बिनाका गीतमाला व हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास

Submitted by preetam ranjana on 27 April, 2016 - 06:53

मित्रांनो, बिनाका गीतमालेचे बोट धरून हिंदी चित्रपट संगीताचा अभ्यास मी सुरु केला आहे. तो श्राव्य स्वरुपात तुमच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून हा धागा. आपला अभिप्राय आपले प्रश्न माझा हा अभ्यास आणखी परीपूर्ण करतील असा मला विश्वास आहे. हा अभ्यास केवळ बिनाकाच्या यादीपुरता मर्यादित नसून त्या काळातले चित्रपट व संगीत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे. बिनाका चे मानांकन हे लोकप्रियतेच्या निकषावर झाले. पण आज जर या यादी कडे पुन्हा पाहिले व त्या वर्षातील चित्रपट संगीताचा विचार केला तर तुम्हाला ही यादी आज बदलावी असे वाटते का? याचाही विचार आम्ही केला आहे. त्या बरोबरच जर त्या काळी मराठी बिनाका यादी असली असती तर कोणत्या गाण्यांना त्या वार्षिक यादीत स्थान मिळेल याचाही अभ्यास आम्ही करतो आहोत. चला तर मग आमच्या बरोबर या संगीत सफारीला सुरुवात करू या.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिनाका गीतमाला १९५३ – अनारकली

शंकर जय किशन हे १९५३ चे सर्वात यशस्वी संगीतकार होते पण सर्वोत्कृष्ठ सांगीतिक चित्रपटाचा मान मिळाला तो मात्र सी रामचंद्र यांच्या अनारकली ला … आणि तुम्हाला हे माहित आहे का कि अनारकली व मुगले आझम हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रोडक्शन मध्ये होते … ह्या आणि अश्या रंजक माहिती साठी ऐका

http://www.voisact.work/index.php/2016/01/27/binaka-1953-anarkali/

बिनाका गीतमाला १९५३ – आह, अलिफलैला, दो बिघा जमीन
महेंद्र कपूर यांचे गायक म्हणून पदार्पण १९५३ च्या मदमस्त ह्या चित्रपटात झाले. १९५३ च्या राज कपूर यांच्या आह ह्या चित्रपटात मुकेश यांच्यावर एक गाणे चित्रित झाले आहे. तर दो बिघा जमीन ची कथा सलिल चौधरी यांची आहे. या आणि अश्याच रंजक माहिती आणि गाण्यांसाठी ऐका

http://www.voisact.work/index.php/2016/02/03/binaka-1953-2-aaah/

दिनेश, याच धाग्यावर मी नवीन episodes ची माहिती देत जाईन. मुळात हे एक श्राव्य साहित्य आहे. गाण्यांच्या गप्पा मारताना तुम्हाला त्या गाण्यांची छोटी झलक ऐकवायचा विचार आहे. ऐका आणि जरूर प्रतिसाद द्या

संजीव हिंदी गीतमाला ही सुंदर संकलन असलेली website आहे. माझ्या audios मध्ये मी केवळ गाण्यांची यादी देत नाही तर त्या गाण्यांच्या , चित्रपट विषयीच्या , कलाकारांच्या कथा हि सांगतो. ऐका व अभिप्राय कळवा

बिनाका गीतमाला १९५३ – पतिता , फुटपाथ आणि इतर चित्रपट

लता दिदींनी त्यांच्या कारकिर्दीत दोन नायिकांना आवाज दिला … नसीम बानो आणि सायरा बानो. नसीम बानो हि सायरा बानो यांची आई आहे. १९५३ च्या तीन बत्ती चार रास्ता ह्या चित्रपटासाठी शांताराम बापूंनी एक गाणे रेकॉर्ड व चित्रित केले ज्या गाण्यात ७ कडवी ७ भाषेत आहेत. ७ संगीतकार , ७ गायक आणि ६ कलाकार … एक मोठा प्रयोग. या आणि अश्या रंजक माहिती साठी गाण्यांसाठी ऐका

http://www.voisact.work/index.php/2016/02/10/binaka-1953-3/

खुद्द अमिन सयानी यांनी बिनाका गीतमालेच्या सफरीचे वर्णन करणारा एक कार्यक्रम रेकॉर्ड केला आहे तो ऐकण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=xoIIZp0X_Cs

याचे १० भाग आहेत. माझा एकच ऐकून झाला आहे.

बिनाका गीतमाला १९५५ – क्रमवारी आमची – हिंदी व मराठी गाण्यांची सुद्धा

श्री ४२० हा एक सर्वार्थाने सुंदर असा सांगीतिक चित्रपट. यातील सर्व गाणी आपण आजही गुणगुणतो. आम्ही आमच्या यादीत या चित्रपटाला योग्य स्थान द्यायचा प्रयत्न केला आहे. ऐका आणि सांगा आमच्या क्रमाशी तुम्ही सहमात आहात का ?

http://www.voisact.work/index.php/2016/05/05/binaka-1955-ourlist/

"बिनाका गीतमाला १९५३ – अनारकली" भाग ऐकला.. मजा येतेय ऐकायला, पण का कुणास ठाऊक लहान मुलांच्या गोष्टी ऐकतोय असे सारखे सारखे वाटत होते..(मुलांना टीव्हीवर छान छान गोष्टी लाऊन देत असतो, त्या जरा जास्तच कानावर आल्या असतील कदाचित!)

