मी खुप वेळेस बालाजीला दर्शनासाठी गेलो आहे. त्या आठवणीतला एक किस्सा येथे देत आहे. एकदा मी बालाजीचे दर्शन घेऊन श्रीकालहस्तीला गेलो. तिथे मंदिरा बाहेर ओळीने बरीच दुकाने होती. माझ्या पत्नीला भांड्याच्या दुकानात इडली पात्र दिसले. आम्ही किंमत विचारायला दुकानात गेलो. तिथे मला एक जाडजूड बाई ने तेलुगु मिश्रीत हिंदीत आवाज दिला "भैया आप कहा से आ रहे हो" मी तिला पुणे उत्तर दिल. ती नवऱ्याकडे बोट दाखवून समजावून सांगण्याच्या उद्देशाने म्हणाली. "इस आदमी को थोडा समझाओ लोग यहासे शॉपिंग करके सामान पुणे लेके जा रहे है और इसको हैदराबाद इतना नजदीक है फिरभी शॉपिंग को ना बोलता है"
मी माझ्या समदु:खी मित्राकडे पाहून किंचित स्मित केले. तिचा नवरा किडकिडीत शरीरयष्टीचा साधासुधा इसम होता. मी त्याच दु:ख समजू शकलो परंतु मी सुद्धा किती हतबल आहे हे त्याला डोळ्यानेच सांगीतलं. तो सांगत होता, इतना बडा बर्तन शॉपिंग करनेकी क्या जरुरत। हैदराबाद मे भी ये चीझ मिल सकती है। मी त्याला डोळ्यानेच सांगीतले इडली पात्र पुण्यात सुद्धा कमी किमतीत मिळतील. पण या स्त्रियांना कोण सांगणार मोठे ओझे वाहून प्रवास करण्यात काय फायदा. मी हसू दाबून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण हसू आवरणे शक्य झाले नाही. नकळत मी एका माणसाला बोलण्याचे कारण बनलो होतो आणि त्याच्या दु:खाची खपली काढली होती.
पाच मिनिटांची करमणूक अनुभवून मी तेथून काही न घेता सटकलो. पण काहीही न घेण्याची चूक मला परतीच्या प्रवासात महाग पडली. मग तिरूपती ला जाऊन मी पहिले reliance mart ला भेट द्यावी लागली. बहुतेक स्त्रियांना प्रवासाची आठवण किंवा आवड म्हणून खरेदी करायची असते. पुरुषांना वाटत असते लक्ष्मी रोड किंवा बोहरी आळी मध्ये सगळी शॉपिंग होऊ शकते. पुरुषाला शॉपिंगचा कंटाळा आणि स्त्रियांना कुठेही गेलो तरी शॉपिंग करायला आवडत असते. Men will always be men and women will always be women यावर शिक्कामोर्तब झाले.
(No subject)
लेखाबाबत अंशत: असहमत ! मी
लेखाबाबत अंशत: असहमत !
मी पुरुष आहे.
मला आंघोळ आणि शॉपिंगमध्ये कमालीचे साम्य जाणवते.
दोन्हींबाबत आधी मी आळस करतो, पण एकदा करायची ठरवली की उत्साह डबल असतो.
आंघोळीचा एवढा आळस की शनिवार रविवार कुठे लांबवर जायचा प्लान नसेल तर टाळतोच.
पण, एकदा का मी आंघोळीला आत शिरलो, आणि शॉवरखाली उभा राहिलो की आईने खेचूनच बाहेर काढावे लागते.
शॉपिंगचाही आळस एवढा की तेच तेच मोजे रुमाल बनियान, आणि तीच ती जीन्स रोज धुवून वापरेन पण नवीन घ्यायला कंटाळा करेन.
पण, एकदा का मी मॉलमध्ये शिरलो आणि ट्रायलरूमच्या आरश्यासमोर उभा राहिलो की तिथूनही गर्लफ्रेंडने खेचूनच बाहेर काढावे लागते.
