मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
तो अभिराम मला तरुणपणीचा 'यतीन
तो अभिराम मला तरुणपणीचा 'यतीन कार्येकर' वाटतो. रोखून बघायची लकब सारखी आहे दोघांची.
बरेच दिवस हा धागा वाचून
बरेच दिवस हा धागा वाचून मालिकेबद्दल कमालिची उत्सुकता वाटत होती. काल ३ मिनिटं पाहिली. ठोकळी म्हणजे बर्फाचा थंड गोळाच आहे. माधवला इतकं कापरं भरंलं होतं , मला टेंशन की ह्याला अट्याक वगैरे येतोय की काय. ही शांत, स्थितप्रद्न्य. भगवद् गीता कोळून प्यालेली दिसते.
आपत्कालीन परिस्थिती मधे धैर्य दाखवलं हे चांगलय पण जोडीला थोड्या भावना पण दाखवायच्या ना...
कोकणात चहा देतात हे सांगायला
कोकणात चहा देतात हे सांगायला का लागतंय?
ईतर ठिकाणी देत नाहीत का? पाणी आणि चहा देणे हे बाय डिफॉल्ट् असते. त्यात काय सांगायचे असे घाटावर आणि सर्वत्र म्हणतात.
किती वेळ उकळायचा तो धागा आपलं
किती वेळ उकळायचा तो धागा आपलं चहा?? गाळुन पीउन टा़कुयात आता!!
झी मराठीच्या सगळ्या सिरीअल
झी मराठीच्या सगळ्या सिरीअल मधला चहा हा अविभाज्य भाग आहे.
आठवा जुळून येती, दिल दोस्ती
आजच्या बजेटमध्ये चाय महागलय.
आजच्या बजेटमध्ये चाय महागलय. आता काय कापी प्यायची होय नायकानी? मग अभिरामच्या चायमदी देवीकाची आई काय घालेल? की चायच पाजणार नाय त्येका?:फिदी: मग अभिराम कोणती गाणी गात जाईल सासुरवाडीक?
चाय नही ये मेरा दिल है, देखो देखो पिलावोना..
शायद तेरी शादीका खयाल दिलमे आया है इसिलीये
मम्मीने तेरीमुझे चायपे बुलाया है
<< भाऊ, ला भारी हाहा... खरं
<< भाऊ, ला भारी हाहा... खरं सांगा, हे चित्र सुचले कसे ते >> कापोचेजी, सुचलं कसलं, माझ्या घरांत प्रत्यक्ष घडलं तें तुम्हांला दोस्तीत सांगितलं, इतकंच !!
<< ..... अगदी गरीबाच्याही घरी गेलं की कोपभर चाय समोर ठेवलीच जाते.>> आडगांवात दुधाचो दुष्काळच. तरी पण 'गोड मानून घ्येवा' म्हणत कोरो चाय तरी आणून देतलेच !! अनुभव घेतलहंय ह्येचो.
माझ्या घरांत प्रत्यक्ष घडलं
माझ्या घरांत प्रत्यक्ष घडलं तें तुम्हांला दोस्तीत सांगितलं, इतकंच !! >>>
इतका विश्वास टाकून गौप्यस्फोट केल्याबद्दल एक बक्षीस याच धाग्यावर देईन , थोड्या वेळाने
अंजली-१२, का...का...आमच्या
अंजली-१२, का...का...आमच्या जानुबायला विसरलीस?
निलीमा माधव ला सोडून चहा पीत
निलीमा माधव ला सोडून चहा पीत होति म्हणून त्याला झटका आला.....वकीलानो बराच डाम्बीस निघाला
की...
>>कोकणात चहा देतात हे
>>कोकणात चहा देतात हे सांगायला का लागतंय? ईतर ठिकाणी देत नाहीत का? पाणी आणि चहा देणे हे बाय डिफॉल्ट् असते. त्यात काय सांगायचे असे घाटावर आणि सर्वत्र म्हणतात
तुम्ही आधीच्या पोस्टस वाचल्या नाहीत का? पाहुण्याला पाणी आणि चहा देणं बाय डिफॉल्ट असतं मान्य पण नाईकांच्या घरात घरातलेच लोक किती तरी वेळा चहा पिताना दाखवलेत म्हणून कॉमेन्ट पोस्ट केली इतकंच. घरी आलेल्या पाहुण्याला, त्यातून होणार्या जावयाला, नुस्ता चहा देताना दाखवलं ह्याचं आश्चर्य वाटलं. बिस्किटंसुध्दा न परवड्याइतके नार्वेकर गरीब दिसत नाहीत.
भगवती हो गं बाय विसरलेच
भगवती हो गं बाय विसरलेच जानीच्या घरचे चहाबाज गोखले

रच्याकने चहा माझाही प्रचंड वीकपॉईंट ... सिरीयलीत चा पिताना दिसले की मस्त वाटतं असं वाटतं आपण्ही ढोसावा थोडा
(No subject)
कोकणात कुठे नसेल ते वैशीष्ट
कोकणात कुठे नसेल ते वैशीष्ट माझ्या माहेरी. नो चहा. बाहेरच्यांसाठी चहा. घरच्यांसाठी कॉफी. मी आजी आते यांच्यावर गेलेय. नो चहा, फक्त कॉफी
आई चहा पिणारी असूनही, मी नाही आणि सासरी सर्व चहाबाज.
<< कोकणात कुठे नसेल ते
<< कोकणात कुठे नसेल ते वैशीष्ट माझ्या माहेरी. नो चहा. >> नियम सिद्ध होवंक अपवाद लागताच !
