Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुदीना
पुदीना संपवण्यासाठी
http://www.thekitchn.com/recipe-mint-cho-28535
कस होईल माहीत नाही.करा आनि कळवा.
हे सगळ एकत्र दळून आणणे शक्य
हे सगळ एकत्र दळून आणणे शक्य आहे का ?>>> मला शक्य नाही. जनरली, ऑल्मोस्ट भाजणीचेच घटक पदार्थ आहेत सो काही अडचण नसावी.
आम्ही "पिल्सबरी" चे
आम्ही "पिल्सबरी" चे मल्टीग्रेन पीठ आणतो. त्यात गव्हाबरोबर ओट्स, बार्ली, मका इ. धान्ये काही प्रमाणात आहेत असं नमूद केलय. चवीला छान लागतायत.
हे पीठ वापरुन, आमच्या स्वयंपाकाच्या नवीन बाई बिनतेलाचे फुलके/ मिनी चपाती करतायत. दुपारी २ च्या दरम्यान जेवताना हे फुलके फार कोरडे होतायत आणि खाताना नंतर नंतर तर पाणी/ताक घ्यावं लागतं घोटभर का होईना. थोडं भाकरी खाताना होतं तसं!
हे फुलके कोरडे होऊ नयेत म्हणून काय करता येईल? मी मावे मध्ये गरम नाही करत फुलके.
बिन तेलाचे असल्याने कोरडे पणा येतो का?
फुलक्यांना तेल तूप न लावता व
फुलक्यांना तेल तूप न लावता व कणकेतही ती भिजवताना नाममात्र तेल घातले असेल तर दुपारी फुलके गार झाल्यावर ते कोरडे कोरडेच लागतात. ते गरम करत असाल तर तसे करताना थोडेसे तूप लावून गरम करता येतील. खानावळींमध्ये तुपाच्या पाण्याचा (तूप कमी व कोमट पाणी जास्त) चमचा फुलका / पोळीवरून फिरवतात असं ऐकलंय पोळी तव्यावरून उतरवली की! स्वत: कधी प्रयोग केलेला नाही.
धन्यवाद. अमूल बटर अथवा थोडे
धन्यवाद.
अमूल बटर अथवा थोडे तूप पण डब्यात नेत जाईन आत्ता.
फुलका उतरवला खाली की थोडे
फुलका उतरवला खाली की थोडे तेल्/तूप लावा हो.. दुपारी चामट होणार नाहीतर. गार फुलक्याला बटर, तेल तूप नाही लावता येणार.
अच्छा! धन्यवाद. सांगतो तसं
अच्छा! धन्यवाद. सांगतो तसं आमच्या बाईंना.
ऑरगॅनिक ब्राऊन शुगर साध्या
ऑरगॅनिक ब्राऊन शुगर साध्या साखरेसारखी खिरीत वापरता येते का? दूध फाटत नाही ना हा मुख्य प्रश्न:) कोणाला काही अनुभव?
Hi Sadhya mi Sydeny madhe
Hi
Sadhya mi Sydeny madhe ahe
Navryala Matakicha dalkanda khup avadto
Pan ithe dal milat nai
Mataki pasun dal kashi banavu?
Konala mahit aslyas sanga
राजसी, नाही फाटत दूध. मी रॉ
राजसी, नाही फाटत दूध. मी रॉ ब्राउन शुगर वापरते आहे गेली बरीच वर्ष. रिफाइन्ड ब्राउन शुगर असेल तर तिचा तब्येतीला तसा पण काही फायदा नाही तेव्हा दूध फाटण्याची रिस्क न घेता साधी जाडी साखर वापरा
रंगासेठ, कणीक दुधात भिजवली तर चामट होत नाहीत पोळ्या/फुलके. अर्ध दूध, अर्ध पाणी असं पण करू शकता.
पुदिन्याची पानं, कोथिंबीर, मीठ आणि भरपूर लिंबाचा रस असं वाटून त्याचे क्युब्स फ्रीझ केले तर रंग, चव सगळं नीट राखलं जातं.
क्यूब ची कल्पना छान आहे.
क्यूब ची कल्पना छान आहे.
प्लिज हेल्प. खोबर्याच्या
प्लिज हेल्प.
खोबर्याच्या वड्या करायला घेतल्या.पण जास्त भाजल्यामुळे कोरडे झाले. त्याचे काय करता येइल?
थोडा दुधाचा हबका मारून जमेल.
थोडा दुधाचा हबका मारून जमेल.
