी ट्युलिप आणि डॅफो सोडून अजून काही आयड्या आहेत का?
Hyacinth - - सुंदर रंग, लो
Hyacinth - - सुंदर रंग, लो मेन्टेनन्स , एकदा लावले की दर वर्षी येत रहातात.
https://en.wikipedia.org/wiki/Hyacinth_(plant)
http://www.whiteflowerfarm.co
http://www.whiteflowerfarm.com/910891-product.html
केशर (सॅफ्रॉन). लवकरच ह्याचे कंद मिळू लागतील.
काहीतरी नवीन लावून पहायचे असेल तर.
Hyacinth लावले ना
Hyacinth लावले ना गेल्यावर्षी.. पण ते अर्धवटच आले.. आता तेच कंद ह्यावर्षी परत येतात का बघू.
केशर ?? वॉव हे असं लावता येतं माहीत नव्हतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डीअर रेझिस्टंट, नेटिव्ह,
डीअर रेझिस्टंट, नेटिव्ह, पेरिनियल, लेट समर मधे फुलणारे असे सर्व एकत्र म्हणून बरीचशी रोझ ऑफ शॅरॉनची रोपं लावली होती या वर्षी मे महिन्यात. चांगली दीड दोन फूट उंच झाली होती आणि बर्याच फांद्या पण फुटल्या होत्या. मागच्या शुक्रवारी सर्वच्या सर्व झाडं हरणांनी खाऊन जेमतेम ६-८ इंच काड्या राहिल्या आहेत :रागः
कॅनडा थिसल, पॉयझन आयव्ही , क्रॅब ग्रास, माइल-अ- मिनिट वेल आणि डॅण्डीलायन्स हीच फक्त डिअर आणि जॅपनीझ बीटल रेझिस्टंट आहेत . सर्व अगदी मस्त मजेत जोमात वाढली आहेत !
मंडळी फॉलची तयारी सुरू केलीत
मंडळी फॉलची तयारी सुरू केलीत का?
आम्ही शेवटी ट्युलिपच्या कंदांचं पोतं आणलं कोस्कोतून. गेल्यावर्षीचे ट्युलिप, डॅफो आणि Hyacinth आहेत तसेच कुंडीत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अजिबात थंडी नसल्याने Hyacinth ना डिसेंबरमध्येच मोठी मोठी पानं आली होती आणि बहुतेक त्यामुळेच नीट फुलं आली नाहीत. ह्यावर्षी बघु काय होतय.
नवीन डॅफो पण आणू.
गुलाब, झेंडू, जर्बेरा वगैरे उन्हाळी फुलं येत आहेत अजून. पुढच्या वर्षी जर्बेरा मोठ्या कुंड्यांमध्ये लाऊ. कॉस्कोतली जर्बेराची झाडं खूप चांगली निघाली. पुर्ण सिझनभर सुंदर फुलं आली.
काल फॉल गार्ड्निंग लेक्चर मधे
काल फॉल गार्ड्निंग लेक्चर मधे एका बाईनी फॉल कंटेनर गार्डनवर भाषण दिले होते.
चार्ड, गार्लिक, रंगी बेरंगी कॅबेज आणि मम्स वापरुन बरेच सुंदर कंटेनर्स केले होते.
रेनबो चार्ड / स्विस चार्ड बियांपासून सहज उगतात. माझ्याकडे गेल्या वर्षीच्या थोड्या बिया आहेत उरलेल्या. त्या लावून बघणार आहे.
आमच्या कंटेनर्स आणि हँगिंग बास्केटमधल्या पेट्युनिया आणी Calibrachoa चं अवतार कार्य संपत आलं आहे .
बरं झाडं घरात कधी आणणार? ती
बरं झाडं घरात कधी आणणार? ती घरात आणली की जिकडे-तिकडे दिसणार्या सेंटिपीड्सची मला भिती बसली आहे त्यामुळे पुढे ढकलते आहे. सहसा सप्टें.च्या दुसर्या-तिसर्या वीकेन्डला आणते घरात.
किमान तापमान ४०च्या वर आहे
किमान तापमान ४०च्या वर आहे तोवर बाहेर राहिली तरी चालतात.
ट्युलिपचे बल्ब्ज आणले आहेत.
ट्युलिपचे बल्ब्ज आणले आहेत. दोन एक आठवड्याने लावायला हवेत.
मी पण अजून १०-१५ दिवसात आणेन
मी पण अजून १०-१५ दिवसात आणेन आतमधे .
रेक्सने रातराणीच्या सर्व फांद्या चावून चावून तोडल्या एका दिवसात
तरी नवी पालवी फुटेल अशा आशेने कुंडी उंच ठिकाणी ठेवलीय सध्या. पण सर्व झाडे घरात आणल्याव रेक्स काय करेल याची चिंता आहेच.
या वेळच्या काही भाज्या आणि
या वेळच्या काही भाज्या आणि फळं, आता अजून थोडेच दिवस राहिले या सिझन मधले.
अजून बाकिच्या फळांचे, भाज्यांचे फोटो आहेत ते अपलोड करते. अर्र, फोटो साईझ चा लोचा दिसतोय!
Wow! भारी!!
Wow! भारी!!
Pages