बिनाका गीतमाला १९५६ – जागते रहो

राज कपूर प्रोडक्शन चा एक आर्थिक विचार बाजूला ठेऊन केलेला अर्थपूर्ण चित्रपट. ह्या चित्रपटासाठी आरके च्या नेहमीच्या टीम ऐवजी काही नवीन कलाकारांनी काम केले. संगीतकार सलिल चौधरी, गीतकार प्रेम धवन या निम्मित्ताने आरके स्टुडीओ मध्ये आले. ‘एक दिन रात्रे’ यामूळ बांगला नाटका वर आधारित या चित्रपटातील गाण्यांच्या जागा अतिशय कल्पकतेने निर्माता दिग्दर्शक जोडीने निवडल्या. हा चित्रपट बांगला भाषेतही करण्यात आला. मुळ चित्रपटातील कोइ ना हे भांगडा गीत व दीदींच्या आवाजातील आओ मोहन प्यारे हे गाणे बांगला चित्रपटात जसेच्या तसे घेण्यात आले. … अश्या आणखी रंजक माहिती साठी ऐका

http://www.voisact.work/index.php/2016/06/08/binaka-1956-1-jagateraho/

संगीतका सफर १९५६ – बसंत बहार आणि सी आई डी

साक्षात भारतरत्न पंडित भीमसेनजी बरोबर गाणे गायचं या गोष्टीचे मन्नाडे यांनाही मोठी भीती होती आणि त्यामुळेच ते चक्क हि संधी टाळत होते. हे शंकर जयकिशन यांचे अजरामर गीत आहे बसंत बहार या चित्रपटातील. याच वर्षी सी आई डी या चित्रपटातून एक नवी नायिका गुरुदत्त यांनी लोकांपुढे आणली, हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ह्या नायिकेचे एक विशेष स्थान आहे … वहिदा रहेमान. गम्मत म्हणजे ह्या नायिकेच्या पहिल्याच चित्रपटात तिने भूमिका केली ते एका खलनयिकेची. … अश्या आणखी रंजक माहिती साठी ऐका

http://www.voisact.work/index.php/2016/06/15/binaka-1956-2-cidbb/

चित्रगीतमाला १९५६ कॅप्सूल – न्यू दिल्ली, परिवार , फंटूश व इतर

काही चित्रपट, गाणी ही अनवट असतात , अवीट गोडीच्या ह्या गाण्यांचा उल्लेख नेहमी होत नसला तरी रसिकांच्या मनात विशेष जागा असते
अश्याच काही खासम खास गाण्यांचा आस्वाद घेऊ या १९५६ चित्रगीतमाला कॅप्सूल मध्ये

http://www.voisact.work/index.php/2016/06/23/cgm-1956-3/

चोरी चोरी हा १९५६ चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट. ह्या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सिहांचा वाटा आहे. हा चित्रपट १९३४ च्या एका इंग्लिश चित्रपटाहून प्रेरित होता. राजकपूर यांचा गाणारा आवाज मुकेश यांच्या ऐवजी या चित्रपटात मन्नाडे यांना संधी देण्यात आली. ह्या संधीचे मन्नादा यांनी सोने केले. या आणि अश्याच रंजक कथा व गाण्यासाठी ऐका हा भाग

http://www.voisact.work/index.php/2016/06/29/cgm-1956-4-chorichori/

चित्रगीतमाला १९५६ : बिनाका क्रमवारी

१९५६ च्या बिनाका क्रमवारीत सर्वाधिक गाणी होती मदन मोहन व ओ पी नय्यर यांची. या क्रमवारीत लता दीदींची ६, रफिसाहेबांची ४ तर किशोर, मन्नाडे व गीता दत्त यांची प्रत्येकी ३ गाणी होती. तलत मेहेमूद यांचे एकही गाणे या यादीत झळकले नाही. ऐकू या बिनाका १९५६ ची हि झलक

http://www.voisact.work/index.php/2016/07/06/cgm-1956-5-binaka/

चित्रगीतमाला १९५६ – यादी आमची

१९५६ च्या आमच्या चित्रगीतमाला क्रमवारीत आम्ही १६ गाण्यांना स्थान दिले आहे. यात तब्बल १० गाणी शंकर जयकिशन यांची आहेत. चोरी चोरी आणि बिजू बावरा ह्या चित्रपटांचे सांगीतिक महत्व वादातीत आहे. शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी पहिले फिल्मफेअर चोरीचोरी या चित्रपटासाठी मिळाले. ऐकू यात २०१६ मधील १९५६ च्या चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेवरून बांधलेली आमची क्रमवारी

http://www.voisact.work/index.php/2016/07/13/cgm-1956-ourlist/

मित्रांनो पुढील इपिसोड हे चित्रगीतमाला - आमचा बिनाका व चित्रपट संगीताचा प्रवास ह्या धाग्यावर आहेत