मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
<< अभिरामला नोकरी नाही अजुन
<< अभिरामला नोकरी नाही अजुन वाटण्या नाही झाल्या, परिक्षा दिली की नाही पत्ता नाही, अभ्यास करताना दिसत नाही. >> हिंदी सिनेमातले हिरो कधीं हातांत पुस्तक घेणत नाय. बघूंचां तर आपलां गाणीं, नाच आणि अचरटपणा, तेंव्हा नाय हो प्रश्न पडणां ? आमच्या कोकणातल्या सिरीयलीतच कसां खुपतां ह्यां !!
<< मग हा वेगळा कसा राहणार? >> नार्वेकरांचां एकुलतां एक चेडू आसा; लगीन केल्यार झक मारत देतलेच त्येकां आपल्या घरांत रवांक !!
<< बाकी अभिराम आणि देविका ची लग्नाची घाई पाहून मस्त करमणूक होते. आज एव्हढे जीव टाकताहेत. उद्या लग्न झालं की काही वर्षांनी जीव खातील एकमेकांचा > कायय म्हणा, नाय बोलावल्यानी तरी मीं जातलंयच ह्या लग्नाक. अगदीं घसघशीत आहेर घेवन . एवढो जीव टाकतहत एकमेंकावर, पण वस्तुस्थितीचां भानही ठेवतत, आतां अभिरामान खिशातली ती पुडी मात्र जपांक होई; सिरीयलींत आतां कसल्ये कसल्ये पुड्ये सोडतले तां दिसातच !!
आत्ता मला जाम बोअर होतंय हि
आत्ता मला जाम बोअर होतंय हि मालिका बघायला. सास-बहु छाप मालिका केलीये हिची पण आणि म्हणे रात्रीस खेळ चाले. (भंगलो खयचो खेळ )
भगवती खरंच कळलं नव्हतं पूर्ण
भगवती खरंच कळलं नव्हतं पूर्ण वाचेपर्यंत!!
स्वप्ना राज आणि सगळे
ती पुडी मात्र जपांक होई;
ती पुडी मात्र जपांक होई; सिरीयलींत आतां कसल्ये कसल्ये पुड्ये सोडतले तां दिसातच !!>>
भाऊ
भाऊ
अरे, इथली 'चायपे गपशप'
अरे, इथली 'चायपे गपशप' मालिकावाल्यांनी वाचली की क्कॉय? काल चक्क वकिलसाहेब 'उन्हाळ्यात लोक चहा सोडतात पण आम्हा कोकणातल्या लोकांना सवय असते' असं माधवला सांगत होते. चांगला टळटळीत उजेड असताना तिथे गेलेले दत्ता आणि माधव निघेस्तोवर रात्र झाली? 'रात्रीस खेळ चाले' हे नाव सार्थक करताहेत. माझी आजी एक म्हण वापरायची त्याची आठवण झाली 'दिवस गेला रेटारेटी आणि चांदण्याने केर लोटी' म्हणजे दिवसा काही करायचं नाही आणि रात्र झाली की सुरुवात करायची.
काल दत्ताने वळून बघितल्यावर वाटलं की ह्यांना पण छायाच दिसली का काय - आधी आर्चिस, मग अभिराम आणि मग हे, इजा बिजा तिजा. पण त्याला गुरव दिसला. नक्की गुरवच होता ना तो? कारण चकवा लागल्यावर दत्ताने 'त्याने इथे आणलं' असं काहीतरी म्हटलं. कोणाबद्दल म्हणत होता काय माहित. अभिराम पण बावळटच आहे. छाया दिसल्यावर आर्चिसला घरी फोन करुन ती तिथे आहे का विचारायचं ना लगेच. घरी येईपर्यंत थांबला.
अभिराम पण बावळटच आहे. छाया
अभिराम पण बावळटच आहे. छाया दिसल्यावर आर्चिसला घरी फोन करुन ती तिथे आहे का विचारायचं ना लगेच. घरी येईपर्यंत थांबला. >>> एक्दम बरोबर !!
