मारी चोको शेल्स

Submitted by शुभांगी. on 25 March, 2016 - 03:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मारी बिस्कीटाचा पुडा
तयार ब्लॅक कॉफी एक कप(कॉफी पावडर, साखर, पाणी घालुन उकळुन गार केलेली दुध विरहित कॉफी)
ड्रिंकिंग चॉकलेट/ बिटर चॉकलेट्+व्हॉईट चॉकलेट एकत्र करुन/कोकोपावडर्+फ्रेश क्रीम एकत्र फेटुन एक वाटीभर

क्रमवार पाककृती: 

प्रत्येक बिस्किट कॉफित बुडवुन एका प्लेटमधे एकावर एक ठेवा.
मेल्ट केलेले चॉकलेट्/ड्रिंकिंग चॉकलेट ब्रशने या बिस्किटांच्या रोल्/सिलिंडरवर अलगद लावा. साधारण पाऊण इंचाचा थर या बिस्कीटांवर बसला पाहिजेत.
नंतर फ्रीजमधे हा रोल ठेवुन साधारण ४ तासाने घट्ट झाल्यावर आडवा करुन तिरके स्लाईसेस कापा.
कॉफी/चहा बरोबर गट्टम करा.

1723aed6-abfe-4b12-9219-d09d0b63257d.jpg

वाढणी/प्रमाण: 
तुम्ही खाल तसं
अधिक टिपा: 

फ्रीज मधे सेट होण्यासाठी लागणारा वेळ पाककृतीत धरलेला नाहिये.
आवडत असल्यास कॉफी मधे बुडवल्यावर दोन बिस्किटांच्या मधे फिलिन्ग भरु शकता. पण असेही चांगलेच लागतात

माहितीचा स्रोत: 
मित्र ललित, ज्याच्याकडे असे वेगवेगळे प्रकार नेहमीच होतात
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुकू, जबरी आहे पाककृती आणि कित्ती सोपी. Happy

किशोर तुला मारी बिस्किटं आवडत नसतील तर तु दुसरी वापर. पण डिप केल्यावर लगेच काढावी लागतील. कारण बाकी बिस्किटं मारी च्या तुलनेत लगेच मऊ पडतात.

किशोर तुला मारी बिस्किटं आवडत नसतील तर तु दुसरी वापर. पण डिप केल्यावर लगेच काढावी लागतील. कारण बाकी बिस्किटं मारी च्या तुलनेत लगेच मऊ पडतात.>>>

हो हा पर्याय चांगलाय! Happy

अगदीच कसा रे तु 'हा' किशोर हाहा>>>

हस हस!! माझ्या गेल्या ४-६ पिढ्यात कुणी आचारी नाही ना झाले! म्हणूनच मी 'हा' नाही तर 'ह' च्या बारखडीत कुठेही बसलो असतो! Wink

देखणी डिश असते ही एकदम,
आमच्याकडे आईसक्रीमसोबत फेवरिट

IMG-20160326-WA0004.jpg

Pages