रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होती का? मी मधेच डुलकते. म्हणुन बघितलं नाही.
ठो३ जायला निघाले का? अर्चिस फक्त पुर्वा अभिला सांगत होता ते पाहिलं.

काल जरा बरा जमला भाग. आजच्या भागात पण 'कोंबड्या नाssssय बाय' करकचून किंचाळते आणि सगळे जण येऊन सामूहिकरित्या घाबरतात असं दाखवलं म्हणजे, आज पण काहीतरी इंटरेस्टिंग असणार.. नेहमीप्रमाणे शेवटच्या ५-६ मिनीटात !

आज पण काहीतरी इंटरेस्टिंग असणार>>.+१

मला वाटतं ठोशाला काहीतरी झालं असेल.

सुषमा मागच्या दाराने नाथाच्या घरी मीठ आणायला गेली असेल.

अण्णी होती की. ठोठो जायला निघाले तेव्हा रडत होती.>> कसली भारी रडत होती ती. अगदी खरोखर वाटलं. तिला बघून मला पण रडायला आलं. माझी आजी आठवली.

पण ठोकळी चेहर्‍या वरची रेषा हलली नाही तिच्या. नुसती बघत बसली. जवळ पण नाही गेली. Uhoh

पहिल्या सीनमध्ये जेव्हा सुषमा जिना चढुन वरच्या खोलीत येते तेव्हा तिच्या हातात कैतरी बोचकसदृश्य आहे, नंतर जेव्हा ती बाहेरुन येते तेव्हा रिकाम्या हाती..

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा माबोकरीणीन्नो!!!

सुषमा जास्तच करतेय आता>> नै तर कै, काय त म्ह्णे मला जेवायला दिले नाही अजुन , मीठ्च क्मी आहे,
नाथा ला पन हड तुड करुन बोलते.

आणि पान्डु जे कै सान्गत होत ते तर एकदम टरकेबल....तुम्ही सगळे झोपल्यावर बोलते म्ह्णे ..बोलतच राह्ते :आओ:

आणि पान्डु जे कै सान्गत होत ते तर एकदम टरकेबल....तुम्ही सगळे झोपल्यावर बोलते म्ह्णे ..बोलतच राह्ते>> ती शेवंता असणार, पारावर बसून बोलते म्हणाला तो. आणि काल सुशी पण बरोबर त्या झाडामागून प्रकट झाली. त्याआधी तिथे आजूबाजूला पण नव्हती.

मला एकच नीटसे कळालेले नाही - पांडू शेवंताशी आधीपासूनच बोलत असतो का मग? अण्णांच्या जाण्याने शेवंता एकदम रीलीज वगैरे झाली आहे का? आता भूत अण्णा डोळे वटारून पांडूकडे बघत असतील तर मग शेवंताशी संवादाबद्दल आता भूत अण्णांना काय वाटते? बॅकग्राउंड काही नीट सेट नाही वाटत.

भूत अण्णा नसवेतच ... भूत शेवंता करत असावी सगळे नै तर मग सुशी नाथा सोबत मिळुन करत असावी

पण तो पांडू म्हणतो, की मी अण्णांना सुपारी दिली. तो गणेश म्हणतो, की अण्णा गेलेले नाहीयेत. मला वाटले दोन दोन भूतांचा खेळ चालू आहे.

शेवंता (फायनली) 'होणार सून मी ह्या घरची' असे म्हणत घरात येते आणि तिला बघू शकणारे बेरीनाना तिला आशीर्वाद देतायत अशी एक इमेज मनात आली. Happy

घरातील ज्येष्ठ लोक त्या सुषमाच्या गृहप्रवेश विरोधात गोष्टी करत असले तरी मुले (दत्ताची मुलगी पूर्वा आणि माधवचा मुलगा अर्चिस) सुषमासोबत आपण बोलले पाहिजे असा जो विचार प्रकट करतात, ती बाब स्वागतार्हच आहे. अर्चिस म्हणतो बाकीचे कुणी काही म्हणोत पण आपल्या घरात ती आली आहे म्हणजे मला तिच्याशी बोलायला आवडेलच. पूर्वा तिला अगत्याने जेवणाचे ताट करून देते, आईचा विरोध असतानासुद्धा. मुलांचा हा कल चांगला दाखविला आहे.

आता नात्याचा विचार करायला गेलो तर सुषमा ही मुलगी अर्चिस आणि पूर्वाची कोण ? असा प्रश्न आला तर तिचे नाते "आत्या" असेच होईल ना ? वयाने तर ही तिन्ही मुले एकाच गटातील दिसतात.

अण्णा गेले, शेवन्ता गेल्या, आली सुसल्या >>>> रश्मी तै प्रचन्ड हसतेय!!
अटूलाला!!!! (अनेबल टू लाफ लाउडली!!)

रश्मी ताई, नाही हो हसू शकत मी जास्त जोरात… हापिसात आहे ना. (कुछ तो रेहेम करो)

आता नात्याचा विचार करायला गेलो तर सुषमा ही मुलगी अर्चिस आणि पूर्वाची कोण ? असा प्रश्न आला तर तिचे नाते "आत्या" असेच होईल ना ? वयाने तर ही तिन्ही मुले एकाच गटातील दिसतात.<<<<
आणि अशोक मामा वयाचा विचार न केलेलाच बरा कारण एकूण शिरेलीतच सगळ्यांची वयं गंडली आहेत.

आता नात्याचा विचार करायला गेलो तर सुषमा ही मुलगी अर्चिस आणि पूर्वाची कोण ? असा प्रश्न आला तर तिचे नाते "आत्या" असेच होईल ना ? वयाने तर ही तिन्ही मुले एकाच गटातील दिसतात. >>>> मोठी फॅमिली असेल तर अस होउ शकत मामा..

असा प्रश्न आला तर तिचे नाते "आत्या" असेच होईल ना ? वयाने तर ही तिन्ही मुले एकाच गटातील दिसतात.>> काही हरकत नाही ना मामा . माझ्या आत्तेबहिणी- भाउ माझ्यापेक्शा वयाने बरेच मोठे आहेत .
माझ्या बहिणीत आणि आमच्या भाचवंडांमध्ये फर्फर तर ४-५ वर्शाच अंतर असेल .

Pages