२०१६ च्या मराठी भाषा दिवसा निमित्त आयोजित उपक्रमांचा भाग म्हणून शब्दवेध नावाचा एक उपक्रम राबवला होता.
http://www.maayboli.com/node/57867
अर्थातच मभादि निमित्त असा उपक्रम चालवण्याला कालावधीची सीमा होती. पण तरीही हा उपक्रम निरंतर चालू रहावा असे वाटल्याने हा धागा काढत आहे. (विशेषतः नवीन / समकालीन) इंग्रजी शब्दास अथवा शब्दसमुहास पर्यायी मराठी शब्द शोधून काढणे हा ह्या धाग्याचा हेतू आहे.
इथून पुढचा भाग तिकडूनच चिकटवला आहे. ज्यायोगे ह्या उपक्रमाची नीट कल्पना येईल.
नमस्कार,
हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.
आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.
तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.
आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा
तर मग होऊ दे कल्पना विस्फोट येऊ देत नवनवीन शब्द मराठी मधे....
माझा प्रयत्न राहील की असे मायबोलीकरांनी सुचवलेले पर्यायी शब्द मी महिन्यातून एकदा तरी इथे मुख्य धाग्यामधे लिहून, धागा अद्ययावत करेन.
मार्च महिना
१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली
२. रिसेट करणे = निरस्त करणे, मूळपदावर आणणे , पुर्वपदावर आणणे
३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते
४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती
५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन , श्रेणीवर्धन
७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री
८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली
९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने
१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल
११. डिस्प्ले पिक्चर = दर्शनचित्र
१२. Strategy व्यवसाय विषयी - धोरण
१३. Strategy युध्द विषयी - व्युहरचना
१४. Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना, उपचार
१५ ग्रेव्ही- रस्सा
१६ डिप - बुडूक / डुबकावणं
१७ पेस्ट - वाटण
१८ मॅरिनेट - मुरमाखवणं
१९ शॅलो फ्राय- तेलावर परतणे
२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ, काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण
२१ detergent - निर्मलक
२२ file( of papers) - धारिका
२३ res. flat - सदनिका
२४ row house जोडघर
२५ कोवर्कर्/कलीग - सहकारी
२६ Mutually exclusive - परस्परवर्ज्य
'अपडेट' साठी अद्ययावत हा शब्द
'अपडेट' साठी अद्ययावत हा शब्द बरोबर आहे का?
मला ज्यासाठी मराठी पर्यायी शब्द हवेत असे इंग्रजी शब्द
१ जी पी एस -
२ रिसेट करणे -
एका धाग्यावर जिज्ञासा यांनी
एका धाग्यावर जिज्ञासा यांनी कॉम्प्युटर शटडाऊन साठी विझवणे हा शब्द वापरल्याचे लिहिले होते. 'बंद करणे' व्यतिरिक्त अजून काही सुचतंय का?
रिसेट करणे - पुनर्प्रस्थापित
रिसेट करणे - पुनर्प्रस्थापित करणे
रिसेट करणे - पूनर्प्रस्थापित
रिसेट करणे - पूनर्प्रस्थापित ?
जी पी एस - वैश्विक
जी पी एस - वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली.
जी पी एस - जगत स्थान प्रणाली
जी पी एस - जगत स्थान प्रणाली
रिसेट करणे - पुसून टाकणे
रिसेट करणे - पुसून टाकणे
रिसेट करणे - पूनर्प्रस्थापित
रिसेट करणे - पूनर्प्रस्थापित ? + १
मित, मलाही हा चपखल वाटत नाहीये.
हे पुनः म्हणजे रि चे भा षांतरच झाले. जरा चौकटी बाहेरचा विचार करूया
जसे सिक्सरला षटकार आणि त्या अनुषंगाने ४ रन ला चौकार हा शब्द योजलाय (म्हणजे मुळात इंग्रजी मधे देखिल सिक्सर सारखा ४ रन ला एकच शब्द नाहीये) तसे नवीनच काही योजता येतंय का / असं काहीतरी सुचतंय का ते बघावं अशी विनंती आहे.
आपापले इंग्रजी शब्द देखिल इथे
आपापले इंग्रजी शब्द देखिल इथे विचारा कृ. ध.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थॅक यू इन अँटीसिपेशन म्हणजे
थॅक यू इन अँटीसिपेशन
म्हणजे मराठीत काय?
थॅक यू इन अँटीसिपेशन - आधीच
थॅक यू इन अँटीसिपेशन - आधीच आभार मानतो /ते
रिसेट करणे - पुसून टाकणे हे
रिसेट करणे - पुसून टाकणे हे ईलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वरील डेटा करता ठीक वाटतंय.
