रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जु. अस कै नै, हिमोग्लोबीन वाढवायच म्हणुन पालक खायला येतील हां भुत रोजरोज.. म्हणजे मग ते पांढरेफट्टक दिसणार नैत.

द्त्तीच्या कीचन मध्ये ४ ते ५ जुड्या पालक च असतोय..बघल्यात भाउकाका, नुसत्या भाज्येवरून कितके गजाली चल्ल्सत ? माशे दाखयतीत तर धागो वाहून जायेत.

<< द्त्तीच्या कीचन मध्ये ४ ते ५ जुड्या पालक च असतोय..बघल्यात भाउकाका, नुसत्या भाज्येवरून कितके गजाली चल्ल्सत ? माशे दाखयतीत तर धागो वाहून जायेत >> खरां तर पालक कोकणातल्या घरांत दिसणां दुर्मिळच. मुळो, चवळीच्ये 'बोके',वाली, असलां काय तरी शोभून दिसात. पण माशे दाखवल्यानीच, तर लेखनाची, दिग्दर्शनाची, अभिनयाची एकय चूक कोण काढूंचो नाय - निदान मालवणी तरी ! सगळां माफ !!! Wink

आर बाबानु, बायानु काय ह्ये? खाव द्या की आमास्नी पाल्क. आलटुन पालटुन करील माझी दत्ती. एक दिस पालकाची पातळ भाजी डाळ-दाणे करुन, दुसर्‍या येळेस सुकी भाजी बेसन पीठ घालुन, तिसर्‍या दिवशी पालक पनीर, मन्ग लसणी-पालक, मन्ग मामीन्च्या पद्धतीने पन्जाबी पाल्क, मन्ग पालकाचा गाजर्+कोबी+ टमाटु घालुन पराठा करील माझी दत्ती:- इती दत्ता अण्णा नाईक

अन जोपत्तुर माझी थोरली वहिनी अभिनय करत नाय, तोपत्तुर नाईकान्च्या घरात मासे बनणार न्हाईत मन्जी न्हाईत. वैनीने अभिनय केला की म्या घरात बान्गड्याचे हुमण, बोम्ब्लाचे सुके, तिसर्‍याचे कालवण, तव्यावरले मासे समद करु, मन्ग या पार्टी झोडाया.Serving food

>>> वैनीने अभिनय केला की म्या घरात बान्गड्याचे हुमण, बोम्ब्लाचे सुके, तिसर्‍याचे कालवण, तव्यावरले मासे समद करु, मन्ग या पार्टी झोडाया.>>> झाला म्हणजे आमका गावलाच समजा.. बगूक म्हणतय मी. Wink
>>पण माशे दाखवल्यानीच, तर लेखनाची, दिग्दर्शनाची, अभिनयाची एकय चूक कोण काढूंचो नाय - निदान मालवणी तरी ! सगळां माफ !!!>> तर तर काय काकानू. अगदी वैनी अभिनय न करताच मुंबयक परतली तरी आम्ही काय्येक बोलूचो नाय. Proud

देवसाक्री कुठेशी आहे?>> मी ते देवसाखरी ऐकत आलेय.

खरां तर पालक कोकणातल्या घरांत दिसणां दुर्मिळच. >> +१ भाऊकाका.
नवरो मुळ्याची भाजी समजून पालक घेवन आलो. Uhoh आता त्याचा काय करायचा ह्यो महान प्रश्न पडलोय. कारण इतक्या वर्षांत पालक बनवायचोच काय खायचो पण संबंध आलो नाय कधी. Happy

बान्गड्याचे हुमण, बोम्ब्लाचे सुके, तिसर्‍याचे कालवण, तव्यावरले मासे समद करु>>>>>>>> अरे देवा ! मालवणीत हुमण नाय म्हणतत गो.हुमण कारवारी/गोवन कोंकणीत म्हणतत. बोंबील, कोकणात कधीपासून मिळूक लागले? तिसर्‍याचा दबदबीत न्हायतर सुक्यां.
Light 1 Light 1
:
Happy wink

निधी, पालकाच्या तिखटामीठाच्या ( कणीक + बेसन )पुर्या कर ठेचलेला लसुण, ओवा टाकुन. बटाट्याच्या उकडलेल्या भाजी बरोबर गट्टम कर.
आटोपते घेते, इथे ओरडा होईल, गल्ली चुकली म्हणून. Happy

भगवती Lol
तुला वेळ असेल तर रेसिपी टाकशील का विपुत?

बोंबील, कोकणात कधीपासून मिळूक लागले? >> मिळतंत हां चांगले किलोवर मिळतंत. Happy

हो

रश्मी लय भारी. देवकी मस्त.

आज माझ्याकडेपण पालक. मी कोबीची सकाळची उरलेली भाजी त्यात थोडा पालक, थोडा मुळा आणि ओटस, नाचणी पिठ, बेसन घालून मुटके किंवा वड्या करणार आहे आत्ता आणि जास्त तेलाची फोडणी देऊन परतणार, याहु.

गो बाय! एका साडीवरून एव्हढ्या पोस्टी? नुस्ती 'रंगीत' साडी म्हणायला हवं होतं मी. बाकी 'पाण्याला आस लागणे' चा अर्थ समजावून दिल्याबद्द्ल सर्वांचे आभार.

