रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येणार येणार वाली >> चांगली असा . धाग्यावर त्या बिचा-या भूताचे काय हाल केले आहेत , ते काय आता समोर यायची हिंमत करणार नाही .

कधी कधी वाटत दत्ता आणि गणेश ची मिलीभगत असावी.. सगळी property मिळावी म्हणून. >> +१ त्यातही दत्ताने गुरवाला पण सामील करुन घेतले असावे. काल त्याने अगदी जीवावर उदार होऊन डायलाॅग फेकून दार उघडलं, त्यावरुन तर जास्तच संशय आला.

ठोकळी मग्रुर आणि शिष्ठ वाटते, अतिआगाऊ.

आकेरी गावातलं घर मेसेज फिरतोय सगळीकडे. फेसबुकवर मी लिहीलं की महानंदा चित्रपटात घाणेकर नव्हते, विक्रम गोखले होते. काशिनाथ घाणेकर बहुतेक नाटकात होते, अजुन एक दोघांनी पण लिहीलंय.

कधी कधी वाटत दत्ता आणि गणेश ची मिलीभगत असावी.. सगळी property मिळावी म्हणून. >> +१

काल दत्ता जातो दार उघडायला आणि गणेशला जाऊ देतो बाहेर त्यावरुन तसंच वाटतंय, पण जनरली शेवटी धक्कादायक दुसरंच असतंना अशा शिरेलीत.

ईथे विं दा करंदिकरांची "भुतावळ" आठवते. नेटवर सापडली आहे, तशीच्या तशी देत आहे.

भुतावळ
किर्र रात्री सुन्न रात्री
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई

स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्ट
दोन पोरे लठ्ठ मठ्ठ

पण प्रत्येक एकादशीस
रताळ्याचा खाते कीस.
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपोआप खोले !

आला आला महासमंध;
त्याची चाल संथ संथ
त्याची उंची दहा फूट
अंगावरती काळा सूट,

डोक्यावरती हँट बीट,
तुम्ही फसाल ! पहा नीट
वळवळणारे गळ्यात काय ?
नागोबाचा लंबा टाय !

किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपोआप खोले !
आले आले थातूमातू ;
खाते सातू जर सातू

नसले घरात तर बसते
नखे खात. रोज रात्री
मांजरावरुन हे येते
जग फिरुन, हे भूत

आहे मुत्रे, तरी त्याला
भितात कुत्रे.
किर्र रानी सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती,
दार त्यांचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !

आले आले अरेतुरे ;
हे भूत काळेबेरे
मध्य रात्री रांगत येते;
दारावरती थाप देते.

जर त्याला घेतले घरात
जीभ काढते तेरा हात.
पण ’कारे’ म्हटले तर,
जाईल सोडून तुमचे घर.

किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी ;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !

आला आला आग्या वेताळ;
त्याच्या डोक्यात असतो जाळ.
कोळसे खातो कराकर;
राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरुन
भुते घेतात स्वैपाक करुन
केसामधून उठतात ज्वाळा,
सगळे न्हावी भितात त्याला.

किर्र रात्री सुन्न रानी;
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?
दार आपो-आप खोले !
आला आला पिंपळावरुन
एक मुंजा संध्या करुन.

त्याची पोथी चालत येते;
हळूच त्याच्या हातात जाते.
रक्तासारखी पाने लाल,
खुणेसाठी असते पाल.

तीच पोथी ऐकण्यासाठी
भुते आली; झाली दाटी
पाल लागली चुकचुक करु,
पोथीवाचन झाले सुरु;

हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड
फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती
दार त्याचे हस्तिदंती.
सर्व आले सर्व आले
दार हसले बंद झाले !

