खादाड बडबडगीते
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
12
एक होत्या आजीबाई त्यांना
एक होत्या आजीबाई
त्यांना स्वयंपाकाची घाई
भाजी केली मेथीची
खीर केली रव्याची
कढी केली ताकाची
उसळ केली मटकीची
मटकीला आले मोड्चं-मोडं
आजीचा स्वयंपाक फारच गोडं
एक होती ईडली ती खुप खुप
एक होती ईडली
ती खुप खुप चिडली
धावत धावत आली
सांबारात बुडाली
सांबार होते गरम गरम
ईडली झाली नरम नरम
चमचा आला खुशीत
जाऊन बसला बशीत
चमच्याने पाहिले इकडे तिकडे
ईडलीचे केले तुकडे तुकडे
ईडली झाली होती मस्त
आम्ही मुलांनी केली फस्त
वडे-घारगे, केशरी भात,
वडे-घारगे, केशरी भात, भाज्या
खिरी गोड लाडु, भजी वा करंज्या
तसे तुप ताजे पुरी वा गव्हाची
मुलां हौस वाटे अश्या भोजनाची
हे श्लोकाच्या चालीवर म्हणावे.
मिरची कैरी कोथिंबीर आलं त्या
मिरची कैरी कोथिंबीर आलं
त्या चौघांचं भांडण झालं
पण कशावरून
एवढ्याश्या खोबर्याच्या तुकड्यावरून
आई आली पदर खोचून
एकेकाला काढलं ठेचून
पाट्यावर वाटली चटणी
चटणीने भरली बशी
पण मीठ म्हणालं,
माझ्याशिवाय चव येणार कशी?
सगळेच मस्त
सगळेच मस्त
सगळे मस्त
सगळे मस्त
अरुण कुमार गोरे खातो कच्ची
अरुण कुमार गोरे
खातो कच्ची बोरे
सो सो सुटले वारे
जमली सारी पोरे
अरुण मला दे रे,
अरुण मला दे रे (हे अॅक्टिंग सकट बरं का !)
मी नाही देत जा रे
टिपू टिपू छू रे
सोडुन पळाला बोरे !
(No subject)
पराग, वरची खादाड बडबडगीते तू
पराग, वरची खादाड बडबडगीते तू लिहिली आहेस का? मस्त आहेत.
छान ... नवीन अॅडिशन्स ! गजा:
छान ... नवीन अॅडिशन्स !
गजा: हो लेकीच्या मदतीने.
पीके, मस्त बडबडगीते
पीके, मस्त बडबडगीते
सगळीच बडबडगीते मस्त.
सगळीच बडबडगीते मस्त.