नमस्कार,
हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.
आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.
तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.
आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा
अरे वा !! छान !!
अरे वा !! छान !!
वा शब्दप्रेमींसाठी चांगला खेळ
वा शब्दप्रेमींसाठी चांगला खेळ आहे हा परत नवीन सुद्धा
पहिला शब्दः brain storming
पहिला शब्दः
brain storming
इंटरेस्टिंग!!
इंटरेस्टिंग!!
Brain Storming : विचार मंथन
Brain Storming : विचार मंथन
ब्रेन-स्टॉर्मिंग : यासाठी
ब्रेन-स्टॉर्मिंग : यासाठी रविवारच्या लोकरंग पुरवणीत राजीव साने यांनी एक चपखल शब्द वापरला होता. सापडला तर लिहिते.
लैच अवघड की !!
लैच अवघड की !!
पहिला शब्दः brain storming>>>
पहिला शब्दः
brain storming>>> मेंदूवादळ (हा शब्द आम्ही खरंच वापरतो)
पण तरीही अर्थाच्या जवळ जाणारा कल्पनामंथन.
बुद्धीशीलता
बुद्धीशीलता
विचार मंथन योग्य वाटतो आहे.
विचार मंथन योग्य वाटतो आहे.
brain storming चालू राहू
brain storming चालू राहू दे.
हा घ्या अजून एक शब्द
Pace
मेंदूवादळ
मेंदूवादळ
Pace: वेग
Pace: वेग
गति
गति
गती
गती
Pace = गती हा शब्द जास्त
Pace = गती हा शब्द जास्त योग्य वाटतो.
तिसरा शब्द Bib?
तिसरा शब्द
Bib?
Bib>>>> लाळेरं.
Bib>>>> लाळेरं.
आधीच्या शब्दांना अजून कोणाला
आधीच्या शब्दांना अजून कोणाला काही सुचत असेल तर येऊ द्या अजून. वेध घ्यायचाय अचूक.
लाळेरं लहान असतं नां?? बिब हे
लाळेरं लहान असतं नां?? बिब हे थोडं मोठं.
brain storming > मेंदु घुसळण
brain storming > मेंदु घुसळण
नंदिनी लाळेरं बरोबर आहे पण
नंदिनी
लाळेरं बरोबर आहे पण रेसम़धे नंबर लिहिलेल्या कागदाला पण बिब म्हणतात त्यासाठी शोधा
बिल्ला...
बिल्ला...
कशाच्या रेसमध्ये कसले नंबर
कशाच्या रेसमध्ये कसले नंबर लिहिलेल्या कुठल्या कागदाला बिब म्हणतात ते सांगा!
Brain storming - विचार-वादळ ?
Brain storming - विचार-वादळ ?
धावण्याच्या रेसमध्ये जो कागद
धावण्याच्या रेसमध्ये जो कागद चिकटवतात पोटावर.
धावक क्रम निर्देशक
धावक क्रम निर्देशक
चौथा शब्द Polite
चौथा शब्द
Polite Reminder
आधीचे शब्द विसरू नका. पर्यायी सोपे शब्द वेधा
धावण्याच्या रेसमध्ये जो कागद
धावण्याच्या रेसमध्ये जो कागद चिकटवतात पोटावर<<< मग त्याला बिल्ला म्हणतात की.
वॉव धमाल चाललीय इथे.
वॉव धमाल चाललीय इथे.
Pages