मुग्धाला आज उशीरच झाला होता. डोक्यावरची पाटी सांभाळत झपाझप पावलं टाकत ती निघाली होती. सूर्य आग ओकत होता, रस्ते खचाखच ट्रॅफिकने भरलेले. हीच तर वेळ धंद्याची असते. लवकरात लवकर लकडी पुलाच्या सिग्नल ला पोहोचायला हवं, तिथे दुपारपर्यंत चांगले गजरे विकले जातात. आज संध्याकाळच्या आत पाटी संपवून वीणा सोबत तळ्यातल्या गणपतीला जायचं असं ठरलेलं होतं दोघींचं. वाट काढत पोहोचली आणि नेहमीच्या ठिकाणी चिरक्या आवाजात ओरडत कामाला लागली.
खूप हौसेने तिच्या आईने कुठूनसं ऐकून मुग्धा नाव ठेवलं होतं. वर्णाने सावळी असली तरी रेखीव होती. नुकतंच अठरावं लागलं होतं. दहावीपर्यंत आईने कशी बशी तिची शाळा रेटली होती. कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नव्हता. घरात खाणारी तोंडं पाच ! धाकट्या दोघी लहान होत्या आणि मोठा भाऊ कॉलेजात होता, हुशार होता. वडील अपघातात गेले आणि घरावर कुऱ्हाड कोसळली. हिची आई दहा घरची धुणीभांडी करी. मग मुग्धावरच आईचा भार हलका करण्याची जबाबदारी आली. बाराव्या वर्षापासूनच ती शाळा सांभाळून गजरे करून विकायला लागली. तिला ते काम आवडत असे. कधी मोगऱ्यात एखादी गुलाबाची कळी तर कधी जाई अबोली मिक्स, बकुळ मिळाला तर अगदी हरखून जाई. त्यांच्या वस्तीत फुलराणीच म्हणायचे तिला. उफाड्याची पोर आता आईसाठी काळजीचा विषय झाली होती. तिचं शिक्षण बंद करावं लागलं ह्याचं राहून राहून तिला वाईट वाटायचं. एखादया बंगल्यातलं कायमस्वरूपी मोठं काम मिळालं आणि पोरगं कमवायला राजी झालं तर इथली खोली बदलून किमान एखाद्या चाळीत जावं आणि हिच्याही कॉलेजचं बघावं अशी गणितं ती मांडत बसे. पण पोरगं ऐकायला तयार नव्हतं. नोकरी करून अभ्यास करायचं नाही म्हणत होतं.
मुग्धाला वेगळंच वाटायचं . एकदोनदा कॅम्पात आईच्या कामाला गेली होती तेव्हा मोठ्ठाली फ्लावर शॉप्स तिने बघितली होती. तशा एखादया दुकानात नोकरी मिळाली तर मनाजोगतं काम करता येईल आणि पुढे त्याचा कोर्सही असतो म्हणे असं वीणेकडून तिने ऐकलं होतं. तशी तिची राहणी साधी स्वच्छ होती. फार हुशार नसली तरी भाषा शुद्ध होती आणि इंग्रजीपण थोडंथोडकं येत होतं.
ठरल्याप्रमाणे पाटी लवकर संपवून चालत जाईस्तोवर उन्हं कललीच. वीणा वाट पाहतच होती. वीणाची आणि तिची शाळेपासूनची घट्ट मैत्री होती. वीणा चांगल्या घरातली, परिस्थिती उत्तम असल्याने कॉलेजात जात होती. त्यामुळे दोघींची भेट आज खूप महिन्यांनी झाली होती. आधी त्यांनी दर्शन घेतलं. भेळ खात खात गप्पा रंगल्या, वीणेने डोळे मिचकावत एक चिठोरा तिच्या हातात सारला. "पत्ता आणि फोन नंबर आहे कॅम्पातल्या फुलांच्या दुकानाचा. बाबांच्या ऑफिस मध्ये तिथून फुलं येतात. बाबांनी बोलून ठेवलंय, उदया बोलावलंय तुला भेटायला तिथे" अजून एक पिशवी तिच्या हातात ठेवली, त्यात एक बऱ्यापैकी ड्रेस आणि काही किरकोळ सामान होतं. मुग्धाला भरून आलं. काही न बोलताच वीणेला तिने घट्ट मिठी मारली.
