फुल्ल क्रिम दुध - २ लिटर (मी टोन्ड गोकुळ किंवा म्हशीचे दुध वापरते)
साखर - १ वाटी / चवीनुसार
सुका मेवा - काजु, बदाम (थोडे भरड वाटुन), चारोळी, मनुके.
देवकी यांनी विचारल्यामुळे बासुंदीची पाकृ देत आहे.
बासुंदीची पाककृती अगदी सोपी आहे फक्त दोनच स्टेप पण वेळ मात्र खुप लागतो, घाईगडबडीचे हे काम नाही. एका बाजुचा गॅस २-३ तासांसाठी बिझी, त्यामुळे जर जास्त स्वयंपाक असेल तर मी आदल्या रात्रीच बासुंदी बनवुन ठेवते. दुसर्या दिवशी बासुंदी अजुन घट्ट होते.
तर, एका जाड बुडाच्या पातेल्यात्/टोपात दुध तापवत ठेवावे. भांडे थोडे मोठेच असु द्या म्हणजे दुधाला उकळायला चांगली जागा मिळेल.
पहिली उकळी येईपर्यंत गॅसची आच मोठी असु दे नंतर मात्र पुर्णवेळ मंद आचेवर दुध तापवत ठेवायचे आहे.
दर १०-१५ मिनीटांनी दुध मोठ्या पळीने / चमच्याने हलवत रहावे व पातेल्याला चिकटलेली साय काढुन परत दुधात एकत्र करत रहा.
दुध पातेल्याला खाली लागु नये तसेच ओतु जाऊ नये म्हणुन आई बशी, प्लेट किंवा वाटी दुधात टाकुन ठेवायची पण मी मात्र ज्या चमच्याचे दुध फिरवते तोच चमचा पातेल्यात उभा ठेवते. (तरीही या चमचा, बशीवर अवलंबुन न राहता दुध अधुनमधुन फिरवत रहावे नाहीतर दुध पातेल्याला लागतोच )
दुधाचे प्रमाण निम्म्यावर आले की दुधाला गुलाबी छटा येण्यास सुरवात होते. अजुन थोडे आटले की त्यात साखर आणि सुका मेवा घालुन साखर विरघळेपर्यंत ढवळत रहा.
या स्टेपनंतर २० ते २५ मिनिटांत मस्त घट्टसर , गुलाबी बासुंदी तयार होते.
२ लिटर दुधाची साधारण पाऊण लिटर बासुंदी तयार होते. (घट्टपणा आपापल्या इच्छेनुसार. आमच्याकडे आम्ही बासुंदी पीत नाही तर चमच्याने खातो )
शनिवारी रात्री लेकीने बासुंदीची मागणी केली तेव्हा बनविली होती. रात्री ९.३० ला २ लिटर दुध तापत ठेवले तेव्हा रात्री १२.३० ला बासुंदी तयार झाली. दरम्यान स्वयंपाक बनवुन, जेवुन झाले, घरातील सगळे झोपले पण
त्यातच थोडा मावा घालुन कुल्फीच्या साच्यात तयार मिश्रण ओतले, रविवारी दुपारी मस्त गारेगार मावा कुल्फीपण खायला मिळाली
काल केली बासुंदी तिचे हे फोटो.
एकच पण महत्वाची टीप.
दुध सतत ढवळत रहा जर करपले तर काही केले तरी दुधाचा करपलेला वास, चव जात नाही.
कुणी स्लो कुकरमध्ये केली आहे
कुणी स्लो कुकरमध्ये केली आहे का बासुंदी? मी कधीच बासुंदी बनवली नाही पण सध्या जास्त दूध आणलं गेलंय तर करू का नको मोडमध्ये आहे.
Pages