Men will always be men and women will always be women याबाबत तर काही माहीत नाही. पण Run mesh will always be Run mesh एवढे नक्की
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
मी पुरुष आहे.>>>>> हे इथे
मी पुरुष आहे.>>>>> हे इथे सान्गावे का लागले?:अओ::फिदी: की स्वतच्या आय डी बाबत शन्का आहे?:दिवा:
आंघोळीचा एवढा आळस की शनिवार
आंघोळीचा एवढा आळस की शनिवार रविवार कुठे लांबवर जायचा प्लान नसेल तर टाळतोच. >>>
तुझा डिओड्रंट/पर्फ्युम/पावडर इ. सुवासिकतेवर जास्त खर्च होत असेल.
रश्मी, क्लीअर केलेले बरे
रश्मी, क्लीअर केलेले बरे असते. जो कोणी ऋन्मेषची पोस्ट पहिल्यांदाच वाचत असेल त्याला कन्फ्युजन नको.
मायबाप, नाही वापरत.
मी आळशी आहे. मेहनत करत नाही. घाम येत नाही. याची गरज पडत नाही.
तसेही माझ्यामते हे सर्व मध्यमवर्गीयांचे चौचले आहेत. जे कष्टकरी घाम गाळतात ते कधी अश्या सुवासिकांचा वापर करत नाहीत.
याऊपर सांगायचे झाल्यास कॉलेजजीवनापासून एक समज आमच्यात प्रचलित होता. तो म्हणजे फूटबॉल क्रिकेट खेळून घामाने भिजलेल्या टीशर्टमधील मुले मुलींना जास्त आवडतात. त्यामुळे तेव्हाही तो वास तसाच राहू द्यायचो.
अय्यय्यो
अय्यय्यो
यक्क्क ऋन्मेष!
यक्क्क ऋन्मेष!
ऋन्मेषच्या पोस्ट्स वाचून
ऋन्मेषच्या पोस्ट्स वाचून शीर्षकात ऋन्मेष विल बी ऋन्मेष असे अॅड केले जावे असे म्हणावेसे वाटले.
हलके घ्या हो. भलते अर्थ नका काढू.
ए घाणेडर्या. म्हणजे फूटबॉल
ए घाणेडर्या.
म्हणजे फूटबॉल क्रिकेट खेळून घामाने भिजलेल्या टीशर्टमधील मुले मुलींना जास्त आवडतात. त्यामुळे तेव्हाही तो वास तसाच राहू द्यायचो.>>>> याआआआआआअक्क्क्क्क्क्क्क्क्क.
काय एकेक शोध लावतोस भलतेच.
बेफ़िकीर +1 सस्मित +1
बेफ़िकीर +1
सस्मित +1
पन्नास गोष्टी घेऊन येतो
पन्नास गोष्टी घेऊन येतो म्हणून सांगायचे आणि दोनच आणायच्या = Men will always be men
दोन गोष्टी घेऊन येते म्हणून सांगायचे आणि पन्नास आणायच्या= women will always be women
हो कबूल, शी अन याक्स.. पण ते
हो कबूल, शी अन याक्स..
पण ते सारे तारुण्याच्या पहिल्या पायरीवरचे गैरसमज होते. आठदहा पायर्या चढल्यावर दूर झाले. हल्ली क्रिकेट फूटबॉल किंवा घाम काढणारा कुठलाही खेळ मी खेळत नाही. जिथे काही न करताही घाम येतो अश्या गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये शिरत नाही. तरीही मुंबईच्या दमट हवेने घरबसल्या घाम काढलाच तर दारंखिडक्या बंद करून घरात उघडा बसतो पण कपडे घामाने ओले होऊ देत नाही, आंघोळीची गरज निर्माण होऊ देत नाही.
तसेही घामाने ओले झालेले अंग नुसते फडक्याने पुसून घेणे पुरेसे असते, त्यावर आणखी आंघोळीचे पाणी शिंपडणे म्हणजे गोर्या मुलीने पावडर लावण्यासारखा अपव्यय आहे.
ऋन्मेष बास की आता. हा धागा
ऋन्मेष बास की आता. हा धागा तुझ्याकडे वळवू नकोस.
अंजू, तसा काही हेतू नव्हता.