अंधाराच्या आत घरी पोहोचली तरी आईने बडबड केलीच पण मुग्धा केव्हाच नवीन ड्रेस अंगावर चढवून दुकानात पोहोचली होती. आईकडे दुर्लक्ष करत तिने परातीत भाकऱ्या थापायला घेतल्या.
आज अंमळ लवकरच उठली. गजरे गुंफायला घेतले आईला कळू नये म्हणून. आई कामाला आणि बहिणी शाळेत गेल्या की निवांत तयार होता येणार होतं. वीणाचा ड्रेस जरा घट्टच झाला तिला. ओढणी अंगभर घेतली. कानात वीणाचेच डूल, कपाळावर टिकली आणि ठेवणीतली पर्स घेऊन ती निघाली. बसही पट्कन मिळाली. चिठ्ठीवरचा पत्ता फारसा शोधावा लागलाच नाही. ती बिचकत काचेचं दार लोटून आत शिरली. एसी चा थंड झोत अंगावर आला. अनेक रंगाच्या आणि ढंगाच्या वेगवेगळ्या पुष्परचना, चॉकलेट्स, आर्ट पीसेस सगळं अगदी सुबकपणे मांडलं होतं. एवढ्या फुलांची नावंही तिला माहित नव्हती. ती हरखून पाहत राह्यली. काउंटर वरच्या इसमाने आवाज दिला तशी भानावर आली. चिठ्ठी दाखवली. त्याने मागच्या बाजूला वर्कशॉपकडे जायला सांगितलं.
तासाभराने बाहेर पडली तिच बागडत! सगळं अगदी मनासारखं झालं होतं. तिथे तिने करून दाखवलेला बुके आणि तिचा आत्मविश्वास दोन्ही, मॅडमना आवडलं होतं. पगार ठरवून उदया रुजू होण्यासंबंधी लेटर घेऊनच निघाली. काम करता करताच कोर्सही करता येणार होता. कधी एकदा वीणेला आणि आईला सांगते असं तिला झालं होतं.
रस्त्यात पाव किलो पेढे घेतले. घरात शिरली तर समोर मामा ! ती काही सांगणार इतक्यात मामा म्हणाला मुग्धे स्थळ आणलंय बघ तुझ्यासाठी. तुझा फोटो पसंत आहे. करायचा का परवा कार्यक्रम? मंडळी सासवडची आहेत. तिने आईकडे बघितलं आई आनंदात होती. मानेनेच होकार देत, हातातली पिशवी लपवत ती मोरीकडे गेली.
सकाळी उठून, काल काही घडलंच नाही अशा आविर्भावात नेहमीप्रमाणे गजरे गुंफायला घेतले. आईने तिच्या पुढ्यातली टोपली खसकन ओढली. गरज नाही म्हणाली ह्याची आता. तिने आश्चर्याने आईकडे पाह्यलं. आईच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले. हातात पाचशेची नोट ठेवत म्हणाली,"आज पहिला दिवस ना कामाचा ? जरा बऱ्यापैकी ड्रेस घे, वीणेचा घट्ट होतो तुला. आवर पट्कन पळ ! काळ रात्री तुला पिशवी घेऊन रडताना पाहिलंय मी आणि तुझ्या दादाने. तुझ्या दादालाही जाणीव करून दिलीस बघ. तोही आजपासून काम शोधणार आहे. वेडे, तुझ्या आईने कालच मामाला इतक्यात नाही म्हणून सांगितलं होतं. चल आटप ! दही साखर देते हातावर !"