नाचणीचं सत्व नामक प्रकरण घरी
नाचणीचं सत्व नामक प्रकरण घरी आहे ते शक्यतो दीड महिन्यात संपवायचंय. त्यची ताक घालून आंबिल करतो आम्ही पण किती वेळा करणार? पीठ असेल तर कणिक-नाचणी-इतर पीठं घालून लाडू करता आले असते. सत्वाचं काय करता येईल का बल्कमध्ये संपवायला?
सनव, योगायोग बघ. आज एका
सनव,
योगायोग बघ. आज एका मल्लु फ्रेंडने ब्रेफासाठी नाचणीच्या पीठाच्या इडल्या आणल्या होत्या. छान टेस्ट होती. कारण सेम तुझंच.... पॉरिजसाठी आणलेलं पीठ संपत नव्हतं. दही घालुन पीठ ३० मि. भिजवलं आणि इडल्या केल्या. आम्हाला पण खाताना समाधान कि न्युट्रिशिअस ब्रेफा केला.
सत्व मुलायम असल्याने
सत्व मुलायम असल्याने पिठासारखे वापरता येत नाही. रोजच्या चपातीच्या / भाकरीच्या पिठात पावपट मिसळता येईल.
वर सांगितल्या प्रमाणे इडल्या,
वर सांगितल्या प्रमाणे इडल्या, शिवाय त्याच नाचणीच्या सत्वात जरासं ताक + पाणी घालून भिजवायचं त्यात फक्त मीठ आणि लसूण ठेचून लावून त्याची धिरडी खायची गरमा गरम. मस्त लागतात.
नाचणी सत्त्व + गरम दूध + गूळ
नाचणी सत्त्व + गरम दूध + गूळ / साखर.
नाचणी सत्त्व अगोड असेल तर नुसतं सत्त्व कपभर गरम पाणी व कणीभर मीठ असं घालून गंजी म्हणूनही पिऊ शकता.
नाचणीच्या सत्वाची खांडवी छान
नाचणीच्या सत्वाची खांडवी छान होते. माझी आई करत असे.
http://goenchyogazaali.com/raagi-sweets-nachni-wadi/
नाचणीच्या पीठाच्या इडल्या
नाचणीच्या पीठाच्या इडल्या होतात का?
>>नाचणीच्या पीठाच्या इडल्या
>>नाचणीच्या पीठाच्या इडल्या होतात का?>> होतात. जालावर पाकृ आहेत. मी कधी केल्या नाहित.
स्वाती२, सापडल्या. करेन
स्वाती२, सापडल्या. करेन आता.
धन्यवाद!
धन्यवाद सर्वांचे. बर्याच
धन्यवाद सर्वांचे. बर्याच आयडिया मिळाल्या!
स्वाती, नाचणीच्या सत्वाचीच डायरेक्टली खांडवी करायची का? माझ्याकडे रेडीमेड सत्व आहे (बहुधा ग्राहक पंचायतीतून घेतलेलं आईनी).
मी नाचणी सत्व + कणीक असे लाडू
मी नाचणी सत्व + कणीक असे लाडू केले होते. मस्त झाले होते. नाचणी सत्व फ्रीझर मध्ये छान टिकते.
..
..
http://www.amazon.in/Favola-D
http://www.amazon.in/Favola-Designer-Molded-Classic-Italian/dp/B00UOQ32Q...
How to wash this water bottle. The kiddie bottle brush is not long enough to reach the end and tupperware bottle brush is very broad. Becoz it's a glass can't use hot water. Any ideas?
राजसी, झाडूच्या जाड काडीला
राजसी, झाडूच्या जाड काडीला पातळ स्वच्छ फडकं गुंडाळून बांधून आत फिरवता येईल.कडे पर्यंत जाईल. नंतर स्वच्छ पाण्याने खळखळून धुता येईल.
(लोक साबण घालून फेस करुन बाटल्या धुतात. पण हा साबण पूर्ण जायला नंतर भरपूरच पाणी वापरावे लागते. आणि किंचीत साध्या पाण्याचे बुडबुडे जरी राहिले तरी आपल्याला साबण राहिल्याची शंका राहते.)
राजसी , स्क्युअर वगैरे असेल
राजसी , स्क्युअर वगैरे असेल तर बघा . त्याला कपडा गुन्डाळून होउ शकेल काम , बहुतेक .
त्यावेळी आलेला पुदीना काल
त्यावेळी आलेला पुदीना काल संपला.. इथल्या बऱ्याच गोष्टी थोड्या थोड्या करून बघितल्या आणि सगळ्या चांगल्या देखील झाल्या.. थोड़ा पुदीना कुंडीत देखील खोचुन ठेवला आहे..
सनव, तयार सत्व असेल तर त्याची
सनव,
तयार सत्व असेल तर त्याची डायरेक्ट खांडवी करायची.
Pages