२१ डिसेंबर २०१६
खाली डोके वर पाय, शीर्षासन करणे..
पाठीच्या कण्याला हाडच नसल्यासारखे शरीराची उलटी कमान करणे..
हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा चोखणे..
पटापटा श्वास घेत पोटाची पिशवी आतबाहेर करणे..
आत्ताच ही लक्षणे आहेत, तर मोठी होत पतंजली नूडल्स खायला लागेल तेव्हा तर विचारायलाच नको
.
.
२३ डिसेंबर २०१६
प्रत्येक देशाची जशी एक खाद्य संस्कृती असते तशी प्रत्येक मुलाचीही एक असते. एक आमचीही आहे.
अन्न हे फक्त खाण्यासाठी असते आणि ते खाण्यासाठी देवाने एक तोंडच काय ते दिले आहे, या खुळचट कल्पनांवर आमचा जराही विश्वास नाही.
आईसक्रीम आम्हाला नाकानेही खाता येते. केक आमच्या गालालाही छान दिसतो.
सॉसचा वापर बॉडीलोशन म्हणून करता येतो. भाताला हातावर थापत आम्ही भाकर्या भाजतो.
क्रिमची बिस्किटे आमचा जीव की प्राण!
फक्त क्रिम खाल्लेले बिस्किट खपवायला एक गिर्हाईक लागतो
चमच्याचा वापर खाण्यापेक्षा ढवळण्यासाठी करायला जास्त आवडतो. सर्वांना भात वाढायचे काम आम्हीच करतो.
पडलेले अन्न खायचे नसते एवढी अक्कल आम्हाला आली आहे. पण ते अन्न मुद्दाम पाडून खाण्यातली गंमत आम्हाला कळली आहे.
आवडीचे असल्यास आम्ही एका मिनिटात दहा घास खातो. नाहीतर एकेक घास खाण्यासाठी मम्मीपप्पांचा श्वास काढतो.
थोडक्यात आम्ही नुसते जेवणच नाही तर मम्मीपप्पांचा जीवही खातो
पण आम्ही अगदीच काही वाया गेलेलो नाही आहोत.
शेजारच्यांची चपाती मन लाऊन खातो. अगदी घरच्या पराठ्यापेक्षाही आवडीने खातो
.
.
५ जानेवारी २०१६
पापा, मम्मी, आजी, भाऊ, दादा, दीदी, मामा, माऊ, ताई, काका, काकी.....
सर्वांना हाक मारायला शिकल्यानंतर आज फयानली आम्ही स्वत:चे नाव "परी" बोलायला सुरुवात केली
फॅमिली फर्स्ट यालाच बोलत असावेत
.
.
१३ जानेवारी २०१६
बाबड्या बोलायला लागल्यावर त्रास कमी होईल असे वाटले होते. पण ती एकेक शब्दही आम्हाला त्रास द्यायलाच शिकतेय..
आईसक्रीम, बिस्किट, किंवा चॉकलेटसारखा शब्द एकदा का तोंडातून बाहेर निघाला, तर ती वस्तू तिच्या तोंडात जाईपर्यंत तो शब्द निघतच राहतो.
कुठलीही गोष्ट तिला स्वत: करायची असेल तर ‘मा’ किंवा ‘मी’ .. बोल दिया ना! बस्स बोल दिया..मग ते तिलाच करू द्यावे लागते.
‘उभी’ हा एक तिच्या आवडीचा शब्द.
"उभी, उभी" बोलत ती उभी राहिली की मग तुम्ही तिला बसवू शकत नाही. जे काय करायचे ते उभ्यानेच करावे लागते.
‘बाजू बाजू’ म्हटले की तिला रस्ता द्यावाच लागतो,
‘अजून अजून’ म्हटले की तिचे समाधान होईपर्यंत ते करावेच लागते.
सर्वात बेक्कार म्हणजे ‘नाही’ बोलायला शिकलीय.
आणि जे बोलू त्याचा एको निर्माण व्हायलाच पाहिजे या नियमाने आपण दम दिल्यास आपल्याला उलटा दम द्यायला शिकलीय.
थोडक्यात काय, तर आधी फक्त तिला झेलत होतो. आता तिच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द झेलावा लागतोय.
पण या सर्वात ‘ए पापा’ नाहीतर ‘ए पापाय’ बोलत गळ्यात तेवढी गोड पडते, बस्स म्हणूनच आमचे नाते टिकून आहे
.
.
३ फेब्रुवारी २०१६
फिंगर बाऊलचा शोध नक्कीच एखाद्या लहान मुलाने लावला असावा..
