नमस्कार,
हल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.
आपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो! त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.
तर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.
आतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..
१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन
२) Pace : गती,वेग
३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक
४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)
५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती
६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा
८) Martinet : शीस्ताग्रही
९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत
१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण
११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,
१२) Blurb : सारांश,गोषवारा
व्वा मामी!
व्वा मामी!
Blurb = चौकटीतला मथळा
Blurb = चौकटीतला मथळा
मथळा म्हटल्यावर वन लायनर
मथळा म्हटल्यावर वन लायनर डोळ्यासमोर येतो.
(टायटल / शीर्षकाप्रमाणे)
मजकूर म्हणा मग. चौकटीतला
मजकूर म्हणा मग.
चौकटीतला मजकूर
polite reminder :
polite reminder : स्मरणविनंती
इन्ना, अगदी! बैठक, धारिणी
इन्ना, अगदी! बैठक, धारिणी (=file)
Blurb = पाठमजकूर
paradigm : मासलेवाईक
paradigm : मासलेवाईक उदाहरण
unplugged = मोकळा ढाकळा
paradigm - ठोकळेबाज /
paradigm - ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना
स्मरणविनंती अगदी योग्य .
स्मरणविनंती अगदी योग्य .
paradigm - धारणा
paradigm - धारणा
वा हे मस्तच.
वा हे मस्तच.
आता पुढचा शब्द Nonplussed
आता पुढचा शब्द
Nonplussed
Nonplussed : स्तंभित.
Nonplussed : स्तंभित.
नि:शब्द
नि:शब्द
दिग्मूढ.
दिग्मूढ.
Bib : बिल्ला, धावक क्रम
Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक >>> हा बिल्ला केवळ धावकच लावतात असं काही आहे कां?
धावकच लावतात असं काही आहे
धावकच लावतात असं काही आहे कां?>>
नाही... तान्ही बाळं पण लावतात. Bib=लाळेरं
निशब्द/ निरुत्तर
निशब्द/ निरुत्तर
Nonpluss = निष्प्रभ
Nonpluss = निष्प्रभ
बीब - हे एखादा धावक त्या
बीब - हे एखादा धावक त्या स्पर्धेमधे अधिकृतरित्या भाग घेत असल्याचे निदर्शक असते. तो धावक वाटेतले सर्व टप्पे पार करून गेलाय ह्याची नोंद देखिल ह्या बीबमुळे / त्यावरील क्रमांका वरून करतात. हल्ली काही वेळा त्या बिबलाच टायमिंग चिप देखिल लावलेली असते. ज्यामुळे वाटेतल्या ठराविक ठिकाणी असलेल्या टप्प्यांवरच्या मॅटवरून गेल्यावर त्या धावकाची नोंद आपोआप होते.
पुढील शब्द Panache
पुढील शब्द
Panache
Panache = झोक, ढंग, बाज, थाट,
Panache = झोक, ढंग, बाज, थाट, ठसका
दिमाख, तोरा
दिमाख, तोरा
रुबाब
रुबाब
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
अरेरे ही गंमत हुकली. आता सगळं
अरेरे ही गंमत हुकली. आता सगळं वाचून काढतो.
चांगली गंमत हुकली. Panache =
चांगली गंमत हुकली.
Panache = मिजास, तोरा.
Panache === दिखाऊपणा
Panache === दिखाऊपणा
Pages