ही माई त्या अभिरामला सांगते की छायावर लक्ष ठेव. मग स्वतः घरातच असते ना तर स्वतः लक्ष ठेवावं पोरीवर. आज परत अभिराम बाईकवरून पोचला आणि छाया त्याच ठिकाणी चालत पोचली. हा काही time warp किंवा wormholes चा कोकणी अवतार नाही ना? माशाबा खुलासा करेलच. वर त्यावर कॉन्फरन्स मध्ये पेपरही सादर करेल 'कोकणातलो वर्महोल्स'.

बाकी अभिराम आणि देविका ची लग्नाची घाई पाहून मस्त करमणूक होते. आज एव्हढे जीव टाकताहेत. उद्या लग्न झालं की काही वर्षांनी जीव खातील एकमेकांचा. माधव आणि दत्ता छायाला का घेऊन जात नव्हते सोबत वकिलाकडे?

मला तर आता कोणीतरी मिशन इम्पॉसिबल टाईप्स छायाचा मास्क बनवून वावरतं आहे असा संशय येतोय. Proud सुशल्याच असणार ती. तो पांडू पण आण्णांचा अनौरस मुलगा निघणार असं मला वाटतंय. वेडा असल्याची अ‍ॅक्टींग करत असणार तो. असलेच लोक शेवटी व्हीलन निघतात. Happy

आज एपिसोडमध्ये किमान दोन लोकांनी एकमेकांना 'घरात काय चाललंय ते माहित आहे ना' असं विचारलं. आधी दत्ताने माधवला विचारलं, माई पण अभिरामला 'तुला घरात काय चाललंय ते माहित नसतं' असं म्हणाली आणि मग दत्ता अभिरामला तेच म्हणाला. हे लोक घरातल्या घरात एक पेपर का काढत नाहीत. म्हणजे सगळ्यांना सगळं काही ठाऊक होईल रोजच्या रोज.

मुख्य म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये सरिता आणि निलिमा दिसल्या नाहीत. Happy

एक शंका - आण्णांनी सुशल्या आणि छायाच्या वेळी दोन रन्स घेतल्या नाहीयेत ना? म्हणजे छाया आणि सुशल्याला जुळ्या बहिणी नाहीयेत ना? Happy

रच्याकने, तेरावं झाल्यावर तो आण्णांचा फोटो खोलीत खुर्चीवर का ठेवलाय? आणि आजच्या एपिसोडमध्ये तो दाखवण्याचं काय प्रयोजन होतं?

त्यांना घरात काय चालू आहे ते कळत नाहीये स्वप्ना, तर शिरेलीत काय चालू आहे ते आपल्याला कसं कळणार Wink . तुला भारीच शंका Lol .

भाऊकाका Lol .

अभिरामला नोकरी नाही अजुन वाटण्या नाही झाल्या, परिक्षा दिली की नाही पत्ता नाही, अभ्यास करताना दिसत नाही. मग हा वेगळा कसा राहणार?

स्वप्ना_राज, अभिरामला त्याचच झालय थोडं, माधव आजारी आहे, दत्ता वाटण्यांच्या आणि मुलाच्या काळजीत. पण तू तर बघतेच आहे तरीही तो घरातील इतरही कामे करतो. अर्चिसला ह्या खोलातुन त्या खोलीत जाण्याशिवाय काही जमत नाही. नाथाला घरातील कामे करायला मज्जाव असेल. पांडूला सांगीतले तरी तो ते योग्यपणे करेलच असे नाही. त्या पुर्वाचा जीव तो केवढा, माई थकलेल्या, सरिता सतत कामात, छायाला परवानगी देतील असे वाटत नाही आणि निलीमा काय दिवे लावेल? म्हणुनच ग, नाही जमले भिंतीवर अण्णांचा फोटो लावायला.

मला कधी कधी वाटतं अण्णाच परत येतील, मी जिवंत आहे सांगतील. कारण माधव अभ्यंकर सारख्या नटाला फक्त एका भागासाठीच घेतलं का सिरीयलमध्ये.

किंवा कधी कधी वाटतं त्यांचा गेम केला ठरवून. किंवा असं पण वाटतं त्यांचाच plan असेल काहीतरी. असो मला काहीही वाटतं.

साडी आणि भाजीवरुन इतका वाद? अरेरे, का.. का छळताय असं ठोकळीच्या "आपल्या" माणसांना.. आपलं- परिवाराला!
मागच्या 'का रे दुरावा' च्या एपिसोडमध्ये, केबिनमधून बाहेर येता-येता जयची दाढी चांगली खरखरीत दिसण्या इतपत वाढली त्याला बरं कोण काय बोल्ल नाय! Uhoh

वेडा असल्याची अ‍ॅक्टींग करत असणार तो. असलेच लोक शेवटी व्हीलन निघतात. >> +१. माझा पण सुरुवातीपासून त्याच्यावरच संशय आहे.

Biggrin भगवती, तुला काय सांगायचय ते पार शेवटचं वाक्य वाचेपर्यंत कळेना मला. भारी.

अगो देवकी माका ठाऊक असा गे, पण नाव आठवना म्हणून ठोकुन दिला. पण मालवणी बान्गड खातात ना गो? समदा कोकण आपलोच असा, पार गोव्यासुन अलीबाग पर्यन्त.:खोखो:

Pages