आणि नसता लागला आजवर, तर आम्ही नक्कीच लावला असता
कारण आधी आम्ही भात खातो, मग पप्पांचा ग्लास खेचून त्यातले पाणी पितो. आणि नंतर उरलेल्या पाण्यातच हात बुचकळून फिंगर बाऊल फिंगर बाऊल खेळतो.
खेळ ईथेच संपत नाही. त्याच पाण्याने मग आपले तोंडही धुतले जाते. अंगावरचे बनियान वापरून स्वत:च पुसलेही जाते.
ईथवर सारे ठिक असते. पण पुन्हा तेच पाणी पिण्याचा मोह काही आवरत नाही. आणि नेहमीसारखाच पप्पांचा धपाटा खात, रडत, चिडत, हा खेळही तसाच संपतो
.
.
९ फेब्रुवारी २०१६
पप्पा
पप्पाss
ए पप्पाsss
अभीsssssss
संस्कारांची ऐशीतैशी..
पण ऐकायला गोड वाटत असेल तर काय हरकत आहे
.
.
१३ फेब्रुवारी २०१६
दोन वर्षे व्हायच्या आतच आम्ही एक ते वीस आकडे मोजायला शिकलो आहोत..
मराठी तर मराठीत, ईंग्लिश तर ईंग्लिशमध्ये..
एबीसीडी देखील तोंडपाठ झाली आहे.
"W" ला देखील आम्ही आता डब्बू न बोलता डबल्यू च बोलू लागलो आहोत.
आता पुढचा मोर्चा कवितांकडे..
एकंदरीत सर्व काही शिकून बालवाडीत आम्ही नुसत्या मस्त्या करायला जाणार आहोत
.
.
१९ फेब्रुवारी २०१६
Gems च्या गोळ्या पंचवीस वर्षांपूर्वीही फेव्हरेट होत्या..
Gems च्या गोळ्या आजही फेव्हरेट आहेत..
फक्त आता त्या काऊच्या गोळ्या म्हणून ओळखल्या जातात
.
.
२३ फेब्रुवारी २०१६
एवढी वर्षे मुंबईत राहिलो,
पण एक गोष्ट मला परीमुळे समजली..
रिक्षा, टॅक्सी आणि एसी कॅब पेक्षाही,
फास्ट मीटर घोडागाडीचे धावते
.
.
२५ फेब्रुवारी २०१६
हल्ली आमचा अभ्यास खूप जोरात चालू आहे.
येता जाता आपल्याच तंद्रीत एबी सीडी, ईएफ जीएच चालू असते.
रस्त्याने चालताना लेवन टॉवेल, थट्टीन फोट्टीन.. पावले मोजतच आम्ही चालतो.
रात्री झोपेतही एच आय जेके, एलेम एनोपी.. तोंडाचा पट्टा चालूच असतो.
पण परवा तर तिने कहर केला, कसल्याश्या कारणावरून माझ्यावर रागावली, चिडली. ओरडायचे होते तिला माझ्यावर. पण नेमके शब्द सापडत नव्हते. तर तेवढ्याच रागाच्या भरात माझ्यावर बोट रोखत म्हणाली.......... चौदा पंधरा सोळा सतरा
.
.
२८ फेब्रुवारी २०१६
तुम्हारा नाम क्या है बसंती ..
हा अगदीच निरर्थक प्रश्न नाहीये.
बसंती आपले पुर्ण नाव सुद्धा सांगू शकली असती
जसं की "तुझे नाव काय आहे परी"
विचारले की चटकन उत्तर येते..
परी
अभी
नाईक
.
.
१ मार्च २०१६
आज आमचा प्लेस्कूलचा पहिला दिवस !
आज पासून पप्पांचे शाळेतील मस्तीचे रेकॉर्ड तुटायला सुरुवात होणार
फिलिंग नॉस्टेल्जिक ..
.
.
१ मार्च २०१६
संध्याकाळचे स्टेटस
पोपट झाला !
शाळेचा पहिला दिवस, पहिला खाडा ..
सकाळी आम्ही उठलोच नाही
शेवटी मुलगी कोणाची आहे
बापाचा वारसा पुढे चालू
- तुमचा अभिषेक
परीकथा ० , परीकथा १ , परीकथा २ , परीकथा ३ , परीकथा ४ , परीकथा ५
मस्तच
मस्तच
मस्त लिहिलय. आधीचे भाग पण
मस्त लिहिलय. आधीचे भाग पण आवडले. गंमतीचे वारसे चालवण्यासाठी लेकीला शुभेच्छा!
