रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कापोचे आणी भाऊ Lol हयसर तुमचीच फटकेबाजी सुरु झाली असा.

स्वप्नाचे उखाणे लय भारी!:हाहा:

त्या सर्वान्च्या अभिनयाचे जाऊ द्या, पण मला हे कुटुम्ब खरेच कुटुम्ब वाटतय.:स्मित:

देऊळ माका आवडलय. देवशेती म्हणजे ज्या जमिनीत/ शेतात देवान्च्या मुर्ती पुरल्यात त्याला देवशेती म्हणतात असे वकीलानी आधीच सान्गीतले होते, कारण ज्याच्या वाट्याला ही जमीन येईल त्याला दर अमावस्या- पौर्णिमेला कोम्बडे बळी द्यावे लागतील, असे वकिलानी सान्गीतले. म्हणून दत्ती पण ती जमीन घ्यायला नको म्हणते, तिला भीती वाटते की त्यान्च्या वाट्याला तीच जमीन येईल.

ओह, म्हणजे मागच्या भागात गुरव आणि वकिल काहितरी पुरत होते ते भविष्यातली देवशेती तयार करत होते वाटते..
जमिनीची किंमत पाडण्यासाठी Sad

कापोचे काकांचा सासु जमातीवर लईच राग दिसतोय. >>> ओ, तसं नाही हो. वाईच वरल्या अंगाचे प्रतिसाद बगा कि.
सासू नसेल तर लाडकी बायको कशी मिळणार ?

मला ते लोक पहाटे गेलेत देवळात असं वाटलं!
बादवे आज भापा सामन्या मुळे मला ही शिरेल नै बघता येणारंय...सो बघेल त्याने अपडेटा हांsssssss!

ओह, म्हणजे मागच्या भागात गुरव आणि वकिल काहितरी पुरत होते ते भविष्यातली देवशेती तयार करत होते वाटते..
जमिनीची किंमत पाडण्यासाठी अरेरे >>>>> आमच्या शेजारी एक मालवणी कुटुंब राहत होते त्यांचे कुणासोबततरी भांडण झाले होते तेव्हा त्या मालवणीबाईने समोरच्याला 'बघ तुझ्या नावाने नारळच फिरवते' असे काहीतरी म्हणालेले आठवतयं मला. तेव्हा बायकांच्या खुसफुसीतुन समजलेले की एखाद्याच्या नावाने त्याचे वाईट चिंतुन नारळ फिरविला तर त्या व्यक्तीची अवस्था खुप वाईट होते. जसा जसा तो नारळ सुकत्/सडत जातो तसा तसा तो माणुसपण Proud पण तेव्हापासुन त्या बाईला जरा टरकुनच होतो आम्ही Proud
जेव्हा कार्यक्रमात हा प्रसंग झाला तेव्हा मला वाटले की वकिलाने अशाच कशासाठी नाईकांच्या कदाचित माधवच्या नावाने तो नारळ पुरला असेल. ती बाईपण तेव्हा पुरते म्हणाली असेल मला फिरविते ऐकायला आला असेल Lol

स्वप्नाराज, उखाणे भारीच.

झीलाक येड लागलय आणी असल कुठतरी देव देवस्की करत. झीलासाठी गाणो..

दिली आरोळी सायन्काळी, दिली आरोळी सायन्काळी
माज काळीज हेलपाटल, माज काळीज हेलपाटल
माज्या काकीला, या ठोकळीला शेवन्तीन झपाटल

ही डोळ वटारुन पाही यातल कळना मजला काही
आली घरातुन मग माई, म्हणली पाण्यातुन धोका हाई
काकाला माज्या, या घराला माज्या, काकाला माज्या या घराला माज्या
कुणी करनी केली बाई, माज्या काकीला, या ठोकळीला शेवन्तीन झपाटल..हा अ अ हा अ अ हा अ अ
Ghost

भगवती तुकाच झपाटल्यानी बहुतेक, आधी जानुने झपाटल्व्तं, आता शेवंताने. किती मनापासून बघतेस आणि डीटेलिंग करतेस. Lol

कापोचेजी, व्यंचि छान.
स्वप्नाजी, उखाणे भारी.
रश्मीजी ,बरां जमलांहा गाणां.
<< माई डावखुर्या आहेत.>> पण आपल्या मुलांत मात्र डाव्या- उजव्यां करणत नाय, ह्यां बरां !! Wink
<< 'बघ तुझ्या नावाने नारळच फिरवते' असे काहीतरी म्हणालेले आठवतयं >> खूप जुनी असतली ही गोष्ट; आतां नारळ खांवक परवडणां नाय, फिरवूंक काय परवाडतलो !! Wink
कोलकत्त्याक पाऊस पडलो म्हणान हंय डोकावलंय; गुरवाक सांगान पाकिस्तानच्या 'ड्रेसींग रूमा'त लिंबू-मिरची टाकूचो इचार होतो. पण हो गुरव तांय काम नीट करीत असो भरवसो नाय वाटलो. असो, जातंय आतां , आपल्या पोरांक खेळताना जरा प्रोत्साहन देवकच होयां ! नाईक कंपनी काय, आसाच रोजची !! Wink

Pages