वर्हाळ (वर्हाड)
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
6
कोकण संपून मुंबई आली
मुंबई संपून खांदेश आले
मराठवाडयाची सिमा स्पर्शून
वर्हाळ आले..वर्हाळ आले
कापसाच्या बोंडाचे
काळ्याभोर जमिनीचे
रणरणत्या उन्हाचे
पाण्याच्या दुर्भिक्षाचे
खंगलेल्या बळीराजाचे
पावणपणाच्या पाहूणचाराचे
आगळ्या वर्हाळी भाषेचे
उभ्या महाराष्ट्राचे
वर्हाळ आले.. वर्हाळ आले
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
छान!
छान!
धन्यवाद.
धन्यवाद.
मला समजली नाही. थोडी उलगडून
मला समजली नाही. थोडी उलगडून सांग.
पावणपणाच्या पाहूणचाराचे म्हणजे काय?
सई, पावण म्हणजे पुण्यासारखे
सई, पावण म्हणजे पुण्यासारखे चांगले कृत्य. पाहुण्यांचे स्वागत करणे, त्यांना पाहुणचार करणे ह्याला पावणपणाचे लक्षण म्हणतात. विदर्भात पाहुणचार असतोच असतो घरी आलेल्या पाहुण्यांसाठी. ज्या दिवशी ते जातात त्या दिवशी सणासुदीसारखे गोडधोड पदार्थ केले जातात. त्यांना कपडे दिले जातात. स्टेशनवर पण लोक जातात पाहुण्यांना टाटा करायला. हे पुर्वी फार होत हल्ली हा प्रकार कमी झाला आहे. आता पाहुणे आले तरी ते आठ दहा दिवस असे येतच नाही.
अच्छा! म्हणजे पावन, पवित्र या
अच्छा! म्हणजे पावन, पवित्र या अर्थानं म्हणायचंय तुला. ओके, मी ते पावणपणा म्हणजे पाहुणेपणा वगैरे काहीतरी समजले आणि ती द्विरुक्ती वाटली.
मात्र व-हाळ आले ह्या ओळीचा वरच्या ओळींशी काही संदर्भ लागला नाही.
बाकी पाहुणे येणं हा एक मस्त सोहळा असायचा पूर्वी, ह्याच्याशी सहमत.
विदर्भात ड ऐवजी ळ वापरतात.
विदर्भात ड ऐवजी ळ वापरतात. त्यामुळे बरेच जण वर्हाड असे म्हणण्याऐवजी वर्हाळ असेच म्हणतात. मी बोलीभाषेचा तो संदर्भ घेतला आहे.