पण डिसेंबर २०१६? टायपो असावा.
चौदा पंधरा सोळा सतरा >>
चौदा पंधरा सोळा सतरा >>


मस्त! तुमची ही परीकथा खुप आवडते मला. वाटच पाहत होते या भागाची.
परीला पाहिलं नसलं तरीही वाचताना एक गोड मुलगी नजरेसमोर येते.
अभि दादा मस्त! वाटच पाहत होतो
अभि दादा मस्त! वाटच पाहत होतो तुझ्या परिकथेची.
मस्तच...
मस्तच...
मस्त रे अभि, मस्त!
मस्त रे अभि, मस्त!
छान लिहिलय, परीकथा
छान लिहिलय, परीकथा आवडली.

संशोधक , नवीनआयडीने प्रतिसाद देण्याची ही माबोवरची पहिलीच वेळ नाही
जरी घरोघरी त्याच परी तरी
जरी घरोघरी त्याच परी
तरी तुझी लिहायची स्टाइल आहे जबरी.
हे पण मस्त आहे.
छान! परी अभि नाईक! यात आईचेही
छान!
परी अभि नाईक!
यात आईचेही नाव घालून म्हणायला शिकवा.
चौदा पंधरा सोळा सतरा...
एकदम भन्नाट!
माबोवर कुणाचा राग आला तर शिव्या द्यायला ट्राय केलं पाहिजे!
सुंदर... लेक मोठी झाल्यावर
सुंदर... लेक मोठी झाल्यावर हे वाचेल, त्यावेळचा तिचा आनंद अमर्याद असेल.
दिनेशदा, एकदम सही! अभिषेक,
दिनेशदा, एकदम सही!
अभिषेक, जपुन ठेव रे बाबा लिखाण नक्की.
चंद्रा. हो डिसेंबर 2016 टायपो
चंद्रा. हो डिसेंबर 2016 टायपो आहे. नंतर सुधारतो. धन्यवाद
निधी, धन्यवाद. आणि हो. मलाही ती कमालीची गोडच वाटते अन्यथा रोज धोपटले असते तिला एवढे छळते आम्हाला
साती, हो नक्कीच. पण सध्या ज्या तालात अन रिदममध्ये परी अभी नाईक येते त्यात छेडछाड नको
बाकी चौदा पंधरा सोळा सतरा आमच्याकडेही फेमस झालेय..
दिनेशदा, मानवमामा, हो. तिच्या त्यावेळच्या आनंदाची कल्पना मला आताही आनंद देऊन जाते. खरे तर लिहितोय माझ्याच आनंदासाठी आणि मलाच असलेल्या लेकीच्या कौतुकापोटी पण नकळत तिच्यासाठीही एक आठवणींचा ठेवा तयार होतोय
खूप मस्तये हे, हा भाग पण आणि
खूप मस्तये हे, हा भाग पण आणि आधीचे सगळेच भाग !!
अरे वा! परी प्ले स्कुलला
अरे वा! परी प्ले स्कुलला जायला लागली का? आता तिच्या शाळेतल्या खोड्या पण दे आम्हाला वाचायला..
चौदा, पंधरा, सोळा, सतरा कमाल होत एकदम
सो क्युट.
सो क्युट.
किती गोड....मस्तच मजा आली
किती गोड....मस्तच मजा आली वाचताना ...चौदा पंधरा सोळा सतरा हे खासच
अभि, मस्तच रे. ...चौदा पंधरा
अभि, मस्तच रे.
...चौदा पंधरा सोळा सतरा
बाकी २३ डिसेंबरचं जेवणाबद्दल जे लिहलयसं ते डिट्टो आमच्याकडेपण होत असे
मुग्धटली हो, तिच्या खोड्या
मुग्धटली हो, तिच्या खोड्या तिच्या तोंडून ऐकायला मी सुद्धा उत्सुक आहे. पण पहिल्या दिवशी मोठ्या उत्सुकतेने विचारले आज काय केले शाळेत तर फक्त `क्रीम बिस्कीट' एवढेच उत्तर मिळाले
मस्तच. चौदा पंधरा सोळा सतरा
मस्तच.

चौदा पंधरा सोळा सतरा >>>
१४,१५,१६,१७ खास परी टच
मस्तच! चौदा पंधरा सोळा सतरा
मस्तच!

चौदा पंधरा सोळा सतरा >>
कित्ती गोड!
कित्ती गोड!