Submitted by निनाद on 30 November, 2015 - 18:25
व्हॉट्सअॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे.
या समुहामुळे,
- सायकलप्रेमी एकत्र आणणे,
- सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
- दुरुस्तीबद्दल मदत करणे
- आणि प्रोत्साहन देणे
असे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे.
तसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल.
तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे.
समुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया विपुमध्ये पाठवावेत.
हे क्रमांक नोंदवल्यानंतर डिलिट केले जातील.
हा समुह फक्त सायकल या विषयासाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी.
आपला
(सायकलवाला)
निनाद
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योजना मस्त आहे
योजना मस्त आहे
मुंबईसाठी सुद्धा का?
मुंबईसाठी सुद्धा का?
वेल, माझ्यामते हो. धागाकर्ते
वेल, माझ्यामते हो.
धागाकर्ते काय ते सांगतीलच.
कुठेही असाल तरी चालेल...
कुठेही असाल तरी चालेल...
सर्व प्रतिसादकांचे
सर्व प्रतिसादकांचे आभार!
ग्रुपवर स्वागत आहे!
हा ग्रुप फक्त सायकल आणि सायकल संबंधित विषयाला वाहिलेला आहे.
एकमेकांना प्रोत्साहन,
सायकल विषयक मदत,
भेटी,
स्पर्धा माहिती,
सायकल खरेदी माहिती,
दुरुस्ती,
फिटनेस, आरोग्य,
सायकलिंग साठी लागणारा आहार, आपले अनुभव सांगणे आणि
प्रश्नाचे निराकरण
यासाठी हा ग्रुप आहे.
कदाचित यात अजूनही अधिक विषय येत जातील.
येथे फक्त विषयाशी संबंधित पोस्ट याव्यात ही माफक अपेक्षा.
विनोद, फॉर्वर्डस चालतील पण ते ही सायकल संबंधित असावेत.
छान आहे योजना. मलाही सायकल
छान आहे योजना. मलाही सायकल सुरू करायची आहे. म्हणजे तशी अधुन मधुन सायकलस्वारी करते पण रेग्युलर काही नाहीय आणि १-२ किलोमिटरपुढे अजुन कधी गेल्लेही नाही. इथ्ल्या लोकांची शतके वाचुन भितीयुक्त आदर वाटतो. मला रहदारीच्या रस्त्यावर सायकल घेऊन जायची अजिबात हिंमत नाही, कॉलनीतल्या दोन फुट रैज असलेल्या रस्त्यावरुन सायकल चढवताना माझी दमछाक होते.
साधनाताई, सकाळी सकाळी फिरायला
साधनाताई, सकाळी सकाळी फिरायला जाताना सायकल वापरुन बघ. नक्कीच प्रगती होईल.
अरे वा ! मस्तच
अरे वा ! मस्तच
थोडी का असेना - पण रोज चालवत
थोडी का असेना - पण रोज चालवत राहणे महत्त्वाचे आहे.
पायचाकी वरून भ्रमण वगैरे अशा
पायचाकी वरून भ्रमण वगैरे अशा काही योजना आहेत का ?
सुस्वागतम ज्यांनी मला व्यनि
सुस्वागतम
ज्यांनी मला व्यनि ने क्रमांक पाठवले आहेत त्यांना सामील करून घेतले आहे.
हा ग्रुप फक्त सायकल आणि सायकल संबंधित विषयाला वाहिलेला आहे.
एकमेकांना प्रोत्साहन,
सायकल विषयक मदत,
भेटी,
स्पर्धा माहिती,
सायकल खरेदी माहिती,
दुरुस्ती,
फिटनेस, आरोग्य,
सायकलिंग साठी लागणारा आहार,
आपले अनुभव सांगणे आणि
प्रश्नाचे निराकरण
यासाठी हा ग्रुप आहे.
कदाचित यात अजूनही अधिक विषय येत जातील.