मुग्धा मुग्ध होऊन आईकडे बघत राहिली. पाटीतला अर्धवट गुंफलेला गजरा तिच्याकडे पाहून हसत होता. सगळीकडे सुगंधच सुगंध पसरला होता...
---श्वेताक्षरा
अतीशय गोड आणी सुगंधी कथा
अतीशय गोड आणी सुगंधी कथा आहे, फार आवडली.:स्मित: मला अशा पॉझीटिव्ह शेवट असलेल्या कथा फार आवडतात.
Mast
Mast
छान........
छान........
छान कथा.
छान कथा.
aavadali.
aavadali.
खूपच छान कथा.. पुलेशु
खूपच छान कथा.. पुलेशु
मस्त कथा. सुखांत आवडला .
मस्त कथा. सुखांत आवडला .
छान आहे...आवडली
छान आहे...आवडली
खुपच सुरेख कथा..
खुपच सुरेख कथा..
छान आहे कथा... शेवट सुखद झाला
छान आहे कथा... शेवट सुखद झाला की चुट्पूट लागत नाही...
फारच गोड आहे कथा. भावस्पर्शी.
फारच गोड आहे कथा. भावस्पर्शी.
अतीशय गोड आणी सुगंधी कथा आहे,
अतीशय गोड आणी सुगंधी कथा आहे, फार आवडली.स्मित मला अशा पॉझीटिव्ह शेवट असलेल्या कथा फार आवडतात. >> +1
छान आहे.
विद्या.
अरे वा! सुगंधित कथा! मात्र
अरे वा!
सुगंधित कथा!
मात्र शेवट उगी उगी गोड केल्यासारखा वाटला!
पुलेशु!
खुप सुन्दर शेवट, फार अवडला.
खुप सुन्दर शेवट, फार अवडला.
आवडली गोष्ट.. शेवट गोड केला
आवडली गोष्ट.. शेवट गोड केला म्हणून नव्हे तर कथानायिकेच्या आईने तिला पाठिंबा दिला म्हणून आवडला
मस्त कथा
मस्त कथा
आवडली गोष्ट.. शेवट गोड केला
आवडली गोष्ट.. शेवट गोड केला म्हणून नव्हे तर कथानायिकेच्या आईने तिला पाठिंबा दिला म्हणून आवडला+१
पुलेशु.
छान आहे गोष्ट
छान आहे गोष्ट
मस्त.. शेवट सुखद झाला की
मस्त..
शेवट सुखद झाला की चुट्पूट लागत नाही..++१
एकदम छान खूप सुंदर गजरा विणला
एकदम छान खूप सुंदर गजरा विणला आहे...
शेवट गोड केला म्हणून नाही तर
शेवट गोड केला म्हणून नाही तर ज्या प्रकारे केला त्यामुळे खुप आवडली.
शेवट गोड केला म्हणून नाही तर
शेवट गोड केला म्हणून नाही तर ज्या प्रकारे केला त्यामुळे खुप आवडली.......>>+१
आवडली. शेवट ट्विस्ट देऊन गोड
आवडली.
शेवट ट्विस्ट देऊन गोड केलात. छान .
मला अशा पॉझीटिव्ह शेवट
मला अशा पॉझीटिव्ह शेवट असलेल्या कथा फार आवडतात. + ११११११
शेवट वाचताना टचकन पाणी आलं
शेवट वाचताना टचकन पाणी आलं डोळ्यत

आईला कसं ना सगळंच कळतं
मस्त कथा .. आवडली
मस्त कथा .. आवडली
खूप छान
खूप छान
wah,, Chan gosht ahe..
wah,, Chan gosht ahe..
सुंदर आहे कथा. आवडली!
सुंदर आहे कथा. आवडली!
सगळ्यांचे खूप खूप आभार. छान
सगळ्यांचे खूप खूप आभार.
छान हुरूप आला नवीन लिहिण्यासाठी
Pages