अंजू, तसा काही हेतू नव्हता. पण धाग्याची निर्मितीवेळ बघा. त्यावर आलेल्या प्रतिसादांची संख्या आणि वेळ बघा. बराच काळ दुर्लक्षलेला धागा होता तो. ते देखील साहेबांच्या भाषेतील टायटल मारूनही प्रतिसाद यायला मागत नव्हते. म्हणून मायबोलीवरचा एक धागा कर्ता पुरुष म्हणून मी पुढे सरसावलो आणि चार प्रतिसाद येतील हे पाहिले.
क्या बात है, इतका उद्दात्त
क्या बात है, इतका उद्दात्त हेतू होता. मान गये आपको.
>>का मी आंघोळीला आत शिरलो,
>>का मी आंघोळीला आत शिरलो, आणि शॉवरखाली उभा राहिलो की आईने खेचूनच बाहेर काढावे लागते.>>आईने केचूनच? म्हणजे? दाराला कडी लावत नाही का आतून? की आईला भिती वाटते कु ऋने बाथरुमला आतून कडी लावली आणि उघडता नाही आली मग काय करायचं?
टोटली सहमत!!! परवा सिडनीच्या
टोटली सहमत!!! परवा सिडनीच्या एका सोवेनिअर शॉपमध्ये मैत्रीणीसोबत फिरतांना, तिची ऑलरेडी खूप भरलेली जड बॅग तिने माझ्या पाठीवर दिली होती. आणि वेगवेगळ्या गोष्टी उचलून "ही कशी आहे, हे घेऊ का?" वगैरे चालले होते. त्यामुळे, ती जिथे जाईल तिथे मी (बोलावलो) जात होतो. एका ठिकाणी मी पुढे गेलो, म्हटलं बाहेर मोकळ्या जागेत थांबूया, तेवढ्यात तिने मागून आवाज दिला, आणि मी वळतांना एक काचेचा शो-पीस बॅगेचा धक्का लागून फुटला. अक्खं दुकान फिरून स्वत:साठी काहीही न घेतलेल्या मला, त्या फुटलेल्या शो-पीस साठी पैसे मोजावे लागले. बरं, मी तो फुटलेला पीस घेतलाही नसता, पैसे देऊन निघून गेलो असतो, पण मैत्रिणीने मात्र तो स्वतःजवळ ठेवून घेतला, म्हणे "फक्त काच फुटली आहे, आतमधलं सगळं व्यवस्थित आहे." आता बोला
हर्शल
हर्शल
स्त्री घरादाराचा विचार करून
स्त्री घरादाराचा विचार करून वस्तू घेत असते बरेचदा!
त्या ईडली पात्रातल्या ईडल्या काय ती बायको एकटी खाणारे का?
ऋन्मेश होळीच्या धाग्यावर
ऋन्मेश
होळीच्या धाग्यावर पाणी वाचवा आणि शॉवर खाली पाणी वाया जाई पर्यंत उभे राहायचे?
यातल खर काय?
"कॉय या बॉयका जिथ्थे जातील
"कॉय या बॉयका जिथ्थे जातील तिथे शॉप्पिंग करतॉत" अशी लाडीक तक्रार करणार्या पुरुष बांधवांचे हात पाय व वॉलेट वाला खिसा अमेरिकेत/बंगलोरात्/मुंबईत जिथे चांगली गॅजेट्स स्वस्तात मिळतात तिथे 'आता आलोच आहे तर लॅपटॉप्/आयफोन/...... घेऊन जाऊ, इथे चांगला स्वस्त मिळतोय' असे म्हटल्यास मुसक्या आवळून बांधले जातील.
प्रत्येक ठिकाणाचे एक खास वैशिष्ठ्य असते, तश्या स्पेक्स ची वस्तू आपल्या ठिकाणी त्या किमतीत्/त्या क्वालिटीची मिळणार नसते.शिवाय 'काय आणले तिथून' ही आठवण हा भाग आहेच.फक्त नीट अभ्यास करुन नकली नसलेल्या आणि योग्य किमतीतल्या चांगल्या वस्तू घेतल्या म्हणजे झाले.