- विंदा करंदीकर

स्वस्ति | 11 March, 2016 - 06:45
मिलीभगत ठीक आहे , पण ठो च्या मळवाटेचे काय ??? <<<<< Biggrin Biggrin

मळवाटेचे नाही हो… मळवटाचे

या सगळ्यात भुताला घरात ये, घरात ये म्हणून आग्रह करतात, काय माणूस हायत कि काय?
नैतर कै? नाना पक्कं डैंबिस दिसतंय. इतकं म्हातारं झालंय तरी बयाला बघून लगेच बाहेर नको, घरात आत ये-आत ये बोलतंय! Sad

हि वाचली नव्हती मी.>> +११
मस्त वातावरण निर्मिती केलि आहे कवितेत.
थांकू मधु-मिलिंद.>> +११

ठो कदाचित रहस्य शोधण्यासाठी मुद्दाम असं करत असेल....तिला अंदाज आला असेल कि इथे काहीतरी शिजतंय .. पण ते नक्की काय हे शोधण्यासाठी ती अजून थोडी वातावरण निर्मिती करत असेल...
दत्ता आणि गुरव चं काहीतरी गुळपीठ आहे हे नक्की...

नाना पक्कं डैंबिस दिसतंय. इतकं म्हातारं झालंय तरी बयाला बघून लगेच बाहेर नको, घरात आत ये-आत ये बोलतंय!>>>११११

सुषमा भूत नसूनही नाईक कुटूंबाला छानच पछाडतेय !!
माझ्या मनातले प्रश्न - अण्णा अजून शेवंताक थंय भेटले नाय कीं काय ? कीं अजून तिकां अण्णा हंयसून निघाले ह्यांच कळांक नाय ? कित्याक अजूनय घरांत घुसूंक बघताहा शेवंता ? Wink

अण्णा अजून शेवंताक थंय भेटले नाय कीं काय ? कीं अजून तिकां अण्णा हंयसून निघाले ह्यांच कळांक नाय ? कित्याक अजूनय घरांत घुसूंक बघताहा शेवंता ?>>>> भेटलेना अण्णा शेवन्ताक. तरीच झुला झुलतोय सुसल्याक बगुन. दुसर्‍या बाईलची का असेना पण पोर घरात आयली याचेच अण्णाक कवतीक असा मा.:फिदी:

अण्णांनी जिवंतपणी सुसल्याला घरात आणले नाही आता गेल्यावर म्रुत्युपत्रात लिहुन ठेवलेय कि तिला घरात घ्या. घाला गोंधळ म्हणाले असतील, मी सुटलो. Happy

मी आत्ताच नवीन प्रोमो बघीतला. त्यात ठो १ व ठोकळी दोघान्चा मुम्बईला जाण्यावरुन वाद होतो. ठो १ ठोकळीला म्हणतो की तू मुम्बईला जाणार नाही. मग ठो१ तिची बॅग घेऊन तरातरा माडीवर जातो , आणी तिची बॅग उघडायला जातो. बॅग उघडल्यावर त्या भैताडाला काय दिसते अण्णा/ शेवन्ता जाणे. कारण तो भयन्कर घाबरतो आणी कोकलत दरवाज्याकडे पळतो. आता हे आज दाखवणार की उद्या माहीत नाय.

काय दाखवलं ते लिहा इथे, मी काल मोठ्या आशेने बघितला भाग, होले होले कथा सरकतेय, फार निराशा झाली माझी.

जीव छोटा असेल तर निदान एक महिना एक कथा असायला हवी, मग इंटरेस्टिंग होईल आणि अजून वेगळ्या स्टोरीज पण बघता येतील.

Lol

बेरीनाना पहिल्या दिवशी क्षीण आवाजात पुटपुटले तेव्हा मला काहीच कळले नाही पण काल मला खणखणीत ऐकू आला त्यांचा आवाज.

आणि ते नाना काय बोलतात ते सबटाईटल्स मध्ये का देत नाहीत. काय बोलतात देव जाणे. काल कोणाला तरी आत ये म्हणत होते एव्हढं कळलं. शेवंता आण्णाचीच ना? का नानांची?>>>>>:हहगलो:

फू बाई फू>>>>>रश्मी Proud Rofl

Pages