Submitted by शुभांगी. on 25 March, 2016 - 03:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मारी बिस्कीटाचा पुडा
तयार ब्लॅक कॉफी एक कप(कॉफी पावडर, साखर, पाणी घालुन उकळुन गार केलेली दुध विरहित कॉफी)
ड्रिंकिंग चॉकलेट/ बिटर चॉकलेट्+व्हॉईट चॉकलेट एकत्र करुन/कोकोपावडर्+फ्रेश क्रीम एकत्र फेटुन एक वाटीभर
क्रमवार पाककृती:
प्रत्येक बिस्किट कॉफित बुडवुन एका प्लेटमधे एकावर एक ठेवा.
मेल्ट केलेले चॉकलेट्/ड्रिंकिंग चॉकलेट ब्रशने या बिस्किटांच्या रोल्/सिलिंडरवर अलगद लावा. साधारण पाऊण इंचाचा थर या बिस्कीटांवर बसला पाहिजेत.
नंतर फ्रीजमधे हा रोल ठेवुन साधारण ४ तासाने घट्ट झाल्यावर आडवा करुन तिरके स्लाईसेस कापा.
कॉफी/चहा बरोबर गट्टम करा.
वाढणी/प्रमाण:
तुम्ही खाल तसं
अधिक टिपा:
फ्रीज मधे सेट होण्यासाठी लागणारा वेळ पाककृतीत धरलेला नाहिये.
आवडत असल्यास कॉफी मधे बुडवल्यावर दोन बिस्किटांच्या मधे फिलिन्ग भरु शकता. पण असेही चांगलेच लागतात
माहितीचा स्रोत:
मित्र ललित, ज्याच्याकडे असे वेगवेगळे प्रकार नेहमीच होतात
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ड्रिन्किक चोको येवजि हर्श्ले
ड्रिन्किक चोको येवजि हर्श्ले सिरप चालेल का? >>> + १०
घरी पडलयं सिरप .
Pages