१. आतून व्यवस्थित पिवळ्या असलेल्या (कमी)आंबट(जास्त)गोड कैर्या - २ मोठे
२. उकडलेली अंडी - ४
३. कच्च्या पपईचा जाड कीस - दोन वाट्या
४. फिश सॉस - दीड चमचा
५. ग्रीन चिली सॉस - अर्धा लहान चमचा
६ .बारीक चिरलेली कांद्याची पात - अर्धी वाटी
७. भाजलेले तीळ - एक चमचा
८. भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाड कूट - चार चमचे
९. साखर - चवीपुरती
१. आंब्याचे / कैरीचे चौकोनी तुकडे करावे किंवा जाडसर कीस करावा.
२. उकडलेल्या अंड्यांचे मोठे तुकडे करावे.
३. एका भांड्यात फिश सॉस, ग्रीन चिली सॉस, भाजलेले तीळ, दाण्याचं कूट, साखर एकत्र करावे.
४. या मिश्रणात उकडलेल्या अंड्याचे काप, कच्च्या पपईचा कीस आणि आंब्याचे तुकडे / आंब्याची कीस मिसळावे.
५. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घालावी.
६. सॅलड तयार.
१. फिश सॉस आवडत नसेल तर दही, लिंबू, मिरपूड, मीठ वापरू शकता. फिश सॉसमध्ये मीठ असल्यानं वेगळं मीठ घालायची गरज नाही.
२. आंबा फार गोड असल्यास वरून लिंबू पिळावं.
३. पपईचा कीस काळा पडू नये म्हणून त्यावर लिंबू पिळावं.
अय्या मी एक्झॅक्टली हेच पपईचा
अय्या मी एक्झॅक्टली हेच पपईचा पसारा या नावाने खाल्ले होते. शिवापूरहून रामपूरकडे जायच्या वाटेवर एक फाटा लागतो तिथे एक हॉटेल आहे तिथे मिळते.
मस्त. इथल्या कोरियन
मस्त. इथल्या कोरियन व्हिएतनामीज रेस्टॉरंटमध्ये अंड्याऐवजी सॉटेड चिकनचे छोटे क्यूब्स घालून हे सॅलड थंड करून देतात. ते व्हेरिअशनसुद्धा मस्त लागतं.
नाव एकदमच अरसिक वाटले.
नाव एकदमच अरसिक वाटले. म्हणजे, अंड्याबरोबर पपई कशी खाणार.....
कृतीवरून तरी सॉल्लीड वाटतोय.
कृतीवरून तरी सॉल्लीड वाटतोय. करून बघावा लागेल.
मस्तं! पण फोटो?
मस्तं!
पण फोटो?
सॅलड केलं की फोटो काढेन. गेली
सॅलड केलं की फोटो काढेन.
गेली अनेक वर्षं काही माबोकर या पदार्थाला नाकं मुरडत होते, म्हणून आज पाककृती टाकली.
>>गेली अनेक वर्षं काही माबोकर
>>गेली अनेक वर्षं काही माबोकर या पदार्थाला नाकं मुरडत होते, म्हणून आज पाककृती टाकली. <<
तुम्ही स्वतः करून घातली का खायला?
आंब्यासोबत अंडी! हायला भारीच
आंब्यासोबत अंडी! हायला भारीच दिसतंय कॉम्बीनेशन
संपदाचा प्रतिसाद वाचून एकदा
संपदाचा प्रतिसाद वाचून एकदा कॉपर चिमनीत कैरी आणि श्रेडेड चिकनचं आंबट -गोड- हिरव्या मिर्चीच्या तिखटाचं थंड सॅलॅड खाल्लं होतं ते आठवलं.
ओह आंबटगोड कैर्या... आंबा या
ओह आंबटगोड कैर्या... आंबा या शब्दाने दचकवले होते, गोड चव तोंडाला येत मळमळवले होते.. बाकी चिकनमध्ये अश्या प्रकारचे सॅलड चांगले वाटते.. अंड्याचे कधी खाल्ले नाही
ओहह् आठवले, एकदा एका
ओहह् आठवले, एकदा एका मैत्रीणीने अंड्याचे लोणचे म्हणत खिलवले होते. ते हेच किंवा असेच असावे का. मला लगेच, कसे केलेस ग्ग, विचारायची सवय नसल्याने सांगता येणार नाही पण फोटो बघितला तर कल्पना येईल.
हे काँबिनेशन छान वाटतंय.
हे काँबिनेशन छान वाटतंय. दिसायलाही मस्त दिसत असेल.
उष्ण होत नाही का रे?
फोटो कुठाय??
फोटो कुठाय??
सॅलड छानच लागेल पण अंडं
सॅलड छानच लागेल पण अंडं कशाला? असा प्रश्न मनात आला. या फ्लेवर्सबरोबर सी फूडचा एखादा प्रकार जास्त चांगला लागेल बहुतेक.
हीच का ती ऐतिहासिक पाकृ? वा
हीच का ती ऐतिहासिक पाकृ?
वा वा !!! छान
फोटो टाका की.
पाककृती टाकली की लोकं नाकं
पाककृती टाकली की लोकं नाकं मुरडायचे थांबतील अशी अजूनी भाबडी समजूत वेडी आशा वगैरे आहे काय क्सा तुजला?
