रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे निधी . मी ही कॅलक्युलेशन करत होते. नक्की कुठल्या शेतीतला हिस्सा त्या मुलीना मिळणार . म्हणजे प्रत्येकीच्या शेतीतला का ?? की सगळे मिळून जे उत्पन्न मिळेल त्याचा

अण्णानी सहावो वाटो म्हणुन सुषमाला काही जमीन वैगेरे दिलेली दाखवायला हवी होती. नुसतच दत्ता-दत्ती कसणार त्या शेतात १५ % ? हा सहावो वाटो हे पटत नाही.

पण दत्तीचं चिडणं पटलं.> + १ , त्यात तो गणेश असा वेगळच कायतरी करतो.. आणि छायाचे चिडणे पण पटते.

बाय द वे , मांगरावरची जमीन म्ह्णजे? नापीक असते का ती ? आणि देवपुरुश असलेली जमीन कोणाला आली ते ही नाही न क्लियर झाले?

२-३ भाग पाहिले आणि प्रत्येक वेळा प्रकर्षाने जाणवले कि मुंबईचा शास्त्रज्ञ मुलगा किती वेगवेगळ्या प्रकारे - होsss, होहो, होss म्हणतो. त्याच्या संवादा मधला एक मोठा भाग हो हो हो, हाच असतो. Happy

तो हलतो, कारण तो विचारतोय, " मी कोणाच्या वाट्याक, मीं कोणाच्या वाट्याक, तां माकां सांगा !" !!डोळा मारा>>>>>>भाऊकाका Proud

माईला नदी काठची ५ एकर जमीन, ठोकळ्याला वरच्या आळीची ५ एकर जमीन, अभीला खालच्या आळीची ४ एकर जमीन, दत्ता ला मांगरावरची ६ एकर जमीन छायाला उत्पन्नातील १२% सुषमा ला उत्पन्नातील १५%. आणि शेतीतील उत्पन्न तीन भावांनी समान वाटप करावे. घरावर सगळ्यांचा समान हक्क. आता बोला दत्ता दत्ती भडकले तर काय चुकलं?

शेतीत राबणाऱ्याला जास्त मिळायला हवं. नाहीतर या म्हणाव राबायला आम्ही एकटेच राबणार नाही, असं दत्ता-दत्तीनं सांगायचं.

खूप जण असे आहेत की जरी आपलं नाव असलं तरी कोकणात जो राबतोय त्यालाच सर्व देतात उलट शहरातून आर्थिक मदत करतात. कारण कोकणात श्रीमंत बागायतदार थोडे आहेत, बाकी हल्ली हवामान इ गोष्टींमुळे तुटपुंज उत्पन्न मिळते.

पण त्यांच्या नावावर जमीन आहे ते बरं, त्यांनी दत्ताला राबायला सांगून उत्पन्न द्यावं त्याला पण आपलं नाव सोडू नये, उद्या नाही कोणी विचारलं त्यांना तर.

नक्की कुठल्या शेतीतला हिस्सा त्या मुलीना मिळणार . म्हणजे प्रत्येकीच्या शेतीतला का ?? की सगळे मिळून जे उत्पन्न मिळेल त्याचा>> स्वस्ति, तोच प्राॅब्लेम.. शेती सगळेच करणार नाहीत ना, फक्त दत्ता शेतीवर अबलंबून आहे. फारतर माईंच्या जमिनीत पिकणारं उत्पन्न गृहित धरता येईल.

आणि शेतीसाठी खर्च काय थोडा नसतो, पण तो कोणी कसा करायचा ते नाहीच मृत्युपत्रात. Uhoh
उद्या छाया म्हणेल, "माका अण्णांनी फक्त वाटो घेवक सांगितलानी हां.. खर्चाचा काय ता तुमचा तुमी बघा. " Proud

शेवंताला जुळ्या मुली तर नव्हत्या ना ? एक साधी सुषमा आणि दुसरी ती जी ऐटीत खुर्चीवर बसली होती .

उद्या छाया म्हणेल, "माका अण्णांनी फक्त वाटो घेवक सांगितलानी हां.. खर्चाचा काय ता तुमचा तुमी बघा. " फिदीफिदी > Lol

त्या सुषमाची काय भानगड आहे कळत नाही. ती कुठल्या तरी वेगळ्या वाटेने बाहेर पडते आणि परत घरात शिरते कि काय ?

तो अभि युपीएस्सी देतोय ना... त्यात एकाच ठिकाणी पोस्टिंग असते का? तो सेटल होणार म्हणतोय ते!

सुषमा खयसुन इली आन खय गेली ते माका कलले नाय.

अभीराम अजून परिक्षा देणार आहे, त्या आधीच तो स्वतला पास समजून सिलेक्ट पण झालाय.:फिदी:

रिया, तुका मालवनी जमना? मग तू गजालीर जा, थय तुका समदे मालवणी बोलाक शिकवतीला. अन तुका कोकणी शिकुक होयो तर तू गोव्याला जा गो चेडवा.School bus

Pages