Submitted by विदेश on 1 March, 2016 - 00:45
बसते बिचारी एकटी आजी
देवापुढती वाती वळत
असते मुखात नामस्मरण
कधी तिचे ना कंटाळत..
गत आयुष्याचा पाढा
असते स्वत:शीच उगाळत
गालावर एखादा अश्रू
नकळत येई ओघळत..
सोसले जे आयुष्यभरात
जाईे डोळ्यासमोर तरळत
वेग वाती वळण्याचाही
जाई वाढत तसाच नकळत..
सखा जीवनातुन का गेला
सोडून अर्ध्यावरुनी पळत
आसवात का भिजती वाती
जिणे रोजचे राहीे छळत..
........ विजयकुमार देशपांडे
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता, वाती वळतानाची आजी
छान कविता, वाती वळतानाची आजी डोळ्यासमोर आली.
फार सुन्दर! अगदी डोळ्यासमोर
फार सुन्दर! अगदी डोळ्यासमोर उभी राहिली आज्जी.
निर्झरा मी_आर्या आनंद
निर्झरा
मी_आर्या
आनंद वाटला. धन्यवाद.