आंबा-अंडं-पपई सॅलड

Submitted by चिनूक्स on 27 March, 2016 - 01:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. आतून व्यवस्थित पिवळ्या असलेल्या (कमी)आंबट(जास्त)गोड कैर्‍या - २ मोठे
२. उकडलेली अंडी - ४
३. कच्च्या पपईचा जाड कीस - दोन वाट्या
४. फिश सॉस - दीड चमचा
५. ग्रीन चिली सॉस - अर्धा लहान चमचा
६ .बारीक चिरलेली कांद्याची पात - अर्धी वाटी
७. भाजलेले तीळ - एक चमचा
८. भाजलेल्या शेंगदाण्यांचं जाड कूट - चार चमचे
९. साखर - चवीपुरती

क्रमवार पाककृती: 

१. आंब्याचे / कैरीचे चौकोनी तुकडे करावे किंवा जाडसर कीस करावा.

२. उकडलेल्या अंड्यांचे मोठे तुकडे करावे.

३. एका भांड्यात फिश सॉस, ग्रीन चिली सॉस, भाजलेले तीळ, दाण्याचं कूट, साखर एकत्र करावे.

४. या मिश्रणात उकडलेल्या अंड्याचे काप, कच्च्या पपईचा कीस आणि आंब्याचे तुकडे / आंब्याची कीस मिसळावे.

५. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घालावी.

६. सॅलड तयार.

वाढणी/प्रमाण: 
दोन माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. फिश सॉस आवडत नसेल तर दही, लिंबू, मिरपूड, मीठ वापरू शकता. फिश सॉसमध्ये मीठ असल्यानं वेगळं मीठ घालायची गरज नाही.

२. आंबा फार गोड असल्यास वरून लिंबू पिळावं.

३. पपईचा कीस काळा पडू नये म्हणून त्यावर लिंबू पिळावं.

माहितीचा स्रोत: 
बंगळुरूला एका हॉटेलात हा पदार्थ खाल्ला होता. तिथल्या शेफने दिलेली ही कृती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्सा: करून बघणार .... अजून अशा काही सॅलडच्या पा.कृ. असतील तर डकव इथे ........ Happy
ट्राय करून बघण्यात येतील ............ Happy

आंबा-अंडं-पपई तिन्ही वेगवेगळे खायला आवडतात पण हे असं सॅलड करून अजिबात खाल्ले जाणार नाही. अंडं आणि फिश सॉस न घालता एकवेळ केले जाइल.

सशल,

>> त्रिशंकू, फूड प्रॉसेसर मध्ये फारच लगदा नाही का होणार??

ग्रॅनी स्मिथ कडक/क्रिस्प असली तर लगदा होत नाही फूड प्रॉसेसरमध्ये.
तशी शंका वाटत असेल तर किसणीने किसले किंवा सुरीने तुकडे केलेत तरी चालेल.
माझ्या आळशीपणामुळे मी फूड प्रॉसेसर वापरतो.

याच्या थाय व्हेजआवृत्तीत टोफू आणि काजू (दोन्ही फ्राय करून) पण घातलेले बघितले आहेत.

Pages