पुलंनी ही पाकृ वाचली, पाहिली खाल्ली असती तर मटारउसळ आणि शिकरण असं डबल प्रमोशन देऊन 'खा खा, आंबा अंडं पपई सलाड खा' म्हणाले असते.
पाककृती टाकली की लोकं नाकं
पाककृती टाकली की लोकं नाकं मुरडायचे थांबतील अशी अजूनी भाबडी समजूत वेडी आशा वगैरे आहे काय क्सा तुजला? <<<
बाकी क्सा तुला स्वतःच्या जबाबदारीवर करून खा असा एक डिस्क्लेमर लवकरच टाकावा लागणारे काही बिचार्या जीवांसाठी.
<<<गेली अनेक वर्षं काही
<<<गेली अनेक वर्षं काही माबोकर या पदार्थाला नाकं मुरडत होते, म्हणून आज पाककृती टाकली
च्च्च्च, इतकी वर्षं कोणाचं काय ऐकत होतास
इंटरेस्टींग .. इकडे थाय
इंटरेस्टींग ..
इकडे थाय रेस्टॉरन्ट मध्ये पपई चं सॅलॅड मिळतं (सॉम टम ) नावाने तेही सिमीलर असतं .. मस्त झणझणीत असतं आणि त्यात अंडं नसतं .. क्वचित तळलेले सोडे असतात किंवा मग ड्रेसींग मध्ये अॅन्चोवीज् ..
अंडं आणि आंबा, पपई एकत्र करून
अंडं आणि आंबा, पपई एकत्र करून फिश सॉसमध्ये घालून खायची कल्पनाही करवत नाही.
थाय रेस्टॉ.मधलं सॅलड आवडतं पण त्यात अंडं नसतं.
आंबा-अंडं-पपई >>> मला तर
आंबा-अंडं-पपई >>> मला तर अजिबात पसंत नाही असलं उलटं सुलटं काँबिनेशन .
थाय सॅलड्मध्ये हिरवी (कच्ची)
थाय सॅलड्मध्ये हिरवी (कच्ची) पपई नसेल तर ग्रॅनी स्मिथ सफरचंद किसून घालतात. त्याचा मी भारतीय अनुवाद केला आहे.
ग्रॅनी स्मिथ, कोथिंबीर, हिरवी मिरची, दाण्याचे कूट, अर्धा चमचा साखर, थोडंसं लिंबू आणि चाट मसाला. हे सगळं फूड प्रॉसेसर मध्ये घालून फिरवायचं १०-१२ सेकंद. अगदी लगदा नाही करायचा.
बहुचर्चित व बहुनाकमुर्डित
बहुचर्चित व बहुनाकमुर्डित पाकृ आली :). आंबा व पपई व त्यावर लिंबू पिळणे यामुळे इतकी स्ट्राँग चव निर्माण होत असेल की मग अंडी असली नसली तरी फरक पडत नसेल.
बहुचर्चित व बहुनाकमुर्डित
बहुचर्चित व बहुनाकमुर्डित पाकृ आली :). आंबा व पपई व त्यावर लिंबू पिळणे यामुळे इतकी स्ट्राँग चव निर्माण होत असेल की मग अंडी असली नसली तरी फरक पडत नसेल.
>> . आंबा व पपई व त्यावर
>> . आंबा व पपई व त्यावर लिंबू पिळणे यामुळे इतकी स्ट्राँग चव निर्माण होत असेल
असं का वाटतं?
पपई आणि आंबा दोन्हीं कच्चेच वापरायचे आहेत त्यामुळे त्यातल्या "रॉ" नेस ची एज्ज घालावायला/ब्रेक डाऊन करायला लिंबू गरजेचं असेल असं मला वाटतं ..
(ह्याव्यतिरीक्त काही वेगळा संदर्भ असल्यास प्लीज् डिसरिगार्ड ..)
नाही वेगळा काही संदर्भ
नाही वेगळा काही संदर्भ नाही:). मला त्यांच्या आंबट चवीमुळे तसे होईल असे वाटले.
हो, दोन्ही ( कच्ची पपई व आंबा
हो, दोन्ही ( कच्ची पपई व आंबा आणि लिंबू) एकत्र केल्याने आंबटपणा वाढेल पण इतर पदार्थांनीं (मिरची, साखर, तीळ इत्यादी) ती आंबट चव बॅलन्स होईल ..
एवडढ्या सुंदर पाककृतीला इतके
एवडढ्या सुंदर पाककृतीला इतके अरसिक नाव ठेवल्याबद्दल निषेध.
हे म्हणजे चिकन बिर्याणीला "कोंबडीचे तुकडे घालून शिजवलेला मसालेभात" म्हटल्यासारखं आहे.
>> हे सगळं फूड प्रॉसेसर मध्ये
>> हे सगळं फूड प्रॉसेसर मध्ये घालून फिरवायचं १०-१२ सेकंद. अगदी लगदा नाही करायचा.
त्रिशंकू, फूड प्रॉसेसर मध्ये फारच लगदा नाही का होणार??
आंबा-अंडं-पपई, मला तर अजिबात
आंबा-अंडं-पपई, मला तर अजिबात पसंत नाही असलं उलटं सुलटं काँबिनेशन >>>>
मला पण झेपलं नाही हे. खरं तर सॅलड्सच्या बाबतीत मी बरंच काही नविन ट्राय करायला तयार असते. पण हे म्हणजे.......
मी पण नाकमुर्ड्या ग्रुपमधे.
Pages