फुल्ल क्रिम दुध - २ लिटर (मी टोन्ड गोकुळ किंवा म्हशीचे दुध वापरते)
साखर - १ वाटी / चवीनुसार
सुका मेवा - काजु, बदाम (थोडे भरड वाटुन), चारोळी, मनुके.
देवकी यांनी विचारल्यामुळे बासुंदीची पाकृ देत आहे.
बासुंदीची पाककृती अगदी सोपी आहे फक्त दोनच स्टेप पण वेळ मात्र खुप लागतो, घाईगडबडीचे हे काम नाही. एका बाजुचा गॅस २-३ तासांसाठी बिझी, त्यामुळे जर जास्त स्वयंपाक असेल तर मी आदल्या रात्रीच बासुंदी बनवुन ठेवते. दुसर्या दिवशी बासुंदी अजुन घट्ट होते.
तर, एका जाड बुडाच्या पातेल्यात्/टोपात दुध तापवत ठेवावे. भांडे थोडे मोठेच असु द्या म्हणजे दुधाला उकळायला चांगली जागा मिळेल.
पहिली उकळी येईपर्यंत गॅसची आच मोठी असु दे नंतर मात्र पुर्णवेळ मंद आचेवर दुध तापवत ठेवायचे आहे.
दर १०-१५ मिनीटांनी दुध मोठ्या पळीने / चमच्याने हलवत रहावे व पातेल्याला चिकटलेली साय काढुन परत दुधात एकत्र करत रहा.
दुध पातेल्याला खाली लागु नये तसेच ओतु जाऊ नये म्हणुन आई बशी, प्लेट किंवा वाटी दुधात टाकुन ठेवायची पण मी मात्र ज्या चमच्याचे दुध फिरवते तोच चमचा पातेल्यात उभा ठेवते. (तरीही या चमचा, बशीवर अवलंबुन न राहता दुध अधुनमधुन फिरवत रहावे नाहीतर दुध पातेल्याला लागतोच )
दुधाचे प्रमाण निम्म्यावर आले की दुधाला गुलाबी छटा येण्यास सुरवात होते. अजुन थोडे आटले की त्यात साखर आणि सुका मेवा घालुन साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा.
या स्टेपनंतर २० ते २५ मिनिटांत मस्त घट्टसर , गुलाबी बासुंदी तयार होते.
२ लिटर दुधाची साधारण पाऊण लिटर बासुंदी तयार होते. (घट्टपणा आपापल्या इच्छेनुसार. आमच्याकडे आम्ही बासुंदी पीत नाही तर चमच्याने खातो )
शनिवारी रात्री लेकीने बासुंदीची मागणी केली तेव्हा बनविली होती. रात्री ९.३० ला २ लिटर दुध तापत ठेवले तेव्हा रात्री १२.३० ला बासुंदी तयार झाली. दरम्यान स्वयंपाक बनवुन, जेवुन झाले, घरातील सगळे झोपले पण
त्यातच थोडा मावा घालुन कुल्फीच्या साच्यात तयार मिश्रण ओतले, रविवारी दुपारी मस्त गारेगार मावा कुल्फीपण खायला मिळाली
काल केली बासुंदी तिचे हे फोटो.
एकच पण महत्वाची टीप.
दुध सतत ढवळत रहा जर करपले तर काही केले तरी दुधाचा करपलेला वास, चव जात नाही.
वाह..छान रेसिपी. माझे पप्पा
वाह..छान रेसिपी.
माझे पप्पा फार काही पदार्थ करु शकत नाहीत पण बासुंदी आवडीने आणि सुंदर बनवतात. आई पण छान बासुंदी बनवते. माझ्या आजीला (आईची आई) गोड पदार्थांपैकी फक्त बासुंदी आवडायची त्यामुळे ती येणार असेल तेव्हा आईने बासुंदी केली नाही असं कधी झालं नाही.
मला चांगली बासुंदी करता येते पण इतका वेळ दयायची तयारी नसते किंवा अचानक बासुंदी खायची असते तेव्हा वाडीची बासुंदी बेस्ट!
मी बासुंदी करताना गॅस मिडीयम
मी बासुंदी करताना गॅस मिडीयम वर ठेवतो. गॅस मोठा ठेवला तर करपण्याची भीती असते किंवा खूप कमी ठेवला तर बासुंदी तुपट होते.
मस्त. करुन बघायला पाहिजे
मस्त. करुन बघायला पाहिजे एकदा. फोटोची वाट बघते
पुण्याच्या प्रसिद्ध बादशाहीत गर्रम वर सायीचा तवंग असलेले असलेले मसाला दूध बासुंदी म्हणून खायला दिल्याने बाकी पदार्थ घरगुती चवीचे असूनही ते ठिकाण मनातून साफ उतरले.
बासुंदी चमच्याने खाता येईल अशी घट्ट हवी. निवलेली किंवा थंड करुनच चांगली लागते ( गरमागरम पुरीसोबत )
दुधावर/ चहावरची साय अजिबात आवडत नाही पण मलईदार बासुंदी, रबडी, मिष्टी दोई खूप आवडतात.