अगदी अगदी भाऊकाका. पण बाबा,
अगदी अगदी भाऊकाका. पण बाबा, काका सर्व नंतर चहाच प्यायला लागले पण आजी, आते नाही. आत्ताच्या पिढीत फक्त मी चहा नाही पित.
आजचा भाग संपला का, आज काय
आजचा भाग संपला का, आज काय झालं.
<< आजचा भाग संपला का, आज काय
<< आजचा भाग संपला का, आज काय झालं.>> एकदांही चहा झाला नाही; एकदां पेज झाली , तिही फक्त माधवाक !!
सही
सही
भाऊ. दत्ती नि छाया कसली
भाऊ.
दत्ती नि छाया कसली कचाकचा भांडत होती... अरे देवा!!!
ठोकळी जरा अतिच करते.. एवढं काय आभाळ कोसळलं अंगारा लावला तर? स्वतःच्या नको लावू पण नवर्याने, मुलाने लावला तर हिची जबरदस्ती का पुसून टाकावा म्हणून..
एकीकडे प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःची मनमानी करायची.
आज हसली बाबा जरा शास्त्रज्ञ !
आज हसली बाबा जरा शास्त्रज्ञ ! दत्ता पण हसल्यावर मस्त वाटला एकदम!
सरीता छायाचे भांडण अगदीच बालिश!
माई एकदम खर्या आईची काळजी दाखवतात. त्यांचे काम खूप आवडतेय!
प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःची मनमानी करायची.>>>>>+१११ निधी
हम्म्म ठोकळीचा तोराच जास्त
हम्म्म ठोकळीचा तोराच जास्त दिसतोय म्हणजे.
तो गणेश मागे गायब झाला तो आला का परत.
दत्ती नि छाया कसली कचाकचा
दत्ती नि छाया कसली कचाकचा भांडत होती... अरे देवा!!!.>>>>>>
त्यातच तर खरी मजा होती
आज वेळच नाही मिळाला बघायला.
आज वेळच नाही मिळाला बघायला. लंच आवरमधे मुलीला शाळेतून पीकप करून हाॅटेलमधुन जेवण आॅर्डर केले, तर पैशाची पर्स गायब. नशीब कारमधे थोडे पैसे ठेवते ते कामाला आले. घरी आल्याआल्या पाकीट शोधले तर किचनमधे होते. असो, तर अगदी पाचच मिनीटे बघीतला तर दत्ती पेज बनवत होती आणि माई माधवला अंगारा लावत होत्या. आणि अर्चीस आणि निलीमा कारमधुन उतरत होते. संध्याकाळी बघते बाकीचा भाग.
छाया रंगीत साडी नेसुन शेतातुन
छाया रंगीत साडी नेसुन शेतातुन भरभर जातांना दिसली. कुठे जात होती कुणास ठाऊक पण निलीमा सांटीफिक पद्धतीने छडा लावून तीचे दुसरे लग्न करून देईल.
माकां एक सांगा, सकाळीं
माकां एक सांगा, सकाळीं प्रसन्न वातावरणात देवळात जावचां सोडून गाडी घेवन रात्रीच थंय धांवण्याची काय गरज ? केवळ वाटेत छायाच्या दिसण्याचो 'सस्पेन्स' निर्माण करूंक ? कीं, गुरवान पेंगत घातलेलां गार्हाणां ऐकांक बरां वाटता म्हणान ? लायनीवर येताहा आतां सिरीयल, तर कशाक असलो खुळेपणा करतत हे ! दत्ती-छायाचां भांडण ह्यांय सिरीयलींत पाणी घालून वाढवण्याच्या प्रकाराची सुरवात नाय ना ! माकां राग नाय येणां, काळजी वाटता; आपली म्हणतंव ना ह्या सिरीयलीक !!!
ते देऊळ कुठलं होतं ? त्यावर
ते देऊळ कुठलं होतं ? त्यावर जोगेश्वरी असं लिहीलेलं होतं.
केळशीजवळ असं एक मंदीर आहे.
पूर्वी आणी त्यातल्या त्यात
पूर्वी आणी त्यातल्या त्यात विधवा स्त्रीयाना स्वयम्पाक घरात येऊ देत नसत. त्यातुन दत्ती जाम अन्धश्रद्धा बाळगणारी त्यामुळे ती छायाला आत येऊ देत नाही आणी छाया पण त्याचा फायदा घेऊन बसुन रहाते. हायला, या ठोकळीच्या. जेव्हा पहावे तेव्हा माधव आजारी असल्याचे सान्गते. पण काल या भान्डत होत्या तर सम्जौता करायचा ना दोघीत. जरा चार शब्द प्रेमाने बोलली असती तर काय गेले असते हिचे. अगदी भौतिक शास्त्राचा रुक्षपणा आहे हिच्यात जरा जीवशास्त्र घ्यायला हवे होते, म्हणजे त्या दोघीन्च्या जीवात जीव आला असता.
काल यान्च्याच गाडीचे लाईटस पेटलेले दिसत होते, बाकी येणारे जाणारे लोक बीना लाईट्सचे फिरत होते. ती छाया कुठे घरन्गळली भूतासारखी त्या देवशेताकडे?
माईन्चा अभिनय उच्च! दत्ता पण छान काम करतोय.
ते कोकणातले प्रसिद्ध काळ
ते कोकणातले प्रसिद्ध काळ भैरवाचे मन्दिर आहे बहुतेक. आणी जुन्या मायबोलीवर वाचल्याचे आठवतेय की ते मन्दिर आपले मायबोलीकर आश्चिक ( आशिष महाबळ) यान्च्या घराण्याच्या मालकीचे आहे. चूक भूल देणे घेणे. त्यानी जर हे कदाचीत वाचले तर कृपया सान्गावे.
कुठलं गाव ?
कुठलं गाव ?
Pages