रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनयात अर्धे अधिक भारत भीषणच आहेत ह्यात.

तो वेडसर विसराळु नोकर म्हणे अण्णांना मी चहा दिला, बिडी मागत होते. कोट दिला. म्हणजे अण्णा भुत झालेत हे नक्की.
साखरपुड्याच्या दिवशी नवर्‍या मुलाचे धडधाकट कर्ते वडील गेलेत. तरी ती देवकीच्या आईला आपला आदर सत्कार करावा वर पुन्हा आपलीच फोन करुन चौकशी करावी असं वाटतंय? कैच्याकै बडबडत होती ती. म्हणे कुणी नीट बोललं नाही, पुन्हा फोन पण केला नाही. हिनेच मयताच्या घरी जावं / फोन करावा खरं तर.
सगळेच अ अ आहे झालं.

ठोकळीला घरात काम नको म्हणून उंडारतेय.
>>:P Proud Proud
तिच्याही चालण्याचे शॉट्स दा़खवले..
आणी जेव्हा बघावे तेव्हा ती अन्ग्णातच ठाण माण्डुन बसते

तो वेडसर विसराळु नोकर म्हणे अण्णांना मी चहा दिला, बिडी मागत होते. कोट दिला. म्हणजे अण्णा भुत झालेत हे नक्की. >>> नाही तो पाण्डू विसरला कि अण्णा गेलेत.

नाईकांना पाण्याची भिती आहे.. पाण्यात गेल्यार आधीच पाण्यात गेलेली माणसां त्यांका पण पाण्यात बोलवतत, असं तो पांडू बोलत असतो ना. मग अर्चिसला आणायला अभि आणि पूर्वा पाण्यात जातात तेव्हा त्यांना नाही का कोणी बोलावत? ते पण नाईकच की? Uhoh

अग तुला मोठी जाउ तरी आहे आमच्याकडे मोठी, मधली, धाकटी सगळा वन वुमन शो आहे.. आता बोल..>> मुग्धा.. सेम गं माझ्याकडे पण. Uhoh

अभिनयात अर्धे अधिक भारत भीषणच आहेत ह्यात. Lol

आणी जेव्हा बघावे तेव्हा ती अन्ग्णातच ठाण माण्डुन बसते Lol

लकी आहे ब्वा. आम्ही गेलो कोकणात की आमच्याकडून घरच्यांना कामाच्या बऱ्याच अपेक्षा असतात, अर्थात त्यांचंही बरोबर आहे म्हणा, त्यांना तरी चेंज नको का.

ठोकळीला घरात काम नको म्हणून उंडारतेय.
>> Lol
पण घरात मदत म्हणजे फक्त जेवणात मीठ, मसाला टाकणं असतं का? कांदा चिरुन द्यायचा, खोबरं खवून द्यायचं, तांदुळ साफ करुन द्यायचे, भाजी नीट करायची किती किती काम असतात. तर हि चवीत बदल होईल म्हणून मदत करणार नाही म्हणते.

आम्ही गेलो कोकणात की आमच्याकडून घरच्यांना कामाच्या बऱ्याच अपेक्षा असतात >>>> अन्जु, तु शास्त्रज्ञ नैस ना, म्हणुन..

आम्ही गेलो कोकणात की आमच्याकडून घरच्यांना कामाच्या बऱ्याच अपेक्षा असतात >>>> अन्जु, तु शास्त्रज्ञ नैस ना, म्हणुन..

हा तो बराबर, हे लय भारी मुगु. Lol

तेचना निधी वरकाम तरी करायचं, मग घरातली जाऊ वैतागणारचना.

काय अन्जु तु तरी, इथे तिच्या शास्त्रज्ञ असण्यावरुन इतका उहापोह झाला तरी तु हे कस विसरलीस?

पण घरात मदत म्हणजे फक्त जेवणात मीठ, मसाला टाकणं असतं का? कांदा चिरुन द्यायचा, खोबरं खवून द्यायचं, तांदुळ साफ करुन द्यायचे, भाजी नीट करायची किती किती काम असतात >>>> तिच्या मुंबैच्या घरी असली काम कामवाल्या करत असतील.. कारण? Wink Proud

बाय द वे पण खरंच कोकणातील खेडेगावात राहणाऱ्या लोकांचं जीवन खरंच कठीण असतं. रांधा वाढा उष्टी काढा यातंच जातं, त्यामुळे आपण गेलं की थोडी आशा असते त्यांना की मदत मिळेल, थोडे वेगळे पदार्थ खाता येतील. आम्हाला पण टिपिकल कोकणातलं खायला मिळते.

तेच तर ना अन्जू, माणसं वाढली की कामं पण वाढतात.. अन् पाहुणे ठीकायत पण घरातली बाई असं मस्तपैकी अंगणात बसून नवर्‍याशी गप्पा मारतेय. उंडारायला जातेय आणि आपण एकट्याच राबतोय.. लय चीडचीड होणार बघ. Happy

मुग्धा, बरोबर हां तुझं पण. Happy

वैतागणारचना>> Lol भारी वाचताना जाम कन्फ्युज झाले.

भानगडबाज आण्णा >> Rofl

त्या अण्णांच्या 'भानगडीने' विहिरीत जीव दिला असणार तेव्हा पासून नाईकांना पाणी बाधत असेल

अण्णांची भानगड. म्हणूनच तो सहावा वाटा. आणि साखरपुड्याच्या दिवशी त्यांची बायको पण मक्ख होती. त्याच कारण हि तेच असेल>> कदाचित ती अंगणात बसलेली अण्णांची अनौरस मुलगी असेल तिचा असेल सहावा वाटा

नाईकांना पाणी बाधत >> पाण्याचाच सहावा वाटा असणार..
बाकी हे बाधन प्रकरण चांगलय.. हिवाळ्यात पाणी बाधत म्हणुन आंघोळच नाई कराची Biggrin

या स्माईल्यांनी धागा हाय़जॅक केला.. मला दिसतच नाईत ना त्या..
आता बबलबाथ वाली स्माईली कशी असेल याचा विचार करतेय..

नाही असं काही होणार नाही. ती सुखरुप परत येइल. इन्फॅक्ट घरचं कुणीतरी तिला आणायला जाइल.
शुक शुक असा आवाज ना? तो काय वार्‍यामुळे येत असेल. पाणी भरतीमुळे ओढुन नेत होते असं ती एक्ष्प्लेन करेल.

Pages