आता आलोच आहे तर
आता आलोच आहे तर लॅपटॉप्/आयफोन/...... घेऊन जाऊ, इथे चांगला स्वस्त मिळतोय >>> मग त्यात काय चुकले? वस्तू खरेदी करायला लागणारे पाकीट आणि उचलायला लागणारी शक्ती आम्ही आमचीच वापरतो (किंवा हमाली आमच्याच पाकिटातून देतो).
स्त्री घरादाराचा विचार करून वस्तू घेत असते बरेचदा! >>> अहो वस्तू घेऊन द्यायला भागवतांची ना नाहीये. अशी प्रवासात जेंव्हा स्त्री खरेदी करते तेंव्हा बहुतेक वेळा ती वस्तू इतरांसमोर मिरवणे हाच उद्देश असतो. त्यात चुकीचे काहीच नाही. फक्त त्या खरेदीचा त्रास आम्हाला नको एवढीच माफक अपेक्षा आहे भागवतांची.
माधवराव, आपली बरीच वाक्ये
माधवराव,
आपली बरीच वाक्ये 'बायका कमावत नाहीत्/स्वतःच्या पैशाने खरेदी करत नाहीत/प्रवासात सामान उचलत नाहीत' या गृहितकावर आहेत, आणि स्वतः पैसे मोजून खरेदी करणार्या, स्वतः सामान उचलणार्या बर्याच बायका आज अस्तित्वात आहेत.
अर्थात विनोद म्हणून हा धागा त्याच्या जागी ठिक आहे, हा हा हा!
स्त्री घरादाराचा विचार करून
स्त्री घरादाराचा विचार करून वस्तू घेत असते बरेचदा!
त्या ईडली पात्रातल्या ईडल्या काय ती बायको एकटी खाणारे का?>>>>
पहिली ठिणगी पडली धाग्यावर! आता रंगत येईल!!
स्वतः पैसे मोजून खरेदी
स्वतः पैसे मोजून खरेदी करणार्या, स्वतः सामान उचलणार्या बर्याच बायका आज अस्तित्वात आहेत. >>> अगदी नक्की आहेत. एवढेच कशाला, नवर्याचे सामान उचलणार्या, नवरा असूनही खर्च स्वतः करणार्या स्त्रीयाही आहेत. त्यांच्याबद्दल योग्य तो आदर आहेच.
पण तसे न करणार्या स्त्रीयांचाही एक मोठा वर्ग आहेच. त्यांना उद्देशून हा बाफ आहे
जाऊ दे उगाच विनोदाकरता उघडलेल्या बाफवर वाद नकोत.
आपली बरीच वाक्ये 'बायका कमावत
आपली बरीच वाक्ये 'बायका कमावत नाहीत्/स्वतःच्या पैशाने खरेदी करत नाहीत/प्रवासात सामान उचलत नाहीत' या गृहितकावर आहेत, आणि स्वतः पैसे मोजून खरेदी करणार्या, स्वतः सामान उचलणार्या बर्याच बायका आज अस्तित्वात आहेत.>>>>>>>>>>>
यू सेड इट अनू! हे लोक अजूनही त्या पांचट नवरा बायको वाल्या जोक्स वर हसणारे आहेत, लेट इट बी!
जाऊ दे उगाच विनोदाकरता
जाऊ दे उगाच विनोदाकरता उघडलेल्या बाफवर वाद नकोत.>>> बरं!
धन्यवाद
धन्यवाद अन्जू,सायो,harshalc,बेफ़िकीर,aashu29,यूरो,mi_anu,माधव,कृष्णा!!!
लेख लिहुन मला स्त्रियांना दुखावण्याचा हेतू नाहीये.
मला ईडली पात्र घावेच लागणार होते. प्रश्न होता वेळ आणि सोयीचा.
ऋन्मेश होळीच्या धाग्यावर पाणी
ऋन्मेश
होळीच्या धाग्यावर पाणी वाचवा आणि शॉवर खाली पाणी वाया जाई पर्यंत उभे राहायचे?
यातल खर काय?
--
दोन्ही खरे.
शॉवरचा उल्लेख तिथेही आहे.
शोधून न मिळाल्यास सांगतो.
Pages