मग आता ह्यांना पण सांगा
Device
Gadget
अपग्रेड साठी यद्ययावत बरोबर
अपग्रेड साठी यद्ययावत बरोबर वाटतोय का ? ह्यासाठी सुचवा:
हार्डवेअर
सॉफ्टवेअर
एप्स
स्क्रीन - मोठ्या आकारा करता
स्क्रीन - मोठ्या आकारा करता पडदा ठीक वाटतो लहान आकारा करता उदा. मोबाईल / घड्याळ यांची स्क्रीन / डिस्प्ले या करता काय शब्द योजता येईल?
थॅक यू इन अँटीसिपेशन <<<
थॅक यू इन अँटीसिपेशन <<< "आगाऊ धन्यवाद" म्हणतात पण तो मला फारसा रुचत नाही (मीही तो वापरतो.)
Device - उपकरण
Device - उपकरण
स्क्रीन - मोठ्या आकारा करता
स्क्रीन - मोठ्या आकारा करता पडदा ठीक वाटतो लहान आकारा करता उदा. मोबाईल / घड्याळ यांची स्क्रीन / डिस्प्ले या करता काय शब्द योजता येईल? <<< पडदा काय वाईट आहे? मग पटल चालेल का?
मग पटल चालेल का? >>>पटलं
मग पटल चालेल का? >>>पटलं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मंजूताई - अपग्रेड -
मंजूताई - अपग्रेड - यद्ययावत' - अद्ययावत चा अर्थ माहीत आहे. अ चं य केल्याने अर्थ काय झाला ते मला नाही कळलं उलगडून सांगणार का ? कृ. ध.
तसेच हे आपणा सर्वांकडून सुचवलेले सगळेच शब्द वर मुख्य धाग्यात वाढवावे का त्याआधी त्याला नजरेखालून घालण्याकरता सुयोग्य अशा माबोकरांना गळ घालावी.
मला भरत मयेकर आणि चिनूक्स अशी नावे सुचताहेत अजून कोणास विनंती करता येईल ते सुचवा. किंवा जाणकार मंडळींनो आपणहूनच पुढे या ! कृ. ध.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अद्ययावतच म्हणायचं होतं ....
अद्ययावतच म्हणायचं होतं ....
जी पी एस - वैश्विक
जी पी एस - वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली.
हे योग्य वाटत आहे
Software = SangaNak PraNali
Software = SangaNak PraNali
पर्यायी मराठी शब्द सुचवताना
पर्यायी मराठी शब्द सुचवताना शक्यतो संस्कृताईज्ड शब्द नकोत. असले तरी सोपे सुटसुटीत असावेत.
अॅपसाठी अनुप्रयोग असा एक शब्द बर्याच टेक्निकल भाषांतरामध्ये वापरला जातो.
जीपीएस इतकेच वापरायचे झाल्यास त्याला मराठी केले जात नाही. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमसाठी मराठी शब्दप्रयोग वापरायला आवडेल.
पर्यायी मराठी शब्द सुचवताना
पर्यायी मराठी शब्द सुचवताना शक्यतो संस्कृताईज्ड शब्द नकोत. असले तरी सोपे सुटसुटीत असावेत. +१![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
संस्कृत ' प्रचूर' सुटसुटीत आहे का
संस्कृतोद्भव.
संस्कृतोद्भव.
१. जी पी एस = वैश्विक
१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली
२. रिसेट करणे = निरस्त करणे
३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते
४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती
५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन
७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री
८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली
९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने
१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल
गोळेकाका आले. आता चिंता नाही.
गोळेकाका आले. आता चिंता नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिसेट करणे - पूर्ववत करणे
रिसेट करणे - पूर्ववत करणे
संस्कृत ' प्रचूर' सुटसुटीत
संस्कृत ' प्रचूर' सुटसुटीत आहे का>> मुद्दामच लिहिलंय.
असले धेडगुजरी शब्द फार भारी मानले जातात आमच्या भाषांतरकार लोकांमध्ये. भले ते कुणाला समजेनात का.
रिसेट करणे - पूर्ववत करणे.
रिसेट करणे - पूर्ववत करणे. निरस्त पेक्षा हा आवडला.
६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन या पेक्षा अद्ययावत करणे हा सोपा आणि जास्त बरोबर वाटतो. अपग्रेडने दर्जा वृद्धी होतेच असं नाही, त्याने फक्त प्रणाली अद्ययावत होते.
Pages