येथे फक्त विषयाशी संबंधित पोस्ट याव्यात ही माफक अपेक्षा.यामुळे काही वेळा अनेक दिवस ग्रुप शांत असु शकतो.
विनोद, फॉर्वर्डस चालतील पण ते ही सायकल संबंधित असावेत.
सर्वांचे परत एकदा स्वागत आहे.
चालवत रहा!
कपोचे पायचाकी वरून भ्रमण
कपोचे पायचाकी वरून भ्रमण वगैरे अशा काही योजना होत असतात.
त्यातल्या काही पुण्यातील उत्साही सदस्यांनी पुर्ण केल्या आहेत. अगदी सकाळी निघून दहा पर्यंत परत आले आहेत.
म्हणजे रविवार हाताशी...
मस्त कल्पना. महिन्यातुन एकदा
मस्त कल्पना. महिन्यातुन एकदा trip अशि सुरवात करु शकतो
फिटनेस साठी सायकल घेण्याचा
फिटनेस साठी सायकल घेण्याचा विचार आहे, पण कोणती घ्यावी कळत नाहीये.
माबोवरचे सायकल माहिती संदर्भात असलेले धागे वाचले, पण तरी एवढा खर्च करून हायफाय सायकल घ्यावी का हा संभ्रमच आहे. खर्चाचेही एकवेळ ठीक आहे, पण माझ्या उंची आणि वजनाला कोणती सायकल योग्य असेल याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन कोणी करू शकेल का पुण्यात ?
दुकानदार यथातथाच माहिती सांगतात, आणि तसेही त्यांना महाग सायकली विकण्यातच जास्त रस असतो.
पुर्वीसारखी हिरो किंवा हर्क्युलस (साधी पण नविन) घ्यावी का असे वाटत आहे.
अॅड्मिनना विनंती, सायकलिंगचा
अॅड्मिनना विनंती, सायकलिंगचा वेगळा विभाग करावा. जेणेकरुन सायकलविषयीचे सर्व धागे एका छताखाली येतील.
महेश, शक्य झाल्यास
महेश, शक्य झाल्यास मित्रांपैकी कुणाच्या कडच्या सायकली चालवुन बघुन मगच निर्णय घे.
नुकतीच माझ्या एका मित्राने स्वतःला हर्क्युलस नेहेमीची सायकल घेतली, जेव्हा की त्याच्याच मुलाकरता एमटीबी घेतली. दोन्हींमधे किंमतित जबरि फरक, साधी सायकल काहितरि साडेतिन हजार पर्यंत मिळालि तर मुलाची सायकल पंधरा हजार.
नुसताच व्यायाम करायचा /भाजी आणायची वगैरे करता पहिली दणकट सायकल घेणेच योग्य.
पण एक मन असेही की आपण तरि शौक केव्हा करावे? तर जरुर रेसिंग/रोडबाईक वा एमटीबी वा हायब्रीडचा विचार करा, अगदी सहा हजारापासुन मॉडेल्स आहेत. पण मग "शौक" हा शौकासारखाच करा, अन खरा शौक, "आळसात" वाया जात नाही.
नविन प्रकारच्या गिअरवाल्या वगैरे सायकलिंना सीट हँडल वगैरे अॅडजेस्ट करता येते आपल्या उंची प्रमाणे. ति काळजी नको.
पण विकत घेण्या आधी कुणाच्या चालवुन बघा...
महेश - सायकल कुठली घ्यायची हे
महेश - सायकल कुठली घ्यायची हे वापर किती आहे त्यावर अवलंबून आहे. फक्त पुण्यातील पुण्यात फिरणे होणार असेल तर साधी सिंगल गियर सुद्धा चालू शकेल,पण जर राईड्स करण्याच्या विचार असेल तर मग स्पेसिफीक सायकल घ्यावी.
मला, हेम किंवा केदार ला विचारलेत विपूत तरी चालेल, नक्की शंकानिरसन करू,