आमच्याकडे आम्ही बासुंदी पीत
आमच्याकडे आम्ही बासुंदी पीत नाही तर चमच्याने खातो>>> आम्हीपण
त्यामध्ये असलेल्या सायीमुळे फारशी आवडत नाही. >>> पण साय काढली तर बासुंदीत उरलं काय
रच्याकाने, राईस कुकर आणि सोलर कुकरमधी बासुंदी मस्त होते असे ऐकले आहे.
मला अन आता पोरीलाही आवडत
मला अन आता पोरीलाही आवडत नाही म्हणून मी करत नाही. पण आता घरच्यांसाठी बिचा-यांना करीन म्हणते.
व्वा ! बासुंदी म्हणजे
व्वा ! बासुंदी म्हणजे स्वर्गसुख माझ्यासाठी.
मी, माझे बाबा आणि आता माझा मुलगा असा बासुंदीप्रेमींचा पिढीजात वारसा आहे घरात.
मला तर गरम, थंड, पुरीसोबत कश्शीही बासुंदी आवडते, प्रचंड आवडते. माझ्यासाठी हे पक्वान्न नं. १. अहाहा, आठवणीनेच जीव जळतोय आता.
मी सुद्धा बासुंदी तयार झाली की ब्लेंडरमधून फिरवते, साय मिक्स होण्यासाठी, त्यामुळे ती आणखीनच दाट होते.
आणि हो दूध जाड बुडाच्या पातेल्यात उकळवायला ठेवण्याआधी त्या पातेल्याला साजूक लोणकढी तुपाचा अगदी हलकासा थर लावायचा की खाली किंवा भांड्याच्या कडेला करपत नाही, म्हणजे सारखे ढवळायला लागत नाही. तु पाचा वास वगैरे अजिबात येत नाही नंतर.
आता पाडव्याची वाट बघतेय बासुंदी करण्यासाठी. मग इथे फोटो टाकेन,
निल्सन मस्त रेसिपी, आम्हाला
निल्सन मस्त रेसिपी, आम्हाला पण खूप आवडते गावी गेल की नेहमी बनवली जाते. मामाकडून रोज २-३ लि. म्हैशीच दूध येत. ते अगोदर तापवून मग फ्रीजमधे थंड करुन जमलेली भाकरी एवढी जाड साय वेगळी काढली जाते. फ्युचुरा कुकरमध्ये ५-६ लि. दूध आटवतो..
हा फोटो
हा बाफ निघाल्यपासून बासुंदी
हा बाफ निघाल्यपासून बासुंदी करायचं मनात होतं. आज जमला बेत फायन्ली. कित्येक वर्षांनी खाल्ली आज बासुंदी! मोठ्या ३.५ क्वार्ट्स च्या हार्ड अनोडाइज्ड पसरट कढईमधे दूध उकळलं . अर्धं आटल्यावर त्यात एक १२ औन्स इव्हअॅपरेटेड मिल्क पण घातलं.
वा मस्त आलाय फ़ोटो. बासुंदी
वा मस्त आलाय फ़ोटो. बासुंदी पूरी आणि बटा टयाची भाजी. सही बेत.
मला तर गरम, थंड, पुरीसोबत
मला तर गरम, थंड, पुरीसोबत कश्शीही बासुंदी आवडते, प्रचंड आवडते.>> आणि नुसती बासुंदी पण.
बासुंदी हा अत्यंत सोपा प्रकार आहे, जर एक लिटरचा करायचा असेल तरच. आता म्हणाल १ लि करून कोणाच्या तोंडाला पुसणार? आम्ही घरात अडीच माणसं, त्यात २ heavy weight. त्यामुळेच मोजकी करून आनंद मानावा लागतो.
आरती, छान ताट. बासुंदी, आमरस,
आरती, छान ताट. बासुंदी, आमरस, पुपो एकाचवेळी बाब्बो
मै, मस्त दिसतेय प्लेट. बासुंदीचा रंगही परफेक्ट.
निल्सन, आम्ही गोड खाऊ,
निल्सन, आम्ही गोड खाऊ, त्यामूळे ताटात कितीही गोड असल तरी कमीच.
मै, मस्त फोटो.
मस्त ! सतत ढवळत राहिलं अगदी
मस्त ! सतत ढवळत राहिलं अगदी पूर्ण गार होईपर्यंत तर साय दिसत/लागत नाही, विरघळून जाते. वेळखाऊ प्रकरण त्यामुळे फारशी करत नाही पण करावीच म्हणते.
मै ! फोटो एक्दम भारी,
मै ! फोटो एक्दम भारी, पर्फेक्ट रन्ग आलाय बासुन्दिला!
मै, मस्त दिसतेय प्लेट.
मै, मस्त दिसतेय प्लेट. बासुंदीचा रंगही परफेक्ट.>>>>>. +१
मै, फोटो मस्त आलाय ताटाचा!!
