रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाव आठवत नाही. आणी जुन्या मायबोली वरचे त्यान्चे सन्दर्भ पण गायब दिसतात, आता बघीतले होते.

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/80992.html?1195446455 नव्या मायबोलीत त्यानी काही दिलेले नाहीये.

पूर्वी आणी त्यातल्या त्यात विधवा स्त्रीयाना स्वयम्पाक घरात येऊ देत नसत. त्यातुन दत्ती जाम अन्धश्रद्धा बाळगणारी त्यामुळे ती छायाला आत येऊ देत नाही >> +१
आणि कामं करत नाही म्हणून वर परत दत्तीची तणतण. Uhoh

दोघी मस्त भांडत होत्या.
ठोशा कधी कधी इमॅचुअर वागते.
बाकी देवदर्शनाला चांगले पहाटे सकाळी निघावे तर नाही. अंधार्‍या रात्री चालले कार दाम्टुन. भुतांसारखे ह्यांचे रात्रीस काम चाले आहे वाटतं.
मिसिंग पांडु.

<< अग मालिकेच नावच रात्रीस खेळ चाले आहे ना....>> म्हणान देवदर्शनय म्हंणजे काय खेळ वाटता की काय त्येंका ? अशान जर देव कोपले, तर भुतां परवडलीं म्हणाची पाळी येत नाईकांवर !! Wink

भुतंही कोपतात आणि देवही. नाईकांना इकडे आड तर तिकडे विहीर झालीय. पण ही म्हण पण त्यांच्या जिवाशी खेळ आहे, कारण पाणीच चालत नाही त्यांना... त्यांनी आता मंगळावर जावे वस्तीस.

<< त्यांनी आता मंगळावर जावे वस्तीस.>> मीं सागतंय, मंगळच उलट बसलो असतलो त्येंच्या मानगुटीवर; सगळ्यांच्ये पत्रिका नेवून दाखवा म्हणांचा तुमच्या बाजूच्याच सिरीयलमधल्या पुनर्वसुच्या बापाशीक !! Wink

माईचा अभिनय आता आवडू लागला आहे. पण ती ठोशा काय सुधरत नाही. स्वत:च्या नवऱ्यासाठी थोडस झुकत घ्यायला काय प्रोब्लेम आहे हिला?

आजच्या रात्रीचो खेळ मात्र अजिबात चुकवूं नकात ! भयानक टेंन्शन, सस्पेन्स, हाणामारी, किंकाळ्यो, नाचानाच... रडारड..... भारत वि. पाकिस्तान !!!

सगळ्यांच्ये पत्रिका नेवून दाखवा म्हणांचा तुमच्या बाजूच्याच सिरीयलमधल्या पुनर्वसुच्या बापाशीक >>>> बाजुची कुठली चांगली अडीच तासाच्या अंतरावर आहे आणि नाईकांना असले काही सल्ले देण म्हणजे त्यांना परत रात्रीच्या वेळी बाहेर पडायला उद्युक्त करण आहे.

>>भयानक टेंन्शन, सस्पेन्स, हाणामारी, किंकाळ्यो, नाचानाच... रडारड..... भारत वि. पाकिस्तान !!!

Proud

>>दत्ता पण हसल्यावर मस्त वाटला एकदम!
>>माई एकदम खर्‍या आईची काळजी दाखवतात. त्यांचे काम खूप आवडतेय!
>>सकाळीं प्रसन्न वातावरणात देवळात जावचां सोडून गाडी घेवन रात्रीच थंय धांवण्याची काय गरज

+१

>>>>प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःची मनमानी करायची

अगदी अगदी. एक सायंटिस्ट असून एव्हढी इल्लॉजिकल?

आण्णांची बायको हुशार. आर्चिस निलीमाचा विक पॉईंट हे बरोबर ओळखले. निलीमा देवळात कशाला गेली मला कळलं नाही. तो अंगारा लावला माधवने कपाळाला तर लगेच पुसून टाकायला लावला ते पण त्याच्या आईसमोर. अचाट आहे ही बाई. त्याने काही अपाय तर होत नाहीये ना. मग राहू देत की. छाया आणि सरिता किती वेळ भांडत होत्या पण ह्यांना वर आवाज बऱ्याच वेळाने ऐकू आला. घराच्या भिंती साऊंडप्रुफ आहेत काय? बाकी छाया कोणाला भेटायला चालली होती? तिच्या हातात काय होतं कोणास ठाऊक.

क्रिकेटच्या खेळात एखादा फलंदाज चांगली फटकेबाजी करत असेल तर त्याचा साथीदार दुय्यम भूमिका घेत त्याला साथ देतो. तसंच या मालिकेत आधी दत्ता दत्ती फटकेबाजी करत असताना आपला अभिनय रोखून धरला होता. हळूहळू आण्णीच्या पण एकेरी दुहेरी धावा सुरू झालेल्या आहेत. त्या मोठमोठे फटके लगावणार नाहीत असं वाटतं. आता अहोबा ने पण आपलं खातं उघडलंय. अभिराम पण चांगला खेळायला लागला, वकीलांनी पण चांगली खेळी केली.

हे सर्व चांगले खेलताहेत हे बघून ठोशा ने आपले फटके राखून ठेवले असावेत. यांचा जोर ओसरला की ठोशा सिक्सरवर सिक्सर मारून सगळी मॅच खिशात घालेल अशी शक्यता वाटते. महान अभिनेत्यांची ही पहिली खूण आहे.

नाईक घराण्यातल्या स्त्रियांसाठी काही उखाणे:

घरात मालती* अन शेवंता दारी
इकडची स्वारी लफडेबाज भारी

* अण्णांच्या बायकोचं नाव माहीत नाही म्हणून मालती वापरलं आहे.

इवला इवला ससा
त्याचे इवलाले पाय
माधव दिसत नाही
भूताला घाबरून खिडकीत पडला काय

आण्णांच्या इस्टेटीचे वाटे झाले सहा
दत्तारामांची बायको देते सगळ्यांना कोपभर चहा

वाट्याला आली जमीन चार एकर
अभिरामराव होतात की नाही बघा डायरेक्ट कलेक्टर

क्रिकेट काय आणि सिरीयल्स काय, आम्हाला टीव्हीसमोर बसायचं पक्कं व्यसन लागलंय आहे , हें हेरलंय या सर्व लबाडानी ! बरे खेळवतहत, नाचवतहत आमकांच आपल्या तालावर !!! Sad

छाया आणि सरिता किती वेळ भांडत होत्या पण ह्यांना वर आवाज बऱ्याच वेळाने ऐकू आला. घराच्या भिंती साऊंडप्रुफ आहेत काय?>>> तां तसा नाय काय. आधी किचेनात भांड भांड भांडल्या. तरी बाकीच्यांची काहीच प्रतिक्रिया नाही म्हटल्यावर भांडत भांडत त्या बाहेर आल्या... मग कुठे तो आवाज माडीवरच्या मंडळींच्या कानावर पोचलान !

आण्णांची बायको हुशार. आर्चिस निलीमाचा विक पॉईंट हे बरोबर ओळखले. >>>> सगळ्या सासवा अश्याच असतंत गो.
उखाणे मस्तच.

Pages