निलिमाच्या नशिबात काही सुखाने
निलिमाच्या नशिबात काही सुखाने खरवस खाणं लिहिलेलं नाही. सरिताने मात्र जमिनीचा विषय तिच्याकडे काढण्यात घाई केली. निदान तो खरवस पचेपर्यंत तरी थांबायचं. निलिमाने 'मी जास्त गोड खात नाही' म्हटल्यावर सरिता तिला 'चल झूटी' म्हणून थापट मारते की काय असं वाटलं क्षणभर. माई दोघींना 'आता जावा-जावा बहिणीसारख्या रहा' म्हणतात. ह्यांना स्वतःला जाऊ नव्हती काय?
लग्नानंतर अभिराम आणि देविका कुठे वेगळे रहाणार आहेत कोणी सांगता का जरा? ह्या बाबाला कोणीतरी परिस्थितीची जाणीव करून द्या रे. बहुतेक त्याने 'कयामत से कयामत तक' पाहिलाय आणि आपण आणि देविका आमिर आणि जुहीसारखे 'एकटो आसा पण दु:खी नसा. मनात आणलंय तर काय पण करतलो. बस एक तुजी साथ हवी माका' असं म्हणत मांगराच्या जमिनीतून फिरणार असं वाटतंय त्याला.
माई स्वतःच्या मरणाविषयी बोलते
माई स्वतःच्या मरणाविषयी बोलते तेव्हा एकही जण असं बोलू नको असं तिला म्हणत नाही. काल अभिराम पण गप्प बसला. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग म्हणतात ते असं.
माईंना निलिमाच्या हातची खीर मिळेस्तोवर कावळे दहा वेळा पिल्लं काढतील. पांडू आणि नाथा चंद्रसूर्यासारखे झालेत, एक उगवला की दुसरा मावळतो (जय पुलं!). वकिल कागदपत्रं माझ्याकडे नाहीत म्हणतोय. मग खंय गेली ती?
बाकी नाथा आणि आण्णा ह्यांनी शेवंताचा खून केलाय अशी शंका मला कधीची आहे. एकट्या माणसाला दिवसाढवळ्या एव्हढ्या उंच झाडावर टांगून घेऊन आत्महत्या करता येईल?
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः १.
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं सिरियल संपताना दिली नाहीत तर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता ह्यांच्या डोक्याची शकलं होऊन त्यांच्याच पायावर लोळण घेऊ लागतील.
(No subject)
अजुन एक - बॅगेत चिखल कोणी
अजुन एक - बॅगेत चिखल कोणी भरला
स्वप्ना_राज, त्यांच्या
स्वप्ना_राज, त्यांच्या डोक्याची शकलं होतील की नाही माहित नाही पण आपल्या मेंदुचा भुगा होणार हे नक्की
मी नताशा धन्यवाद! अॅड
मी नताशा धन्यवाद! अॅड केलंय.
या धाग्याक पूर इलो. कदीपण
या धाग्याक पूर इलो. कदीपण भरतलो. आता दुसरो धागो (http://www.maayboli.com/node/58113) वापराचो हाssssss !
चार कमी दोन हजार....
चार कमी दोन हजार....
मित धन्स
मित धन्स
अभिराम पण बावळटच आहे. छाया
अभिराम पण बावळटच आहे. छाया दिसल्यावर
आर्चिसला घरी फोन करुन ती तिथे आहे का
विचारायचं ना लगेच. घरी येईपर्यंत थांबला. >>> त्याला इतरवेळीही लग्नाशिवाय काही सुचत नाही आणि देविका सोबत असताना त्याला फोन वगैरे कशाच सुचेल ?
मालिकेविषयी पुढील चर्चा ,
मालिकेविषयी पुढील चर्चा , टोमणे, स्तुती आणि बरच काही आता पुढील धाग्यावर
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
२०००
२०००
खंप्लीट!!
खंप्लीट!!
अग्दी २००० पूर्ण करूनच सोडलंत
अग्दी २००० पूर्ण करूनच सोडलंत कि वो..
Pages