रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या छायाला सरिता म्हणत असते नुसतं बसून खाते पण मग छायाला किचन मधे येऊन काही करायला बंदी केली आहे मग ती कशी काय बनवणार?

<< बाळ्या: अरे मेल्या, ते जी मालवणी बोलतत ना, ताच लय हॉरर आसा ! >>मालवण्यांसाठी दुसरीय एक तितकीच हॉरर गोष्ट -

अहो, पण इतके दांत -ओठ कित्याक ! तुमकां हंय गावतत ना रोज मासे ?
नाय कायैक बोलेनत ते नाईक माशांबद्दल !!!
smile.JPG

त्या छायाला सरिता म्हणत असते नुसतं बसून खाते पण मग छायाला किचन मधे येऊन काही करायला बंदी केली आहे मग ती कशी काय बनवणार? >>
अगं, जेवण नाही बनवायचं. बाकीची काम करायची तिने. भांडी, कपडे, झाडलोट वगैरे.

भाऊकाकानू अगदी अगदी मी पण तोच ईचार करी होतय. निदान बुधवारचा तरी माशांचा काय बनवतत असा दाखवूचा. काय ह्या... श्या.. माशे नायतर मजा नाय बघूक Lol

भाऊकाकानू, आताशा तेराव्या झाला मा आन भर म्हणून माधव आजारी असा.त्याका पचूक नको मासे? हंय इतक्या बारकाईन लोका बघतसत ,साडी खयंच्या रंगाची , माई डावखुरी असा की न्हाय.तेतूर माशे दाखयंले की बघूक नको.
पण तुमचो माशाचो पाँईट एकदम पर्फेक्ट असां हां

.

स्वप्ना पाण्याला आस लागली की कोणीतरी जीव देतं त्यात, बळी जातो कोणाचा तरी.

अरे शिरेलीवाल्यानो इथं काही आता कोणाचा बळी घेऊ नका.

अर्थ नाही कळाला व्यंचि चा>>>>>> तुम्हाला मासे मिळताहेत ना? मग इतके दातओठ का खाता (वैतागता)?
नाही,ते नाईक काही बोलत नाहीत माशांबद्दल.
थोडक्यात कोकणी माणसांचा वीक पाँईट म्हणजे मासे,सगळ्या कोकणी वातावरणात मासे दिसले नाही की ऐकू आले नाही.

हा पण कोकण आणि मासे इतकं घट्ट समीकरण आहेना की आम्ही श्रीरामपूरला राहायचो तेव्हा आम्हाला प्रश्न विचारायचे की तुम्ही कोकणातले असून मासे कसे खात नाही, Lol .

<< अपवाद असात हा.>> माझ्या वडीलांच्या घरीं सगळे पक्के शाकाहारी, आईच्या बाजूचे अट्टल मासेखाऊ ! पण आम्ही सारीं भावंडं या बाबतींत आईच्याच वळणावर ! एक अपवाद तरी मिटवण्याचां काम आमच्या पिढीन केलांच !!! Wink

कोकणात शिमगा सुरु झाला ना?
अजुन पालखी, खेळे, नमन यांचा साधा उल्लेखदेखील नाही केलाय तो.

<< अजुन पालखी, खेळे, नमन यांचा साधा उल्लेखदेखील नाही केलाय तो.>> खात्रीपूर्वक नाहीं सांगत पण मला वाटतं सिंधुदुर्गात याचं एवढं प्रस्थ नसतं, जेवढं रत्नागिरी जिल्ह्यात असतं. चिपळून- रत्नागिरी भागात मात्र अजूनही याला आत्यंतिक महत्व असतं, हें मीं अनुभवलंय.

तुमचो माशाचो पाँईट एकदम पर्फेक्ट असां हां>>> मलाही वाटले हे..कारण जेव्हा बघावं तेव्हा द्त्तीच्या कीचन मध्ये ४ ते ५ जुड्या पालक च असतोय..

क्लिओपात्रा good observation!! छाया गुलाबी साडी घालुन दिसते.पण ती अशी रन्गीबेरन्गी साडी घालत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात पालख्या येतात आणि सिंधुदुर्गमध्ये निशाणे येतात, नारळ आणि पैसे देतात मानाचे त्यांना (देवगड तालुक्यात आमच्या गावात तरी येतात). माहेरी रत्नागिरी जिल्ह्यात ३ वर्षांनी एकदा मान आमच्या घराचा असतो पालखीचा. मी दोन्हीकडे अजूनही होळीच्या दिवसात गेलेली नाहीये Sad .

>>कारण जेव्हा बघावं तेव्हा द्त्तीच्या कीचन मध्ये ४ ते ५ जुड्या पालक च असतोय..>> निरीक्षण भारी आसा हा पण पालक कसले कर्माचे दाखयतत. निदान वालीची भाजी तरी दाखवूची.. नायतर लाल माठाची. Proud

अन्जु Proud

छाया गुलाबी साडी घालुन दिसते.>>> हो फ्लुरोसंट गुलाबी Uhoh

आणि पालकाच्या जुड्या पआमुच्या पंतसचिवांकडेही असतात. देवसाक्रीहुन कोकणात येत असतील!!!

Pages