नवी मुंबईतील झाडांचे प्रदर्शन

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 March, 2016 - 02:52

नवी मुंबई महानगर पालीकेने दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी २०१६ पर्यंत नवी मुंबईतील सिबीडी, वंडर्स पार्क येथे फळ, फुल, भाज्यांचे प्रदर्शन होते. प्रदर्शन अतिशय सुंदर होते. नुसती झाडे नाहीत तर पुरातन वस्तू, शेती लागवड वगैरेचे नमुनेही प्रदर्शनात लावलेले जे लहान पिढीला माहीती करून देण्यासाठी उपयुक्त होते. प्रदर्शनातील दुकानांमध्ये बी-बियाणे, खते, जंतुनाषके, उपकरणे, कुंड्या, रोपे, खत बनवायचे कल्चर सकट बास्केट अशा अनेक उपयोगी वस्तू होत्या. विविध झाडे, त्यांचे प्रकार तर एकाहून एक सरस होते.

नेचर नट्स या ग्रुप वरील श्री तुषार देसाई (शेती/बाग उपकरणे उत्पादक व डिलर्स) यांनी ग्रुपवर ह्या प्रदर्शनाची माहीती दिली होती. ते तेथिल व्यवस्थापक मंडळात असल्याने त्यांच्याकडून चांगली माहिती मिळाली. ह्याच प्रदर्शनात माबोकर साधनाचा आणि माझा छोटा गटग झाला Happy दोन तास फिरूनही अजुन वेळ पाहिजे होता असे वाटले.

ह्या प्रदर्शनात काही स्पर्धाही आयोजीत केल्या होत्या. नामवंत संस्थांनी उद्योग कंपन्यांनी ह्यात भाग घेतला होता.

प्रदर्शनातील काही प्रकाशचित्रे. मी फक्त फोटो काढलेत पण ही कलाकुसर घडविणार्‍यांना, जतन करणार्‍यांना हे प्रदर्शन भरवणार्‍यांना, व्यवस्थापकांना ह्याचे पुरेपुर श्रेय आहे.

१) प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच ही रांगोळी स्वागतासाठी होती.

२) शेत लागवडीचा नमुना

३) बैलगाडी

४) उपकरणे

५) झोपडी. ह्या झोपडीत चुल, त्यावर भाजलेली भाकरी,जात, पाटा वरवंटा अशी जुनी स्वयंपाकाची साधने होती.

६) किल्ला.

७) छोट्या कलाकृती

८) ट्रेन

९) छोट्याश्या झोपड्या.

१०) हे गार्डन किती सुंदर आहे.

११) टाकाऊतून उपयोगी टिकाऊ

१२) हिरवेगार

१३) फुलांनी सजवलेली बैलगाडी.

१४) स्पर्धेतील रांगोळी. (अजुन काही आहेत त्या रांगोळीच्या धाग्यामध्ये टाकते.)

१५) पानांपासुन केलेली कलाकुसर

१६) सुंदर कलाकृती

१७) बोन्साय

१७) अजुन एक बोन्साय

१८) वडाचे बोन्साय पहा.

१९) सुकलेल्या झाडाचा उपयोग

२०) बागेच्या लागवडीची झाडे

२१) झाडा फुलांची नावे जाणकार सांगतीलच

२२) एका प्रकारची फुले विविध रंगात

२३)

२४) मला ही फुलांनी भरलेली मोठी कुंडी फार आवडली.

२५)
From exibution

२६)

२७) झेंडू

२८) कॅकटस

२९) हेही कॅकटस. फोटो निट नाही आला पण द्यायचा मोह आवरत नाही वेगळा प्रकार वाटल्याने.

३०) विविधरंगी अडेनिअम

३१) शोभिवंत झाडे

३२)

३३) गुलाबाचे प्रकार

३४) छोटुकल्या कुंड्या

३५) विविधरंगी सुपारी (खायची सुपारी नाही)/गोंडा.

३६)

३७) हा प्रकार म्हणे हवेतच वाढतो. फक्त पाणी फवारायचे. त्याला निळी फुलेही येतात.

३८) संक्रांत वेल

३९) मी ह्या ऑरेंज फुलांची खरेदी केली.

४०)

४१)

४२)

४३)

४४) जास्वंद

४५) नंतर माझ्या कॅमेर्‍याची बॅटरी डाउन झाली त्यामुळे फोटो काढता आले नाही.
जवळ जवळ ८ ला आम्ही तिथून निघालो. इतक सुंदर प्रदर्शन पहायला मिळाल ह्याचा खुप आनंद झाला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. मस्त फोटो आहेत गं.

मी तिनही दिवस भेट दिली प्रदर्शनाला (अगदी एका दिवशी दोनदा पण... इकडे तेव्हा डिलिवरी सुरू झाली त्यामुळे प्रदर्शन अर्धवट टाकुन धावावे लागलेले.. Happy ) पण फोटो न काढता फक्त नयनसुख घेतले.. तु राधा श्रावणीचा जोरदार "हमारी मांगे पुरी करो" चा घोष सुरू असतानाही एका बाजुला फोटो पण काढत राहिलीस त्याचे कौतुक.. Happy