मै, फोटो मस्त आलाय ताटाचा!! पुर्याही मस्तच दिसत आहेत
बासुंदी किती दाट आहे त्याचा फोटो कसा टाकता येईल ह्याचा विचार करत आहे
थॅन्क्यू सगळ्यांना सशल,
थॅन्क्यू सगळ्यांना सशल, बहुधा वाटी तिरकी वगैरे करून फोटो काढता येईल दाट आहे की नाही ते दाखवायला. पण माझी बासुंदी केव्हाच फस्त झाली असल्याने तू केलीस तर काढून बघ तसा फोटू
ओके, वाटी तिरकी करून फोटो
ओके, वाटी तिरकी करून फोटो काढणे ही आयडीया होऊ शकते. (मी ह्यावर अॅक्ट करण्याचा मुहूर्त शोधून काढते लवकरच :))
आहा.. मैत्रेयी, कसला जळावु
आहा.. मैत्रेयी, कसला जळावु फोटो टाकलास गं... वाटी चटकन उचलुन तोंडाला लावावीशी वाटली.......
मलाही आता पाडव्याला करायलाच हवी.
बासुंदी गाळून
बासुंदी गाळून खाणार्या/पिणार्यांच्या बोटीत मी पण. बासुंदी अजिबात आवडत नाही, गाळून फार्तर अर्धी वाटी. त्यामुळे घरी बासुंदी असेल त्यादिवशी माझ्यासाठी आणि आपल्या त्या ह्यांच्यासाठी आम्रखंड किंवा श्रीखंड आणलं जायचं. नंतर त्यांनी पक्ष बदलला त्यामुळे आता माझ्या एकटीसाठी वेगळा गोडाचा प्रकार असतो.
श्रीरामपूरला बुवा हलवाईंकडची बासुंदी फार्फार भारी असते असं ऐकून आहे.
बासुंदीचा चहा लई भारी होतो हे
बासुंदीचा चहा लई भारी होतो हे नम्रपणे सांगून ठेवतो. चहा गाळावाच लागतो सो बासुंदी गाळणं आपोआपच होतं. मी पण बासुंदी/साय नावड्णार्यांच्या बोटीत
मी पण बासुंदी/साय
मी पण बासुंदी/साय नावड्णार्यांच्या बोटीत >>> ते कळतंच आहे योकु नाहीतर बासुंदीचा वापर चहा करण्यासाठी केला नसतास !! :कुफेहेपा: !!
(No subject)
मै, भारीच! सुंदर ताट.
मै, भारीच! सुंदर ताट.
>>>बासुंदीचा चहा लई भारी होतो
>>>बासुंदीचा चहा लई भारी होतो हे नम्रपणे सांगून ठेवतो.
योकु बासुंदी पेक्षा चहा मध्ये मिल्क्मेड घालुन पी. असा चहा सही लागतो. चहात वेगळी साखर घालावी लागणार नाही बहुतेक.
>>इव्हअॅपरेटेड मिल्क पण
>>इव्हअॅपरेटेड मिल्क पण घातले>> मैत्रेयीने वर लिहिलय ते वाचुन मनात विचार आला की कंडेन्स्ड मिल्क अॅड करु शकतो का? साखर कमी घालावी लागेल आणि लवकर दाट होईल.
अमि, काटकसर कशात करायची आहे?
अमि, काटकसर कशात करायची आहे? साखरेत की वेळेत? कन्डेन्स्ड मिल्कमध्ये गरजेपेक्षा जास्तच साखर असते. आणि खरोखर आटीव चवीची बासुंदी करायची असेल तर कन्डेन्स्डमिल्कचा शॉर्टकट नको
काटकसर दोन्हीत करायची आहे.
काटकसर दोन्हीत करायची आहे. असो. आटीव दुधाचीच ट्राय करण्यात येईल.
घरातल्या मोठ्यांपासून
घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच बासुंदी प्रचंड आवडत असल्याने अनेकदा बासुंदी केली जाते. मला स्वतःला साय तोंडात आलेली अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी कितीही लिटर दूध असले तरी मोठ्या गॅसवर, सतत ढवळून बासुंदी करते. ज्यामुळे साय आणि दूध असे वेगळे न राहता छान दाटसर टेक्श्चर येते. करायला लागणारा वेळ क्वांटिटीवर अवलंबून असतो, ४-५ लिटर साठी साधारण १.५ ते २ तास लागतो. बासुंदी तयार झाली की मग गॅस बंद करून साखर घालायची आणि थंड करून सर्व्ह करायची. बासुंदी ही शांतपणे मन लावून बनवावी लागते. दूध सतत ढवळायचे असल्याने तेव्हा इतर दुसरे कोणतेही काम करू नये, कांदा कापणे बिपणे तर अजिबातच नाही ढवळून दमलात की आराम करण्यासाठी किचनमध्ये खुर्ची ठेवावी
अमि, प्लिज पुर्ण दुधाचीच कर ह
अमि, प्लिज पुर्ण दुधाचीच कर ह बासुंदी. वरच्या सगल्या सुचना पाळ. १ नंबर होइल.
Pages